CHO

Enumeration Form व CBAC Form भरण्याच्या मार्गदर्शक सूचना

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

Enumeration Form व CBAC Form भरण्याच्या मार्गदर्शक सूचना, NCD Screening in Marathi, Non Communicable Disease Program, Mofat Arogya Tapasani,

अनुक्रमणिका

मासिक सर्विस डिलिवरी रेपोर्ट कसा भरावा?

Enumeration Form व CBAC Form भरण्याच्या मार्गदर्शक सूचना

Enumeration Form कोणी भरायचा ?

पॉपुलेशन बेस्ड स्किनिंग या कार्यक्रमांतर्गत असंसर्गजन्य रोग निवारण व नियंणासाठी आशा स्वयंसेविका यांनी गाव निहाय , कुटुंब निहाय Enumeration Register मध्ये संपूर्ण कुटुंबाची माहिती १ ते ५५ रकान्यात भरण्यात यावी .

CBAC form कोणी भरायचा ?

आशा स्वयंसेविका कुटुंबातील ३० वर्षावरील सर्व स्त्री व पुरुषाचे CBAC form भरतील व त्याप्रमाणे माहिती तयार करतील . ज्या ३० वर्षापूढील लोकांचे ४ किंवा ४ पेक्षा जास्त Score असेल त्यांना तातडीने दुसऱ्याच दिवशी आरोग्य केंद्रामध्ये तपासणी घेऊन तर उर्वरीत सर्व ३० वर्षापूढील स्त्री + पुरुषांची तपासणी टप्या टप्याने पूर्ण करतील . एक रजिस्टर पूर्ण भरल्यानंतर त्याचा गोषवारा काढतील व संपूर्ण लोकांची ५ आजारांसाठी तपासणी झालेली आहे त्याचा पाठपुरावा करतील . गावात १००० च्या लोकसंख्येवर अंदाजे ३७० व्यक्ती ( १८२ स्त्री व १८८ पुरुष ) ३० वर्षावरील वयाची असतील . या सर्वांची नोंद यात करावी व दर वर्षी माहिती अद्यावत करावी .

