स्त्रीयांचे आरोग्य व आजार

आय व्ही एफ सर्व माहिती IVF Treatment Information in Marathi

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

खालील लेखात आय यु आय, आय व्ही एफ, इक्सी IUI, IVF, ICSI in Marathi बद्दल सर्व माहिती देण्यात आलेली आहे. IVF Treatment Information in Marathi.

आय व्ही एफ (IVF Treatment in Marathi) –

अनेक जोडपी बाळ होण्यासाठी IVF चा विचार करतात.मात्र IVF उपचार पद्धत घेत असतात त्या दोघांनांही अनेक शारीरिक व मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागते.अशा वेळी IVF पहिल्याच सायकल मध्ये यशस्वी गर्भधारणा रहाणे हे सर्वस्वी तुमच्या शारिरीक क्षमता व मानसिक अवस्थेवर अवलंबून असते.

आय यु आय, आय व्ही एफ, इक्सी म्हणजे काय? IUI, IVF, ICSI in Marathi

आय यु आय म्हणजे काय? IUI in Marathi –

Intra uterine Insemination  यामध्ये गर्भ पिशवीच्या आतमध्ये पतीचे वीर्य Cannula द्वारे ने सोडले जाते. स्त्रीला पाळीच्या दुसर्या दिवसापासून गोळ्या अथवा इंजेक्शन देऊन अंडाशयात अंडी तयार करतात. त्याचे Follicular Study करून 36 तासानंतर IUI  केले जाते. पतीच्या शुक्रजंतूंची संख्या कमी असली तरी या पध्दतीमुळे फायदा होऊन गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते.

कृत्रिम बिजारोपण हे सध्या अस्तित्वात असलेल्या अनेक प्रजनन उपचारांपैकी एक आहे. ह्यामध्ये गर्भाशयात जास्तीत जास्त सक्षम शुक्रजंतू नेऊन सोडले जातात ज्याने गर्भधारणेची संभाव्यता वाढते .

ह्याची प्रक्रिया काय आहे ?

ह्या प्रक्रियेमध्ये स्त्रीला स्त्रीबीज तयार करण्यासाठी काही विशिष्ट औषधी दिले जातात. अंडे फुटण्याच्या वेळी पुरुषाचे शुक्रजंतू साफ करुन त्यातील शुक्रजंतूंची शक्ती वाढवून ते गर्भपिशवीच्या वरच्या भागात एका छोट्याशा नळीद्वारे नेऊन सोडले जातात. आशा पद्धतीने शुक्रजंतूंना स्त्रीबीजाजवळ नेऊन सोडल्यामुळे शुक्रजंतू आणि स्त्रीबीज ह्यांचे मिलन होऊन फलन होण्याची शक्यता बळावते.

याकरिता किती कालावधी लागतो ?

साधारणतः महिन्यातून ३ ते ४ वेळा दवाखान्यात जावे लागते.
ही प्रक्रिया अंदाजे १० ते १५ मिनिटात संपते.

एखाद्याने कृत्रिम बीजारोपणाचा पर्याय कधी निवडावा ?

वीर्यात शुक्रजंतूंची संख्या कमी असल्यास, शुक्रजंतूंची शक्ती कमी असल्यास किंवा वीर्यात शुक्रजंतू आजिबात नसल्यास दात्याचे शुक्रजंतू वापरून किंवा अस्पष्ट वंधत्व ही कृत्रिम गर्भधारणे साठीची काही महत्त्वाची कारणे आहेत.

आपल्याला आय यु आय म्हणजेच कृत्रिम गर्भधारणा ही प्रक्रिया निवडायची असल्यास आपल्या जवळील वंध्यत्व तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आय व्ही एफ / टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय? IVF / Test tube Baby in Marathi –

IVF ( In Vitro Fertilization) (ivf full form in marathi) म्हणजेच (Test tube Baby) यामध्ये स्त्रीला पाळीच्या गोळ्या दिल्या जातात आणि पाळीच्या 20 व्या दिवसापासून इंजेक्शन सुरू होतात जी रोज 20-25 दिवस घ्यावी लागतात. पाळी आल्या नंतर पाळीच्या दुसर्या दिवसापासून अंडाशयात अंडी तयार होण्यासाठी वेगळी इंजेक्शन सुरू करतात.

