विकली ऑयन फॉलिक अॅसीड सप्लिमेंटेशन ( WIFS in Marathi ) अॅनिमिया / रक्तक्षय हा गंभीर स्वरुपाचा सामाजिक स्वास्थ्याची समस्या आहे. त्याचा परिणाम स्त्रिया व मुलांच्या संपुर्ण वाढीवर होतो. रक्तक्षय हा मुला / मुलींच्या विकासाला अध्ययन क्षमतेला आळा घालतो.
दैनंदिन कार्यातील एकाग्रता कमी करतो त्यांना रोग संक्रमणास अधिक विकारक्षम बनवतो. शाळा अनुपस्थिती दर वाढवतो, शारीरीक सक्षमता आणि कार्यक्षमता कमी करतो. किशोरअवस्था / पौंगडाअवस्था हा रक्तक्षयाबाबत हस्तक्षेप करण्यासाठी योग्य काळ आहे.
अपुरे पोषण, शिक्षणाचा अभाव आणि अपुरे लोह व फॅालिक अॅसिड पुरवणी यामुळे मुले व मुली लोह कमतरतेच्या आणि रक्तक्षयाच्या चक्रात आडकल्या जातात.पौगंडावस्थेतील मुलांच्या वाढीसाठी आवश्यक ती पुर्तता करण्याखेरीज पुरेसेलोहाचे अभिशोषण हे गर्भावस्थेपुर्व व दरम्यान आवश्यक असते.
विकली ऑयन फॉलिक अॅसीड सप्लिमेंटेशन, WIFS in Marathi, Weekly Iron Folic Acid Supplementation in Marathi, Anemia Mukta Bharat in Marathi, Anemia program in Marathi.
WIFS मोहिमेची उध्दिष्टे:-
विकली ऑयन फॉलिक अॅसीड सप्लिमेंटेशन मोहिमेची उध्दिष्टे:-
विकली ऑयन फॉलिक अॅसीड सप्लिमेंटेशन मोहिमेच्या या अनुशंगाने खालीलप्रमाणे उध्दिष्टे साध्य करावयाची आहेत.
- किशोरवयीन ( १०-१९ ) वर्षे वयोगटातील मुला / मुलीमधील अॅनिमियाचे प्रमाण कमी करणे.
- रक्तक्षयामुळे होणा – या माता मृत्यूचे प्रमाण कमी करणे.
- नवजात अर्भक मृत्यू दर व अर्भक मृत्यू दर कमी करणे.
- कमी वजनाचे बालक जन्माला न येणे.
- किशोरवयीन मुला / मुलीमध्ये बौध्दिक , शारीरीक , व मानसिक क्षमतेमध्ये वाढ करणे.
WIFS मोहिमेचे लाभार्थी:-
विकली ऑयन फॉलिक अॅसीड सप्लिमेंटेशन WIFS मोहिमेचे लाभार्थी:-
१० ते किशोरवयीन वयोगट १९ वर्षे पोषण विषयक रक्तक्षय संबोधण्यासाठी केंद्र शासनाने साप्ताहिक लोह व फॉलिक अॅसिड पुरवणी WIFS कार्यक्रमाचा आरंभ केलेला आहे .राज्यात WIFS कार्यक्रमाची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार केलेली आहे .
सदर योजनेअंतर्गत शाळेत जाणा-या किशोरवयीन मुले – मुली , शाळेत न जाणा-या किशोरवयीन मुली व विवाहित पण गरोदर नसलेल्या किशोरवयीन मुली या लाभार्थीना दर सोमवारी एक लोहयुक्त गोळी दिली जाते वर्षातून दोन वेळेस ऑगष्ट व फेब्रुवारी मध्ये जंतनाशक गोळयांचा लाभ दिला जातो.
WIFS मोहिमेचा उद्येश:-
विकली ऑयन फॉलिक अॅसीड सप्लिमेंटेशन WIFS मोहिमेचा उद्येश:-
- शासकीय , शासन अनुदानित व नगरपालिकांच्या शाळेतील इयत्ता ६ वी ते १२ वी च्या किशोरवयीन मुला – मुलींनी प्रत्येक सोमवारी लोह व फॉलिक अॅसीडची १ गोळी आणि वर्षातून दोनदा म्हणजे ६ महिन्यांच्या अंतराने अल्बेंडॅझॉलची १ जंतनाशक गोळी सेवन केल्याची खात्री करणे.
