Latest news on coronavirus in Marathi कोरोना व्हायरस ची आजची नविन माहिती करोना व्हायरस कसा पसरतो ? करोना व्हायरस लस, करोना व्हायरस प्रतिबंध, करोना व्हायरस उपचार, करोना व्हायरस निदान, करोना व्हायरस तपासणी, करोना व्हायरस लक्षणे इत्यादि सर्व माहिती खालील लेखामध्ये दिलेली आहे.
CoronaVirus in Marathi, Coronavirus in maharashtra, Coronavirus marathi news, Coronavirus in india, Coronavirus in info marathi, Coronavirus symptoms in marathi, coronavirus in Mumbai, Coronavirus in thane, Coronavirus in Solapur
अनुक्रमणिका
करोना विषाणू आजार ( nCov ) कोविड – १९ सद्य: स्थिती २७ एप्रिल २०२० पर्यंंत:-
Latest news on coronavirus in Marathi, करोना विषाणू आजची नविन माहिती –
जगभरातील दिनांक २७ एप्रिल २०२० पर्यंत एकूण रुग्ण – ३०,२१,०४१ मृत्यू – २,०८,५२७, पुर्ण बरे झालेले रुग्ण – ८,९१,२१२
दिनांक २७ एप्रिल २०२० पर्यंत भारतामध्ये २८,३८१ रुग्ण आढळले असून ८८६ मृत्यू झाले आहेत. ६३६२ रुग्ण उपचारानंतर पुर्ण बरे झाले आहेत.
दिनांक २७ एप्रिल २०२० पर्यंत महाराष्ट्रामध्ये ८,५९० रुग्ण आढळले असून ३६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रामध्ये १,२८२, रुग्ण बरे झाले. आज
चीनच्या बाहेर भारतासह श्रीलंका, नेपाळ, जपान, थायलंडदक्षिण कोरिया, अमेरिका, इराण, इटली इत्यादी २१० देशांनीही या आजाराचे रुग्ण नोंदविले आहेत.
देशनिहाय मृत्यू दि. २७ एप्रिल २०२० पर्यंंत –
- चीन – ४,६३३
- इटली – २६,६४४
- इराण – ५,८०६
- दक्षिण कोरिया – २३८
- जपान – ३७२
- फ्रान्स – २२,८५६
- अमेरिका – ५५,८७९
- स्पेन – २३,५२१
- इंग्लड – २०,७३२
- भारत – ८८६
भारत राज्यनिहाय रुग्ण व मृत्यु दि. २७ एप्रिल २०२० पर्यंंत:-
अ . क्र . | राज्य | रुग्ण संख्या |
१ | दिल्ली | २,९१८ |
२ | हरियाना | २८९ |
३ | राजस्थान | २,१८५ |
४ | उत्तर प्रदेश | १,८६८ |
५ | केरळ | ४५८ |
६ | तेलंगाणा | १००२ |
७ | जम्मू कश्मीर | ५२३ |
८ | झारखंड | ८२ |
९ | कर्नाटक | ५०३ |
१० | महाराष्ट्र | ८,०६८ |
११ | पंजाब | ३१३ |
१२ | तामिळनाडू | १,८८५ |
१३ | उत्तराखंड | ५० |
१४ | आध्रप्रदेश | १,०९७ |
१५ | गुजरात | ३,३०१ |
१६ | आसाम | ३६ |
१७ | लडाख | २० |
१८ | बिहार | २७४ |
१९ | पं बंगाल | ६४९ |
२० | उडिसा | १०३ |
२१ | पांंडुच्चेरी | ७ |
२२ | छत्तिसगढ | ३७ |
२३ | मध्यप्रदेश | २,०९६ |
२४ | हिमाचल प्रदेश | ४० |
२५ | अंदमान | ३३ |
२६ | चंदिगड | ३० |
२७ | गोवा | ७ |
२८ | मिझोराम | १ |
२९ | मनिपूर, त्रिपूरा | प्रत्येकी २ |
३० | मेघालय | १२ |
एकूण | २८,३८१ |
महाराष्ट्र – सद्य : स्थिती दिनांक २७ एप्रिल २०२० पर्यंंत:-
अ. क्र. | जिल्हा / मनपा | बाधित रुग्ण |
१ | पिंपरी चिंचवड मनपा | ७२ |
२ | पुणे | १,०२७ |
३ | मुंबई | ५,७७६ |
४ | नागपूर | १२७ |
५ | बुलढाणा | २१ |
६ | कल्याण + डोबिवली | १४५ |
७ | नवी मुंबई | १३५ |
८ | उल्लासनगर, जालना, नांदेड, बीड | प्रत्येकी १ |
९ | अहमदनगर | २९ |
१० | इस्लामपूर + सांगली+कुपवाड | २७ |
११ | धुळे | ९ |
१२ | ठाणे | ३३५ |
१३ | गोंंदिया, वाशीम | प्रत्येकी १ |
१४ | औरंगाबाद | ३८ |
१५ | वसई विरार | ११५ |
१६ | जालना, चंद्रपूर | प्रत्येकी २ |
१७ | यवतमाळ | ६२ |
