आजारांची माहिती

प्लाझ्मा थेरपी मराठी माहिती Plasma Therapy In Marathi

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

प्लाझ्मा थेरपी सर्व माहिती Plasma Therapy ला अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने नुकतीच कोरोना विषाणूच्या रुग्णांच्या उपचारासाठी क्लिनिकल ट्रायल मध्ये वापरण्याची मान्यता दिलेली आहे. खालील लेखात Plasma Therapy Marathi Meaning in Marathi, Plasma Therapy in Marathi, Plasma Therapy for Coronavirus Treatment in Marathi इत्यादि प्लाझ्मा थेरपी सर्व माहिती दिलेली आहे.

प्लाझ्मा थेरपी सर्व माहिती Plasma Therapy In Marathi प्लाझ्मा थेरपी माहिती, प्लाझ्मा थेरपी मराठी माहिती, Plasma Therapy Marathi Meaning, Plasma Therapy info in Marathi, plasma Therapy information in Marathi

प्लाझ्मा थेरपी मध्ये जो रुग्ण कोरोना विषाणू पासून नुकता मुक्त झालेला आहे त्याच्या शरीरातून अँन्टिबॉडीज युक्त प्लाझ्मा घेऊन, हा अँन्टिबॉडीज युक्त प्लाझ्मा करोना संक्रमण झालेल्या व्यक्तीमध्ये ट्रान्सफ्युज केला जातो, या उपचारा मुळे त्या कोरोना रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती वाढते व त्या रुग्णाचे शरीर कोरोना विरुद्ध लढण्यास सज्ज होते. या प्लाझ्मा थेरपी ला Convalescent थेरपी असे म्हणतात.

संशोधकांच्या म्हणण्यानुसार कन्व्हेलेसेंट प्लाझ्मा थेरपी ( Convalescent Plasma Therapy in Marathi ) हे निष्क्रिय लसीकरण करण्यासारखीच आहे, कारण प्लाझ्मा थेरपी प्रतिबंधात्मक उपाय आहे, कोविड -१९ (कोरोना व्हायरस) या आजारावर उपचार नाही.

प्लाझ्मा म्हणजे काय? What is Plasma in Marathi?

रक्तातील द्रव घटकाला प्लाझ्मा (Plasma) असे म्हणतात. हा द्रावणसदृश्य, पिवळसर रंगाचा द्रव पदार्थ असतो.

एकूण रक्तामध्ये प्लाझ्मा (Plasma) 55% टक्के असतो, आणि उर्वरित भाग 45% RBCs अर्थात लाल रक्तपेशी असतात. Centrifuge machine चा वापर करून प्लाझ्मा (Plasma) व लाल रक्तपेशी (RBCs) रक्तातून वेगवेगळे केले जातात.

थोडक्यात प्लाझ्मा (Plasma) म्हणजे , Plasma = Blood —RBC and WBC

कोरोना व्हायरस कारणे, लक्षणे, उपाय, प्रतिबंध, Coronavirus in Marathi

प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय? What is Plasma Therapy in Marathi?

जेंव्हा एखादा व्यक्ती आजारी पडतो तेंव्हा त्याच्या शरीरातील Bacteria, Virus चा प्रतिकार करण्यासाठी आपली Immune system त्याच्या विरुद्ध Antibodies (प्रतिपिंडे) तयार करते.
या Antibody (प्रतिपिंडे) आजारातून पूर्ण बरे झाल्यानंतरही ह्या Antibodies (प्रतिपिंडे) शरीरात जतन राहतात.

या Antibodies (प्रतिपिंडे)) युक्त प्लाझ्मा (Plasma) चा उपचार पद्धतीत उपयोग करण्याला प्लाझ्मा थेरपी (Plasma in Marathi) असे म्हणतात.

कोरोना साठी प्लाझ्मा थेरपी Plasma Therapy for Corona (COVID19) in Marathi:-

कोरोना आजार COVID19 मधून जे रोगमुक्त झाले आहेत त्यांच्या Plasma मध्ये Corona Virus च्या विरोधात लढण्यासाठीच्या Antibodies (प्रतिपिंडे) तयार झालेल्या आहेत.

अशा लोकांच्या Plasma चा वापर करून आपण ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे किंवा जे वृद्ध आहेत त्यांच्या मध्ये हा प्लाझ्मा (plasma) शिरेद्वारे रक्तात सोडतो त्यामुळे त्यातील Antibody (प्रतिपिंडे) कोरोना विषाणूशी लढण्यात मदत करतात.

प्लाझ्मा थेरपी कशी काम करते? Plasma Therapy – How it Work?