पाळीच्या 9 व्या दिवसापासून Follicular Study करून अंडाशयातील Follicules ची वाढ 18 मी. मी. पेक्षा जास्त झाली की इंजेक्शन देऊन 36 तासांनी तयार झालेली अंडी अंडाशयातून सुईने बाहेर काढतात. त्यासाठी सोनोग्राफीचा उपयोग केला जातो. पेशंटच्या पोटावर कोणतीही शत्रक्रिया केली जात नाही. ( ivf information in marathi )

बाहेर काढलेली स्त्रीबीज आणि पतीचे शुक्रजंतू यांचे शरीराच्या बाहेर मीलन घडवून आणतात आणि शरीराबाहेर गर्भ तयार केला जातो. हा गर्भ Incubator मध्ये  2-3 दिवस वाढवून नंतर पत्नीच्या गर्भ पिशवीमध्ये सोडला जातो. हा गर्भ गर्भपिशवीत रूजतो. 9 महिने त्याची वाढ होते आणि नंतर बाळ जन्माला येते.

कृत्रिम बीजारोपण ( आय यू आय ) आणि टेस्ट ट्यूब बेबी यामधील फरक काय ?

टेस्ट ट्यूब बेबीमध्ये शुक्रजंतु आणि स्त्रीबीज ह्यांचे फलन शरीराबाहेर एका प्रयोगशाळेत केले जाते व गर्भ हा प्रयोगशाळेत तयार करून नंतर स्त्रीच्या गर्भाशयात सोडला जातो.

परंतु कृत्रिम बीजारोपणात शुक्रजंतु स्त्रीबीजाजवळ नेऊन सोडले जातात व शुक्रजंतु स्वतः नैसर्गिकरीत्या स्त्रीबिजात प्रवेश करतो आणि स्त्रीला गर्भधारणा होते.

कृत्रिम बीजारोपण हे टेस्ट ट्यूब बेबीच्या तुलनेत कमी खर्चिक आहे.

– कृत्रिम बीजारोपण ही प्रक्रिया टेस्ट ट्यूब बेबीपेक्षा कमी त्रासदायक आहे.

– परंतु टेस्ट ट्यूब बेबीचा गर्भधारणेचा दर कृत्रिम बीजारोपणापेक्षा अधिक आहे.

इक्सी म्हणजे काय? ICSI in Marathi –

ICSI  (Intra Cytoplasmic Sperm Injection)  ज्या पुरूषांमध्ये शुक्रजंतूंची संख्या अतिशय कमी आहे त्या जोडप्यासाठी या पद्धतीचा उपयोग होतो. या पद्धतीत IVF सारखीच प्रक्रिया असते. फक्त शुक्रजंतू हे बीजांडावर न सोडता, स्रीबीजाच्या आतमध्ये इंजेक्शनने सोडतात. शुक्रजंतूंची संख्या चांगली असेल तर या प्रक्रियेची आवश्यकता नसते.

सरोगेट मदर म्हणजे काय? Surrogate Mother in Marathi

हा प्रकार हल्ली बर्याच टीव्ही सिरीयल मधून दाखवला जातो. एखाद्या स्त्रीला जन्मतःच गर्भपिशवी नसेल किंवा काही कारणांनी काढून टाकली असेल अथवा काही दोष असेल तर या मार्गाचा अवलंब केला जातो.

पत्नीच्याच अंडाशयात अंडी तयार करून पतीचे शुक्रजंतू वापरून गर्भ तयार होतो तो दुसर्या स्त्रीच्या गर्भशयात वाढवला जातो. अशा प्रकारे पती आणि  पत्नीचे गुणसूत्र असलेला गर्भ हा दुसर्या आईच्या पोटात वाढवून पत्नीला बाळ दिले जाते. जी स्त्री हा गर्भ वाढवते तिला Surrogate Mother  म्हणतात.

दिल्लीच्या Mother’s Lap IVF Centre मधील Medical Director and IVF Specialist यांच्या मते जाणून घेऊयात IVF पद्धतीने यशस्वी गर्भधारणा राहण्यासाठी नेमके काय करावे.

१. प्रथम आय.व्ही.एफ पुर्वतयारी करा –

उपचार सुरु करताना कमीतकमी तीन महीने आधीपासून तुमच्या मासिक पाळीच्या तारखा व त्याबाबत इतर बाबी नोंद करुन ठेवा. कारण उपचार करताना याची मदत होऊ शकते. गर्भधारणा होण्याची शक्यता नेमकी कधी आहे किंवा गर्भधारणेत नेमकी काय अडचण आहे हे समजून घेण्यासाठी तुमच्या डॉक्टरांना यामुळे मदत होते.

२. ताण-तणाव टाळा –

जीवन जगत असताना सर्वच परिस्थितीत चिंता-काळजी पासून दूर राहणे अशक्य आहे. मात्र तुम्ही अशा वेळी जाणिवपूर्वक काही गोष्टी टाळू शकता ज्यामुळे तुम्हाला अधिक ताण येणार नाही. उपचार सुरु करण्यापुर्वी नवीन घरी शिफ्ट होणे, नवीन ठिकाणी जॉबला जाणे किंवा करीयर मध्ये बदल करणे टाळा. आय.व्ही.एफ उपचारांच्या चांगल्या परिणामांसाठी दोघांनीही जास्त ताण घेणे टाळा. कारण अती ताणाचा स्त्री व पुरुष दोघांच्यांही फर्टिलिटीवर विपरित परिणाम होऊ शकतो.

३. अ‍ॅक्युपंक्चर करा –

जर तुमच्या डॉक्टरांनी यासाठी तुम्हाला परवानगी दिली तरच तुम्ही एखाद्या विश्वनीय व सुपरिचित एक्युपंक्चर सेंटरमधून हे उपचार घ्या. एक्युपंक्चरचा महीलांना आयव्हीएफ उपचार घेताना गर्भधारणेसाठी अधिक चांगला फायदा होतो. काही महीलांना एम्ब्रीओज ट्रान्सफर केल्यानंतर एक दिवसाच्या आत जर एक्युपंक्चर उपचार दिले तर त्याचा त्यांना एम्ब्रीओज इम्प्लांटेशन व यशस्वी गर्भधारणा होण्यासाठी चांगला फायदा होतो.

४. सकस अन्न घ्या –

आय.व्ही.एफ उपचार यशस्वी होण्यासाठी व गर्भधारणा राहण्यासाठी तुमच्या आहारात चांगले बदल करा. अन्नातील पोषणमुल्यांमुळे स्त्रीच्या शरीरात सृदुढ एग्ज निर्माण होतात तसेच गर्भधारणेसाठी तिला याचा अधिक फायदा होतो. यासाठी संतुलित आहार घ्या.

दिवसभरात चार ते सहा वेळा थोडे थोडे पोषक अन्न खा.तुमच्या रोजच्या आहारात ताज्या भाज्या व फळे तसेच ब्राऊन राईस सारखी कर्बोदके येतील याची दक्षता घ्या. ज्यामुळे तुमच्या शरीराला पुर्नउत्पादनासाठी व गर्भधारणेसाठी लागणारी पुरेशी उर्जा मिळेल.

https://marathidoctor.com/care-during-pregnancy-in-marathi.html

५. मुबलक पाणी प्या –

पुरेश्या प्रमाणात पाणी पिण्याने तुमच्या शरीरातील विषद्रव्ये (टॉक्सिन्स) शरीराबाहेर टाकण्यास मदत होते तसेच आय.व्ही.एफ उपचारातील इतर दुष्परिणाम होत नाहीत. ज्या स्त्रीयांना Ovarian hyper stimulation syndrome चा त्रास असतो त्यांना या उपचारात काही इंजेक्शन्स दिली जातात.

मुबलक पाणी प्यायल्याने ही इंजेक्शन घेताना होणा-या वेदना व सुज कमी होते. या महीलांनी दिवसभरात कमीतकमी तीन ते पाच लीटर पाणी प्यावे.

