स्त्रीयांचे आरोग्य व आजार

प्रेगन्सी गरोदरपणाची सर्व लक्षणे Pregnancy Symptoms in Marathi

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

विवाहित स्त्रीची नियमीत येणारी पाळी चुकली, तिला सकाळी – सकाळी मळमळ, उलट्या होऊ लागल्या की लगेचच ती गरोदर आहे अशी शंका घेतली जाते.

परंतु फक्त या लक्षणा वरुन आपण निश्चितपणे सांगू शकत नाही की, ती स्त्री गरोदर आहेच. तसेच गरोदरपण निश्चितीकरणाची लक्षणे ही सर्वसाधारणपणे गरोदरपणाच्या १६ ते २० व्या आठवड्यानंतर दिसतात.

त्या अगोदर दिसणाऱ्या अनेक लक्षणावरून प्रेगन्सीची शक्यता दर्शविली जाते किंवा संभाव्यता व्यक्त करता येते.

अनुक्रमणिका

प्रेगन्सी ड्यू डेट कॅल्क्युलेटर Due date Calculator in Marathi

प्रेगन्सी लक्षणांचे वर्गीकरण (Classification of signs & symptoms of Pregnancy)

गरोदरपणाच्या चिन्हालक्षणांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे केले आहे .

  • १ ) सूचक लक्षणे / शक्यता दर्शविणारी लक्षणे / अनुमानीत लक्षणे Pregnancy Presumptive Symptoms in Marathi
  • २ ) संभाव्या चिन्हे लक्षणे / Probable Signs of Pregnancy in Marathi & Symptoms of Pregnancy in Marathi
  • ३ ) निश्चितीकरणाची चिन्हे – लक्षणे / Positive signs of Pregnancy in Marathi

I ) सूचक चिन्हे लक्षणे ( Presumptive Signs and Symptoms ) :-

गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांना म्हणजे १२ आठवड्याच्या कालावधीला फर्स्ट ट्रायमेस्टर ( First Trimester ) असे म्हणतात.
यावेळी दिसणाऱ्या चिन्हा – लक्षणांना सूचक लक्षणे असे म्हणतात . कारण यावरून गरोदरपणाची फक्त सूचनाच मिळते. आपण गरोदरपणाचे निदान कशकत नाही .

१) मासिकपाळी चुकणे ( Missed Period in Marathi )

नियमितपणे येणारी पाळी चुकणे / बंद होणे : जननक्षम निरोगी स्त्रीस अगदी नियमितपणे मासिकपाळी येत असते. अशा स्त्रीस कोणताही आजार झालेला नसताना किंवा ती अतिस्थूल ( Obese ) झालेली नसताना तिची नियमित येणारी मासिकपाळी बंद होण्याच्या लक्षणाला गरोदरपणाचे पहिले आणि मुख्य लक्षण म्हटले आहे.

परंतु खालील इतर अवस्थेत नियमित येणारी मासिकपाळी बंद होते.

  1. स्रावांचे असंतुलन झाल्यास ( Harmonal Imbalance )
  2. अतिगंभीर स्वरूपाचा रक्तक्षय झाल्यास ( Severe Anaemia )
  3. मिक्सिडिमा ( Myxoedema ) थायरॉईड ग्रंथी अकार्यक्षम होणे . यामध्ये स्त्रीच्या मासिकपाळीमध्ये अनियमितपणा येतो किंवा ती पूर्णत : बंद होऊन जाते.
  4. तरूण मुलींमध्ये ( स्त्रियांमध्ये ) हवामानातील बदलामुळे ( Change in Climate ) मासिकपाळी थोड्या अवधीकरिता बंद होते.
  5. तसेच गरोदरपणासाठी आतुरलेल्या स्त्रिया आणि गरोदरपणाची भीती असलेल्या स्त्रियांची मासिकपाळी तटू शकते किंवा उशीरा येऊ शकते.
  6. म्हणून नियमित येणारी मासिक पाळी बंद होणे हे सूचक लक्षणांमध्ये धरले जाते.

विवाहित जननक्षम स्त्रीची पाळी चुकल्याचे आढळल्यास तिची संपूर्ण माहिती घ्यावी आणि वरीलपैकी कोणते कारण आहे काय हे पाहावे व तसे काही न आढळल्यास ती स्त्री ९० % गरोदर असेल असे समजावे व १६ ते २० आठवड्यानंतर मात्र निश्चितीकरणाची लक्षणे आढळल्यानंतर आपले निदान १०० % खरे आहे हे समजावे.

Pregnancy Symptoms in Marathi, प्रेगन्सी- गरोदरपणाची लक्षणे, www.marathidoctor.com, Dr.Vivekanand V. Ghodake

२ ) प्रात : वमन / मॉर्निंग सिकनेस ( Morning Sickness ) :‌‌‌‌‌-

बऱ्याच गरोदर स्त्रियांमध्ये मॉर्निंग – सिकनेस हे लक्षण आढळून येते.
यामध्ये त्या स्त्रीला सकाळी उठल्या – उठल्या तोंडाला पाणी सुटते , मळमळते आणि उलट्या होतात.
हे गरोदरपणाच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होते ते सहाव्या आठवड्यापर्यंत सुरू असते व नंतर ते बंद होते .
काही स्त्रियांना उलट्या होत नाहीत, परंतु मळमळणे व उलटी आल्यासारखे वाटते किंवा कोरड्या उलट्या होतात . त्यासुद्धा सकाळच्यावेळी होत नाहीत तर इतर वेळी होतात.
बऱ्याच स्त्रियामध्ये रात्रीचा स्वयंपाक करीत असताना वरील तक्रार आढळते . याची कारणे अनेक असू शकतील.
१ ) पोट रिकामे असल्यामुळे ,
२ ) शिजत असलेल्या अन्नाच्या वासामुळे ,
३ ) गरोदरपणाच्या अनेक कल्पनांमुळे मानसिकता झाल्यामुळेही या तक्रारी उद्भवतात.

परंतु वरिल हि लक्षण देखील अनेक रोगांमध्ये आढळते, जसे
१ ) पित्ताच्या त्रासामुळे सकाळी – सकाळी उलट्या होतात ,
२ ) मानसिक ताणतणावामुळे ( Mental Stress and Strain )
३ ) स्रावांच्या असंतुलन झाल्यास ( Harmonal Imbalance )
वरील सर्व कारणांमुळेही हे लक्षण दिसते म्हणून हे लक्षण देखील सूचक लक्षणांमध्ये घेतले जाते.

हायपरएमेसिस ग्रॅव्हिडर्म Hyperemesis Gravidarum :-

ज्यावेळेस मॉर्निंगसिकनेसचे प्रमाण खूपच वाढते, दीर्घकाळ टिकते तेव्हा ते गंभीर स्वरूपात जाऊ शकते. त्या अवस्थेस ‘ हायपरएमेसिस ग्रॅव्हिडर्म ‘ ( Hyperemesis Gravidarum ) असे म्हणतात.

३ ) लघवीला जाण्याची वारंवारिता वाढणे / Frequency of Micturation

गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे ६ आठवड्यापासून १२ व्या आठवड्यापर्यंत बाईस वारंवार लघवीला जाण्याची इच्छा होते.

याची महत्त्वाची कारणे खालीलप्रमाणे आढळतात.
१ ) कटिरपोकळीत गर्भाशयाच्या पुढील बाजूस मूत्राशय व पाठीमागील बाजूस गुदाशय आहे. वाढणाऱ्या गर्भाशयाचा मूत्राशयावर दाब पडल्यामुळे,
२ ) गर्भाशयाची स्वाभाविक स्थिती अँटिव्हर्टेड अँटिफ्लेक्सड आहे, त्यामुळे मूत्राशयाला पाठीमागील बाजूने इरिटेशन होते.
३ ) वाढत्या इस्ट्रोजन – प्रोसस्टेरॉनमुळे मूत्राशयाचे स्मूथ मसल्स रिलॅक्स झाल्यामुळे तेथे कंजक्शन होऊन लघवीला जाण्याचे प्रमाण वाढते. परंतु यावेळेस जळजळ किंवा वेदना होत नाहीत.

हे देखील सूचक लक्षणांमध्ये घेतले जाते. कारण
१ ) मूत्राशयाला जर दाह झाला असेल,
२ ) युरिनरीट्रॅक्ट इन्फेक्शन असेल,
३ ) जवळच्या इंद्रियाला असणाऱ्या ट्यूमरचा दाब मूत्राशयावर पडत असेल तर अशा अनेक कारणांनी बाईला वरचेवर लघवीला जाण्याची इच्छा होते म्हणून. हे लक्षण सूचक लक्षण समजले जाते.

४ ) त्वचेतील बदल ( Pregnancy Skin Changes in Marathi )

१ ) गरोदरपणामध्ये तैलग्रंथी व धर्मग्रंथी जास्त क्रियाशील बनतात . त्यामुळे त्वचेवर एक प्रकारचा तजेला येतो . त्यालाच गरोदरपणाचे तेज असे म्हणतात .
२ ) चेहऱ्यावर व डोळ्याभोवती ही गरोदरपणात काळी वर्तुळे दिसतात. त्यांना क्लोआझमा ( Chloasma ) असे म्हणतात. हे देखील सूचक लक्षणांमध्ये घेतले जाते.
याचे कारण प्रोटिन डेफिसियन्सी तसेच अनेक प्रकारच्या जीवनरसत्त्वांच्या कमतरतेमध्ये त्वचेवर बदल दिसून येतात.
परंतु अनेक त्वचारोगांमध्ये देखील त्वचेमधील बदल आढळतात म्हणून हे लक्षण सूचक लक्षण मानले जाते.

५ ) क्विकनिंग ( Quickening in Marathi )

गरोदरपणाच्या १६ ते २० व्या आठवड्याच्या दरम्यान गर्भाच्या हालचालींची जाणीव सर्वप्रथम आईला होते. त्यास क्विकनिंग असे म्हणतात.
अगदी गर्भधारणा झाल्यापासून गर्भ जिवंत असतोच , परंतु त्याच्या हातापायांची वाढ पुरेशी झालेली नसते. त्यामुळे त्यांची हालचाल अगदी कमी असते म्हणून १६ आठवड्याच्या आधी क्विकनिंग होत नाही.

क्विकनिंग ( Quickening ) याही लक्षणाला सूचक लक्षणांमध्ये गणले जाते . कारण जी स्त्री गरोदरपणासाठी आसुसलेली असते तिला मानसिक अवस्थेमुळे पोटात फिरल्यासारखे वाटते. तसेच सुडो प्रेग्नन्सी ( Pseudopregnancy ) मध्येही अशी जाणीव गरोदर नसतानादेखील होऊ शकते.

II ) गरोदरपणाची संभाव्य चिन्हे – लक्षणे (Pregnancy Probable Signs in Marathi)


सर्व संभाव्य चिन्हे, लक्षणे ही तपासण्या करूनच पाहावी लागतात. यामध्ये मुख्यत्वे करून व्हजायनल एक्झामिनेशन करून व मूत्राच्या तपासण्या करून पाहाव्या लागतात.

अ ) व्हजायनल एक्झामिनेशन (Vaginal Examination in Marathi)

१ ) व्हजायन एक्झामिनेशन हि डॉक्टरांद्वारे केली जाणारी तपासणी आहे याद्वारे पाहाण्यात येणारी चिन्हे
१ ) व्हजायन एक्झामिनेशन

अ ) हेगार्स साईन ( Hegar’s sign in Marathi )

सहा ते बाराव्या आठवड्याच्या आत ही तपासणी करतात. यामध्ये डॉक्टर संपूर्ण निर्जंतुकपणाची काळजी घेऊन आपल्या उजव्या हाताची दोन बोटे ( तर्जनी व मधले बोट ) व्हजायनामधून आंत पुढील कप्प्यात ( Anterior Fornix ) मध्ये घालतात आणि डाव्या हाताची बोटे सिंफसीस प्युबिसजवळ गर्भाशयाच्या पाठीमागील बाजूस ठेवतात यावेळेस दोन्ही हाताची बोटे एकमेकांस भिडल्यासारखी वाटल्यास ‘ हेगार्स साईन पॉजिटिव्ह ‘ आहे असे समजले जाते.

गर्भधारणा झाली असल्यास या काळामध्ये

  • अ ) फलितबिजाची वाढ ( Fertilised ovum in Marathi ) गर्भाशयाच्या वरच्या भागात होत असल्यामुळे तेथील भागाची वाढ झालेली असते.
  • ब ) गर्भाशयाचा खालचा भाग हा रिकामाच असतो.
  • क ) सर्व्हिक्सचा भाग तुलनात्मकदृष्टीने स्थिर ( Firm ) असतो. गर्भाशयाच्या इस्थमसचा भाग आणि मऊ / सॉफ्ट झाल्यामुळे दोन्ही हातांची बोटे एकमेकांना भिडल्यासारखी वाटतात.
  • ही तपासणी डॉक्टर अतिहळुवारपणे करतात, म्हणजेच गर्भाशय अतिहळुवारपणे हाताळतात.

ब ) जॅक्वेमिअर्स साईन ( Jacquemiers Sign in Marathi)

या तपासणीमध्ये गरोदरपणाच्या आठव्या आठवड्यानंतर व्हजायनाच्या म्युकस मेम्ब्रेनचा रंग निळसर जांभळा झालेला दिसतो.
कारण गरोदपणामुळे तेथील रक्तपुरवठा वाढलेला असतो .

परंतु हे लक्षण रिट्रोवर्टेड युटरसमध्ये तसेच पेल्व्हिक ट्यूमर्स असतील तर आणि पेल्व्हिक सेल्युलायटिसमध्येही आढळते म्हणून या लक्षणाला संभाव्य लक्षण म्हटले आहे.

क ) ओसीयांडर्स साईन ( Osiander Sign in Marathi )

या तपासणीसाठी संपूर्ण निजतुकता पाळून डॉक्टर उजव्या हाताची दोन बोटे व्हजायनामधून आत लॅटरल फॉर्निसेसमध्ये घालतात. त्याठिकाणी त्यांना नाडीचे ठोके ( Pulsation ) लागतात. हे लक्षणदेखील तेथील रक्तपुरवा वाढल्यामुळेच दिसते.

परंतु अशा प्रकारचे लक्षण हे अ‍ॅक्यूट पेल्व्हिक इन्फ्लमेशन ( Acute Pelvic Inflammation ) मध्येही आढळते म्हणून याला संभाव्य लक्षण समजले जाते.

ड ) गुडेल्स साईन ( Goodell’s Sign in Marathi )

यामध्ये पी . व्ही . एक्झामिनेशनच्या वेळेस गर्भाशयाच्या सर्व्हिक्सचा भाग अतिशय मऊ लागतो. बाई गरोदर असल्यास सर्व्हिक्सच्या बाह्यद्वाराचा ( External OS ) स्पर्श हा बोटांना ओठाप्रमाणे लागतो व बाई गरोदर नसल्याम त्याच्या स्पर्शाची जाणीव ही नाकाच्या शेंड्याप्रमाणे असते.
स्पेक्युलम एक्झाम केल्यास आपल्याला सर्व्हिक्सचा रंग हा निळसर जांभळट दिसतो.

ई ) गर्भाशयातील बदल ( Changes in the Uterus )

आठव्या आठवड्यानंतर गर्भाशयाचे आकारमान वाढलेले असते. ते अतिशय मऊ लागते व आकार हा पेरूच्या आकाराऐवजी गोलाकार लागतो. परंतु पोटाचे आकारमान वाढणे हे पोटातील ट्यूमर्सच्या वाढीमुळे, पोटात पाणी झाल्यास ( Ascites in Marathi ) अशा प्रकारच्या इतर कारणांमुळेही वाढू शकतो. म्हणून हेदेखील लक्षण संभाव्य लक्षणांमध्ये गणले जाते.

फ ) बॅक्सटोनहिक्स काँट्रॅक्शन्स ( Braxton Hick’s contractions )

गरोदरपणाच्या २० व्या आठवड्यानंतर गर्भाशयाला वेदनारहित आकुंचने येतात व ती आपल्याला पोटाची चाचपणी ( Abdominal Palpation in Marathi ) वरून ओळखता येतात.

ही दर १५ मिनिटांनी येतात व ३५ आठवड्यानंतर यांची तीव्रता वाढते. या आकुंचनामुळे वारेच्या ठिकाणचे ( Placental Site ) रक्ताभिसरण वाढते. तसेच गर्भाशयाचे लोअर सेगमेंट तयार होण्यामध्ये यांचा थोडा फायदा होतो.