१८ | अमरावती | २२ |
१९ | लातूर | १० |
२० | उस्मानाबाद | ३ |
२१ | मिरा-भाईंदर | १२१ |
२२ | पालघर | २५ |
२३ | नाशिक | २३ |
२४ | मालेगाव | १२३ |
२५ | सिधुदुर्ग,बीड | प्रत्येकी १ |
२६ | अकोला | २१ |
२७ | बदलापूर | १४ |
२८ | सोलापूर | ६५ |
२९ | पनवेल | ४३ |
३० | भिवंडी | १४ |
३१ | रायगड | १८ |
३२ | जळगाव | २० |
३३ | नंदुरबार | ११ |
३४ | सातारा | २९ |
३५ | कोल्हापूर | ११ |
३६ | रत्नागिरी | ८ |
३७ | हिगोली | ८ |
३८ | परभणी | १ |
एकूण | ८,५९० |
CoronaVirus in Marathi, coronavirus in pune, coronavirus in maharashtra, coronavirus marathi news
बाधित रुग्णांसाठी करण्यात आलेल्या नियंत्रणात्मक उपाययोजना –
१ ) बाधित रुग्णांच्या प्रवासाचा आणि त्यानंतरचा इतिहास माहिती घेऊन निकटसहवासितांचा शोध घेतला जात आहे.
२ ) ज्या भागात रुग्ण आढळले आहेत त्या निवासी सोसायटीमध्ये आवश्यक पथके स्थापन करुन घरोघर सर्वेक्षण फ्ल्यू सदृश्य आजारांचा शोध घेतला जात आहे.
३ ) रुग्ण ज्या कंपनीत काम करतो तेथील संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.
४ ) निकट सहवासितांपैकी लक्षणे असलेल्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात भरती करुन प्रयोगशाळा तपासणी केली जात आहे.
५ ) लक्षणे नसलेल्या निकटहवासितांना घरी विलग राहण्याचा सल्ला आणि पाठपुरावा केला जात आहे.
६) सर्वेक्षण आणि इतर कृतियोजनेचे अंमलबजावणीसाठी आरोग्य , नगरविकास , महसूल विभागाचा आंतरविभागीय समन्वय
७ ) संपुर्ण देशामधे १४ एप्रिल २०२० पर्यंत लॉक डाऊन करण्यात आला आहे.
विमाततळावरील स्क्रिनिंग आणि इतर तपशील –
१ ) २० मार्चपर्यंत मुंबई पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत १,६८४ विमानांमधील २, २१, ९२५ प्रवासी तपासण्यात आले आहेत.
२ ) आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकुण ११४३ प्रवासी आले आहेत .
३ ) जानेवारी पासून ताप , सर्दी , खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ७७४ जणांना भरती करण्यात आले आहे.
४ ) आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी सर्व ८६९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ५२ जण पॉझिटिव्ह आले आहेत .
५ ) बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण १०४३ प्रवाशांपैकी ४४२ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे .
करोना विषाणू – सर्वसाधारण माहिती –
CoronaVirus in Marathi, coronavirus marathi news –
करोना हे विषाणूच्या एका समूहाचं नाव आहे साध्या सर्दी खोकल्यापासून ते सार्स ( Severe Acute Respiratory Syndrome ) किंवा मर्स ( Middle East Respiratory Syndrome ) यासारख्या गंभीर आजारासाठी करोना विषाणू कारणीभूत असतात
नवीन करोना विषाणू आजाराची लक्षणे:-
CoronaVirus in Marathi, करोना व्हायरस लक्षणे, coronavirus symptoms in marathi –
ही मुख्यत्वे श्वसनसंस्थेचे निगडीत असतात ती सर्वसाधारणपणे इन्फ्लुएन्झा आजारा सारखीच असतात. सर्दी , ताप, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे, निमोनिया, काहीवेळा मूत्रपिंड निकामी होणे अशी लक्षणे मुख्यत्वेकरून आढळतात. या आजारास जागतिक आरोग्य संघटनेने कोविड – १९ असे नाव दिले आहे .
