आजारांची माहिती

म्युकरमायकोसिस कारणे, लक्षणे, उपचार, प्रतिबंध, Mucormycosis in Marathi

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्यानंतर म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. हा आजार वाढल्यानंतरच लक्षात येत असल्याने डोळे आणिजीव वाचविण्यासाठी तातडीने शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते आहे. कोरोनाच्या संसर्गानंतर सहा आठवड्यांपर्यंत म्युकरमायकोसिस होण्याची शक्यता असते.

म्यूकोर्मिकोसिस हा एक म्युकर मायोसिटिस नावाचा समूह आहे. ज्याला आपण ब्लॅक फंगस सुद्धा म्हणतो. हा एक प्रकारचा Fungal Infection आहे जो शरीरात खूप वेगाने पसरतो. याला झिगॉमायकोसिस देखील म्हणतात. यात रोग आणि जंतूंचा सामना करण्याची क्षमता कमी होते. मेंदू, फुफ्फुस किंवा त्वचेवर याचे संक्रमण होऊ शकते. या रोगामध्ये, बर्याच रुग्णांच्या जबडा आणि नाकाची हाड गळून जातात, आणि काहींच्या डोळ्यांचा प्रकाश सुद्धा कायमचा निघून जातो. जर वेळीच त्यावर नियंत्रण ठेवले नाही तर ते रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरू शकते.

काय आहे हे म्युकरमायकोसिस ?

हा बुरशीमुळे होणारा आजार आहे. या बुरशीचा संसर्ग नाक, घसा, जबडा, दात यापासून सुरू होऊन डोळे व मेंदूपर्यंत पोचून दृष्टीवर परिणाम करू शकतो. काही प्रकरणांत तो जिवावरही बेतू शकतो.

म्युकरमायकोसिस ची कारणे

  • ज्येष्ठ नागरिक
  • नियंत्रणाबाहेर मधुमेह असलेले रुग्ण
  • रोगप्रतिकारशक्ती कमी असलेले .
  • कोरोना संसर्गाच्या काळात रुग्णालयात ” हाय फ्लो ऑक्सिजन थेरपी ” घेतली असल्यास
  • कोरोना उपचारादरम्यान स्टीरोइड अथवा टोसिलीझुमकसारख्या औषधांच्या अतिरिक्त वापराचा परिणाम
  • रोग प्रतिकारशक्ती कमी असणे.

म्युकरमायकोसिस कसा पसरतो ?

फंगस किंवा बुरशी प्रथम नाकावाटे शरीरात जाते आणि तिथून सायनसमध्ये वाढते. तिथून ती डोळ्यात आणि मेंदूत शिरते. या बुरशीचा संसर्ग कर्करोगाच्या पेशींपेक्षा जलद होतो. कर्करोगात पेशींची अनियंत्रित वाढ होण्यासाठी किमान काही महिने तरी जातात; पण ‘म्युकर’चा संसर्ग झाल्यानंतर काही दिवसांतच झपाट्यानं ही बुरशी फुफ्फुस, डोळे, मेंदू, जबडा यांपैकी कुठल्या तरी अवयवांवर हल्ला करते.

रुग्णाच्या कपाळाखाली किंवा तोंडात टाळ्याच्या जागी काळे व्रण दिसणं, हे या आजाराचं गंभीर लक्षण मानलं जातं. करोना येण्याआधी तीन-चार वर्षांतून ‘म्युकर’ झालेला एखादाच रुग्ण दिसे. आता त्याचे बरेच रुग्ण आढळत आहेत.

म्युकरमायकोसिस ची लक्षणे

  • डोकेदुखी
  • डोळे दुखणे
  • डोळे बाहेर आल्यासारखे दिसू लागणे
  • दोन – दोन प्रतिमा दिसू लागणे ( डबल व्हिजन )
  • दृष्टी अधू होणे
  • गाल दुखणे / सुजणे
  • काळपट अथवा तपकिरी रंगाचा स्राव नाकातून येणे.
  • चेहयाचे स्नायू दुखणे.
  • अर्धशिशी
  • नाक चोंदणे, नाकावर सूज येणे
  • एका नाकपुडीतून रक्तस्त्राव
  • चेहरा अथवा डोळ्यावर सूज
  • एक पापणी अर्थी बंद राहणे
  • दात दुखणे किंवा हलू लागणे
म्युकरमायकोसिस कारणे, म्युकरमायकोसिस लक्षणे, म्युकरमायकोसिस उपचार, म्युकरमायकोसिस प्रतिबंध, Mucormycosis in Marathi, Mucormycosis symptoms in Marathi, Mucormycosis causes in Marathi, Mucormycosis Treatment in Marathi, Mucormycosis photo in Marathi, Mucormycosis Prevention in Marathi,