इंटरनल बॅलॉटमेंट ( Internal Ballottement )

१६ ते २० आठवड्याच्या दरम्यान ही तपासणी केली जाते. गरोदर स्त्रीला अर्धवट पालथी ( Semi – reccumbent ) झोपवून संपूर्ण निर्जंंतुकतेची काळजी घेऊन डॉक्टर उजव्या हाताची दोन बोटे व्हजायनामध्ये घालतात व डावा हात पोटावर गर्भाशयाच्या फंडसच्या ठिकाणी ठेवतात.
आतील दोन बोटांनी सर्व्हिक्सच्या वरील बाजूस हलकासा धक्का दिल्यास गर्भाशयातील गर्भाची धडक वरील हातास जाणवते व परत तो खाली आल्यावर व्हजायनामधील बोटांना त्याची जाणीव होते.
यालाच इंटरनल अलॉटमेंट असे म्हणतात, वरील सर्व लक्षणांवरून ती बाई गरोदर असण्याची शक्यता दाट आहे हे समजते.

२ ) बायोलॉजिकल किंवा इम्युनॉलॉजिकल तपासण्या (UPT in Marathi)

बाई गरोदर राहिल्यापासूनच तिच्या लघवीतून कोरियॉनिक गोनॅडोट्रोफीन हो हार्मोन्स बाहेर टाकली जातात. ते हॉर्मोन्स गरोदर स्त्रीच्या लघवीत आढळल्यास ती गरोदर आहे याची ९५ ते ९८ % खात्री देता येते.

परंतु राहिलेल्या २ % मध्ये ज्या स्त्रीला द्राक्षागर्भ आहे, कोरिओकारसीनोमा आहे त्यांच्याही लघवीतून ही हॉर्मोन्स बाहेर पडतात. परंतु या ठिकाणी निश्चितीकरणासाठी इतर तपासण्यांवर अवलंबून रहावे लागते म्हणून या तपासण्यादेखील प्रोबॅबल साईन्समध्येच मोडतात.

हल्लीच्या प्रगतकालामध्ये सहजतेने अल्ट्रासोनोग्राफी करून लगेचच गरोदरपणाचे निश्चितीकरण करता येते.

लघवीचा नमुना घेण्याची पद्धत ( Collection of Urine Sample in Marathi )

  • १ ) लघवी धरण्यापूर्वी बाह्यजननेंद्रिये भरपूर पाण्याने स्वच्छ करावीत.
  • २ ) लघवीसाठी घेतलेली बाटली स्वच्छ करून , उकळवून घेतलेली परंतु थंड असावी .
  • ३ ) बाटली रूंद तोंडाची , पांढऱ्या रंगाची व पुरेशी मोठी असावी व तिला घट्ट बसणारे फिरकीचे टोपण असावे.
  • ४ ) तपासणीसाठी सकाळची लघवी धरावी.
  • ५ ) लघवीची पहिली धार सोडून मधील लघवी तपासणीसाठी बाटलीमध्ये आणावी.
  • अशाप्रकारे तपासणीसाठी घेतलेल्या लघवीच्या बाटलीस शक्य तितक्या लवकर लॅबोरेटरीला पाठवून द्यावी.

III ) गरोदरपणाची निश्चितीकरणाची चिन्हे – लक्षणे (Pregnancy Positive Signs and Symptoms in Marathi)

खालील चिन्हा – लक्षणांवरुन मात्र आपण निश्चितपणे सांगू शकतो की ती स्त्री गरोदर आहे.

