उष्माघात कारणे, उष्माघात लक्षणे, उष्माघात प्रतिबंध, उष्माघात उपचार, उष्माघात घरगुती उपाय, मराठी माहिती, Heat Stroke Meaning in Marathi, उष्माघात व्याख्या, शरीराचे तापमान नियंत्रित करणारा घटक कोणता?, उपघात, शरीरातील उष्णता वाढण्याची कारणे, उष्णतेचे विकार, उष्माघात प्रथमोपचार, उष्माघात meaning in English,
उष्माघात अतिशय कडक उन पडणाऱ्या भागामध्ये उष्माघाताचे प्रमाण जास्त असते. महाराष्ट्रात विदर्भामध्ये दरवर्षी उष्माघाताने अमेक मृत्यु होतात. वयस्कर, दारु पिणारे व्यक्ती, लहान मुले इत्यादी मध्ये उष्माघाताचे प्रमाणं उन्हाळ्याच्या दिवसाच जास्त दिसून येते.
महाराष्ट्रात सर्वत्र सध्या उष्णतेची लाट पसरली आहे. प्रखर उन्हामुळे होणाऱ्या उष्माघातापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. आरोग्य विभागाने नागरिकांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे व सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे
उष्माघात होण्याची कारणे
- उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे.
- कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यातील कामे करणे.
- जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे.
- घट्ट कपड्याचा वापर करणे.
- अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येण्याने उष्माघात होतो.
उष्माघाताची लक्षणे
- थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे
- भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे
- रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैन व अस्वस्थता, बेशुद्धावस्था इत्यादी
- उष्णतेच्या लाटेमुळे शारिरीक ताण पडून मृत्यु होण्याची शक्यता आहे.
उष्माघाताचे उपचार
- रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कुलर ठेवावेत, वातानुकुलित खोलीत ठेवावे.
- रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावेत.
- रुग्णास थंड पाण्याने आंघोळ घालावी.
- रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, आईसपॅक्ड लावावेत.
- आवश्यकतेनुसार शीरेवाटे सलाईन देणे.
१) शरीराचे उष्णतामान तात्काळ कमी करणे आवश्यक आहे. उष्माघात झालेल्या व्यक्तीस प्रथम सावलीत आणावे
२ ) रुग्णाला वारा घालावा.
३ ) रुग्णाचे कपडे काढून त्याच्या अंगावर थंड पाणी ओतत रहावे.
४) दर एक १० मिनिटांनी रुग्णाचा ताप मोजून नोंद करावी. ताप ३८ डिग्री होईपर्यंत थंड पाण्याचा मारा चालु ठेवावा.
५) वैद्यकिय मदत मिळवावी.
६ ) उष्माघातामुळे उद्भवणारे आणीबाणीचे गंभीर प्रसंग टाळण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाण्यामध्ये मिठ, साखर घालून ते भरपुर प्रमाणात दिवसभर पीत रहावे व उन्हात फिरतांना डोक्याला रुमाल बांधावा.
काय करावे
उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी खालील उपाययोजना करण्यात याव्यात.
- तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यावे
- हलकी, पातळ व सच्छिद्र सूती कपडे वापरावेत
- बाहेर जाताना गॉगल्स, छत्री/ टोपी, बुट व चपलांचा वापर करण्यात यावा
- प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी
- उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा तसंच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा
- शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा नियमित वापर करावा
- अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
- गुरांना छावणीत ठेवावे तसेच त्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी द्यावे
- घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर, व सनशेडचा वापर करावा, तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे
- कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी
- सूर्यप्रकाशाशी थेट संबंध टाळण्याचे कामगारांना सूचित करावे
- पहाटेच्यावेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा
- बाहेर कामकाज करताना मध्ये मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करावा
- गरोदर महिला कामगार व आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी
- रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावेत.
- जागोजागी पाणपोईची सुविधा उभारावी.
- उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टि.व्ही . किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा.
- तहान लागलेली नसली तरी सुद्धा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे.
- हलकी , पातळ व सछिद्र सुती कपडे वापरावेत.
- बाहेर जातांना गॉगल्स , छत्री / हॅट , बुट व चप्पलाचा वापर करण्यात यावा.
- प्रवास करतांना पाण्याची बाटली सोबत घ्यावी.
- जर आपण बाहेर उन्हात काम करीत असाल तर हॅट किंवा छत्रीचा वापर करण्यात यावा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके , मान , चेहरा झाकण्यात यावा.
- उन्हाळ्यात शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने ओ आर . एस . घरी बनविण्यात आलेली लस्सी, आंबील, लिंबुपाणी, ताक इत्यादीचा वापर करण्यात यावा.
- अशक्तपणा स्थुलपणा , डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.
- गुरांना छावणीत ठेवण्यात यावे . तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास यावे. घर थंड ठेवण्यासाठी पडदे , शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात.
- पंखे ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे.
- कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.
- सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करण्यात यावे.
- पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा.
- तसेच बाहेर कामकाज करीत असताना मध्ये मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करण्यात यावा.
- जर गरोदर वा आजारी असाल तर अधिकची काळजी घेण्यात यावी.
काय करु नये
- लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या किंवा पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये
- दुपारी १२.०० ते ३.३० कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे
- गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे
- बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत
- उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवावीत
- लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या वा पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.
- दुपारी १२.०० ते ३.०० या कालावधीत बाहेर उन्हात जाण्याचे टाळावे.
- गडद घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
- बाहेर तापमान जास्त असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत.