आजारांची माहिती

पोष्टमार्टेम ची सर्व माहिती Postmortem in Marathi

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

न्यायवैद्यकीय शवचिकित्सा म्हणजेच पोष्टमार्टेम Postmortem in Marathi.

गुन्हेगारी हा एक सामाजिक रोग आहे. रोगमुक्त समाज हे वैद्यकीय व्यवसायाचे अंतिम लक्ष असून या ध्येयपूर्तीसाठी प्रयत्नशील व सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे. रोग्याचे उपचार करणे आणि न्यायवैद्यकीय कामकाजाद्वारे गुन्हा अन्वेषण व न्यायदान प्रक्रियेत मदत करणे या दोन्ही गोष्टींचा मूळ उद्देश आजार व गुन्हेगारीसारख्या दुष्प्रवृत्तीपासून समाजाचे रक्षण करणे हाच आहे.

याच कारणास्तव न्यायवैद्यकीय शवचिकित्सा हा गुन्हा अन्वेषण व न्यायदान प्रक्रियेतील अत्यंत महत्वाचा दुवा ठरतो. चिकित्सालयीन कामकाज व प्रशासकीय कामाबरोबर न्यायवैद्यकीय शवचिकित्सा करणे हा वैद्यकीय अधिका-यांच्या दैनंदिन कामाचा महत्वाचा व अनिवार्य भाग आहे.

खून, आत्महत्या, अपघात, विषबाधा व संशयास्पद परिस्थितीतील मृत्यू दवाखान्यात दाखल झाल्यानंतर २४ तासाच्या आत मृत्यु झालेल्या प्रकरणात न्यायवैद्यकीय अवचिकित्सा अनिवार्य ठरते.

त्याचप्रमाणे बधिरावस्था व शल्यक्रियेदरम्यान अथवा पश्चात्य मृत्यू प्रकरणात देखील न्यायवैद्यकीय शवचिकित्सा करणे क्रमप्राप्त ठरते. सर्वसाधारणपणे अशा प्रकरणात विनंती पत्र व पंचनाम्यासह पोलीसांमार्फत मृतदेह शवचिकित्सेसाठी आणले जातात.

परंतु आरोपी किंवा कैदी मृत्यू पावल्यास अथवा पोलिस गोळीबार मृत्यू प्रकरणी दंडाधिका-यामार्फत मृतदेह शवचिकित्सेसाठी आपले जातात.

पोष्टमार्टेम चे उदिष्टे Use of Postmortem in Marathi

  • मृत व्यक्तीची ओळख पटविणे.
  • मृत्यूचे कारण ठरविणे.
  • मृत्यूची वेळ ठरविणे.
  • मृत्यूचा प्रकार ठरविणे ( खून , आत्महत्या , अपघात )
  • अर्भक / नवजात शिशु मृत्यू प्रकरणात जीवन क्षमता ठरविणे.

न्यायवैद्यकीय शवचिकित्सा महत्वाच्या बाबी

  • शवचिकित्सा नोंदणीकृत अनुभवी वैद्यकीय अधिका-यांनी करावी.
  • शवचिकित्सा काटेकोर व संपूर्ण असावी.
  • सर्व पुराव्याच्या गोष्टी जपून ठेवाव्यात.
  • सुस्पष्ट, सविस्तर अहवाल लिहावा.

न्यायवैद्यकीय शवचिकित्सा चे नियम

  • अधिकार पत्रांशिवाय ( उदा . पोलिसांचे विनंती पत्र , पंचनामा व शवफॉर्म ) शवचिकित्सा न करणे.
  • शवचिकित्सेपूर्वी मयताची ओळख पटविणे आवश्यक.
  • पंचनामा अपूर्ण वा चूक असल्यास दंडाधिका-यांमार्फत दुसरा पंचनामा करुन घेणे.
  • आवश्यक वाटल्यास / पोलिसांनी विनंती केल्यास घटना स्थळास भेट देणे.
  • मृत व्यक्ती उपचारासाठी एखाद्या रुग्णालयात दाखल झालेली असल्यास त्या कागदपत्रांची पाहणी करणे.
  • आरोपी / कैदी मृत्यू प्रकरणात मृतदेहांची सविस्तर रंगीत छायाचित्रे काढण्यास पोलिसांना लेखी सांगणे.
  • शवचिकित्से दरम्यान अनधिकृत व्यक्तिना / आगंतुकांना शवगृहात प्रवेश न देणे.
  • शवचिकित्सा दिवसा प्रकाशात करणे.
  • शवचिकित्सेस विलंब न लावता मृतांच्या नातेवाईकांशी सभ्यपणे व आपुलकीने बोलणे.

