कर्करोग कॅन्सर प्रकार, लक्षणे, तपासणी, उपचार, प्रतिबंध Cancer in Marathi

cancer in marathi, kark rog, cancer marathi meaning, cancer symptoms in marathi,cancer sign in marathi, types of cancer in marathi, cancer marathi mahiti, cancer information in marathi language, cancer chi lakshane in marathi, cancer reasons in marathi, cancer treatment in marathi language, cancer upchar marathi, Cancer Prevention in Marathi, Benign Tumour in Marathi, Malignant Tumors in Marathi, Cancer Meaning in Marathi, ChemoTherapy in Marathi, RadioTherapy in Marathi, Causes of Cancer in Marathi, Tumour in Marathi, Biopsy for Cancer in Marathi, Investigations for Cancer in Marathi, Cancer Names in Marathi, Benign Tumour in Marathi, Malignant Tumour in Marathi,

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

कर्करोग / कॅन्सर Cancer in Marathi म्हणजे काय? कर्करोग / कॅन्सर कशामुळे होतो? कर्करोग / कॅन्सर ओळखावा कसा? कर्करोग / कॅन्सर प्रभावी उपचार कोणते? कर्करोग / कॅन्सर उपचारांची निवड कशी करावी? या उपचारांचे दुष्परिणाम कोणते? ईत्यादि सर्व प्रश्नांची उत्तरे व कर्करोग/ कॅन्सर ची सर्व माहिती खालील लेखात दिलेली आहे.

अनुक्रमणिका

कर्करोग / कॅन्सर (Cancer Meaning in Marathi) व्याख्या:-

पेशींच्या अनियंत्रित विभाजनातून शरीराच्या कोणत्याही भागात अनावश्यक पेशींच्या गाठी/ समुह तयार होणे म्हणजेच कर्करोग (Cancer in Marathi) होय. अश्या अनावश्यक पेशींच्या समूहालाच गाठ (Tumour) असे म्हणतात.

पेशींचे विभाजन होऊन त्यांच्या संख्येत वाढच होत रहाते जेव्हा याची आवश्यकता आपल्या शरीराला नसते आणि या पेशींच्या अमर्याद वाढीमुळे पेशींचा एक मोठा पुंजका तयार होतो आणि गाठ बनते. यालाच गाठ ( ट्यूमर ) असे म्हणतात.

गाठीचे प्रकार (Types Of Tumours):-

गाठी दोन प्रकारच्या असतात.

निरुपद्रवी गाठ (Benign Tumour in Marathi):-

अशा प्रकारच्या गाठींचा परिणाम शरीरातील इतर अवयवांवर होत नाही. साध्या गाठी कर्करोगाच्या नसतात. त्यांना पुष्कळ वेळा बाहेर काढले जाते. आणि त्या पुन्हा उत्पन्न होत नाहीत.

साध्या गाठीतील पेशी दुसऱ्या भागांत पसरत नाहीत. या साध्या गाठी कमी प्रमाणात नुकसान पोहचवितात.

दुर्दम्य ( मेलिग्नंट ) गाठ (Malignant Tumour in Marathi):-

या गाठीतील पेशी असामान्य असतात आणि अनियमित प्रमाणात नियंत्रणाच्या बाहेर जाऊन त्या पसरतात. आणि आजूबाजूच्या पेशींवर आणि अंगांवर आक्रमण करू शकतात.

अशा प्रकारच्या गाठींचा परिणाम अंतर्गत अवयवांच्या कार्यावर होतो. आणि यामुळेच कर्करोगाच्या स्थितीला दूर्दम्यता (Mallignancy) असेही म्हणतात.

अशा कॅन्सरच्या पेशी घातक ट्यमूरपासून वेगळ्या होऊन रक्त प्रवाहामध्ये किंवा लसिका पर्व ( लिम्फॅटिक सिस्टिम ) मध्ये मिसळू शकतात. अशाप्रकारे कॅन्सरचा विस्तार शरीरामध्ये होतो. आपली मूळची जागा सोडून नवीन ट्यूमर अन्य जागी तयार होतात. अशा कॅन्सरच्या विस्ताराला ‘ मेटास्टेसिस म्हटले जाते.

रक्ताद्वारे कॅन्सरच्या वाढत असलेल्या पेशी जेव्हा सर्व शरीरभर पसरतात त्या स्थितीला Metastatis असे म्हणतात.