करोना विषाणूमुळे होणारा आजार पसरतो कसा ?
करोना विषाणू मुळे होणारा आजार नेमका कसा पसरतो याबाबत अजून बरीचशी संदिग्धता असली तरी सर्वसाधारणपणे हा आजार हा हवेवाटे शिंकण्या खोकल्यातून जे थेंब बाहेर पडतात त्यातून पसरतो. करोना विषाणूचे मूळ स्थान प्राणी जगतात आहे.
करोना विषाणू आजारावर कोणतेही औषध अथवा लस उपलब्ध नाही. रुग्णास त्याच्या लक्षणानुसार उपचार केले जातात.
करोना आजार होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायला हवी?
Coronavirus in info marathi, Prevention of Coronavirus in Marathi –
१ ) श्वसनसंस्थेचे विकार असणा-या व्यक्तीशी संपर्क ठेवताना संसर्ग न होण्याची काळजी घेणे.
२ ) हात वारंवार धुणे.
३ ) शिंकताना , खोकताना नाकातोंडावर रुमाल अथवा टिश्यू पेपर धरणे
४ ) अर्धवट शिजलेले, कच्चे मांस खाऊ नये.
५ ) फळे , भाज्या न धूता खाऊ नयेत.
खाली नमूद केलेल्या व्यक्तींनी ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा –
१ ) श्वसनास त्रास होणा – या व्यक्ती आणिहा त्रास कोणत्या आजारामुळे होतो आहे हे स्पष्ट होत नसल्यास व रुग्णाने बाधित देशात प्रवास केला असल्यास .
२ ) प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्ती आणि ज्यांनी नुकताच बाधित देशात प्रवास केला आहे.
नवीन करोना विषाणू ( कोविड – १९ ) – उपाययोजना:-
करोना विषाणू आजाराच्या प्रतिबंध व नियंत्रणासाठी केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रात पुढील उपाय योजना राबविण्यात येत आहेत –
१ . आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचे स्क्रीनिंग –
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार करोना बाधित देशातून येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रिनिंग मुंबझुणे व नागपूरसह देशातील ३० विमानतळांवर सुरू करण्यात आले आहे . सध्या सर्व देशातील प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात येत असुन चीन , हॉगकॉग , सिंगापूर थायलंड , व्हिएतनाम , इंडोनेशिया , मलेशिया , जपान , द . कोरिया , नेपाळ , इराण आणि इटली या देशांमधून येणा – या प्रवाशांचा पाठपुरावा आयडीएसपी मार्फत करण्यात येत आहे .
२ . बंदरावर परदेशातून येणा-या जहाजांची तपासणी –
राज्यातील मोठया तसेच सर्व लहान बंदरांवरही कोविड – १९ आजाराच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून येणा – या प्रत्येक जहाजाची तपासणी करण्यात येत आहे आणि त्या अनुषंगाने आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे .
३ . बाधित देशातून आलेल्या प्रवाशांचा पाठपुरावा –
जे प्रवासी करोना बाधित देशातून भारतामध्ये येत आहेत त्यांची माहिती दैनंदिन स्वरूपामध्ये विमानतळ आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत राज्य आरोग्य विभागास कळविली जाते .
- केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणा – या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येते .
- १२ मोठया प्रमाणावर करोना बाधित असणा – या देशातून आलेल्या आणि लक्षणे नसलेल्या इतर प्रवाशांची यादी पाठपुराव्यासाठी राज्यातील आरोग्य विभागास दैनंदिन स्वरुपात देण्यात येते .
- बाधित भागातून येणा – या प्रत्येक प्रवाशाला १४ दिवसांकरिता घरी थांबण्यास ( होम आयसोलेशन ) सांगण्यात आले आहे .
