आरोग्य कर्मचारी अधिकार आणि कर्तव्य

बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) कर्तव्ये, जबाबदाऱ्या MPW Job Chart in Marathi

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

MPW Job Chart in Marathi, MPW म्हणजे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) होय, या पदावर काम करणाऱ्यास आरोग्य सेवक असेही म्हणतात.

महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग ( शासन निर्णय क्रमांक – आरईएस १०,१००१ / प्र.क्र .१ / १२२ / सेवा ) बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी ( पुरुष ) या पदाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या बहुउद्देशीय आरोग्य सेवक योजनेतर्गत प्रत्येक ५००० जनसंख्येकरिता , आदिवासी आणि डोंगरी भागात ३००० लोकसंख्येकरिता एक उपकेंद्र स्थापन करून तेथे एक आरोग्य सेवक व एक आरोग्य सेविका नियुक्त करण्यात आलेली आहे .

MPW आरोग्य सेवक पात्रता / शैक्षणिक अहर्ता – सध्या हे १२ वी उत्तीर्ण झालेले तर पूर्वीच्या काळी इयत्ता १० वी उत्तीर्ण झालेले या पदासाठी पात्र असत.

आरोग्य सेवकाने (MPW) त्याच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक घरी १५ दिवसांत एकदा भेट देणे आवश्यक आहे.

आरोग्य सेवकांच्या (MPW) जबाबदा-या

१ ) हिवताप नियंत्रण कार्यक्रम

दर पंधरवडयाला प्रत्येक घरी भेटी देवून तापाच्या रुग्णांची चौकशी करणे, तापाचा रुग्ण आढळल्यास रक्त नमुना घेवून हिवतापाचा गृहितोपचार देणे. हिवतापाचा जंतू आढळलेल्या रक्त नमुन्याची नोंद करणे व आरोग्य सहाय्यकाला समूळ उपचारासाठी कळविणे. कार्यक्षेत्रात हिवताप फवारणी विषयक बाबींची देखरेख करणे.

कार्यक्षेत्रात कायमची व तात्पुरती डास उत्पत्ती स्थाने शोधून त्यांत गप्पी मासे सोडणे. हिवतापाचा अभिलेख काढणे व अहवाल ठेवणे. लोकांना खालील गोष्टी बाबत आरोग्य शिक्षण देणे तापाच्या रुग्णाचे तपासणीचे महत्व, घरात फवारणीचे महत्व, डास अळी नियंत्रणाचे महत्व, हिवतापाचा प्रसार होवू नये म्हणून विविध उपाय योजना.

२ ) साथरोग नियंत्रण

  1. गृहभेटी दरम्यान साथीच्या आजाराचे रुग्ण शोधून काढणे . उदा . अतिसार , हगवण , पुरळ असलेले तापाचे रुग्ण , मेंदूदाह , धनुर्वात , काविळ , घटसर्प , पोलिओ इ.आणि अचानक साथीच्या आजाराचे अपेक्षेपेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास आरोग्य सहाय्यक व वैद्यकिय अधिकारी यांना तातडीने कळविणे.
  2. साथ नियंत्रण उपाययोजना राबविणे.
  3. क्षारसंजीवनीचे द्रावण तयार करून अतिसाराच्या रुग्णांना वयोगटाप्र

३ ) कुष्ठरोग

  1. गृहभेटीत कातडीवर चट्टा आढळल्यास किंवा कातडीच्या रंगामध्ये बदल व त्या ठिकाणी संवेदना नसल्यांस अशा रुग्णांची नोंद करणे.
  2. रुग्ण नियमित उपचार घेतो किंवा नाही याची खात्री करणे .
  3. कुष्ठरोगामुळे व्यंगत्व येवू नये म्हणून आरोग्य शिक्षण देणे .
  4. अनियमित व अर्धवट उपचार घेतलेल्या रुग्णांना नियमित व संपूर्ण औषधोपचारासाठी प्रवृत्त करणे . व असे रुग्ण आरोग्य सहाय्यक ( पु ) यांच्या निदर्शनास आणणे .
  5. कुष्ठरुग्ण व त्यांच्या कुटुंबातील सहवासित यांच्याशी सुसंवाद साधून कुष्ठरोगाबाबत असलेले गैरसमज दूर करणे .
  6. बहुविध औषधोपचार योजनेची अंमलबजावणी करणे .
  7. नवीन कुष्ठरुग्ण शोध मोहिम राबविणे .
  8. कुष्ठरुग्णांचा पाठपुरावा व सर्वेक्षण करणे .