मानवी शरीरातील कोणत्याही अवयवात कॅन्सर होऊ शकतो. सर्वाधिक तोंडाचा, स्तनांचा, आणि रक्ताचा कॅन्सर बघायला मिळतो.

अवयवा नुसार नावे/ प्रकार Cancer Names in Marathi:-

प्रामुख्याने बरेचसे कॅन्सर आपले नाव हे शरीराचे अंग किंवा ज्या प्रकारच्या पेशी त्या ठिकाणी निर्माण होतात त्यावरून प्राप्त करतात.
उदाहरणार्थ

 1. जो कॅन्सर फुफ्फुसां ( लंग्स ) मध्ये निर्माण होतो त्याला ‘ लंग कॅन्सर ‘ च्या नावाने ओळखले जाते.
 2. जो कॅन्सर , त्वचेच्या पेशींमध्ये होतो ज्याला ‘ मेलानोसाईट्स ‘ म्हटले जाते तो ‘ मेलॅनोमा ‘ या नावाने ओळखला जातो.

मेटास्टाईज्ड कर्करोगाचे Metastasized Cancer in Marathi:-

जेव्हा कॅन्सर (Cancer in Marathi) पसरतो ( मेटास्टाईजेस ) , कॅन्सरच्या पेशी साधारणतः लसिका नोड्सच्या जवळच्या भागांमध्ये ( ज्यांना पुष्कळवेळा लसिका ग्रंथी ‘ लिम्फ नोड्स ‘ सुद्धा म्हटले जाते ) आढळतात.

हाच कॅन्सर या ग्रंथींमध्ये शरीराच्या अन्य भागांमध्ये उदा . यकृत ( लीवर ). हाडांमध्ये किंवा कदाचित मेंदूमध्ये सुद्धा विस्तार झाला आहे. जेव्हा कॅन्सर आपल्या मूळ जागेपासून पसरून शरीराच्या अन्य अंगामध्ये पसरतो तेव्हा नवीन ट्यूमरमध्ये सुद्धा त्याचप्रकारे असाधारण पेशी असतात. आणि त्यांचे नाव सुद्धा मूळ ट्यूमर सारखेच संबोधले जाते.

उदाहरणार्थ जर फुफ्फुसांचा कॅन्सर पसरून मेंदूमध्ये पसरतो तेव्हा मेंदूच्या आतील पेशी वास्तवतः
फुफ्फुसाच्या कॅन्सर पेशी असतात. अशा रोगाचे नाव ‘ मेटास्टेटिक लंग ( फुफ्फुसांचा ) कॅन्सर ‘ असे म्हटले जाते. ( बेन कॅन्सर नाही )

https://marathidoctor.com/tb-tuberculosis-in-marathi-kshaya-roga.html

कर्करोगाचे प्रकार Types of Cancer in Marathi:-

 1. कार्सिनोमा – अभिस्तर पेशींचा किंवा त्वचेचा रोग
 2. सार्कोमा – संयोजी उतींचा कर्करोग
 3. लिम्फोमा – लसिकापेशींचा कर्करोग
 4. ल्युकेमिया – रक्ताचा/ श्वेतपेशींचा कर्करोग
 5. सेमिनोमा – वृषणाचा कर्करोग
 6. डीसजर्मीनोमा – अंडाशयाचा कर्करोग
 7. ब्लास्टोमा – अपरीकव पेशींचा कर्करोग

कर्करोगाची लक्षणे Symptoms of Cancer in Marathi:-

कर्करोगाची (Cancer in Marathi) लक्षणे सुरुवातीला आढळत नाहीत. न भरणाऱ्या जखमा, असाधारण रक्तस्त्राव, अपचन, ताप, वजन कमी होणे, खूप थकवा जाणवणे, त्वचेमध्ये बदल होणे. हि कर्करोगाची सामान्य लक्षणे आहेत.

 • कोणतीही घट्ट किंवा कठिण गाठ स्तनांच्या भागात किंवा अन्य कोणत्या अवयवावर येणे.
 • शरीरावर असलेल्या कोणताही तीळ किंवा मस यामध्ये बदल / परिवर्तन होणे.
 • कोणतीही जखम, खरचटणे किंवा फोड जो बरा होत नाही.
 • भरपूर खोकला किंवा कफ जो आवाजात बदल आणतो.
 • मलाशय आणि मूत्राशयाच्या क्रियेमध्ये बदल.
 • अतिसार किंवा गिळण्यामध्ये त्रास होणे.
 • कोणतेही कारण नसताना शरीराच्या वजनात बदल, वजन अचानक वाढणे किंवा कमी होणे.
 • असाधारण रक्त वहाणे किंवा मासिक पाळीच्या वेळी रक्तस्राव जास्त होणे.
 • खूपच अशक्तपणा येणे अथवा थकवा येणे.