ज्या रुग्णांना कोरोना विषाणू संक्रमण झालेले असते त्यांच्या शरीरात कोरोना विरुद्ध Antibody (प्रतिपिंडे) तयार झालेले असतात जे व्हायरस ला ब्लॉक/नष्ट करतात.

हे Antibody (प्रतिपिंडे) आपल्या रक्तातील रोगप्रतिकार पेशींद्वारे (B – lymphocytes, ज्या पांढऱ्या रक्तपेशिंचा प्रकार असतात) तयार केले जातात.

जेणे करून भविष्यात जेव्हा हा विषाणू त्या व्यक्तीला पुन्हा संक्रमित करेल तेव्हा त्या विषाणू विरुद्ध लढण्यासाठी त्या व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती तयार असेल व त्या व्यक्ती ला विषाणूची बाधा होणार नाही.

याला आपण सक्रिय रोगप्रतिकारक शक्ती असे म्हणतो. हीच Antibody (प्रतिपिंडे) जेव्हा नवीन संक्रमण झालेल्या रुग्णामध्ये ट्रान्सफ्युज करतात तेव्हा Antibody (प्रतिपिंडे) त्या व्हायरस ला ओळखतात व ब्लॉक/नष्ट करतात.

आयुष मंत्रालयाचा कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक सल्ला, AYUSH Coronavirus Advisory in Marathi

प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धतीच्या मर्यादा Limitations of Plasma Therapy in Marathi:-

१ ) रोगमुक्त व्यक्तीला रक्तदानासाठी प्रोत्साहित करणे.

हे अवघड काम आहे, आजारातून नुकताच पुर्णपणे बरा झालेला रुग्ण रक्तदान करण्याचे टाळताना दिसतात. याविषयी व्यापक जनजागृतीची गरज आहे.

२ ) निरोगी रक्तदाता –

त्या रक्त नमुन्यात इतर दुसरा कोणताही आजार घडवणारे घटक (जीवाणू , विषाणू) नसले पाहिजेत उदा. HIV, Hepatitis. म्हणजेच ज्या व्यक्तीचा प्लाझ्मा (रक्त) प्लाझ्मा थेरपी साठी घेणार आहोत ती व्यक्ती निरोगी असली पाहिजे.

३ ) त्या रक्त नमुन्यात पुरेश्या प्रमाणात Antibody Titre असल्या पाहिजेत.

४ ) प्लाझ्मा थेरपी साठी लागणारी यंत्र सामुग्री व रक्तातून प्लाझ्मा मिळवण्याची पध्दत गुंतागुंतीची व खर्चिक आहे.

५ ) एक Antibody (प्रतिपिंडे) दाता फक्त २ रुग्णांना पुरेल इतकाच प्लाझ्मा डोस देऊ शकतो.

प्लाझ्मा थेरपी या पद्धतीचा वापर करून जगात आतापर्यंत बऱ्याच आजारावरील लस बनविण्यात आली आहे. उदा. Spanish fiue, Diphtheria (घटसर्प) , Anti snake venom (सर्पदंशावरील औषध) इत्यादि

प्लाझ्मा थेरपी हा कोरोना विरोधात सापडलेला खात्रीलायक उपचार आहे का?

नाही.

संशोधकांच्या म्हणण्यानुसार कन्व्हेलेसेंट प्लाझ्मा थेरपी ( Convalescent Plasma Therapy in Marathi ) हे निष्क्रिय लसीकरण करण्यासारखीच आहे.

कारण प्लाझ्मा थेरपी प्रतिबंधात्मक उपाय आहे, कोविड -१९ (कोरोना व्हायरस) या आजारावर खात्रीलायक उपचार नाही.

अन्न व औषध प्रशासनानुसार प्लाझ्मा थेरपी किती प्रभावीपणे काम करू शकेल हे सांगणे सध्या कठीण आहे.

पण जगभरात त्यावर चाललेल्या संशोधनातून काही सकारात्मक परिणाम समोर आले आहेत. तेव्हा भविष्यात नक्कीच उपयोग होऊ शकतो.

कोरोना विरुद्ध जोपर्यंत आपल्याकडे लस (vaccine) उपलब्ध होणार नाही तोपर्यंत याचा आपण वापर करू शकतो.

अँन्टिबॉडीज (प्लाझ्मा) दाता कोण होऊ शकतो?

Who can Donate Antibodies? Plasma Donner in Marathi –

  • कमीत कमी १७ वय वर्ष पूर्ण असावे.
  • कमीत कमी ५० किलो वजन असणे आवश्यक आहे.
  • त्याला आधी कोरोना संक्रमण झालेले असावे.
  • अँटीबॉडी देण्याआधी कमी कमी १४ दिवस कोरोनाची लक्षणे दिसता कामा नये.
  • तो व्यक्ती पूर्णपणे कोरोना संक्रमणातून मुक्त असावा.
  • स्वास्थ्य व शरीर प्रकृती चांगली असणे आवश्यक आहे.
  • त्या व्यक्तीस दुसरे कोणतेही जीवाणू, विषाणू जन्य संक्रमण (उदा. HIV, Hepatitis ) झालेले नसावे.
  • तो रक्तदानास तयार असावा.

Corona विरुद्ध च्या लढ्यात याचा सर्वप्रथम उपयोग चीन च्या shenzan (शेंझन) शहरातील डॉक्टरांनी केला आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये पाच कोरोनाग्रस्त रुग्णांवर याचा वापर करण्यात आला आणि
त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली आहे. सध्या ब्रिटन व अमेरिका याची चाचणी करत आहेत.

कोरोना व्हायरस आणि आयुर्वेद, प्रतिबंधात्मक आयुर्वेदिक व घरगुती उपाय

प्लाझ्मा थेरपीची उपयोगिता:-

Use of Plasma Therapy in Marathi –

१ ) ज्या रुग्णांची प्रकृती अत्यंत खराब आहे त्यांना व्हेंटिलेटर (प्राणवायू पुरवठा करणारे यंत्र) आवश्यकता भासते पण भारतात काय तर संपूर्ण जगात व्हेंटिलेटर चा तुटवडा आहे.

२ ) आपण या प्लाझ्मा थेरपीचा वापर करून कमी खराब प्रकृती असणाऱ्या रुग्णांना गंभीर अवस्थेत जाण्यापासून वाचवू शकतो.

३ ) त्याद्वारे रुग्णांलयात काम करणारे मनुष्य बळाचा सुयोग्य वापर करु शकतो. आत्यंतिक गरजू रूग्णांना त्यांंची उपलब्धता करून देऊ शकतो.

सारांश:-

Indian Council of Medical Research च्या निर्देशानुसार प्लासमा थेरपी चा वापर हा फक्त कोरोना विषाणूच्या रुग्णांच्या उपचारादरम्यान क्लिनिकल ट्रायल व संशोधनासाठीच करावा.

प्लासमा थेरपी चा अयोग्य वापर जीवघेणा ठरु शकतो. जोर्यंंत प्लासमा थेरपी वरील संशोधन पुर्ण होत नाही तोपर्यंत कोणताही दावा प्लासमा थेरपी बद्धल करणे चुकिचे ठरेल.

Pregnancy Symptoms in Marathi, प्रेग्नन्सी – गरोदरपणाची लक्षणे
Copyright Material Don't Copy © 2020

Recent Posts

SRDP उपचार: संपूर्ण माहिती, फायदे आणि प्रक्रिया

प्रस्तावना SRDP (Scientific Reversal Detoxification Process) उपचार ही एक आधुनिक आयुर्वेदिक पद्धती आहे जी पारंपरिक… Read More

05/03/2025

सोरायसिस कारणे, लक्षणे, घरगुती उपाय आणि आधुनिक उपचार

प्रस्तावना सोरायसिस हे एक दीर्घकालीन त्वचेचे आजार आहे जे त्वचेच्या पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवते. ही… Read More

27/02/2025

PCOD उपचार: कारणे, लक्षणे, उपाय आणि जीवनशैलीतील बदल

प्रस्तावना पॉलीसिस्टिक ओव्हरी डिसऑर्डर (PCOD) किंवा पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) ही एक सामान्य हॉर्मोनल समस्या… Read More

25/02/2025

केस गळती थांबवण्याचे उपाय, कारणे, लक्षणे, प्रतिबंध आणि नवीन उपचार

प्रस्तावना केस गळती ही एक सामान्य समस्या बनली आहे जी पुरुष आणि महिलांना सारख्या प्रभावित… Read More

22/02/2025

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग: कारणे, लक्षणे, उपाय, प्रतिबंध, लस आणि नवीन उपचार

प्रस्तावना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) हा महिलांमध्ये आढळणारा एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे,… Read More

21/02/2025

आम्लपित्त – ऍसिडिटी उपचार, कारणे, लक्षणे, घरगुती उपाय आणि प्रतिबंध

ऍसिडिटी, ज्याला मराठीत "अम्लपित्त" किंवा "छातीत जळजळ" असेही संबोधले जाते, ही आजकालच्या जीवनशैलीमुळे सामान्य झालेली… Read More

20/02/2025