घरगुती उपाय

आले (आर्द्रक) – सुंठ गुण व औषधी उपयोग

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

आले ( सुंठ) :-

आर्द्रक आल्याचे झाड एक हात उंच वाढते. त्याच्या मुळ्यांना आले म्हणतात.

सुंठ:- सुकलेल्या आल्याला सुंठ असे म्हणतात.

सुंठीला महौषध ( महाण औषध ) किंवा विश्व भेषज (सर्व विकारांवर उपयोगी ) असेही म्हणतात. 

आले – सुंठ गुण व औषधी उपयोग, www.marathidoctor.com

आले – सुंठ गुण :-

आले हे पाचक, सारक, अग्निदीपक आमपाचक, वातशामक, वातानुलोमक, शूल नाशक, रूचिप्रद व कंठास हितकर आहे.
सुंठ लघु, स्निग्ध तिखट पण मधुर विपाकाची व उष्णवीर्य आहे. आले गुरू, तीक्ष्ण, तिखट व उष्ण आहे. 

आलेपाक :-

आल्याचा रसात चौपट पाणी व साखर घालून पाक होईपर्यत उकळावे नंतर त्यांत केशर , वेलची , जायफळ , जायपत्री व लवंग यांचे चूर्ण घालून तो भरून ठेवावा .

मात्रा – डोस :-

आल्याचा रस ५ ते १० मिली

सुंठ चूर्ण १ ते २ ग्रॅम.

औषधी उपयोग :-

सूज, घशाचे रोग, खोकला, दमा, पोटफुगी, उलटी व पोटदुखी यांवर उपयोगी.  खोकला, दमा , भूक न लागणे व अग्निमाद्यांवर उपयोगी. 

१ ) भूक न लागणे :-

आल्याच्या रसात लिंबाचा रस व सैंधव घालून द्यावे. 

२ ) अजीर्ण :-

सुंठ व जवखार यांचे चूर्ण गरम पाण्याबरोबर द्यावे. 

३ ) ओकारी :-

आल्याचा व कांद्याचा रस प्रत्येकी २ – २ चमचे मिक्स करूनद्यावा. 

४ ) आमांश ( आव ) :-

सुंठ , बडिशेप , खसखस व खारीक यांचे चूर्ण गरम पाण्याबरोबर द्यावे. 

५ ) कृमी व अग्निमांद्य :-

सुंठ व वावडिंग यांचे चूर्ण मधाबरोबर द्यावे. 

६ ) पोटदुखी :-

पोटदुखी – सुंठ , सज्जीक्षार ( सोडा बायकार्ब ) व हिंग यांचे चूर्ण गरम पाण्याबरोबर द्यावे.

७ ) परिणाम शूल :-

जेवण केल्यानंतर जर पोटात दुखत असेल तर त्याला परिणाम शूल असे म्हणतात.

सुंठ, तीळ व गूळ एकत्र कुटून गाईच्या दुधात शिजवून द्यावी. 

८ ) संग्रहणी व प्लीहावृद्धी :-

सुंठीच्या काढ्याने सिद्ध केलेले तूप द्यावे. 

९ ) मूळव्याध :-

सुंठीचे चूर्ण ताकाबरोबर द्यावे. 

स्वयंपाक घरातील औषधे

१० ) सर्दि पडसे :-

आले किंवा सुंठ दालचिनी व खडीसाखरेबरोबर द्यावे. 

११ ) खोकला, दमा :-

( १ ) आल्याचा रस मधाबरोबर घ्यावा.

( २ ) आल्याचा रस दुप्पट खडीसाखर किंवा गुळाबरोबर द्यावा. 

१२ ) ताप :-

जीर्ण ज्वर – सुंठ ताकाच्या निवळीत उगाळून २१ दिवस द्यावी. 

१३ ) सूज –

( १ ) गुडाईक योग – अर्धा चमचा आल्याचा रस व १ / २ चमचा जुना गूळ – पहिल्या दिवशी . नंतर रोज १ चमचा या प्रमाणे वाढवत दहाव्या दिवशी ५ चमचे आल्याचा रस व ५ चमचे गूळ द्यावा . एक महिना द्यावे.

( २ ) सुंठीची पूड गुळांत कालवून पुनर्नव्याच्या रसात किंवा काढ्यात द्यावी.

१४ ) आमवात:-

सुंठ ४ भाग + बडिशेप १ भाग एकत्र करून गुळाबरोबर खावे.

१५ ) कंबर – पाठ दुखी :-

आल्याच्या रसांत किंवा महाळुगाच्या रसांत तूप घालून द्यावे. 

१६ ) अर्धशिशी :-

आल्याचा रस नाकांत पिळावा.

लसूण व सुंठीचे चूर्ण ह्यांनी सिद्ध केलेले गाईचे तूप – १ ते २ चमचे प्रमाणांत द्यावे. 

१७ ) श्वेतप्रदर :-

सुंठी सिद्ध दूध गाईचे दूध – १४० मिलि . + पाणी २१० मिलि . + सुठ ८ ग्रॅम + साखर ८ ग्रॅम पाणी आटून जाईपर्यंत उकळावे रोज – सकाळ संध्याकाळी २१ दिवस घ्यावे.

आवळ्याचे गुण व औषधी उपयोग

१८ ) वीर्यवृद्धी साठी :-

सुंंठ १० ग्रॅम २० ग्रॅम तुपात तळावी . नंतर त्यात १० ग्रॅम गूळ व ५० मि . लि . पाणी घालून पाणी आटेपर्यंत उकळावे. सकाळी व संध्याकाळी द्यावे. 

१९ ) लघवीचे प्रमाण वाढल्यास :-

आल्याचा रसात खडीसाखर घालून दोन वेळा द्यावा. 

२० ) लघवीत खर पडणे :-

सुठीच्या काढ्यात हळद व गूळ घालून प्यावा.

आले सुंठ निषिद्ध /वर्ज्य :-

ग्रीष्मवशरद ऋतूत , रक्तपित्त व पांडुरोगात आले – सुंठ देऊ नये.

Recent Posts

जागतिक आरोग्य दिन २०२४ – माझे आरोग्य, माझे हक्क

जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास जागतिक आरोग्य दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो.… Read More

01/04/2024

राष्ट्रीय जंतनाशक दिन २०२४ प्रश्न उत्तरे Deworming day FAQ in Marathi

सन २०२३ - २०२४ राष्ट्रीय जंतनाशक दिन १३ फेब्रुवारी २०२४ व २० फेब्रुवारी २०२४ (मॉप… Read More

11/01/2024

गरोदरपणातील मधुमेह GDM in Marathi

गरोदरपणातील मधुमेह (GDM) म्हणजे काय? Gestational diabetes in Marathi :- गर्भधारणेदरम्यान जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण… Read More

07/01/2024

पोटातील जंत सर्व माहिती Roundworm Tapeworm Worm Meaning in Marathi

जंत ( Worm in Marathi ) होणे ही आपल्या देशातली महत्त्वाची समस्या आहे. ग्रामीण भागात… Read More

05/01/2024

उष्माघात कारणे लक्षणे प्रतिबंध उपचार Heat Stroke Meaning in Marathi

उष्माघात कारणे, उष्माघात लक्षणे, उष्माघात प्रतिबंध, उष्माघात उपचार, उष्माघात घरगुती उपाय, मराठी माहिती, Heat Stroke… Read More

19/03/2023