जर अशी किंवा अन्य कोणतीही लक्षणे दिसली तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा हे महत्त्वाचे आहे.

अशी लक्षणे कॅन्सर (Cancer in Marathi) शिवाय सुद्धा दिसू शकतात याचे कारण म्हणजे कोणताही संसर्ग, किंवा सौम्य ( बिनाईन ) ट्यूमर किंवा कोणतेही अन्य कारण असू शकते. तुम्ही कोणत्याही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा हे महत्त्वाचे आहे.

ही लक्षणे किंवा दुसरे कोणतेही शरीरातील बदल तुम्ही स्वतः जाणून घ्या. एक डॉक्टरच याचे निदान करू शकतो. जास्त त्रास होईपर्यंत वाट पाहू नका. कॅन्सरच्या पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः वेदना होत नाहीत.

कर्करोगाची तपासणी Investigations for Cancer in Marathi:-

जर काही लक्षणे दिसून येत असली तर डॉक्टर तुमच्या आजारपणाचा इतिहास ( हिस्टरी ) विचारतील आणि शरीराची तपासणी करतील. साधारण स्वास्थ्याच्या तपासणी शिवाय डॉक्टर अन्य परीक्षणांचा सल्ला देतील. हे परीक्षण म्हणजे एकतर प्रयोगशाळेमध्ये तपासणी किंवा प्रतिमांकन ( ईमेजिंग ) पद्धत होऊ शकते.

कॅन्सरचा शोध सिद्ध करण्यासाठी ‘बायोप्सी’ ही अत्यंत आवश्यक असते . प्रयोगशाळेत परीक्षण रक्त आणि लघवीची तपासणी केल्याने डॉक्टरांना रुग्णाच्या स्वास्थ्याची महत्त्वपूर्ण माहिती मिळते.

पुष्कळ वेळा काही खास गोष्टी ( ज्यांना ट्यूमर उत्पादक म्हटले जाते ) या रक्तामध्ये लघवीमध्ये किंवा अन्य टिश्यूंमध्ये किती प्रमाणात आहेत याचे परीक्षण करतात. ट्यूमर उत्पादनांचा स्तर साधारणतः कोणत्या कॅन्सरमध्ये असेल तर आढळून येतो. परंतु केवळ प्रयोगशाळेतल्या परीक्षणाने कॅन्सरचे निदान केले जाऊ शकत नाही.

कर्करोगाच्या (Cancer in Marathi) चाचणीसाठीबायोप्सी (Biopsy) चाचणी मार्गांचा वापर केला जातो. यामध्ये शंकास्पद उतींचा छोटा तुकडा काढून सूक्ष्मदर्शकाखाली त्याचे निरीक्षण केले जाते.

प्रतिमांकन ( Imaging for Cancer in Marathi):-

शरीराच्या आतील भागांच्या प्रतिमा या डॉक्टरांना ट्यूमर आहे की नाही हे समजण्यास मदत करते . या प्रतिमा पुष्कळ प्रकारे बनविल्या जातात.

एक्स – रे (X ray for Cancer in Marathi):-

हा एक सर्वसामान्य प्रकार आहे ज्यामुळे शरीरातील वेगवेगळ्या भागांचे ( ऑर्गनस ) आणि हाडांचे ( बोन्स ) छायांकन केले जाते.

कॉम्प्यूटेड टोमोग्राफी सीटी किंवा कॅट ( CT / CAT for Cancer in Marathi):-

हे एक विशेष प्रकारचे प्रतिमांकन आहे ज्यामध्ये संगणक ( कॉम्प्यूटर ) एक्स – रे ला जोडले जाते जेणेकरून क्रमवार चित्रे घेतली जातात.

रेडिओन्यूक्लाईड स्कॅनिंग (Radio nuclear Scanning for Cancer in Marathi):-

रेडिओन्यूक्लाईड स्कॅनिंग मध्ये रुग्ण इंजेक्शन द्वारा किंवा गिळून किरणोत्सर्ग वस्तू शरीरामध्ये धारण करतो. एक मशीन ( स्कॅनर ) किरणोत्सर्गाचा स्तर शरीरातील काही भागांनी मापते आणि एका सावली सारखे चित्र कोणत्याही कागदावर किंवा फिल्मवर छापते.

शरीराच्या कोणत्या भागामध्ये किरणोत्सर्ग वस्तूची मात्रा अधिक आहे. त्याचप्रमाणे कोणता असाधारण भाग ओळखता येतो हे या चित्रांवरून डॉक्टरांना समजते . ही किरणोत्सर्ग वस्तू तपासणीनंतर रुग्णाच्या शरीरातून लगेच काढली जाते.

अल्ट्रासोनोग्राफी (Ultrasonography for Cancer in Marathi):-

हे एक प्रकारचे प्रतिमांकन आहे. रुग्णाच्या शरीरातील आतल्या भागांचे अध्ययन करण्याच्या हेतूने हे उपयोगात आणले जाते. उच्च कंपनाच्या लहरी ज्या मानवाच्या कानांना ऐकू जात नाहीत पण शरीरात जातात आणि त्याचे अनुगुंजन परिवर्तित होऊन परत येते हे अनुगुंजन एक चित्र निर्माण करते.

ज्याला ‘ सोनोग्राम ‘ असे म्हणतात. हे चित्र एका मॉनिटर टीवी स्क्रिनिंग वर दिसते ज्याची छपाई ( पिटींग ) केली जाऊ शकते. ‘ एम आर आय ‘ मध्ये एक शक्तिशाली चुंबक कॉम्प्यूटर बरोबर जोडले जाते. ज्यामुळे शरीरातील भागांचे विस्तृत चित्र घेतले जाते. ही चित्रे मॉनिटरवर दिसतात आणि त्यांची छपाई सुद्धा केली जाऊ शकते.

पेट स्कॅन (PET Scan for Cancer in Marathi) –

पॉझिट्रॉन एमिशन टमोग्रफी आपणांस एक इन्जेक्शन दिले जाईल ज्यांत खूप अल्प प्रमाणात रेडियो अ‍ॅक्टीव पदार्थ असेल. मशीन छायाचित्र घेईल ज्यात शरीरात चाललेल्या रासायनिक क्रिया दिसून येतील. कधी कधी कॅन्सर पेशी शरीरातील अतिक्रियाशील भाग दर्शवते.

बायोप्सी (Biopsy for Cancer in Marathi):-

 1. बायोप्सी ही प्रत्येक वेळी आवश्यक असते त्यामुळे डॉक्टरांना कॅन्सरचे निदान करण्यास मदत मिळते.शरीरात उगवलेली गाठ ही कर्करोगाची आहे का साधी आहे याचा निशितपणे निकाल लावणारी चाचणी म्हणजे बायोप्सी.
 2. गाठ आलेल्या पेशींचा किंवा जागेचा छोटासा तुकडा कादून तो सुक्ष्मदर्शिकेखाली तपासणी करून त्यात कर्करोगाच्या पेशी शिरकाव झाला आहे का हे पहाणे. हा तुकड्याचा नमुना तीन प्रकारे काढला जातो.
 3. एन्डोस्कोप , सुईची बायोप्सी आणि शल्य बायोप्सी . १ ९ एन्डोस्कोपी या क्रियेमध्ये डॉक्टर शरीरातील आतल्या भागांचा अभ्यास करू शकतात . एका पातळ प्रकाश नलिकेद्वारा त्या भागातील चित्र सुद्धा काढता येते. आणि जर आवश्यकता असेल तर पेशींचा स्तर कोष ( टिश्यू ) किंवा पेशींचा नमूना सुद्धा परीक्षणासाठी काढू शकतात.
 4. सूई बायोप्सी ( नीडल बायोप्सी ) या क्रियेमध्ये डॉक्टर एक पेशींच्या स्तर कोषा ( टिश्यू ) चा नमूना असाधारण भागामध्ये सुई घालून काढू शकतात. शल्य बायोप्सी क्रिया ही दोन प्रकारची असते.