- या सर्व प्रवाशांचा ते बाधित देशातून आलेल्या तारखेपासून पुढील १४ दिवस दैनंदिन पाठपुरावा करण्यात येतो . त्यांच्यामध्ये करोना आजार सदृश्य लक्षणे निर्माण झाली आहेत किंवा कसे याबाबत दैनदिन विचारणा करण्यात येते .
- याशिवाय अशी लक्षणे आढळल्यास त्यांनी स्वतःहून आरोग्य विभागात कळवण्याबाबत देखील प्रत्येक प्रवाशास सुचित करण्यात आले आहे .
- या दैनंदिन पाठपुराव्यामध्ये एखाद्या प्रवाशामध्ये संशयित करोना आजाराची लक्षणे आढळल्यास त्याला विलगीकरण कक्षात भरती करण्यात येते .
- भारत सरकारने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार आज मध्यरात्रीपासून जेप्रवासी चीन , इटली , इराण , द . कोरिया , फ्रान्स , स्पेन आणि जर्मनी मधून भारतात येतील त्यांना त्यांच्या वर्गवारीनुसार १४ दिवसांकरिता क्वारंटाईन करण्यात येणार आहे
४ . प्रयोगशाळा निदान व्यवस्था –
नवीन करोना विषाणु आजाराच्या रुग्ण निदानाची व्यवस्था राज्यात पुढील ३ प्रयोगशाळांमध्ये करण्यात आलेली आहे –
- राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था ( एन आय व्ही ) , पुणे
- कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळा , मुंबई
- इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय , नागपूर
५ . विलगीकरण आणि उपचार व्यवस्था –
संशयित करोना आजारी रुग्णांना भरती करण्यासाठी सध्या मुंबईमध्ये कस्तुरबा रुग्णालय आणि पुण्यात नायडू रुग्णालय येथे आवश्यक विलगीकरण व उपचार सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे . या शिवाय प्रत्येक जिल्हा रुग्णालयात आणि शसकीय वैद्यकीय महाविद्यालयातही विलगीकरण कक्ष कार्यान्वित करण्याबाबत संबंधितांना सूचित करण्यात आले आहे .
६ . खाजगी रुग्णालयातही विलगीकरण कक्ष सुरु करण्याबाबत मार्गदर्शक सूचना –
कोविड १९ आजाराच्या उद्रेकाचे स्वरुप लक्षात घेऊन पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याच्या दृष्टीने खाजगी रुग्णालयांमध्येदेखील विलगीकरण कक्ष सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या साठी हॉस्पिटल चेकलिस्ट तयार करण्यात आली आहे .
७ . आवश्यक साठा
अ. क्र. | वस्तूचे नाव | उपलब्ध | शेरा |
१ | पी पी ई कीट | १ ९८०१ | स्थानिक पातळीवर जिल्हा शल्य चिकित्सक आणि महानगरपालिका यांना खरेदी करण्याबाबत आदेश . |
२ | एन – ९५ मास्क | २९, १८६ | क्षय रोग विभागाकडेही उपलब्धता, १ . ८० लाख मास्कचे नवीन खरेदी आदेश त्यापैकी ९५ हजार एन ९५ मास्क जिल्ह्यांना वितरित . |
३ | ट्रिपल लेयर मास्क | १४, ४०, ९३८ ४ | – |
४ | व्हिटीएम किट | ४४२ | स्थानिक पातळीवर खरेदी करण्याची अनुमती . |
८ . आरोग्य शिक्षण –
राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सर्वसामान्य जनता , वैद्यकीय व्यावसायिक आणि बाधित भागातून आलेल्या प्रवाशांसाठी आरोग्य शिक्षण विषयक साहित्य तयार करण्यात आले असून ते सर्व संबंधितांना वितरित करण्यात आले आहे
१ ) करोना विषाणू संसर्ग काळजी करू नका सावध रहा.
२ ) लक्षणे दिसल्यास उपचार घ्या.
३ ) हे करा
- स्वतःला व इतरांना सुरक्षित ठेवा साबण व पाणी वापरून आपले मन हात स्वच्छ धुवा.
- शिंकतानाव खोकताना आपल्या नाकावर व तोंडावर रुमाल धरा, सर्दी किंवा पल्ल्यू सदृश्य लक्षणे असलेल्या लोकांशी नजीकचा संपर्क टाळा.
- मांस आणि अंडी पूर्णपणे शिजवून व उकडून घ्या.
