सुंठ गुण,आले - सुंठ गुण व औषधी उपयोग, www.marathidoctor.com , dr.vivekanand ghodake, मराठी डॉक्टर सुंठ औषधी उपयोग, आले औषधी उपयोग, आले गुण
अनुक्रमणिका
आर्द्रक आल्याचे झाड एक हात उंच वाढते. त्याच्या मुळ्यांना आले म्हणतात.
सुंठ:- सुकलेल्या आल्याला सुंठ असे म्हणतात.
सुंठीला महौषध ( महाण औषध ) किंवा विश्व भेषज (सर्व विकारांवर उपयोगी ) असेही म्हणतात.
आले हे पाचक, सारक, अग्निदीपक आमपाचक, वातशामक, वातानुलोमक, शूल नाशक, रूचिप्रद व कंठास हितकर आहे.
सुंठ लघु, स्निग्ध तिखट पण मधुर विपाकाची व उष्णवीर्य आहे. आले गुरू, तीक्ष्ण, तिखट व उष्ण आहे.
आल्याचा रसात चौपट पाणी व साखर घालून पाक होईपर्यत उकळावे नंतर त्यांत केशर , वेलची , जायफळ , जायपत्री व लवंग यांचे चूर्ण घालून तो भरून ठेवावा .
आल्याचा रस ५ ते १० मिली
सुंठ चूर्ण १ ते २ ग्रॅम.
सूज, घशाचे रोग, खोकला, दमा, पोटफुगी, उलटी व पोटदुखी यांवर उपयोगी. खोकला, दमा , भूक न लागणे व अग्निमाद्यांवर उपयोगी.
आल्याच्या रसात लिंबाचा रस व सैंधव घालून द्यावे.
सुंठ व जवखार यांचे चूर्ण गरम पाण्याबरोबर द्यावे.
आल्याचा व कांद्याचा रस प्रत्येकी २ – २ चमचे मिक्स करूनद्यावा.
सुंठ , बडिशेप , खसखस व खारीक यांचे चूर्ण गरम पाण्याबरोबर द्यावे.
सुंठ व वावडिंग यांचे चूर्ण मधाबरोबर द्यावे.
पोटदुखी – सुंठ , सज्जीक्षार ( सोडा बायकार्ब ) व हिंग यांचे चूर्ण गरम पाण्याबरोबर द्यावे.
जेवण केल्यानंतर जर पोटात दुखत असेल तर त्याला परिणाम शूल असे म्हणतात.
सुंठ, तीळ व गूळ एकत्र कुटून गाईच्या दुधात शिजवून द्यावी.
सुंठीच्या काढ्याने सिद्ध केलेले तूप द्यावे.
सुंठीचे चूर्ण ताकाबरोबर द्यावे.
आले किंवा सुंठ दालचिनी व खडीसाखरेबरोबर द्यावे.
( १ ) आल्याचा रस मधाबरोबर घ्यावा.
( २ ) आल्याचा रस दुप्पट खडीसाखर किंवा गुळाबरोबर द्यावा.
जीर्ण ज्वर – सुंठ ताकाच्या निवळीत उगाळून २१ दिवस द्यावी.
( १ ) गुडाईक योग – अर्धा चमचा आल्याचा रस व १ / २ चमचा जुना गूळ – पहिल्या दिवशी . नंतर रोज १ चमचा या प्रमाणे वाढवत दहाव्या दिवशी ५ चमचे आल्याचा रस व ५ चमचे गूळ द्यावा . एक महिना द्यावे.
( २ ) सुंठीची पूड गुळांत कालवून पुनर्नव्याच्या रसात किंवा काढ्यात द्यावी.
सुंठ ४ भाग + बडिशेप १ भाग एकत्र करून गुळाबरोबर खावे.
आल्याच्या रसांत किंवा महाळुगाच्या रसांत तूप घालून द्यावे.
आल्याचा रस नाकांत पिळावा.
लसूण व सुंठीचे चूर्ण ह्यांनी सिद्ध केलेले गाईचे तूप – १ ते २ चमचे प्रमाणांत द्यावे.
सुंठी सिद्ध दूध गाईचे दूध – १४० मिलि . + पाणी २१० मिलि . + सुठ ८ ग्रॅम + साखर ८ ग्रॅम पाणी आटून जाईपर्यंत उकळावे रोज – सकाळ संध्याकाळी २१ दिवस घ्यावे.
सुंंठ १० ग्रॅम २० ग्रॅम तुपात तळावी . नंतर त्यात १० ग्रॅम गूळ व ५० मि . लि . पाणी घालून पाणी आटेपर्यंत उकळावे. सकाळी व संध्याकाळी द्यावे.
आल्याचा रसात खडीसाखर घालून दोन वेळा द्यावा.
सुठीच्या काढ्यात हळद व गूळ घालून प्यावा.
ग्रीष्मवशरद ऋतूत , रक्तपित्त व पांडुरोगात आले – सुंठ देऊ नये.
चिकनगुनिया हा एक विषाणूजन्य आजार आहे जो डासांच्या चावण्यामुळे पसरतो. हा आजार प्रामुख्याने एडिस इजिप्ती… Read More
डेंग्यू हा डासांमुळे पसरणारा एक गंभीर आजार आहे जो डेंग्यू विषाणूमुळे होतो. हा आजार प्रामुख्याने… Read More
जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास जागतिक आरोग्य दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो.… Read More
bhagar-khatana-kay-kalaji-ghyavi-bhagar-vhishbadha-bhagar-acidity Read More
सन २०२३ - २०२४ राष्ट्रीय जंतनाशक दिन १३ फेब्रुवारी २०२४ व २० फेब्रुवारी २०२४ (मॉप… Read More
गरोदरपणातील मधुमेह (GDM) म्हणजे काय? Gestational diabetes in Marathi :- गर्भधारणेदरम्यान जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण… Read More