आजारांची माहिती

फिशर कारणे, लक्षणे, प्रकार, उपचार, पथ्य Fissure in Marathi

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

फिशर Fissure Meaning in Marathi हा मूळव्याधीचा एक उपप्रकार आहे. फिशर ही स्त्रीयांमधील प्रमुख समस्या आहे. मुख्यतः गुदमार्गात होणारे व्याधी हे मलावष्टंभ (Constipation in Marathi) व शरीरातील वाढलेली उष्णता या दोन कारणांमुळे होतात. सततच्या बध्दकोष्ठतेमुळे शौचास कुंथावे लागल्याने अनेकदा गुदमार्गाची बाह्य भागातील त्वचा फाटली जाते व तिला चिरा पडतात.

शरीरातील अतिशय संवेदनशील भागात अशा प्रकारे जखम तयार होते. यालाच फिशर असे म्हणतात. आयुर्वेदात यांस परिकर्तिका म्हटले जाते. परिकर्तिका म्हणजे कातरल्याप्रमाणे अथवा कापल्याप्रमाणे वेदना होणे. खालील लेखात फिशर ची सर्व माहिती दिलेली आहे.

फिशर म्हणजे काय? Fissure Meaning in Marathi:-

शौचास कडक होत असेल, मलाचे खडे तयार होत असतील तर ते बाहेर पडताना गुदद्वाराच्या भिंतीला त्वचेला घासून जातात व हे सतत होत राहिले की, त्या ठिकाणच्या नाजूक त्वचेला जखम तयार होते व त्वचेला चिरा पडतात यालाच ‘फिशर’ असे म्हणतात.

फिशर ची कारणे Causes of Fissure in Marathi:-

  1. मलावष्टंभ/ बध्दकोष्ठता- जास्त प्रमाणात बद्ध कोष्ठता असेल आणि शौचास साफ होत नसेल तर फिशर हा आजार होतो.
  2. अती तिखट, अती तेलकट व बाहेरचे पदार्थ जास्त प्रमाणात खाणे.
  3. रात्री अति जागरण करणे, सतत बैठे काम करणे.
  4. अपचन अति उष्ण, तिखट, मसाल्याचे पदार्थ, मांसाहार, Spicy food हॉटेलमधील पदार्थ खाणे.
  5. स्थूलपणा
  6. स्त्रियामध्ये सतत उपवास, वेळेवर जेवण न करणे, शिळे अन्न खाणे, अति तिखट खाणे.
  7. रक्त पातळ होण्याचे औषध घेणे, तसेच BP, Diabetes, T.B.,Thyroid, Asthma यांची औषधाचे सेवन रोज करणे.
  8. गरोदरपणात विविध औषध सेवन व गर्भाचे वजन पोटावर पडणे यामुळे फिशर होते.
  9. मासांहार, मद्यसेवन, तंबाखू व धुम्रपान यांचे सेवन करणे.
  10. अनुवांशिक – काही रुग्णांमध्ये फिशर हा आनुवंशिक असल्याचे दिसून येते.
  11. अतिसाराचे योग्य उपचार न करणे.

फिशर ची लक्षणे Symptoms of Fissure in Marathi:-

  1. वेदना – शौच्याच्या वेळेस व शौच विधी नंंतर गुदप्रदेशी प्रचंड वेदना होतात. पेशंटच सांगतात की, शौचास होताना डोळयापुढे काजवेच चमकतात किंवा डोळयांमध्ये पाणीच येते. यामध्ये गुदद्भागी जखम झाल्यामुळे त्याजागी कापल्याची जाणीव होते, काहीतरी टोचल्या प्रमाणे वेदना होतात. त्यामुळे पेशंट शौचास जाण्यास घाबरतो व त्या भितीने जेवणही करत नाही परिणामी, अशक्तपणा येतो.
  2. शौचाला साफ न होणे (बध्दकोष्ठता) होणे.
  3. रक्तस्त्राव – शौचास कडक झाल्याने पेशंट कुंथण्यास सुरूवात करतो व त्यामुळे त्या जागी शौचाचा दाब पडतो जखम फाटून त्यातून थेंब – थेंब रक्त पडते. कधी – कधी शौचास लागूनही रक्त पडते
  4. सूज -गुदभागी सुज येते. कारण त्याठिकाणच्या जखमांवर वारंवार कडक शौचाचा आघात होतो.
  5. खाज – गुदभागातील जखमांच्या ठिकाणी जंतूसंसर्ग होतो व तेथे दाह होऊन त्याठिकाणी खाज येण्यास सरूवात होते.
  6. लघवी साफ न होणे – कधी कधी पेशंटला वेदना व आग खूप जास्त प्रमाणात असल्याने मूत्रमार्गाच्या पेशीचेही आकुंंचन होते व लघवी साफ होत नाही किंवा वारंवार लघवीस जावे लागते.
Fissure in Marathi, फिशर म्हणजे काय, Fissure Meaning in Marathi, Fissure Treatment in Marathi, fissure symptoms in marathi, fissure in ano in marathi, फिशर कारणे, फिशर लक्षणे, फिशर प्रकार, फिशर उपचार, फिशर पथ्य, फिशर मराठी, फिशर उपचार मराठी

फिशर चे प्रकार Types of Fissure in Marathi:-

फिशर चे मुख्यतः दोन प्रकार पडतात.

१) नविन फिशर Acute fissure in Marathi:-

बध्दकोष्ठतेमुळे नुकतीच फिशरची लक्षणे दिसू लागली आहेत. ७ दिवसापेक्षा कमी दिवसांचा आजार यालाच नविन फिशर असेे Acute fissure म्हणतात. यामध्ये जखमा खोलवर नसते व गुदमार्गात जास्त इंफेक्शन जास्त पसरलेले नसते.