४ ) क्षयरोग

  1. संशयित क्षयरोगी शोधून थुकी नमुना घेणे . व तो तपासणीसाठी प्रा.आ.केंद्र किंवा क्षयरोग केंद्रात पाठवणे .
  2. क्षयरुग्णांच्या नियमित उपचाराची खात्री करणे
  3. अनियमित व अर्धवट उपचार घेतलेल्या रुग्णांना नियमित व संपूर्ण औषधोपचारासाठी प्रवृत्त करणे . व असे रुग्ण आरोग्य सहाय्यक ( पु ) याच्या निदर्शनास आणणे.
  4. पंधरा दिवसापेक्षा जास्त दिवस खोकला व ताप असल्यास लोकांना थुकी नमुना तपासून घेण्याविषयी आरोग्य शिक्षण देणे .
ANM job Chart in Marathi

५) परीसर स्वच्छता

  1. सार्वजनिक पाण्याच्या साठयांची नियमित शुध्दीकरणाची खात्री करणे.
  2. पाणी नमुना आणि विरंजक चूर्ण नमुना प्रयोगशाळेत तपासणीस नियमित पाठवणे .
  3. लोकांना खालील बाबींवर आरोग्य शिक्षण देणे .
    1. घरातील स्वच्छता , बिनधुराची चूल व उपयोग सुरक्षित संडासाचे फायदे व उपयोग , मलमुत्राची व सांडपाण्याची योग्य विल्हेवाट .
  4. समाजाला खालील गोष्टी करुन घेण्याबाबत मार्गदर्शन मदत करणे . शोषखड्डा , परसबाग , खतखड्डा , सुरक्षित संडास .

६) जीवनविषयक आकडेवारीची नोंद

  1. कार्यक्षेत्रात होणाऱ्या जन्म मृत्युंची नोंद करणे व तसा अहवाल आरोग्य सहाय्यक यांना कळवणे .
  2. कार्यक्षेत्रात होणाऱ्या रुग्णांची नोंद करणे . आणि कायदयानुसार कमी वय असणाऱ्या मुलामुलींचे लग्न ठरल्यास किंवा झाल्यास आरोग्य सहाय्यक यांच्या निदर्शनास आणणे .
  3. जन्म आणि मृत्युची नोंद वेळीच करण्याचे महत्व लोकांना सांगणे .

७) प्रथमोपचार व किरकोळ आजारांवर उपचार

  1. प्रथमोपचाराचे साहित्य , क्षारसंजिवनीची पाकिटे व किरकोळ आजारावरील औषधे योग्य त्या व्यक्तिना / रुग्णांना उपलब्ध करून देणे .
  2. गंभीर आजार व गुंतागुंत झालेल्या , किाकोळ व साध्या आजारांच्या रुग्णांना वैद्यकिय अधिकारी प्रा.आ.केंद्र किंवा जवळच्या दवाखान्यांत पाठविणे.
  3. आरोग्य मार्गदर्शकाने पाठवलेल्या रुग्णांवर उपचार करणे . व आवश्यक बाटल्यांस रुग्ण पुढील उपचारासाठी पाठविणे .

८) अंधत्व नियंत्रण कार्यक्रम

  1. संशयित मोतिबिंदू रुग्णांची यादी तयार करणे , त्यांना तपासणीसाठी पाठविणे व पक्व मोतिबिंदू असणाऱ्या रुग्णास मोतिबिंदू शस्त्रक्रिया करून घेण्यास प्रवृत्त करणे .
  2. मोतिबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णास पाठपुरावा करणे.
  3. डोळयांची योग्य घेण्याबाबत आरोग्य शिक्षण देणे.