- जंगली अथवा पाळीव प्राण्यांशी निकट संपर्क टाळा.
संपर्क साधा – सार्वजनिक आरोग्य विभाग , महाराष्ट्र शासन
राष्ट्रीय कॉल सेंटर क्र – + 91 – 11 – 23978046
राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्र – 020 – 26127394
टोल फ्री हेल्पलाइन – 104
९ . अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन –
सोशल मिडियावर करोना संदर्भात विविध अर्धवट माहिती असणारे , चुकीचे , भिती उत्पन्न करणारे संदेश फिरताना दिसत आहेत . असे कोणतेही संदेश हे अधिकृत स्रोतांकडून खात्री करुन घेतल्याशिवाय पुढे पाठवू नयेत तसेच आवश्यक असल्यास नागरिकांनी हेल्प लाईन लाफोन करुन शंका निरसन करुन घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे .
१० . राज्यआणि जिल्हास्तरीयअधिका-यांचे प्रशिक्षण –
दिनांक ६ मार्च रोजी देशपातळीवरील प्रशिक्षकांचे प्रशिक्षण घेण्यात आले असून दिनांक १२ – १३ मार्च रोजी राज्यपातळीवरील प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले असून यामध्ये राज्यातील २०५ अधिका-यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे .
११ . करोना नियंत्रण कक्ष –
सर्वसामान्य नागरिकांसाठी टोल फ्री १०४ क्रमांक करोना विषयक शंकासमाधानासाठी उपलब्ध करण्यात आला आहे . याशिवाय संचालक आरोग्य सेवा पुणे कार्यालयात करोना नियंत्रण कक्ष स्थापन ( ०२० – २६१२७३९४ ) करण्यात आला असून तो २४x ७ या कालावधीत कार्यरत आहे . नवीन करोना विषाणू आजाराबद्दलच्या मार्गदर्शक सूचना सर्व संबंधितांना पाठविण्यात आल्याअसून त्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहेत.
करोना – सर्वेक्षण सद्य: परिस्थिती –
दिनांक – १८ मार्च २०२० पर्यंंत –
Latest news on coronavirus in Marathi, coronavirus in marathi , करोना विषाणू आजची नविन माहिती, करोना व्हायरस –
दिनांक १८ जानेवारीपासून भारत सरकारच्या आदेशानुसार सुरुवातीला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर केवळ चीनमधील बाधित भागातून येणा – या प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग सुरु करण्यात आले आहे . त्यामध्ये वेळोवेळी बदल करण्यात येऊन सध्या मुंबईसह पुणे आणि नागपूर येथे सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे स्क्रिनिंग सध्या करण्यात येत आहे .
या स्क्रिनिंग संदर्भातील ताजी आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –
दिनांक १८ मार्च पर्यंत स्क्रिनिंग करण्यात आलेले प्रवासी | १,८१,९२५ |
विमानतळावरील स्क्रिनिंग आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आढळलेले एकूण प्रवासी | १२९७ |
१४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झालेले प्रवासी | ६४७ |
पाठपुराव्यामध्ये करोनासदृश्य लक्षणे आढळलेले व भरती केलेले प्रवासी | ७७४ |
करोना बाधित प्रवासी | ४१* |
निगेटिव्ह नमुने | ३०५ |
सध्या रुग्णालयात भरती असलेले रुग्ण (संशयीत + रुग्ण) | ३३० |
* १८ मार्च नुसार अद्ययावत
सध्या रुग्णालयात भरती असलेले रुग्ण –
- कस्तुरबा रुग्णांलय – ५९
- नायडू हॉस्पिटल – ४५,
- अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटल – ४,
- यवतमाळ सिव्हिल हॉस्पिटल – ९,
- वायसीएम हॉस्पिटल – ४१,
- पी व्ही पी हॉस्पिटल, सांगली – २,
- जिल्हा रुग्णालय, पालघर – ५,
- धूत हॉस्पिटल, औरंगाबाद – १,
- शा. वै. म. नागपूर – १९,
- नाशिक सिव्हिल हॉस्पिटल – २
सारांश –
कोरोना मुळे फक्त १ ते ३ % रुग्णांचा मृत्यु होतो. त्यामुळे घाबरुन जाऊ नका, परंतु कोरोना ची लागण होऊ नये यासाठी दक्षता घ्या.