पुस्तिकेची माहिती:-

  • पहिल्या पानावर आशा स्वयंसेविका यांनी आपली वैयक्तीक माहिती सविस्तर दिलेल्या रकाण्यात भरावी .
  • रकाना क्र .२ ते १ ९ यात लाभार्थीच्या घरासंबंधी माहितीची नोंद करावी .
  • रकाना क्र . २ यात आरोग्य सेविकेने प्रत्येक कुटुंबाला एक आयडी द्यावा व त्या कुटुंबातील प्रत्येक ३० वर्षावरील व्यक्तीची नोंद करावी .
  • रकाना क्र . ४ यात आरोग्य सेविकेने प्रत्येक व्यक्तीस एक आयडी क्रमांक द्यावा .
  • रकाना क्र . ४ यात लिंग यासाठी : १ – पुरुष २ – स्त्री हे सांकेतांक द्यावेत रकाना क्र . १० यात वैवाहिक स्थितीसाठी : १ – अविवाहित , २ – विवाहित . ३ – विधुर | विधवा , ४ – घटस्पोटीत हे सांकेतांक द्यावेत .
  • रकाना क्र . १३ यात घराचे यासाठी : १ – कच्चे . क . ३ – सिमेंट व विटाने तयार केलेले हे सांकेतांक द्यावेत .
  • रकाना क्र . १४ यात शौचालयाची माहिती यासाठी : १ – शौचालये बाहते पाणी सुविधा असणारे , २ – शौचालये पाण्याची सुविधा नसणारे , ३ – शोषखड्याचे वाहत्या पाण्याची सुविधा असणारे , ४ – शोषखड्याचे वाहत्या पाण्याची सुविधा नसणारे हे सांकेतांक द्यावेत आणि इतर स्पष्ट करा .
  • रकाना क्र .१५ यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यासाठी १ – नळाचे पाणी , २ – घरातील हातपंप , ३ – विहीर , ४ – टाकी , ५ – नदीचे पाणी हे सांकेतांक द्यावेत आणि इतर स्पष्ट करा .
  • रकाना क्र . १६ यात विजेची व्यवस्था यासाठी : १ – विजेची व्यवस्था , २ – जनरेटर , ३ सौरउर्जा , ४ – रॉकेलचा दिवा हे सांकेतांक द्यावेत आणि इतर स्पष्ट करा .
  • रकाना क्र . १७ यात दुचाकी किंवा चारचाकी वाहने यासाठी : १ – मोटरसायकल , २ – कार , ३ – ट्रॅक्टर हे सांकेतांक द्यावेत आणि इतर स्पष्ट करा .
  • रकाना क्र .१ ९ यात आधारकार्ड उपलब्ध नसेल तर मतदान कार्ड किंवा रेशन कार्डची माहिती द्यावी .
  • रकाना क्र . २१ ते ५५ यात प्रत्येक व्यक्तीचा आरोग्याचा तपशिलाची नोंद करावी .
  • रकाना क्र . २१ ते ४२ यात विविध व्याधींसाठी जोखमीचे घटकांची यादी देण्यात आलेली आहे .
  • रकाना क्र .४१ भरण्यासाठी या यादीचा उपयोग होईल . प्रत्येक जोखमीच्या घटकाला उपक्रमांक देण्यात आले आहे . आशा स्वयंसेविकेने यातील कोणतेही जोखमीचे घटक सापडल्यास ती ४१ क्रमांकाच्या रकान्यात जोखमीच्या उपक्रमांकाची नोंदणी करावी .
  • रकाना क्र . २१ ते २६ व्यक्तीला असणाऱ्या आजाराची विचारणा करुन संबंधीत रकान्यात नोंदणी करावी . स्काना क्र .२७ ते ३३ व्यक्तीला असणाऱ्या असंसर्गजन्य आजाराच्या तपासणीचे दिनांक विचारणा करुन त्याचे विवरण नमुद करावे .
  • रकाना क्र .३४ ते ३१ यात तपासणीचे परिणाम लिहावे . उदा . श्याम हा उच्च रक्तदाबाचा रुग्ण असुन त्याची २ मार्च रोजी तपासणी करण्यात आली होती व त्याचे रक्तदाब १४० / २० असे आहे .
  • रकाना क्र . २७ यात २/६/१७ अशी नोंद करावी व रकाना क्र . ३४ यात १४० / ९ ० अशी नोंद करावी .
  • रकाना क्र . ४१ यात रकाना क्र . १२ ते ३३ यातील दिलेल्या व्याधीच्या धोक्यांची उपक्रमांक याची नोंद करावी .

जोखमीचे घटक रकाना क्र . ४१ यात खालील प्रमाणे नोंद करावी .

उच्च रक्तदाब:-

  1. कुटुंबात कोणाला उच्च रक्तदाबाबत पूर्व इतिहास ,
  2. अयोग्य आहाराबर सवयी विशेषतः जास्त मीठ ( खारट ) स्निग्ध पदार्थांचा वापर ( चरबीयुक्त पदार्थ )
  3. पालेभाज्या व फळाचा कमी वापर
  4. शारीरिक हालचाल न करणे ( बैठी जीवनशैली )
  5. जास्त प्रमाणात वजन . ( लठ्ठपणा )
  6. मद्यपानाचे जास्त सेवन ( अतिमद्य पान )
  7. गंभीर स्थिती जसे किडणी , हार्मोनस संबंधीत समस्या , मधूमेह अधिक मात्रामध्ये रक्तामधील चरबी ( कोलेस्टॉलचे जास्त प्रमाण )
  8. ताण तणाव / चिंता ( काळजी )

उच्च रक्तदाब:-

  1. उच्च रक्तदाब / हायपर टेन्शन
  2. रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त ( मधुमेह )
  3. अति मद्यसेवन
  4. अयोग्य आहार
  5. धुम्रपान
  6. लठ्ठपणा ( अधिक वजन वाढ )

लकवा किंवा पक्षाघात प्रमुख घटक:-

  1. उच्च रक्तदाब / हायपर टेन्शन
  2. मधुमेह
  3. हृदयासंबंधीत आजार
  4. धुम्रपान
  5. मद्यपान