९) प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम

  1. आरोग्य सेविकेसोबत समाजाच्या आरोग्य विषयक गरजांवर आधरित उपकेंद्राचा कृती आराखडा करणे .
  2. जोखमीचे गरोदरपणी वैद्यकिय उपचाराची आवश्यकता असलेल्या व प्रजननाविषयी समस्या असलेल्या स्त्रियांना आरोग्य सेविकेकडे पाठविणे.
  3. गुतागुत आढळून आलेल्या नवजात अर्भकास व मातेस प्रथम स्तर संदर्भसेवा केंद्रात ताबडतोब पाठविण्यासाठी मदत व पाठपुरावा करणे.
  4. मातांना व वयात येणाऱ्या मुलीना एकत्रित पणे खालील बाबींवर आरोग्य शिक्षण देणे . कौटुंबिक आरोग्य , माता आणि मुलांचे आरोग्य , कुटुंब नियोजन , आहार , सांसर्गिक आजारावर नियंत्रण , लसीकरण , वैयक्तिक व परीसर स्वच्छता ई . जेणेकरुन रोगांपासून बचाव करण्यासाठी आणि आरोग्य चांगले राखण्यासाठी लोक स्वतः पुढे येतील.
  5. लैगिक आजार व प्रजनन मार्गाचा जंतुसंसर्ग झालेल्या रुग्णंचा शोध घेणे व त्यांना आवश्यक त्या सेवा देणे .
  6. प्रत्येक गावांत आरोग्य सेवा सत्र आयोजित करुन आरोग्य सेविकेसोबत आवश्याक त्या आरोग्य सेवा पुरविणे आणि लसीकरण कार्यक्रमांत आरोग्य सहाय्यिकेला मदत करणे.
  7. विविध सांसर्गिक आजाराविरुध्द लसीकरणचे महत्व आणि लसीकरण वेळापत्रकाबाबत लोकांना आरोग्य शिक्षण देणे .
  8. लसीकरणाद्वारे टाळता येणाऱ्या आजारांचे सर्वेक्षण करणे.
  9. शालेयपूर्व मुलांमध्ये आणि अर्भकांमध्ये कुपोषणाचे रुग्ण शोधून काढून अशा मुलांना आवश्यक तो उपचार देणे आणि नजीकच्या अंगणवाडी आणि बालवाडी केंद्रात पुरक आहार घेण्याबाबत किंवा वैद्यकिय अधिकारी प्रा.आ.केंद्र यांचे कडे जाणचा सल्ला देणे .
  10. शालेय पूर्व बालके गरोदर माता , स्तनदा माता आणि कुटुंब नियोजनाची पध्दत स्विकारणाऱ्यांना आरोग्य सेविकेशी समन्वय साधून लोह युक्त गोळयांचे वाटप करणे .
  11. ३ वर्षाखालील बालकांना जीवनसत्व अ च्या मात्रा पाजणे .
  12. स्थनिक पातळीवर उपलब्ध असणऱ्या अन्नपदार्थापासून समतोल आहार तयार करण्याबाबत लोकांना माहिती व आरोग्य शिक्षण देणे .
  13. कुटुंब पहाणी करणे व योग्य जोडप्यांची यादी अद्ययावत ठेवणे
  14. व्यक्तिगत किंवा एकत्रितपणे योग्य जोडप्यांना कुटुंब नियोजनाचा संदेश देणे .आणि कुटुब नियोजनासाठी प्रवृत्त करणे .
  15. पात्र योग्य जोडप्यांना पाळणा लांबवणसाठी साधने पुरविणे .
  16. कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करुन घेणेसाठी आणि तांबी बसवून घेणेसाठी आलेलया लाभार्थीना सुविधा पुरविणे व मदत करणे .
  17. कुटुब कल्याण शस्त्रक्रिया करुन घेतलेल्या पुरुष लाभार्थ्यांचा पाठपुरावा करणे आणि डेपो होल्डरांची निवड करणे आणि त्यांच्या समस्या सोडविणे .
  18. समाधानी पुरुष लाभार्थी , स्थानिक नेते , आरोग्य मार्गदर्शक , शिक्षक , स्वयंसेवक आणि इतरांशी चांगले स्नेहसंबंध प्रस्थापित करुन कुटुब कल्याण कार्यक्रमाला चालना देण्याबाबत प्रवृत्त करणे .
  19. निरोध व तोंडाने घ्यावयाच्या गर्भनिरोधक गोळयांच्या वाटपासाठी डेपोहोल्डर्सची निवड करणे , त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आरोग्य सहाय्यिकेला मदत करणे आणि डेपोळोल्डर्सना बरील साधनांचा नियमित पुरवठा करणे .
  20. जनसभेमध्ये सहभागी होऊन मुलांच आरोग्य कुटुंब कल्याण इत्यादीवर माहिती व आरोग्य शिक्षण देणे .
  21. लैगिक समानतेवर समाजाला प्रवृत्त करणे व प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमात पुरुषांचा सहभाग साधण्यासाठी प्रवृत्त करणे . वैद्यकिय गर्भपात करुन घेणा – या स्त्रियांना जवळच्या सरकारमान्य केंद्रात पाठविणेसाठी मदत करणे व आरोग्य सहाय्यिकेला कळविणे .
  22. वैद्यकिय गर्भपात करुन घेणासाठी उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती स्त्रियांना करुन देणे
  23. असुरक्षित गर्भपात केल्यामुळे होणा – या गंभीर परिणामाबाबत लोकांना आरोग्य शिक्षण देणे त्यांना असुरक्षित आणि बेकायदेशिर गर्भपात करुन घेण्या पासून परावृत्त करणे . .