अ‍ॅक्सीझिनल किंवा ईनसीझिनल (Oxyginal / Inscisional Treatment in Marathi):-

अ‍ॅक्सीझिनल बायोप्सीमध्ये शल्यचिकित्सक ( सर्जन ) पूर्ण ट्यूमर आणि आजूबाजूच्या काही भागांना काढून टाकतात. ईनसीझिनल बायोप्सीमध्ये डॉक्टर केवळ ट्यूमरचा एक छोटासा हिस्सा काढतात, जर कॅन्सरचा शोध लागला तर लगेच ऑपरेशन करून पूर्ण ट्यूमरच कावून टाकला जातो.

https://marathidoctor.com/%e0%a4%ae%e0%a5%82%e0%a4%b3%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a7-%e0%a4%89%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%af-%e0%a4%89%e0%a4%aa%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0-piles-in-marathi.html

कर्करोगाची कारणे Causes of Cancer in Marathi:-

कर्करोग निर्माण करणाऱ्या घटकांचे तीन गट केले जाते.

1) अपसारी/ प्रारणे ऊर्जा (Radiant Energy):-

अतिनील किरणे, क्ष- किरणे, आणि गॅमा किरणे कर्करोगजन्य असतात. ही किरणे विविध मार्गांनी डी. एन. ए. रेणूंची हानी करतात.

डी. एन. ए. वरील परिणांव्यतिरिक क्ष-किरणे आणि गॅमा किरणे उतींमध्ये घटक मुक्त मूलके निर्माण करतात. जगातील सुमारे १०% लोकांना यामुळे कर्करोग होतो.

2) रासायनिक सयुंगे (Chemical Compounds):-

जगातील सुमारे 80% लोकांना विविध रासायनिक सयुंगांमुळे कर्करोग होतो.
उदा. आर्सेनिक, कोबाल्ट, कॅडमिअम, अल्फोटॉक्सिन -B-1, अबेसटॉस, पोलिसायक्लिक हाड्रोकार्बन, बेन्झीन, बेरिलियम, निकेल, डॉक्टीनोमायसिन या संयुगांचा परिणाम DNA रेणूंतील ग्वानिन या नत्ररेणूवर होतो.

3) विषाणू (Viruses):-

कॅन्सर घडवून आणण्याची क्षमता असलेल्या जनुकांना कर्करोग जनुक म्हणतात. काही रोगांचे विषाणू कर्करोगजनक स्थिती निर्माण करतात. त्याचे प्रमाण 5% आहे.
उदा: हिपॅटिटिस -B आणि हिपॅटिटिस -C च्या विषाणूमुळे यकृताचा कर्करोग होतो.
राउस -सार्कोमा हर्पस विषाणूमुळे रक्ताचा कर्करोग होतो.
पॅपिलोमा विषाणूमुळे त्वचेचा कर्करोग होतो.

4) इतर घटक (Miscllaneous):-

 • जगातील सुमारे 5% लोकांना अनारोग्यादायी सवयीमुळे कर्करोग होतो व दिवसेंदिवस यांचे प्रमाण वाढत चालले आहे.
 • धूम्रपान आणि तंबाखू सेवनामुळे तोंड, स्वरयंत्र, फुप्फुस, ग्रसनी, ग्रासनिका, स्वादुपिंड इत्यादींचा कर्करोग होतो.
 • अतिमद्यप्राशनामुळे यकृत व ग्रासनलिका यांचा कर्करोग होतो.
 • अतिमेदयुक्त आहारामुळे स्तनांचा कर्करोग

कर्करोगाचा उपचार (Cancer Treatment in Marathi):-

कॅन्सर हा कोणत्या प्रकारचा आहे ? तो कोणत्या जागेवर झाला आहे आणि त्याचा स्तर (Stages of Cancer in Marathi) कोणता आहे ? रुग्णाचे शारिरीक स्वास्थ कसे आहे ? इत्यादि गोष्टींवर कॅन्सरची चिकित्सा अवलंबून असते.
डॉक्टर याचा अभ्यास करून रुग्णाच्या अवस्थेनुसार उपचाराची योजना बनवितात.

कॅन्सरच्या रुग्णांचा इलाज साधारणतः एक विशेषज्ञांचा समुह ज्यामध्ये शल्यचिकित्सक , किरणोपचार विशेषज्ञ ( रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट ) , मेडीकल – ऑन्कॉलॉजिस्ट आणि इतर करतात.

अधिक प्रमाणात कॅन्सरची चिकित्सा शल्यक्रिया, किरणोपचार, रसायनोपचार, हॉर्मोनथेरपी किंवा बायोलोजिकल थेरपीने केली जाते. कोणत्या प्रकारच्या चिकित्सेचा उपयोग होऊ शकतो हे डॉक्टरच निक्षित करू शकतात.

