बाल आरोग्य

कांजण्या कारणे, लक्षणे, उपचार, घरगुती उपाय, आयुर्वेदिक उपाय, Chickenpox in Marathi

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

कांजण्या हा प्रामुख्याने १५ वर्षाखालील लहान मुलांमध्ये आढळणारा विषाणू मुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. 

दरवर्षी भारतात १००० लोकसंख्ये पाठीमागे १२ ते १७ बालकांना कांजण्या ची लागण होते.

कांजण्या हा आजार सुदृढ मुलांमध्ये सौम्य लक्षणे निर्माण करतो, परंतु काही प्रसंगी नवजात बालके, कमी प्रतिकार शक्तीची बालके, गर्भवती महिला किंवा निरोगी प्रौढांमधे गंभीर रुप धारण करु शकतो.

chickenpox in marathi, कांजण्या, chickenpox Symptoms in marathi, कांजण्या लक्षणे व उपाय

अनुक्रमणिका

कांजण्या आजाराची इतर नावे:-

इग्रजी नाव- chicken pox

मराठी नाव- कांजण्या

संस्कृत नाव- लघुमसूरिका (त्वकगत मसूरिका)

कांजण्या – kanjanya Meaning in English ?

कांजण्या ला इग्रजी मधे chicken pox असे म्हणतात.

कांजण्या का येतात ? कांजण्या येण्याची कारणे Chickenpox Cause in Marathi

कांजण्या हा संसर्गजन्य आजार व्हेरिसेला झोस्टर(Varicella zoster virus) या हर्पिस विषाणू कुलातील, विषाणूची लागणं झाल्यामुळे होतो. 

कांजण्याची लागण झालेल्या रुग्णाशी संपर्क आल्यामुळे कांजण्याचा प्रसार होतो.

ज्या बालकांना कांजण्याची लस दिलेली नसते त्यांंना आयुष्यात एकदा तरी कांजण्या होतात.

एकदा कांजण्या येऊन गेल्या की शरीरामध्ये कांजण्या या रोगाविरुद्ध कायमची आयुष्यभर टिकणारी प्रतिकारशक्ती निर्माण होते. त्या व्यक्तीला पुन्हा कांजण्या आजार होत नाही.

कांजण्याची लक्षणे काय असतात? Chickenpox Symptoms in Marathi?

सुरवातीला १-२ दिवस

१ ) मध्यम तीव्रतेचा ताप

२ ) अंगदुखी, डोकेदुखी

३ ) भूक न लागणे

४ ) सर्दि, खोकला हि लक्षणे दिसतात.

त्यानंतर २ -या, ३ -या दिवसा पासून खाजयुक्त पुरळ येण्यास सुरवात होते. हे खाजयुक्त पुरळ सुरवातीला पाठीवर पोटावर येतात व त्यानंतर हळूहळू संपूर्ण शरीरावर, तोंडात, नाकात, कानात, केसात, अन्ननलिका, स्वासनलिका, गुदमार्गात, योनीमार्गात येतात.

chickenpox in marathi, कांजण्या, chickenpox Symptoms in marathi, कांजण्या लक्षणे व उपाय

पुरळ अवस्था-

१) पॅपुल्स:-

सुरवातीला पुरळ हे लाल रंगाचे व आकाराने लहान असतात त्यांना पॅपुल्स असे म्हणतात.

२) व्हेसिकल्स:-

पॅपुल्स अवस्थेतील पुरळ आकाराने मोठे होतात त्यात द्रवयुक्ट पदार्थ (लस) जमा होतो, त्यावर काळपट बारिक टिपका तयार होतो या अवस्थेला व्हेसिकल्स असे म्हणतात.

chicken pox in marathi, कांजण्या, chickenpox Symptoms in marathi, कांजण्या लक्षणे व उपाय

३) क्रस्टिंग:-

व्हेसिकल्स अवस्थेतील पुरळ फुटतात त्यातील लस बाहेर पडते, व

खपली तयार होते या अवस्थेला क्रस्टिंग असे म्हणतात.

कांजण्या आजारात साधारणत: ५० ते १५०० पुरळ शरिरावर येतात. 

पुरळ ज्या क्रमाने येतात त्या क्रमाने १५ ते २१ दिवसात निघूण जातात. 

कांजण्याचे डाग ३ महिण्यात आपोआप नाहिसे होतात. या डागांसाठी सहसा विषेश उपचाराची गरज भासत नाहि.

कांजण्या रोगाची गुंंतागुंत Complications of Chickenpox in Marathi :-

१ ) त्वचेवरील पुरळामधे जीवाणूजन्य संक्रमण उद्भवू शकते, कधीकधी परिणामी त्यात पू तयार होतो व कोथ उत्पन्न होतो.

२ ) Meningoencephalitis- तीव्र स्वरुपाची सूज मेंन्दूवर येणे

३ ) Transverse myelitis- मज्जारज्जूला सूज येणे त्याचा दाह होणे

४ ) LGB syndrome – सार्वत्रिक चेतासंस्थेचा दाह झाल्यामूळे स्नायू शिथील होतात, व स्नायुंंचे कार्य कमी होते.

