खालील लेखात कोरोना व्हायरस प्रतिबंध करण्यासाठीचा आयुष मंत्रालय सल्ला, योगासन, प्राणायाम, जिरे, धणे, लसूण, हळद, च्यवनप्राश, तुळस, दालचिनी, काळी मिरी, सुंठ, मनुका, गंडुष, नस्य, पुदीना, लवंग, ओवा इत्यादि सर्व माहिती दिलेली आहे. AYUSH Coronavirus Advisory in Marathi
आयुष मंत्रालयाने कोविड १९ कोरोनाच्या साथी दरम्यान स्वत: ची काळजी घेण्यासाठी खालील उपाययोजना सूचविल्या आहेत.
कोविड १९ कोरोनाच्या उद्रेकाने जगातील संपूर्ण मानवजातीला त्रास होत आहे. शरीराची नैसर्गिक संरक्षण प्रणाली (रोग प्रतिकारशक्ती) वाढविणे चांगले आरोग्य राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
अनुक्रमणिका
प्रतिबंध करणे हे उपचार करण्यापेक्षा चांगले:-
आपल्या सर्वांना माहित आहे की प्रतिबंध करणे हे उपचार करण्यापेक्षा चांगला असते.
१ ) आत्तापर्यंत कोविड -१९, कोरोना व्हायरस साठी कोणतेही औषध सध्या उपलब्ध नाही त्यामुळे साथीच्या या काळात आपल्या प्रतिकारशक्तीला चालना देणारे प्रतिबंधक उपाय करणे चांगले होईल.
२ ) आयुर्वेद जीवन विज्ञान आहे, आरोग्यसंपन्न आणि आनंदी जीवन जगण्यासाठी निसर्गाच्या या देणगीचा उपयोग व प्रसार करावा.
३ ) आयुर्वेद आरोग्य विज्ञाना मध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना यावर विस्त्रृत वर्णन पथ्य, अपथ्य, दिनचर्या व ऋतुचर्या याद्वारे दिलेले आढळते.
आयुर्वेद हे निसर्गातून निर्माण झालेले आरोग्यशास्त्र आहे. Ayurveda and Coronavirus in Marathi-
४ ) आयुर्वेदाच्या ग्रंथांमधे वर्णन केलेल्या उपदेशांचे पालन स्वत: च्या आरोग्याचे रक्षण, रोगांपासून प्रतिबंधन करणे व आरोग्यसंपन्न निरोगी जीवन जगण्यासाठी करावे.
५ ) स्वतःबद्दल जागरूकता आणि प्रतिकारशक्तीची वाढ करून, प्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यासाठीआयुर्वेदाच्या शास्त्रवचना मधे जोर देण्यात आला आहे.
६ ) आयुष मंत्रालय श्वसन आरोग्याच्या संदर्भात विशेष प्रतिबंधात्मक उपाय आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी खालील स्वयं-काळजी मार्गदर्शक तत्त्वांची शिफारस करतो.
कोरोना व्हायरस आयुष मंत्रालय सल्ला:-
AYUSH Coronavirus Advisory in Marathi – AYUSH Ministry Corona Salla –
१ ) दररोज नेहमी पिण्यासाठी गरम पाण्याचा वापर करा.
२ ) आयुष मंत्रालयाने (#YOGAatHome #StayHome #StaySafe) सल्ला दिल्यानुसार कमीतकमी ३० मिनिटे योगासन, प्राणायाम आणि ध्यान करण्याचा रोजचा सराव करा.
३ ) जीरा (जिरे), धनिया (धणे) आणि लहसुन (लसूण) , हळदी (हळद) ईत्यादि मसाले अन्नपदार्थ शिजवताना वापरावेत.
आयुर्वेदिक रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे उपाय:-
How to Increase Immunity in Marathi ?, Boost Immunity in Marathi –
१ ) च्यवनप्राश:-
Chyawanprash in Marathi
१० ग्रॅम (१ चमचा) च्यवनप्राश चे रोज सकाळी सेवन करावे.
मधुमेह असलेल्यांनी बिना साखरेच्या च्यवनप्राश चे सेवन करावे.
२ ) आयुर्वेदिक काढा:-
Ayurvedic Kadha for Prevention of Coronavirus in Marathi –
दिवसातून एक किंवा दोन वेळा तुळशी (तुळस), दालचिनी (दालचिनी), कालिमिर्च (काळी मिरी), सुंठ (वाळलेले आले) आणि मनुका पासून बनविलेले हर्बल चहा / डिकोक्शन / काढा प्या.
आवश्यकते नुसार गूळ (नैसर्गिक साखर) आणि / किंवा ताजे लिंबाचा रस त्यात घाला.
३ ) गोल्डन मिल्क:-
Golden Milk in Marathi –
अर्धा चहाचा चमचा हळद (हळद) चूर्ण १०० मिली गरम दुधात – दिवसातून एकदा किंवा दोनदा सेवन करावे.
सोपी आयुर्वेदिक प्रक्रिया:-
१. नस्य :-
Nasya in Marathi _
नाकामधे तेल किंवा औषधी द्रव्य सोडणे या प्रक्रियेला नस्य असे म्हणतात.
तिळाचे तेल / नारळ तेल किंवा तूप दोन्ही नाकपुड्यांमध्ये (प्रतिमर्ष नास्य) सकाळी आणि संध्याकाळी घाला.
२. गंडुष – Oil pulling therapy :-
Oil Pulling Therapy in Marathi –
१ टेबल स्पून तीळ किंवा खोबरेल तेल याचा गंडुष धारण करावा.
गंडुष २ ते ३ मिनिटे तोंडात धारण करावा आणि त्या नंतर थुंकून टाका. त्यानंतर कोमट पाण्याने मुख स्वच्छ धुवा.
दिवसातून एकदा किंवा दोन वेळा गंडुष धारण करावे.
कोरड्या खोकला / घसा दुखणे उपाय:-
Dry Cough / Throat Pain Treatment in Marathi –
१ ) पुदिना (पुदीना) पाने किंवा अजवाईन ओवा (कॅरवे बियाणे) गरम पाण्यात टाकूण त्याचा वाफारा दिवसातून एकदा घ्या.
२. खोकला किंवा घशात जळजळ झाल्यास लवंग (लवंग) पावडर नैसर्गिक साखर / मधात मिसळून दिवसातून २ ते ३ वेळा सेवन करा.
सामान्यतः कोरडा खोकला आणि घसा खवखवणे यावर वरील प्रमाणे उपाययोजना केल्या जातात. तथापि, ही लक्षणे कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे सर्वात चांगले.
सारांश:-
प्रत्येक व्यक्तीच्या सोयीनुसार वरील उपायांचे शक्य तितक्या प्रमाणात पालन केले जाऊ शकते.
वरील आयुष मंत्रालयचा कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक सल्ला हा कोरोना व्हायरस आजार होऊ नये यासाठी आहे, कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी नाही.
हा आयुष मंत्रालयाचा कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक सल्ला आपल्या देशातील १६ श्रेष्ठ आयुर्वेद तज्ञाद्वारे तयार केलेला व आयुष मंत्रालयाने प्रकाशित केला आहे.
संदर्भ:-
आयुष मंत्रालयाचे अधिकृत संकेतस्थळ – https://www.ayush.gov.in/docs/123.pdf