कोवीड १ ९ कोरोना या आजाराच्या उपचारा साठी आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी मार्गदर्शक सूचना. Ayush Guidelines for Covid 19 in Marathi, कोरोना साथीच्या रोगाकरीता आयुर्वेद , युनानी व होमिओपॅथी उपचार विषयक मार्गदर्शक सूचना टास्कफोर्स ऑन आयुष फॅार कोवीड १९ वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग महाराष्ट्र शासन द्वारा निर्गमित. Corona Treatment in Marathi.
अनुक्रमणिका
Covid 19 Safety Instructions in Marathi, Precautions of Covid 19 in Marathi –
१ ) वैयक्तिक स्वच्छतेचे व्यवस्थित पालन करावे .
२ ) वारंवार साबणाने हात वीस सेकंद पर्यंत धुवावे .
३ ) श्वसनाविषयक नियम पाळावेत – खोकताना व शिंकताना तोंड झाकावे .
४ ) ज्या व्यक्ती आजारी आहेत किंवा ज्यांना सर्दी खोकला इत्यादी आजाराची लक्षणे आहेत अशा व्यक्तींशी जवळचा संपर्क टाळावा .
५ ) जिवंत प्राण्यांशी संपर्क व कच्चे न शिजवलेले मांस खाणे टाळा .
६ ) पशुपालन गृह तसेच जिंवत पशु विक्री केंद्र किंवा कत्तल खाने या ठिकाणी प्रवास टाळावा .
७ ) थंड , फ्रिजमध्ये ठेवलेले व पचायला जड पदार्थ टाळणे हितकारक आहे . थंड वा-याचा थेट संपर्क टाळणे हे नेहमी फायदेशीर आहे .
८ ) प्रशिक्षित योग तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगासने व प्राणायाम यांचा सराव करावा .
९ ) पर्याप्त विश्रांती व वेळेत झोपणे हितकारक आहे .
Guidelines for COVID 19 in Marathi, Coronavirus Tips in Marathi –
हे ताजे उष्ण व पचायला हलके असावे . त्यात आख्खी धान्ये आणि ऋतूनुसार भाज्या इत्यादींचा समावेश असावा , तुळशीची पाने , ठेचलेले आले व हळद ही द्रव्ये पाण्यात उकळून ते पाणी वारंवार पिणे फायदेशीर आहे .
मुग डाळ पाण्यात उकळवून तयार केलेले मुगाचे गरम कढण / सुप / पाणी प्यावे , ते पोषक व पथ्यकर आहे .
१५० मिलीलिटर गरम दुधात अर्धा चमचा हळद व अर्धा चमचा सुंठीचे चुर्ण मिसळून हे दूध दिवसातून एकदा किंवा दोनदा प्यावे.
सर्दी व खोकला या सारखी श्वसन संस्थेची लक्षणे असल्यास मास्क चा वापर करावा. याशिवाय खालील नमूद विशिष्ट आयुष उपाययोजनांचे पालन करावे .
१ ) तुळशीची पाने , ठेचलेले आले व हळद ही द्रव्ये पाण्यात उकळून ते पाणी वारंवार पिणे फायदेशीर आहे .
२ ) सर्दी व खोकल्यासाठी चिमूटभर काळीमिरी चूर्ण मधातून सेवन करणे फायदेशीर आहे .
३ ) तसेच उपरोक्त लक्षणांमध्ये तुळस ( ऑसीमम सँक्टम ) , गुडुची / गुळवेल ( टीनोस्पोरा कॅार्डीफोलीया ) , आले ( झिंझीबेर ऑफीसिनेल ) आणि हळद ( करकूमा लाँगा ) या सामान्य औषधी वनस्पती उपयुक्त आहेत .