म्युकरमायकोसिस उपचार

  • अशा प्रकारचा त्रास झाल्यास तातडीने नाक – कान – घसा तज्ज्ञांचा किंवा नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
  • बुरशीविरोधी औषधे प्रारंभीच्या टप्प्यात उपयोगी . प्रसार वाढला तर शस्त्रक्रिया हाच उपाय. शस्त्रक्रियेद्वारे सर्व मृत आणि संक्रमित भाग काढावा लागतो.
  • वेळेत उपचार न केल्यास कायमचे अंधत्व येऊ शकते , किंवा प्रसंगी जीवही गमवावा लागतो .
  • बुरशीमुळे झालेला हा आजार बरा करण्यासाठी ‘अॅम्फोटेरिसिन’ हे ‘अँटिफंगल’ औषध इंजेक्शनद्वारे द्यावं लागतं. केशनलिका जर बंद झाल्या, तर हे औषध रुग्णाच्या बाधित अवयवापर्यंत पोहोचत नाही; त्यामुळे त्या औषधाचा अपेक्षित परिणाम होत नाही. अशा वेळी हा अवयव काढून टाकण्याशिवाय दुसरा मार्ग उरत नाही. हे चित्र भयावह असलं, तरी योग्य वेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास आजार बरा होण्याची शक्यता वाढते. ही अँटिफंगल इंजेक्शन आणि काही आठवडे चालणारा एकूण उपचारांचा खर्च लाखांच्या घरात असल्यानं, हा खर्च सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचा असतो.

काय करायला हवे ?

  1. लक्षणे दिसू लागल्यास डॉक्टरांशी संपर्क करा.
  2. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी रक्तातील साखरेचे प्रमाण नियमितपणे तपासावे कोरोनातून बरे झाल्यानंतर एअर कंडिशनचा वापर टाळावा. दमट किंवा ओलसर वातावरण टाळा. रक्तातील साखरेवर काटेकोर नियंत्रण ठेवावे.
  3. वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे.
  4. मास्क नियमितपणे बदलावेत.
  5. कान , नाक , घसा तज्ञाकडून एका आठवड्यानंतर तपासणी करावी.
  6. टूथ ब्रश / मास्क वरचेवर बदलणे.
  7. दिवसातून एकदा गुळण्या करणे.
  8. डॉक्टरांनी सांगितले तेवढे दिवस स्टिरोइड किंवा इतर औषधे घेणे.
  9. वरील लक्षणे आढळल्यास लगेच डॉक्टरांशी संपर्क करावा.

काय करू नये ?

  • छोट्या छोटया लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.
  • घरगुती उपायांचा पर्याय निवडू नये.
  • वैद्यकीय सल्ल्यानेच स्टिरॉइड्स चे सेवन करावे.

सारांश

म्युकरमायकोसिस हा अति जलद पसरणारा बुरशीचा रोग आहे, जो मुख्यत: नाक, डोळे आणि मेंदू ह्यांना बाधित करतो. वेळेवर उपचार लाभल्यास हा रोग पूर्ण बरा होऊ शकतो परंतु वेळेवर योग्य उपचार न केल्यास रुग्ण त्याचा डोळा , दृष्टी किंवा प्राण देखील गमावू शकतो.

वेळेवर योग्य उपाय करणे अत्यंत गरजेचे आहे कारण रोग बळावल्यास दृष्टी आणि जिवाला धोका पोचू शकतो.

Copyright Material Don't Copy © 2021

Recent Posts

जागतिक आरोग्य दिन २०२४ – माझे आरोग्य, माझे हक्क

जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास जागतिक आरोग्य दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो.… Read More

01/04/2024

राष्ट्रीय जंतनाशक दिन २०२४ प्रश्न उत्तरे Deworming day FAQ in Marathi

सन २०२३ - २०२४ राष्ट्रीय जंतनाशक दिन १३ फेब्रुवारी २०२४ व २० फेब्रुवारी २०२४ (मॉप… Read More

11/01/2024

गरोदरपणातील मधुमेह GDM in Marathi

गरोदरपणातील मधुमेह (GDM) म्हणजे काय? Gestational diabetes in Marathi :- गर्भधारणेदरम्यान जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण… Read More

07/01/2024

पोटातील जंत सर्व माहिती Roundworm Tapeworm Worm Meaning in Marathi

जंत ( Worm in Marathi ) होणे ही आपल्या देशातली महत्त्वाची समस्या आहे. ग्रामीण भागात… Read More

05/01/2024

उष्माघात कारणे लक्षणे प्रतिबंध उपचार Heat Stroke Meaning in Marathi

उष्माघात कारणे, उष्माघात लक्षणे, उष्माघात प्रतिबंध, उष्माघात उपचार, उष्माघात घरगुती उपाय, मराठी माहिती, Heat Stroke… Read More

19/03/2023