५ ) optic neuritis – डोळ्यांच्या चेतापेशीचा दाह झाल्यामुळे तात्पुरते अंधत्व येणे.

इ कांजण्या रोगाच्या गुंंतागुंत असून यांच्या उपचारा नंतरही मृत्यूचे प्रमाण जास्त असते.  

कांजण्या घरगुती उपाय Chickenpox Home remedy in Marathi :-

कांजण्या आल्यावर घरगुती उपाय, सौम्य स्वरुपाच्या कांजण्यासाठी, डॉक्टरांकडे जाईपर्यंंत घरगुती उपचार खालील प्रमाणे करावेत.

१ ) तापासाठी पाण्याध्ये भिजवलेल्या ओल्या कपड्याने अंग पुसावे.

२ ) अंगाला तेल लावू नये, तेल लावल्याने ताप वाढतो व अंगावर आलेल्या फोडांंमधे जंतूसंसर्ग होतो.

३ ) खाजेसाठी आंघोळीच्या पाण्यात ५० ते १०० ग्रॅम खाण्याचा सोडा मिसळावा.

४ ) तोडांत फोड आल्यामुळे व त्यामुळे होणा-या वेदनेमुळे बाळ खात नसल्यास, त्याला द्रव स्वरुपातील अन्नपदार्थ खाण्यास द्यावेत.

५ ) बाळाची नखे वाढलेली असतील तर काढावीत, वाढलेल्या नखाद्वारे खाजवल्यास, फोडामध्ये जंतूसंसर्ग होऊ शकतो.

६ ) आंघोळीच्या पाणी गरम करताना त्यात कडूलिंबाची पाने टाकावित, अशा कडूनिंब सिध्द पाण्याने आंघोळ करावी.

७ ) बाळाला डॉक्टरांच्या सल्ल्यांंने औषधोपचार करावा.

कांजण्या उपाय / उपचार Chickenpox Treatment in Marathi:-

कांजण्यासाठी सामान्यपणे लक्षणानुसार उपचार केला जातात.

१ ) Antipyretics –

तापाचे औषध बाळाच्या वजनानुसार प्रत्येक ६-८ तासांनी तापाचे औषध द्यावे.

२ ) Cough syrup –

सर्दि व खोकल्यासाठी औषध द्यावे.

३ ) Antihistaminics –

अंगावरील पुरळ व खाजेसाठी खाज कमी करणारी औषध द्यावे.

४ ) Antiviral Drugs –

कांजण्या आल्यावर Aciclovir नावाचे विषाणू मारणारे औषध वापरले जाते.

कांजण्याचे पुरळ अंगावर येण्यास सुरवात झाल्याच्या २४ तासांच्या आत Aciclovir हे औषध चालू केल्यास त्याचा चांगला फायदा होतो.

Aciclovir हे औषध ज्यांची प्रतीकार शक्ती कमी आहे, जे कुपोशीत आहेत किंवा ज्या बालकांंमध्ये कांजण्या रोगामुळे गुंंतागुंत निर्माण झाली आहे, त्यांच्यामधे २४ तासांच्यानंतरही चालू करणे फायदेशीर आहे.

Aciclovir औषधाचा डोस –

80 mg / kg / day या मात्रेत देण्यात येतो.

५ ) Antibiotic –

जर कांजण्या झालेल्या रुग्णाच्या पुरळांंमध्ये जंतूसंसर्ग झाला तर तुमचे डॉक्टर प्रतिजैवीक म्हणजेच Antibiotic देतात.

६ ) Calamine Lotion –

हे लोशन कांजण्या झालेल्या रुग्णाच्या अंगाला रोज ३-४ वेळा लावावे. यामुळे खाज व दाह कमी होतो तसेच यातिल झिंक हा घटक जंतूसंसर्ग होऊ देत नाही.

कांजण्या आयुर्वेदिक उपाय Chicken pox Ayurvedic Treatment in Marathi

आयुर्वेदात कांजण्याला लघुमसुरिका या नावाने ओळखतात, कांजण्या रोगाचे आयुर्वेदिक उपचार पदवीधर वैद्याकडूनच करावेत. कांजण्या रोगाचे आयुर्वेदिक उपचारात खालील चिकित्सा उपक्रमांचा समावेश होते

१ ) शमन चिकित्सा २ ) नैमित्तीक रसायन ३ ) पथ्थ – अपथ्थ

१ ) शमन चिकित्सा :-

येथे दिलेली औषधे तज्ञ पदवीधर वैद्यांच्या सल्ल्याने सेवन करावित, कारण रुग्णाचे वय, वजन, प्रकृती, दोषप्राबल्य, बल, आजाराची अवस्था, निदान या नुसार औषध व त्याची मात्रा पुर्णपणे बदलते. खाली दिलेली औषधे फक्त माहितीसाठी आहेत.