Ayush Guidelines for Covid 19 in Marathi, Guidelines for Corona in Marathi –
रोगप्रतिकार शक्ती वाढीसाठी व कोरोना प्रतिबंधासाठी आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथी उपचार –
१ ) संशमनी वटी –
संशमनी वटी ५०० मिली ग्रॅम – १ गोळी दिवसातून दोनदा – १५ दिवस
खरेदी करा संशमनी वटी, च्यवनप्राश –
२ ) आयुष क्वाथ – Ayurvedic Kadha for Corona in Marathi –
Kadha for Corona in Marathi –
या द्रव्यांच्या भरड चुर्णाने काढा तयार करणे .
आयुष क्वाथ / काढा तयार करण्याची पद्धत Kadha for Corona in Marathi :-
वरील औषधींचे ३ ग्रॅम भरड चुर्ण १०० मिलीलिटर उकळलेल्या पाण्यात मिसळून ५ ते ७ मिनीटे झाकून ठेवणे व गाळून ते पाणी / काढा पिणे . हा काढा सकाळ व संध्याकाळ ताजा बनवून १५ दिवसांसाठी सेवन करावा .
३ ) च्यवनप्राश –
च्यवनप्राश १० ग्रॅम ( १ मोठा चमचा ) सकाळी सेवन करावे . मधूमेही रुग्णांनी साखर विरहित / शुगरफ्री च्यवनप्राश सेवन करावे .
खरेदी करा च्यवनप्राश –
अ ) नस्य / नाका वाटे औषध टाकणे –
सकाळ व संध्याकाळ दोन्ही नाकपुडयांमध्ये तिळतेल / खोबरेल तेल किंवा तूप हे बोटाने लावावे / प्रतिमर्श नस्य करावे .
ब ) तेलाने गंडुश / गुळण्या व गरम पाण्याने गुळण्या करणे –
तोंडामध्ये १ मोठा चमचा तिळतेल / खोबरेल तेल घ्यावे . हे तेल न गिळता २ ते ३ मिनीटे गुळण्या कराव्यात व त्यानंतर हे तेल थुकावे व गरम पाण्याने चुळ भरावी . असे दिवसातून एकदा किंवा दोनदा करावे .
गरम पाण्याने देखील एकदा किंवा दोनदा गुळण्या कराव्यात .
काढा / जोशंदा घटक द्रव्ये व तयार करण्याची पद्धत-
बिहीदाना , उन्नाब , सपीस्तान , करंजवा -बिहीदाना ०५ ग्रॅम , बर्गे गावजबान ०७ ग्रॅम , उन्नाब ०७ दाणे , सपीस्तान ०७ दाणे , दालचिनी ०३ ग्रॅम , बनपशा ०५ ग्रॅम यांचा काढा / जोशंदा .
या घटकद्रव्यांना २५० मिलीलिटर पाण्यामध्ये १५ मिनीटे उकळवावे व गरम असताना चहाप्रमाणे दिवसातून १ किंवा २ वेळा १५ दिवसांकरिता सेवन करावे .
दुधासोबत ०५ ग्रॅम दिवसातून दोनदा सेवन करावे . ( मधुमेही रुग्णांनी सेवन करु नये . )
४ ग्लोब्युल्स / गोळया उपाशीपोटी दिवसातून दोनदा , असे तीन दिवस सलग सेवन करावे . एका महिन्याच्या अंतराने पुन्हा हा तीन दिवसांचा औषधाचा कोर्स करावा .
वरील सर्व उपक्रम हे आपआपल्या सोयीनुसार शक्य तेवढे पालन करावे .
कोवीड १ ९, कोरोना समान लक्षणे असणा-या रोंगासाठी आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथी उपचार – Covid 19 Treatment in Marathi, Corona Che Upay in Marathi –
१ ) टॅबलेट आयुष ६४ –
टॅबलेट आयुष ६४ च्या ५०० मिली ग्रॅम – २ गोळया दिवसातून २ वेळा १५ दिवस सेवन करणे .