- १० ते १ ९ वर्ष वयोगटातील सर्व किशोरवयीन मुलींना ( विवाहित मुलींसहीत लोह व फॉलिक अॅसीड ची १ गोळी आठवडयातून एकदा देणे आणि अल्बेंडॅझॉल (४०० मिग्रॅ) ची एक गोळी ६ महिन्यातून एकदा जंतनाशक उपचार देणे.
- किशोरवयीन मुला मुलींना आहारातून लोहाचे प्रमाण वाढविण्याकरीता योग्य आहाराचे महत्व सांगणे.
- जंत प्रादुर्भाव टाळण्यासाठी किशोरवयीन मुलींना स्वच्छतेच्या योग्य सवयी लावण्याबाबत प्रोत्साहित करणे. यामध्ये प्रामुख्याने पादत्राणांचा वापर केल्यास जंत प्रादुर्भावास निर्बंध होतो.
WIFS मोहिमेची कार्यप्रणाली:-
विकली ऑयन फॉलिक अॅसीड सप्लिमेंटेशन WIFS मोहिमेची कार्यप्रणाली:-
- साप्ताहिक लोह व फॉलिक अॅसीड गोळी ( WIFS ) देणे. (लोह व फॉलिक अॅसीडची १ गोळी १०० मि.ग्रॅ.लोह आणि फॉलिक अॅसीड ५०० मायक्रोग्रॅम) वर्षात ५२ आठवडयांकरीता सोमवारी देण्यात यावी.
- मध्यम / तीव्र रक्तक्षय असणारे लक्ष्य गट शोधून त्यांना योग्य आरोग्य संस्थेत रक्तक्षय उपचारासाठी पाठविणे.
- जंत प्रादुर्भाव नियंत्रणासाठी ६ महिन्यांच्या अंतराने वर्षातून दोनदा अल्बेंडॅझॉल (४०० मि.ग्रॅ) च्या गोळया देणे.
- आहारातून लोहाचे प्रमाण वाढविण्याकरीता तसेच आंतडयातील जंत प्रादुर्भावाचा प्रतिबंध करण्याकरिता माहिती देणे व समुपदेशन करणे.
मुख्याध्यापकांची नोडल शिक्षक/शिक्षकांची व अंगणवाडी सेविकांची जबाबदारी:-
- साप्ताहिक लोह व फॉलिक अॅसीड गोळयांच्या पूरवणी कार्यक्रमासाठी २ शिक्षकांची नोडल शिक्षक म्हणून निवड करणे व इतर वर्ग शिक्षकांना माहिती देणे.
- शुध्द पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेची खात्री करणे.
- लोह व फॉलिक अॅसीड आणि अल्बेंडॅझॉल गोळयांच्या योग्य साठवणूकीची खात्री करणे.
- लोह व फॉलिक अॅसीड आणि अल्बेंडॅझॉल गोळयांची मागणी शाळेच्या गरजेनुसार निर्धारित करण करणे.
- लोह व फॉलिक अॅसीड आणि अल्बेंडॅझोल गोळयांचा वार्षिक साठा स्वच्छ, कोरडया व धूळविरहित ठिकाणी आणि प्रत्यक्ष सुर्यप्रकाशापासून दूर साठवावा.
- शाळेच्या साप्ताहिक लोह फॉलिक अॅसीड पूरवणी कार्यक्रम अंमलबजावणीसाठी व प्राचार्य / मुख्याध्यापक यांच्या अध्यक्षतेखाली नोडल शिक्षक, वर्ग प्रतिनिधी आणि आरोग्य सेवक / सेविका यांची समिती स्थापन करुन कार्यक्रमाचे नियमितपणे व्यवस्थापन व संनियंत्रण केले जाईल.
लोह व फॉलिक अॅसीड आणि अल्बेंडॅझॉल गोळयांच्या गरजेचे निर्धारण आणि साठवणूक:-
प्रत्येक शाळेतील नोडल शिक्षक लोह व फॉलिक अॅसीड आणि अल्बेंडॅझॉल गोळयांच्या वार्षिक गरजेचे निर्धारण करतील.
लोह व फॉलिक अॅसीड गोळयांचे वितरण व रक्तक्षयाकरीता छाननी.
- इयत्ता ६ वी ते १२ वी मधील किशोरवयीन मुला – मुलींकरीता कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी.
- १० ते १ ९ वर्षे वयोगटातील शाळाबाहय मुलींना लोह व फॉलिक अॅसीड आणि अल्बेंडझोल गोळया देण्यात याव्यात.