अन्य घटक:-

  1. रक्तातील हानिकारक चरबीच्या प्रमाणात वाढ
  2. कमी प्रमाणात शारिरीक हालचाल
  3. प्रमाणाच्या बाहेर वजन वाढ ( लठ्ठपणा )

मधुमेह:-

  1. कुटुंबात अगोदरच कुणाला तरी मधुमेहाचा त्रास असेल .
  2. याचा त्रास जास्त करुन वयस्क लोकांमध्ये पाहायला मिळतो .
  3. किशोरवयीन मुला – मुलींमध्ये पण पाहीला जातो .
  4. जास्त वजन असणे
  5. आहाराच्या अयोग्य सवयी विशेषतःजास्तीचे मीठ , तेलकट भाज्या किंवा फळे कमी प्रमाणात खाणे .
  6. शारिरीक हालचाली कमी / व्यायामाचा अभाव ,
  7. उच्च रक्तदाब
  8. रक्तात कोलेस्टाल चे जास्त प्रमाण ,
  9. सवयी – जसे धुम्रपान किंवा नशेच्या औषधी किंवा दारु पिणे , जर गरोदरपणा मातेला मधुमेह झाला असेल किंवा गरोदर पणात साखरेचे प्रमाण थोडे जरी वाढले असेल .

गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर:-

  1. एका पेक्षा अधिक व्यक्तींबरोबर लैंगिक संबंध .
  2. असुरक्षित लैंगिक संबंध ,
  3. कमी वयात लग्न होणे ,
  4. कमी वयात बाळंतपण
  5. अनेक वेळा गरोदर राहणे किंवा बाळाला जन्म देणे ,
  6. धुम्रपान करणे .स्तनाचे कॅन्सर
  7. कमी वयात मासिक पाळी सुरु होणे .
  8. जास्त वयात मासिक पाळी बंद होणे .
  9. जास्त वयात पहिले मुल होणे . ६.४ तंबाखू खाणे / तंबाखू जन्य पदार्थाचे सेवन करणे / दारु पिणे .
  10. प्रमाणापेक्षा जास्त वजन ,
  11. शरिराची कमी हालचाल होणे ,
  12. अशा महिला की , त्यांनी आपस्या मुलांना कमी दुध पाजले आहे किंवा दुध पाजलेच नाही . कौटुंबिक पाश्वभुमी ( इतिहास ) .

तोंडाचा कॅन्सर:-

  1. तोंडाची अस्वच्छता .
  2. अयोग्य आहार – फळे भाजीपाला यांचा जेवणात कमी वापर ,
  3. कौटुंबिक पाश्वभुमी – इतिहास
  4. तंबाखूचे सेवन
  5. दारु पिणे .
  6. सुपारी आणि तंबाखू युक्त पदार्थ ( उदा . गुटखा )
  7. नविन दात बसविल्यास ते व्यवस्थित लावले गेले नसेल किंवा ते टोकदार असल्यास .
  8. महिलांच्या तुलनेत पुरुषांना तोंडाच्या कॅन्सरचे प्रमाण जास्त आहे . रकाना क्र . ४३ ते ५५ यात व्यक्ती घेत असलेल्या उपचाराची माहितीची नोंद करावी . रकाना क्र . २१ पासून सर्व कुटुंबातील व्यक्तीच्या सध्याच्या आरोग्याची अवस्था / व्याधी / अक्षमता / जोखमीचे घटक इत्यादी सविस्तर नोंदणी करावी .

कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची माहिती १ ते ५५ रकान्यात भरावी .

Population Based Screening ( PBS ) कार्यक्रम अंमलबजावणी करीता सूचना

पॉप्युलेशन बेस्ड स्क्रिनिंग हे प्रायोगिक तत्वावर फेब्रुवारी २०१७ पासून भंडारा , सातारा , सिंधुदुर्ग व वर्धा जिल्हयात प्रत्येकी १० उपकेंद्रांवर हया कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे . तसेच सदर कार्यक्रम हा सन २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये खालील जिल्हयांमध्ये सुरु करण्यात आला आहे . १ ) अमरावती २ ) चंद्रपूर ३ ) गडचिरोली ४ ) नंदूरबार ५ ) वाशिम ६ ) उस्मानाबाद ७ ) हिंगोली ८ ) पुणे ९ ) नाशिक १० ) जालना ११ ) रत्नागिरी १२ ) नांदेड १३ ) लातूर – निलंगा तालुका १४ ) अहमदनगर – पारनेर तालुका १५ ) जळगाव – जामनेर तालुका