पंचतिकक्त कशाय –

तुमचे आयुर्वेदिक पदवीधर वैद्य पंचतिकक्त कशाय १० मिली रोज ३ वेळा समप्रमाण पाण्यासोबत घेण्याचा सल्ला देतील.

द्राक्षारीष्ट –

तुमचे वैद्य द्राक्षारीष्ट १० मिली रोज ३ वेळा समप्रमाण पाण्यासोबत घेण्याचा सल्ला देतील.

मृत्युंजय रस –

तुमचे आयुर्वेदिक डॉक्टर मृत्युंजय रस ची १ गोळी दिवसातून ३ वेळा आद्रक स्वरस व मधासोबत जेवणानंतर खाण्याचा सल्ला देतील.

दशांग लेप –

दशांग लेप तुपात कालवून त्याचा सर्वांगावर लेप करावा, यामुळे खाज व डाग़ कमी होण्यास मदत होते.

२ ) नैमित्तीक रसायन:-

कुमारकल्याण रस –

तुमचे वैद्य तुम्हाला कुमारकल्याण रस आर्धी ते १ गोळी रोज २ वेळा घेण्याचा सल्ला देतील.

तसेच तुमचे वैद्य अमृतोत्तर कशाय, कामदुधा व मुक्ता, मृत्यूंंजय रस, नारदेय लक्ष्मीविलास रस, संंशमनी वटि ( संंशमनी वटि १ गोळी ३ वेळा जेवनानंतर ) इ औषधे कांजण्या आजारासाठी वापरू शकतात.

कांजण्या पथ्थ – अपथ्थ :-

कांजण्या आजारात खालील प्रमाणे आहार व विहार यांंचे पालन करावे.

१ ) आहारात दूध, पचावयास हलके, ताजे अन्नपदार्थ, हिरव्या पालेभाज्या, मटनाचे सुप यांचा समावेश करावा.

२ ) ताक, डाळिम, आवळा खावेत.

३ ) रुग्णाने ७ दिवस गर्दिच्या ठिकाणी जाऊ नये.

४ ) अती तिखट, अती तेलकट, दही, बेकरी उत्पादणे, मटन खाऊ नये.

५ ) उन्हात, वा-यात जाऊ नये. आराम करावा कष्टाची कामे करु नयेत.

प्रतिबंधात्मक उपाय How to Prevent Chickenpox ?

१ ) कांजण्या झालेल्या रुग्णा जवळ जाणे टाळावे.

२ ) कांजण्या झालेल्या रुग्णाने सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे.

३ ) १ वर्ष वयानंतर लवकरात लवकर कांजिण्या प्रतिबंधक लस बालकाला द्यावी.

कांजण्या लसीकरण ChickenPox Vaccination in Marathi :-

कांजण्या प्रतिबंधक लस व्हेरिसेला झोस्टर इम्युनोग्लोबिन सध्या वापरात आहे.

कांजण्या प्रतिबंधक लस हि बालकाचे वय १ वर्ष पूर्ण झाल्यानंतर देतात.

१ वर्ष ते १२ वर्ष वयाच्या बालकांना कांजण्याच्या लसीचा एक डोस देतात, व ५ वर्षांनंंतर बुस्टर डोस देतात.

१२ वर्षां नंतर च्या वयाच्या बालकांंमधे व प्रौढांंना कांजण्या प्रतिबंधक लसीचे २ डोसेस आठ आठवड्यांच्या अंतराने देतात.

Chickenpox in Marathi, कांजण्या, प्रकांजण्या लसीकरण ChickenPox Vaccination in Marathi

View Comments

Recent Posts

जागतिक आरोग्य दिन २०२४ – माझे आरोग्य, माझे हक्क

जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास जागतिक आरोग्य दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो.… Read More

01/04/2024

राष्ट्रीय जंतनाशक दिन २०२४ प्रश्न उत्तरे Deworming day FAQ in Marathi

सन २०२३ - २०२४ राष्ट्रीय जंतनाशक दिन १३ फेब्रुवारी २०२४ व २० फेब्रुवारी २०२४ (मॉप… Read More

11/01/2024

गरोदरपणातील मधुमेह GDM in Marathi

गरोदरपणातील मधुमेह (GDM) म्हणजे काय? Gestational diabetes in Marathi :- गर्भधारणेदरम्यान जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण… Read More

07/01/2024

पोटातील जंत सर्व माहिती Roundworm Tapeworm Worm Meaning in Marathi

जंत ( Worm in Marathi ) होणे ही आपल्या देशातली महत्त्वाची समस्या आहे. ग्रामीण भागात… Read More

05/01/2024

उष्माघात कारणे लक्षणे प्रतिबंध उपचार Heat Stroke Meaning in Marathi

उष्माघात कारणे, उष्माघात लक्षणे, उष्माघात प्रतिबंध, उष्माघात उपचार, उष्माघात घरगुती उपाय, मराठी माहिती, Heat Stroke… Read More

19/03/2023