२ ) अगस्त्य हरीतकी –
५ ग्रॅम दिवसातून २ वेळा गरम पाण्यासोबत १५ दिवस सेवन करणे .
३ ) अणूतेल / तीळतेल –
दोन थेंब प्रतिदिन सकाळी प्रत्येक नाकपुडीत टाकणे .
खरेदी करा तीळ तेल, अगस्त्य हरीतकी –
४ ) वाफारा घेणे –
ताजी पुदीन्याची पाने किंवा ओवा पाण्यात उकळून त्याची वाफ दिवसातून एकदा / दोनदा घेणे .
५ ) खोकला व घसा खवखवणे –
खोकला व घसा खवखवणे याकरीता नैसर्गिक साखर अथवा मध यामध्ये लवंगचुर्ण मिसळून दिवसातून २ ते ३ वेळा घेणे .
१ ) अर्के अजीब –
अर्धा ग्लास पाण्यामध्ये ५ थेंब औषध मिसळून गुळण्या कराव्या. हा उपक्रम १५ दिवस करावा .
हे मिश्रण घरीदेखील तयार करता येते.
तयार करण्याचा विधी –
प्रत्येकी ५ ग्रॅम सत्ते ( सत्व ) अजवाइन , सत्ते ( सत्व ) पुदीना व सत्ते ( सत्व ) कपूर / कफूर एकत्रित करुन तयार करता येते .
२ ) तिर्यक अर्बा –
हब्बुल घर / ( लॉरस नोबीलीस फळ ) , ज्युन्तीआना ( ज्येन्शीआना ल्युटीयाना मूळ ) , मूर ( कॉम्मीफोरा माईर डीक ) , झरवंद तवील ( अॅरीस्टोलोकीया लाँगा मूळ ) .
तयार करण्याचा विधी –
या सर्व घटकद्रव्यांचे चूर्ण तयार करुन तूपामध्ये परतावे व मध गरम करुन त्यामध्ये ही औषधे मिसळावीत . याचा वापर चूर्ण स्वरुपातही केला जावू शकतो .०१ चमचा चूर्ण सकाळी घ्यावे . हे औषध १५ दिवस घ्यावे .
अर्सेनिकम अल्बम ३० Arsenik Album 30 in Marathi –
४ ग्लोब्युल्स / गोळया उपाशीपोटी दिवसातून दोनदा , असे तीन दिवस सलग सेवन करावे . एका महिन्याच्या अंतराने पुन्हा हा तीन दिवसांचा औषधाचा कोर्स करावा .
तसेच ब्रायोनिया अल्बा ( Bryonia alba ) , हस टॉक्सीको डेन्ड्रान ( Rhus toxico Dendron ) , बेलाडोना जेलसेमियम ( Belladonna Gelesemium ) , युप्याटोरियम परफॉलिएटम ( Eupatorium perfoliatum ) , हि औषधे देखील सर्दी खोकला / फ्लू समान रोगांमध्ये चिकित्सेसाठी उपयुक्त ठरली आहेत .
( उपरोक्त सर्व औषधे तज्ञ आयुर्वेदिक , युनानी व होमिओपॅथीक डॉक्टरांच्या सल्यानंतरच घ्यावीत )
कोवीड १ ९ पॉझीटीव्ह अलाक्षणिक , चिकित्सालयीन तपासणीनुसार स्थिर ( क्लिनीकली स्टेबल ) असणा – या व इतर वर्तमान गंभीर व्याधी ( प्रि एक्झीसटींग को- मॉरबीडीटीज ) रहित रुग्णांकरीता प्रस्थापीत चिकित्सेला पुरक आयुर्वेद व होमिओपॅथी उपचार
Ayush Guidelines for COVID 19 in Marathi, Corona Treatment In Marathi –
५०० मिली ग्रॅम -२ गोळया दिवसातून दोन वेळा १५ दिवस सेवन करणे
किंवा
टॅबलेट सुदर्शन घनवटी Tablate Sudarshan Ghan Vati in Marathi –
२५० मिलीग्रॅम – २ गोळया दिवसातून २ वेळा १५ दिवस सेवन करणे .