सन २०१ ९ -२० मध्ये पॉप्युलेशन बेस्ड स्क्रिनिंग हा कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे . सदर कार्यक्रमाचा उद्देश जिल्हयांतर्गातील प्राथमिक आरोग्य केंद्रे , उपकेंद्रे व उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या गावांमधील वय वर्षे ३० वरील सर्व लोकसंख्येचे असंसर्गजन्य रोगांची तपासणी प्रामुख्याने ( उच्चरक्तदाब , मधुमेह , मुखकर्करोग , गर्भाशय मुखकर्करोग , स्तनकर्करोग ) पाच व्याधींकरीता तपासणी करण्यात येत आहे .

  • सदर ३० वर्षांवरील सर्व व्यक्ती ( स्त्री व पुरुष ) यांच्या कुटुंबाची नोंदणी ( Enumeration ) व C – BAC forms भरणे हे आशा यांचे काम आहे .
  • तर C – BAC forms भरल्यानंतर प्रत्येक उपकेंद्रामध्ये त्यांची पाच आजारांसाठी तपासणी करणे हे ANM / MPW / CHO यांचे काम आहे .
  • त्यानंतर C – BAC forms व तपासणीची माहिती NCD IT Software मध्ये भरणे हे काम देखील ANM / MPW यांचे आहे . यासाठी खालील प्रमाणे पायऱ्या ( Step ) आहेत .

सदर कार्यक्रम खालील दिलेल्या पध्दतीने राबविण्यात यावा .

Step – I – लोकसंख्या व कुटुंबाची गणती व नोंदणी (Enumeration Register): –

( Enumeration Register ) या नोंदणी फॉर्म मध्ये आशा यांनी गृहभेटीच्या वेळी त्या कुटुंबातील सर्व लोकांची नोंदणी करावी . म्हणजेच कुटुंबातील लहान मुलांपासून ते वयोवृध्दांपर्यंत सर्वांची नोंद Enumeration रजिस्टरमध्ये करावयाची आहे . त्यास Family folder असेही म्हणतात .

Step – II त्या नंतर त्या कुटुंबात वय वर्ष ३० व त्यापेक्षा जास्त असणाऱ्या महिला व पुरुष यांचे CBAC Form मध्ये नोंद घेणे : –

  1. आशा स्वयंसेविका ही पूर्वपरवानगीने कुटुंबातील वय वर्ष ३० व त्यापेक्षा जास्त असणाऱ्या सर्व महिला व पुरुषांची माहिती C – BAC Form मध्ये भरणार . .
  2. C – BAC Form मध्ये भरणार . C – BAC Form चे २ भाग असतात . पहिल्या भागात प्रश्नांच्या आधारे गुण दिले जातात . यामध्ये ४ पेक्षा कमी गुण व ४ पेक्षा जास्त गुण असे विभागले जाते .
  3. ज्या व्यक्तीला ४ व ४ पेक्षा जास्त गुण आहेत ते अति जोखमीचे आहेत व त्यांना त्वरीत तपासणीची आवश्यकता आहे . त्यामुळे त्यांना शक्यतो दुसऱ्याच दिवशी संबंधित उपकेंद्राच्या ANM / MPW / CHO यांच्या मदतीने ५ आजारांसाठी प्रत्यक्ष तपासणी करुन पुढे निश्चित निदानासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र ( PHC ) येथे पाठवावे व त्यांची नोंद NCD IT Software मध्ये घेण्यात यावी .
  4. ज्यांचे गुण ४ पेक्षा कमी आहेत त्यांना पुढील एक आठवडयात संबंधित ANM / MPW / CHO यांचे कडून तपासणी करुन घ्यावी व संशयित असल्यास निश्चित निदानासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र ( PHC ) वैद्यकिय अधिकारी यांच्याकडे संदर्भित करावे . तसेच सर्वांची ( सर्व तपासलेल्या लोकांची ) नोंद NCD IT Software मध्ये घेण्यात यावी .
  5. C – BAC Form च्या दुसऱ्या भागात गर्भाशयाचा कर्करोग , स्तनाचा कर्करोग , तोंडाचा कर्करोग , अपस्मार , क्षयरोग व कुष्ठरोग हया आजारा विषयी प्रश्न असून संबंधित आजारांच्या संशयितांना ओळखून Sub center / PHC च्या डॉक्टर / ANM मार्फत प्राथमिक तपासणी करुन संशयित असल्यास पुढील तपासणीसाठी संदर्भित करावे व पूर्ण तपासणी होईपर्यंत पाठपुरावा करावा .
  6. कर्करोगाचे अंतिम निदान हे संशयित झाल्यापासून १ महिन्याच्या आत झााले पाहिजे व त्याची जबाबदारी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी व Sub center चे ANM , MPW.CHO व आशा यांची राहील .