२) जिर्ण जुनाट फिशर Chronic Fissure in Marathi:-

खुप दिवस फिशर चा आजार अंगावर काढल्याने हा आजार जूना होत जातो. गुद भागातील जखमा आतमध्ये खोलवर वाढत जातात व आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जाते यालाच जुनाट फिशर Chronic Fissure असे म्हणतात.

या जुनाट अवस्थेत अनेकदा गुदमार्गात बाह्यभागी जखमेच्या संरक्षणार्थ शरीराकडून आवरण म्हणून मांसल भाग तयार होतो. त्याला सेन्टिनल टॅग Sentinel Tag असे म्हटले जाते.

बऱ्याचदा External Piles व Sentinel Tag यामध्ये भेद करणे कठिण जाते.

फिशर चे उपचार Fissure Treatment in Marathi:-

फिशर वर उपाय मराठी:-

१) नविन फिशर उपचार Acute fissure Treatment in Marathi –

  1. नुकताच सुरु झाल्यामुळे आयुर्वेदिक औषधं आणि पथ्य याद्वारे संपूर्ण बरे करता येतो
  2. फिशर वर उपाय मराठी – फिशरमध्ये सुरूवातीच्या अवस्थेमधे औषधांनीच बरे वाटते. यात शौचास पातळ व साफ होण्यासाठी औषधे देतात, गुदभागाची आग कमी होण्यासाठी औषधे मलम दिला जातो.
  3. तसेच वातनाशक व व्रणरोपक औषधी तेलांचे मात्राबस्ती गुदभागी दिल्याने पेशंटला ब-याच प्रमाणात आराम मिळतो, तसेच, त्या ठिकाणी local anesthetic वगैरे ही लावायला दिली जातात.
  4. रोज सकाळ – संध्याकाळ कोमट पाण्याचा त्याजागी १५ – २० मिनिटे शेक घेतल्याने पेशंटना बरे वाटते.

२) जुनाट फिशर उपचार Chronic Fissure Treatment in Marathi –

जिर्ण जुनाट फिशर साठी खालील उपचाराचे पर्याय आहेत.

  1. क्षारसूञ चिकित्सा Fissure Ayurvedic Treatment in Marathi क्षारसुञ चिकित्सेचे फायदे:-
    1. रक्तस्ञाव होत नाही
    2. कुठलीही कापाकापी नाही.
    3. ॲडमिट राहण्याची आवश्यकता नाही
    4. शौचावरील नियञंण जाण्याचा धोका नाही
    5. सर्वात महत्वाचे कमी खर्चात उपलब्ध
  2. अ‍ॅनल डायलेशन Anal Dilatation
  3. Fissurectomy फिशरेक्टॉमी – या उपचार पद्धतीत फिशर झालेला भाग शल्यकर्माद्वारे कापून टाकला जातो.
  4. Laser Treatment लेसर उपचार – या उपचार पद्धतीत गुदभागी भूल दिली जाते व अ‍ॅनल डायलेशन करून लेसर द्वारे जखम जाळून टाकली जाते. तसेच सेन्टिनल टॅग असतील तर तेही लेसर द्वारे जाळून नष्ट केले जातात.

ईत्यदि पध्दती द्वारे चिकित्सा करावी लागते. चिकित्सेनंतर रुग्णाचा फिशर आजार संपूर्णपणे बरा होतो.

फिशर पथ्यापध्य Diet for Fissure in Marathi:-

  • मूळव्याधा प्रमाणेच बद्धकोष्ठता होवू नये म्हणून काळजी घेणे.
  • पालेभाज्या, फळे व तंतूमय पदार्थ युक्त आहाराचे सेवन करणे.
  • योग्य प्रमाणात पाणी पिणे.
  • योग्य प्रमाणात आहार सेवन करणे.
  • मांसाहार व व्यसन टाळणे.
  • एका जागी जास्त वेळ बसू नये.
  • अति तिखट, अति तेलकट, अति खारट हॉटेलमधील पदार्थ टाळावे.
  • गरोदर पणात एका कुशीवर झोपणे.
  • फिशर anal fissure ची लक्षणे जाणवू लागली की त्वरीत उपचार घेणे.
Copyright Material Don't Copy © 2020

Recent Posts

जागतिक आरोग्य दिन २०२४ – माझे आरोग्य, माझे हक्क

जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास जागतिक आरोग्य दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो.… Read More

01/04/2024

राष्ट्रीय जंतनाशक दिन २०२४ प्रश्न उत्तरे Deworming day FAQ in Marathi

सन २०२३ - २०२४ राष्ट्रीय जंतनाशक दिन १३ फेब्रुवारी २०२४ व २० फेब्रुवारी २०२४ (मॉप… Read More

11/01/2024

गरोदरपणातील मधुमेह GDM in Marathi

गरोदरपणातील मधुमेह (GDM) म्हणजे काय? Gestational diabetes in Marathi :- गर्भधारणेदरम्यान जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण… Read More

07/01/2024

पोटातील जंत सर्व माहिती Roundworm Tapeworm Worm Meaning in Marathi

जंत ( Worm in Marathi ) होणे ही आपल्या देशातली महत्त्वाची समस्या आहे. ग्रामीण भागात… Read More

05/01/2024

उष्माघात कारणे लक्षणे प्रतिबंध उपचार Heat Stroke Meaning in Marathi

उष्माघात कारणे, उष्माघात लक्षणे, उष्माघात प्रतिबंध, उष्माघात उपचार, उष्माघात घरगुती उपाय, मराठी माहिती, Heat Stroke… Read More

19/03/2023