१ ) गर्भहृदयध्वनी ऐकू येणे (Hearing the Foetal Heart Sound in Marathi)

  1. गर्भहृदयध्वनी ऐकू येणे हे सर्वात महत्त्वपूर्ण असे चिन्ह आहे. सर्वसाधारणपणे गरोदरपणाच्या २० व्या ते २४ व्या आठवड्याच्या दरम्यान पोटावरून गर्भहृदयध्वनी ऐकू येतात.
  2. जर बाई अतिलठ्ठ असेल तर ते मंद ऐकू येतात. जर आतमध्ये गर्भोदकाचे प्रमाण जास्तअसेल तर गर्भहृदय ध्वनी दुरून ऐकू आल्यासारखे वाटतात.
  3. जर तपासणीच्या खोलीमध्ये गडबड गोंधळ खूप असेल तर ते कदाचित ऐकूही येत नाही.
  4. गर्भहृदयध्वनीचे प्रमाण स्वाभाविकत: १२० ते १४० प्रति मिनिटास असते, गर्भहृदयध्वनी १०० पेक्षा कमी किंवा १६० पेक्षा जास्त असणे धोक्याचे आहे. (Normal Foetal Heart Sound in Marathi)

२ ) गर्भाचे अवयव ( Foetal Parts in Marathi)

सर्वसाधारणपणे गरोदरणाच्या २२ व्या आठवड्यानंतर पोटावरून तपासणी (चाचपणी) केली असता ( Abdominal Palpation ) गर्भाच्या शरीराचे भाग हाताला लागतात. २८ आठवड्यानंतर मात्र गर्भाचे डोके, पाठ, हातपाय स्पष्टपणे व चांगल्याप्रकारे ओळखता येतात.

३ ) गर्भाची हालचाल ( Foetal Movements in Marathi )

गरोदरपणाच्या २२ ते २४ आठवड्यानंतर गर्भ मातेच्या पोटात चांगला फिरू लागतो. आपण जर गरोदरमातेच्या पोटावर हात ठेवून पाहिले तर ते आपणाला जाणवते. बऱ्याच वेळेला ही हालचाल पोटावर दिसते.

४ ) अल्ट्रासोनोग्राफी USG in Marathi

प्रेगन्सी- गरोदरपणाची लक्षणे, Pregnancy Symptoms in Marathi, अल्ट्रासोनोग्राफी, USG marathi , www.marathidoctor.com, Dr.Vivekanand V. Ghodake

सध्याच्या प्रगत काळातील ही आधुनिक पद्धत आहे. याच्या सहाय्याने गरोदरपणाच्या ६ व्या आठवड्यातदेखील गर्भधारणेची माहिती मिळते. सर्व सरकारी हॉस्पिटल्स मध्ये सोनोग्राफी मोफत केली जाते.

गरोदरपणाच्या सुरवातीच्या काळात सोनोग्राफीवरून खालील गोष्टी समजतात.

  • अ ) बाई गरोदर आहे हे समजते.
  • ब ) गर्भाशयात गर्भ आहे याची खात्री करता येते.
  • क ) गर्भ एक की अनेक हे समजते.
  • ड ) गर्भ जीवंत आहे हे समजते.
  • इ ) गर्भाचे जस्टेशनल एज समजते.
  • फ ) गर्भाशयात गाठी असतील तर त्याचे निदान होते.

Copyright Material Don't Copy © 2021

Recent Posts

जागतिक आरोग्य दिन २०२४ – माझे आरोग्य, माझे हक्क

जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास जागतिक आरोग्य दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो.… Read More

01/04/2024

राष्ट्रीय जंतनाशक दिन २०२४ प्रश्न उत्तरे Deworming day FAQ in Marathi

सन २०२३ - २०२४ राष्ट्रीय जंतनाशक दिन १३ फेब्रुवारी २०२४ व २० फेब्रुवारी २०२४ (मॉप… Read More

11/01/2024

गरोदरपणातील मधुमेह GDM in Marathi

गरोदरपणातील मधुमेह (GDM) म्हणजे काय? Gestational diabetes in Marathi :- गर्भधारणेदरम्यान जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण… Read More

07/01/2024

पोटातील जंत सर्व माहिती Roundworm Tapeworm Worm Meaning in Marathi

जंत ( Worm in Marathi ) होणे ही आपल्या देशातली महत्त्वाची समस्या आहे. ग्रामीण भागात… Read More

05/01/2024

उष्माघात कारणे लक्षणे प्रतिबंध उपचार Heat Stroke Meaning in Marathi

उष्माघात कारणे, उष्माघात लक्षणे, उष्माघात प्रतिबंध, उष्माघात उपचार, उष्माघात घरगुती उपाय, मराठी माहिती, Heat Stroke… Read More

19/03/2023