तपासणी कशी करावी Screening Procedure in Marathi:-

  • आठवडयातील कमीत कमी ३ दिवस गाव किंवा उपकेंद्र स्तरावर ( अंतर व परिस्थिती पाहता ) आशा , ANM / MPW / CHO यांनी उच्चरक्तदाब , मधुमेह , तोंडाचा कर्करोग , गर्भाशयाचा कर्करोग व स्तनांचा कर्करोग हयासाठीची तपासणी करावी . प्रत्येक सत्रामध्ये कमीत कमी २० रुग्ण तपासावे .
  • उच्चरक्तदाब , मधुमेह , तोंडाचा कर्करोग व स्तनाचा कर्करोग यांची तपासणी सोपी असल्याने ती outreach Services मध्ये करता येऊ शकते . पण गर्भाशयमुख कर्करोगाच्या तपासणीसाठी बंधिस्त जागा जेथे Speculum Examination व Visualization with acetic acid ने करणे आवश्यक असल्याने सदर तपासणी उपकेंद्र किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र ( PHC ) स्तरावर Trained ANM / LHV / Staff Nurse / वैद्यकिय अधिकारी यांच्या कडून करावी .

सदर तपासणी करतांना संबंधितांनी योग्य काळजी घ्यावी .

तपासणीच्या दिवशी प्रत्येकाचे कार्य Screening day Job Chart in Marathi

उपकेंद्र ( SC ) स्तरावर आठवडयातील कमीत कमी तीन दिवस निश्चित NCD Screening साठी राखून ठेवावे व ज्यांचा Score 4 च्या वर आहे व कर्करोगाचे संशयित आहेत त्यांची तपासणी तातडीने दुसऱ्याच दिवशी होईल याची जबाबदारी ANM / HA / MPW व संबंधित ASHA यांची राहील .

Enumeration Form व CBAC Form भरण्याच्या मार्गदर्शक सूचना, NCD Screening in Marathi, Non-Communicable Disease Program, Mofat Arogya Tapasani
https://marathidoctor.com/anm-job-chart-in-marathi.html

Step – III NCD IT Software मध्ये माहिती भरणे :-

ANM / MPWICHO यांनी प्रत्यक्ष तपासणी करुनच NCD IT Software मध्ये माहिती भरावी व संशयितांना संदर्भित करावे .

Step – IV प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये निश्चित निदान करणे:-

  • वैद्यकिय अधिकारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे संशयितांचे उच्चरक्तदाब व मधुमेहासाठी निश्चित निदान करुन त्यांना Protocol प्रमाणे औषधोपचार करावा व त्यांची नोंद MO Portal मध्ये करावी व complicated असल्यास पुढे संदर्भित करावे .
  • कर्करोगाच्या संशयितांच्या निश्चित निदानाकरीता RH / SDH / DH येथे संदर्भित करावे व त्यांची नोंद MO Portal मध्ये करावी .
  • Cervical Cancer साठी प्राथमिक तपासणी करुन संशयितांना पुढे संदर्भित करावे .
  • प्रत्येक संदर्भित रुग्णांचा पाठपुरावा करावा .