प्रत्यक्ष शवचिकित्सा

  • अ ) बाहय परिक्षण :
    • मृतदेहाचे संपूर्ण अवलोकन. जखमा, महत्वाच्या रोगांची लक्षणे, श्वासाबरोबरच्या खुणा, विषबाधेची लक्षणे इ. विशेषत्वाने नोंद केली जाते.
  • ब ) अंतर्परिक्षण :
    • छाती , पोट व कवटीच्या पोकळयातील सर्व अवयवांचे व्यवस्थित परिक्षण व नोंदी.
  • क ) शवचिकित्सेनंतर मृतदेह / कपडे / व्हिसेरा / पुराव्याच्या इतर वस्तू अधिकृत पोलिसास देऊन लेखी पावती घ्यावी.
  • ड ) शवचिकित्सेनंतर ४८ तासाचे आत शवचिकित्सा अहवाल कार्यालयात नोंदीसह जमा करणे , दस्तऐवज गोपनीय व सुरक्षित ठेवणे.

मृत्यू म्हणजे काय ?

मृत्यू हा जीवनाचा शेवट आहे. वैद्यकीय शास्त्रानुसार मृत्यू म्हणजे श्वसनक्रिया, हृदयक्रिया व मेंदूचे कार्य या तीन अती आवश्यक क्रिया बंद पडणे. यापैकी काही आधी किंवा लगेच, नंतर बंद पडते. हृदय व श्वसनक्रिया हया परस्परावलंबी असतात. त्यामुळे एक बंद झाली की लगेच दुसरीही बंद पडते. यानंतर २ ते ३ मिनिटात मेंदू निष्क्रीय होतो व जीवन संपते.

मृत्यूचे निदान

  1. दृदयक्रिया –
    • नाडी तपासणी, गळयाच्या व मनगटाच्या जागी तपासतात. तसेच दृदयावर (डाव्या छातीवर) हात ठेवल्यास हृदयाचे ठोके जाणवतात. तसेच स्टेस्थोस्कोपद्वारे सुध्दा हृदयाचे ठोके तपासता येतात. मृत व्यक्तीमध्ये नाडी व दृदयाचे ठोके जाणवत नाही.
  2. श्वसनक्रिया –
    • श्वसन छातीच्या हालचालीवरुन कळते. स्टेथोस्कोपने सुध्दा श्वसनाचे आवाज तपासता येतात. मृत व्यक्तीमध्ये श्वसनक्रिया बंद पडते.
  3. मेंदूचे कार्य –
    • मेंदू मृत झाल्याची महत्वाची खुण म्हणजे बाहुल्या विस्फारणे व बॅटरीने प्रकाश टाकूनही त्या आकुंचित न होणे. त्याशिवाय इतर प्रतीक्षिप्त क्रिया सुध्दा बंद पडतात. याशिवाय स्नायू शिथिल पडणे, शरीराचे तापमान थंडावणे व नंतर शरीर कडक व ताठर होणे ह्या टप्याटप्याने होतात.
Copyright Material Don't Copy © 2021

Recent Posts

राष्ट्रीय जंतनाशक दिन २०२४ प्रश्न उत्तरे Deworming day FAQ in Marathi

सन २०२३ - २०२४ राष्ट्रीय जंतनाशक दिन १३ फेब्रुवारी २०२४ व २० फेब्रुवारी २०२४ (मॉप… Read More

11/01/2024

पोटातील जंत सर्व माहिती Roundworm Tapeworm Worm Meaning in Marathi

जंत ( Worm in Marathi ) होणे ही आपल्या देशातली महत्त्वाची समस्या आहे. ग्रामीण भागात… Read More

05/01/2024

उष्माघात कारणे लक्षणे प्रतिबंध उपचार Heat Stroke Meaning in Marathi

उष्माघात कारणे, उष्माघात लक्षणे, उष्माघात प्रतिबंध, उष्माघात उपचार, उष्माघात घरगुती उपाय, मराठी माहिती, Heat Stroke… Read More

19/03/2023

पांढरे डाग, कोड त्वचारोग लक्षणे, कारणे, निदान, उपचार, घरगुती उपाय, Vitiligo in Marathi

कोड रोग म्हणजे काय ? कोड रोग म्हणजेच vitiligo मध्ये त्वचेचा रंग जातो, ज्यामुळे, त्वचेवर… Read More

19/02/2023

आरोग्यवर्धिनी उपकेंद्र बोरीपार्धी अंतर्गत जागतिक योग दिन साजरा डॉ गणेश केशव भगत

आरोग्यवर्धिनी उपकेंद्र बोरीपार्धी अंतर्गत नाथनगर विद्यालय बोरीपार्धी येथे 21 जून 2022 रोजी जागतिक योग दिन… Read More

22/06/2022