५ ग्रॅम दिवसातून २ वेळा गरम पाण्यासोबत १५ दिवस सेवन करणे .
खरेदी करा सुदर्शन घनवटि,अयुष काढा, अयुश 64 टॅबलेट –
अ ) नस्य / नाका वाटे औषध टाकणे –
सकाळ व संध्याकाळ दोन्ही नाकपुडयांमध्ये तिळतेल / खोबरेल तेल किंवा तूप हे बोटाने लावावे / प्रतिमर्श नस्य करावे .
ब ) तेलाने गंडुश / गुळण्या व गरम पाण्याने गुळण्या करणे –
तोंडामध्ये १ मोठा चमचा तिळतेल / खोबरेल तेल घ्यावे. हे तेल न गिळता २ ते ३ मिनीटे गुळण्या कराव्यात व त्यानंतर हे तेल थुकावे व गरम पाण्याने चुळ भरावी .
असे दिवसातून दोनदा / तीनदा करावे . गरम पाण्याने देखील दोनदा / तीनदा गुळण्या कराव्यात .
क ) वाफारा घेणे -
गरम पाण्याची वाफ दिवसातून दोनदा / तीनदा घ्यावी . उपरोक्त सामान्य प्रतिबंधात्मक उपायांचे देखील पालन करावे .
कोवीड १ ९ समान रोगांच्या लक्षणांच्या चिकित्सेकरीता उपरोक्त नमूद औषधांचा वापर हा प्रस्थापीत चिकित्सेस पुरक चिकित्सा म्हणून केला जावू शकतो .
( उपरोक्त सर्व औषधे तज्ञ आयुर्वेदिक व होमिओपॅथीक डॉक्टरांच्या सल्यानंतरच घ्यावीत )
उपरोक्त सर्व मार्गदर्शक सूचना या आयुर्वेद , युनानी व होमिओपॅथी चिकित्सा पध्दतीद्वारा रोग प्रतिकार शक्ती वाढीसाठी जनहितार्थ निर्गमित करण्यात येत असून , त्याद्वारे कोवीड १ ९ प्रतिबंधास मदत होण्याची शक्यता आहे . Covid 19 Suchana in Marathi
कोवीड १ ९ प्रतिबंधाचा किंवा चिकित्सेचा कोणताही दावा या ठिकाणी करण्यांत येत नाही .
आपणांस ताप , घसा खवखवणे , कोरडा खोकला , श्वास घेण्यास त्रास होणे किंवा इतर कोवीड १ ९ समान लक्षणे अधिक काळ जाणवल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे .
वरील सर्व माहिती टास्कफोर्स ऑन आयुष फॅार कोवीड १ ९ वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग महाराष्ट्र शासन द्वारा निर्गमित केलेली आहे.
जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास जागतिक आरोग्य दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो.… Read More
bhagar-khatana-kay-kalaji-ghyavi-bhagar-vhishbadha-bhagar-acidity Read More
सन २०२३ - २०२४ राष्ट्रीय जंतनाशक दिन १३ फेब्रुवारी २०२४ व २० फेब्रुवारी २०२४ (मॉप… Read More
गरोदरपणातील मधुमेह (GDM) म्हणजे काय? Gestational diabetes in Marathi :- गर्भधारणेदरम्यान जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण… Read More
जंत ( Worm in Marathi ) होणे ही आपल्या देशातली महत्त्वाची समस्या आहे. ग्रामीण भागात… Read More
उष्माघात कारणे, उष्माघात लक्षणे, उष्माघात प्रतिबंध, उष्माघात उपचार, उष्माघात घरगुती उपाय, मराठी माहिती, Heat Stroke… Read More