Step -V संशयितांना संदर्भित करण्याबाबत:-

Sub centre च्या ANM / MPW यांचे मार्फत तपासणी झााल्यानंतर

  • उच्चरक्तदाबाचे संशयित – ज्यांचा Systolic BP – १४० च्या वर व Diastolic BP ९ ० mm Hg च्या वर असतो . त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये संदर्भित करावे .
  • मधुमेहाचे संशयित – ज्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण ( Random Blood Sugar ) Glucometer ने १४०mg व त्यापेक्षा जास्त असते . त्यांना Fasting , PP करुन घेणेसाठी व पुढील औषधोपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये संदर्भित करावे .
  • कर्करोगाचे संशयित – ज्यांच्या कर्करोगाच्या चाचणी मध्ये Positive लक्षणे आढळली आहेत , अशा रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रातून RH / SDH / DH येथे संदर्भित करावे .
  • जे रुग्ण कर्करोगाचे संशयित आहेत , त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र / उपजिल्हा रुग्णालय / जिल्हा रुग्णालय येथे निदानासाठी व तज्ञांच्या मार्फत औषधोपचारासाठी संदर्भित करावे .

Step -VI संशयितांचे निदान:-

  • प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी यांनी नमूद चाचण्यांद्वारे उच्चरक्तदाब व मधुमेह यांची तपासणी व निदान करावे . निदान झालेल्या रुग्णांना उच्चरक्तदाब / मधुमेहासाठी औषधोपचार मार्गदर्शन प्रोटोकॉल प्रमाणे सुरु करावा . रुग्णांना कमीत कमी एक महिन्यांची औषधे दयावी . रुग्णास औषध लागु पडल्यास नंतर तीन महिन्यापर्यंतची औषधे देण्यात यावी .
  • प्रत्येक रुग्णाचा पाठपुरावा ASHAIANM / MPW / CHO यांनी करावा .

Step – VII रुग्णांचा पाठपुरावा व औषधोपचारा बद्दल शाश्वती:-

  • रुग्णांनी औषध घेतल्यानंतर दर महिन्याला उपकेंद्रांमध्ये Follow up साठी व तीन महिने संपत आल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रावर Follow up साठी जावे लागणार . आवश्यकता असल्यास तज्ञांद्वारे उपजिल्हा रुग्णालयातून निदान करावे . आशांनी रुग्णाला नियमित उच्चरक्तदाब व मधुमेहाच्या तपासणीसाठी प्रोत्साहित करावे .
  • जे रुग्ण नियमित औषधोपचार घेत नाहीत , अशा रुग्णांना आशा स्वयंसेविकेने प्राधान्य दिले पाहिजे . जेणे करुन अनियमित औषध घेणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होईल . ANM / CHO यांनी सुध्दा नियमित गृहभेटी दयाव्यात व हया आजाराबाबत तसेच जीवनशैली बदलाबाबत ( Life style change ) जनजागृती करावी .
Copyright Material Don't Copy © 2021

Recent Posts

जागतिक आरोग्य दिन २०२४ – माझे आरोग्य, माझे हक्क

जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास जागतिक आरोग्य दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो.… Read More

01/04/2024

राष्ट्रीय जंतनाशक दिन २०२४ प्रश्न उत्तरे Deworming day FAQ in Marathi

सन २०२३ - २०२४ राष्ट्रीय जंतनाशक दिन १३ फेब्रुवारी २०२४ व २० फेब्रुवारी २०२४ (मॉप… Read More

11/01/2024

गरोदरपणातील मधुमेह GDM in Marathi

गरोदरपणातील मधुमेह (GDM) म्हणजे काय? Gestational diabetes in Marathi :- गर्भधारणेदरम्यान जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण… Read More

07/01/2024

पोटातील जंत सर्व माहिती Roundworm Tapeworm Worm Meaning in Marathi

जंत ( Worm in Marathi ) होणे ही आपल्या देशातली महत्त्वाची समस्या आहे. ग्रामीण भागात… Read More

05/01/2024

उष्माघात कारणे लक्षणे प्रतिबंध उपचार Heat Stroke Meaning in Marathi

उष्माघात कारणे, उष्माघात लक्षणे, उष्माघात प्रतिबंध, उष्माघात उपचार, उष्माघात घरगुती उपाय, मराठी माहिती, Heat Stroke… Read More

19/03/2023