६. अल्कोहोल घेणे टाळा –

अल्कोहोलचे सेवन गर्भधारणे पुर्वी किंवा गर्भधारणे नंतर करावे किंवा नाही हा मुद्दा वादाचा ठरु शकतो. पण असे असले तरी नियमित किंवा अगदी कमी प्रमाणातही मद्यपान केल्यास गर्भधारणा राहण्याचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी होऊ शकते.

७. कॅफेन चे अतीसेवन टाळा –

पाच किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात कॉफी घेतल्यास मिसकॅरेज होण्याचा धोका अधिक असतो. अगदी त्याचप्रमाणे जर तुम्ही कोक,ज्युसेस,सॉफ्टड्रिंक घेतले तरी देखील त्यातील कॅफेनच्या प्रमाणामुळे गर्भधारणा होण्याची शक्यता कमी होते.

८. स्वत:ची काळजी घ्या –

ताणतणाव टाळण्यासाठी तुमच्या आवडत्या गोष्टी करा.पुस्तक वाचा,तुमच्या जोडीदाराशी गप्पा मारा,छंद जोपासा, बागेत फेरफटका मारा. आई होण्याच्या या भावनिक चढउतारामध्ये ताणापासून दूर राहण्यासाठी तुम्हाला आनंद मिळेल अश्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा.

९. डॉक्टरांच्या सतत संपर्कात रहा –

कोणत्याही वेळी तुम्हाला त्रास अथवा अस्वस्थता जाणवल्यास त्वरीत तुमच्या डॉक्टरांना याबाबत सांगण्यास अजिबात संकोच बाळगू नका. तुमच्या मनातील भीती व काळजी बाबत देखील तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करायला काहीच हरकत नाही.

१०. प्लॅन बी तयार  ठेवा –

नेहमी दुसरा पर्याय देखील तयार ठेवा.जर तुमचे हे आय.व्ही.एफ सायकल यशस्वी झाले नाही तरी धीर सोडू नका.तुम्ही तुमच्या आयव्हीएफ तज्ञांसोबत चर्चा करुन दुस-या आयव्हीएफ सायकल चा किंवा एग डोनर / स्पर्म डोनर किंवा सरोगसी इत्यादी पर्याय निवडू शकता.

Copyright Material Don't Copy © 2022-2023

Recent Posts

SRDP उपचार: संपूर्ण माहिती, फायदे आणि प्रक्रिया

प्रस्तावना SRDP (Scientific Reversal Detoxification Process) उपचार ही एक आधुनिक आयुर्वेदिक पद्धती आहे जी पारंपरिक… Read More

05/03/2025

सोरायसिस कारणे, लक्षणे, घरगुती उपाय आणि आधुनिक उपचार

प्रस्तावना सोरायसिस हे एक दीर्घकालीन त्वचेचे आजार आहे जे त्वचेच्या पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवते. ही… Read More

27/02/2025

PCOD उपचार: कारणे, लक्षणे, उपाय आणि जीवनशैलीतील बदल

प्रस्तावना पॉलीसिस्टिक ओव्हरी डिसऑर्डर (PCOD) किंवा पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) ही एक सामान्य हॉर्मोनल समस्या… Read More

25/02/2025

केस गळती थांबवण्याचे उपाय, कारणे, लक्षणे, प्रतिबंध आणि नवीन उपचार

प्रस्तावना केस गळती ही एक सामान्य समस्या बनली आहे जी पुरुष आणि महिलांना सारख्या प्रभावित… Read More

22/02/2025

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग: कारणे, लक्षणे, उपाय, प्रतिबंध, लस आणि नवीन उपचार

प्रस्तावना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) हा महिलांमध्ये आढळणारा एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे,… Read More

21/02/2025

आम्लपित्त – ऍसिडिटी उपचार, कारणे, लक्षणे, घरगुती उपाय आणि प्रतिबंध

ऍसिडिटी, ज्याला मराठीत "अम्लपित्त" किंवा "छातीत जळजळ" असेही संबोधले जाते, ही आजकालच्या जीवनशैलीमुळे सामान्य झालेली… Read More

20/02/2025