स्थानिक उपचार (Local Treatment for Cancer in Marathi):-

केवळ शरीरातील एकाच अवयवांतील कर्करोग नष्ट करतो. शल्यक्रिया हे एका अवयवांतील कर्करोगाच्या गाठी काढून टाकण्याकरता उपयोगात स्थानिक उपचार म्हणून केले जातात.
किरणोपचार पण गाठीचा आकार कमी करण्यास अथवा गाठीला नष्ट करण्यात स्थानिक उपचार म्हणून वापरले जाऊ शकतात .

सिस्टेमिक उपचार ( Systemic Treatment for cancer in Marathi):-

औषधे किंवा पदार्थ पूर्ण शरीरातील रक्तप्रवाहात कॅन्सर पेशी नष्ट करण्याकरता सोडले जातात .
ते या पेशी नष्ट करतात किंवा त्यांची वाढ कमी करतात ज्यामुळे प्राथमिक जागेपासून रोगाचा फैलाव शरीरांत अन्य ठिकाणी झाला असल्यास त्यावर निर्बंध घातला जातो, रसायनोपचार, अंतःस्राव चिकित्सा, तसेच जैविक ( बायोलॉजिकल ) चिकित्सा हे ह्या प्रकारचे होत.

चिकित्सकीय परीक्षण ( क्लिनिकल ट्रायल्स ):-

अनुसंधान परीक्षणाने पर्यायी औषधांचे ज्ञान होते , जी अन्य कॅन्सर पीडित रुग्णांना लाभदायक होऊ शकते. असे अनुसंधान अध्ययन पुष्कळ नविन चिकित्साचा परिचय करून देतात. आणि अन्य वैज्ञानिक शंकांचे समाधान करतात.

या अध्ययनांचा उद्देश हा असतो की नविन आणि अधिक कार्यरत चिकित्सांचा शोध जो कॅन्सरला अधिक नियंत्रणात ठेवू शकतो आणि ज्याचे पुष्कळ कमी दुष्परिणाम असतील.

शल्यचिकित्सा Operation for Cancer in Marathi:-

कर्करोगग्रस्त पेशी व ऊती शल्यचिकित्सेद्वारे पूर्णपणे काढून टाकणे

रेडियो थेरपी RadioTherapy in Marathi:-

रेडियो थेरपी चा वापर:- मानवी शरीरातील कॅन्सरच्या उपचारासाठी कोबाल्ट 60 चा वापर, थायरॉईड ग्रंथींच्या कर्करोगाच्या उपचारासाठी किरणोत्सारी आयोडीनचा वापर, जीभ आणि गर्भाशयाच्या कॅन्सरच्या उपचारासाठी किरणोत्साराचा वापर केला जातो.

किमो थेरपी ChemoTherapy in Marathi:-

किमो थेरपी:- कँसरविरोधी औषधांचा वापर, प्रामुख्याने रक्ताच्या कॅन्सरच्या उपचारासाठी

ऍस्पिरीन:- या औषधांमुळे कर्करोगामुळे होणारा संभाव्य मृत्यूचा धोका 7% ने कमी झाला आहे.

टॅमॉक्झिफेन किंवा रॅलोक्झिफेनमुळे स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कँसर होण्याचा धोका कमी होऊ शकतो.

कर्करोगाचा प्रतिबंध (Cancer Prevention in Marathi):-

 1. विषाणूंमुळे होणाऱ्या कर्करोगाविरुद्ध मानवी पॅपिलोमा विषाणू लस आणि हिपॅटिटिस-बी ची लस यांचा वापर केला जातो.
 2. तंबाकू – तंबाकू धूम्रपान ( सिगारेट , विडी , चिरुट , पाईप चिलम , हुक्का इत्यादि ) टाळणे.
 3. वजन नियंत्रित ठेवणे.
 4. रासायनिक पदार्थांचे सेवन / वापर करु नये.
 5. किरणोत्सर्ग टाळणे.
 6. मद्य सेवन टाळणे.
 7. कर्करोगाची कोणतीही लक्षणे जाणवल्यास त्वरीत उपचार घ्या.
 8. स्टिरॉईड चे दिर्घकालीन सेवन डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नये.
 9. सर्व प्रकारच्या कर्करोगावर सरकारी हॉस्पिटल मध्ये मोफत उपचार मिळतो.

हत्तीरोग मराठी माहिती:-

https://marathidoctor.com/filariasis-in-marathi.html
Copyright Material Don't Copy © 2020