१०) आयोडीन न्यूवता विकार नियंत्रण कार्यक्रम :

  1. आयोडीनच्या कमतरतेमुळे होणा – या आजारांचे रुग्ण शोधून काढणे .
  2. वापरण्यात येणा – या मिठात आयोडीनचे प्रमाण तपासणे .
  3. वापरण्यात येणा – या मिठाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठवणे .
  4. आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारे विकार / आजार आणि आयोडीनयुक्त मिठाचा वापर व आहाराविषयी लोकांना आरोग्य शिक्षण देणे
आरोग्य सेवक किंवा एम.पी.डब्लू. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) कर्तव्ये, जबाबदाऱ्या MPW Job Chart in Marathi

११) अहवाल व नोंदवही ठेवणे

  1. कार्यक्षेत्रात असणा – या सर्व कुटुंबाचे सर्वेक्षण करुन प्रत्येक कुटुंबाची सर्वसाधारण अद्ययावत ठेवणे .
  2. गावनिहाय कुटुंबाची नोंदवहि तयार करणे , अद्ययावत करणे व त्यांचा उपयोग विविध कार्यक्रमांतर्गत येणा-या लाभार्थीसाठी करणे .
  3. आरोग्य सेविकेच्या मदतीने यांग्य जोडप्यांची नोंदवही , कुंटुंब पाहणी नोंदवहीवरुन तयार करुन अद्ययावत ठेवणे.
  4. केलेल्या कामाचा पुरावा म्हणून नोंदवही व अहवाल ठेवणे .
  5. वेळोवेळी नियमितपणे पाठविण्यात येणारा अहवाल तयार करुन तो वेळेत आरोग्य सहाय्यकाना पाठविणे .
  6. कार्यक्षेत्राचा नकाशा व आलेख तयार करुन त्याचा उपयोग कामाचे नियोजन करण्यासाठी करणे. .

१२) संघकार्य

  1. प्राथमिक आरोग्य केंद्रात होणा-या कर्मचा-यांच्या प्रत्येक सभेत हजर राहणे व सहभागी होणे .
  2. आपल्या कार्याचा आरोग्य सेविकेशी आणि इतर आरोग्य कर्मचा – यांशी समन्वय साधणे .
  3. प्रत्येक आठवडयाला एकदातरी आरोग्य सहाय्यक ( पुरुष ) यांना भेट देणे आणि त्यांचा सल्ला व मार्गदर्शन म्हणून आवश्यकतेप्रमाणे घेणे.
  4. कार्यक्षेत्रात घेण्यात येणा – या विविध शिबीरात आणि मोहिमेत सहभागी होणे.
  5. स्थानिक स्वयंसेवी संस्था शोधून त्यांना समाजाचे आरोग्य चांगले राखण्यास प्रवृत्त करणे .

संदर्भ:-

महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग ( शासन निर्णय क्रमांक – आरईएस १०,१००१ / प्र.क्र .१ / १२२ / सेवा १ दिनांक – ११/१२/२००१ )

Copyright Material Don't Copy © 2021

Recent Posts

जागतिक आरोग्य दिन २०२४ – माझे आरोग्य, माझे हक्क

जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास जागतिक आरोग्य दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो.… Read More

01/04/2024

राष्ट्रीय जंतनाशक दिन २०२४ प्रश्न उत्तरे Deworming day FAQ in Marathi

सन २०२३ - २०२४ राष्ट्रीय जंतनाशक दिन १३ फेब्रुवारी २०२४ व २० फेब्रुवारी २०२४ (मॉप… Read More

11/01/2024

गरोदरपणातील मधुमेह GDM in Marathi

गरोदरपणातील मधुमेह (GDM) म्हणजे काय? Gestational diabetes in Marathi :- गर्भधारणेदरम्यान जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण… Read More

07/01/2024

पोटातील जंत सर्व माहिती Roundworm Tapeworm Worm Meaning in Marathi

जंत ( Worm in Marathi ) होणे ही आपल्या देशातली महत्त्वाची समस्या आहे. ग्रामीण भागात… Read More

05/01/2024

उष्माघात कारणे लक्षणे प्रतिबंध उपचार Heat Stroke Meaning in Marathi

उष्माघात कारणे, उष्माघात लक्षणे, उष्माघात प्रतिबंध, उष्माघात उपचार, उष्माघात घरगुती उपाय, मराठी माहिती, Heat Stroke… Read More

19/03/2023