- अविवाहित आणि विवाहित गर्भवती नसणाऱ्या दोन्ही गटातील मुलींचा समावेश असावा.
- सबला योजना सरु असलेल्या जिल्हयांमध्ये किशोरी समुह मंचाचा किशोरवयीन मुलींना एकत्र आणण्याकरिता उपयोग करावा.
- इतर जिल्हयांमध्ये अंगणवाडी सेविकांनी आशांच्या मदतीने किशोरवयीन मुलींना अंगणवाडी केंद्रात प्रत्येक सोमवारी ठराविक वेळेवर जेवणानंतर एक तासाने एकत्रित करावे.
- सर्व शाळांमध्ये एप्रिल महिन्यात किंवा नविन सत्र सुरु झाल्यानंतर हा कार्यक्रम करावा.
- वैयक्तिक पाठपुरावा कार्ड भरण्याबाबत शिक्षकांनी विद्यार्थ्यांन मार्गदर्शन करावे.
- नोडल शिक्षकांनी , इतर वर्ग शिक्षकांच्या सहभागाने इयत्ता ६ वी ते १२ वी मधील किशोरवयीन मुला – मुलींनी लोह व फॉलिक अॅसीड गोळया सेवन केल्याची खात्री करावी.
- लोह व फॉलिक अॅसीड गोळी प्रत्येक सोमवारी ठराविक वेळी मध्यान्ह / दुपारच्या जेवणा नंतर एक तासाने द्यावी.
- शिक्षकांनी / अंगणवाडी सेविकानी लोह व फॉलिक अॅसीड गोळी घेण्यासाठी शुध्द पाण्याची व्यवस्था करावी.
- शिक्षकांनी / अंगणवाडी सेविकेनी विद्यार्थ्यांसमोर लोह व फॉलिक अॅसीड गोळी घ्यावी.
- विद्यार्थी किंवा अंगणवाडीतील मुलगी जर सोमवारी गैरहजर असेल किंवा लोह व फॉलिक अॅसीड गोळी सेवन केली नसेल तर त्याच आठवडयात गोळी सेवन केल्याची खात्री करावी . पुढच्या आठवड्यात गोळी सोमवारीच द्यावी.
- शिक्षक / अंगणवाडी सेविका किशोरवयीन मुला – मुलींची नखे , तळहात , डोळयाच्या पापणी- खालील भाग आणि जीभेवरील फिक्कटपणाची तपासणी करुन त्यांचे मध्यम / तीव्र रक्तक्षयाकरीता वर्गीकरण करतील.
- फिक्कटपणाची लक्षणे आढळलेल्या मुला – मुलींना जवळच्या आरोग्य संस्थेत रक्तक्षयाच्या उपचाराकरीता पाठवावे.
- शाळांना सुट्टया लागण्यापुर्वी विद्यार्थ्यांना आवश्यक संख्येने लोह व फॉलिक अॅसीड गोळया देऊन त्यांनी त्या गोळया सुटीच्या काळात पालकांच्या देखरेखीखाली घेण्या बाबत सांगावे.
- शिक्षकांनी सुट्टी संपल्यानंतर गोळयांच्या पाकीटांचे निरीक्षण करुन गोळया सेवन केल्याची खात्री करावी.
- काही मुलीमध्ये / लाभार्थ्यांमध्ये काळी शौचास, मळमळणे, उलटी होणे असे किरकोळ दुष्परिणाम दिसून येतात. परंतू हे दुष्परिणाम बरेचदा अल्पकालीन असतात आणि लोह व फॉलिक अॅसीड गोळया दुष्परिणामाची पुनरावृत्ती कालांतराने कमी कमी होत जाते असे सांगावे.
- एखाद्याने अस्वस्थता / दुष्परिणामाबद्दल तक्रार केल्यास शिक्षकांनी / अंगणवाडी सेविकेनी त्याला / तिला आरोग्य सेविकेकडे पाठवावे.
- शिक्षकांनी / अंगणवाडी सेविकेनी लोह फॉलिक अॅसीड गोळयांच्या फायद्याबद्दल व मुला – मुलींना खालील माहिती द्यावी.
टिप : – किशोरवयीन गर्भवती मुलींना जवळच्या आरोग्य संस्थेत पाठवावे.
वर्ग शिक्षक/अंगणवाडी सेविकांकडून संनियंत्रण:-
- वैयक्तिक पाठपुरावा कार्ड अद्ययावत व सुरक्षित ठेवण्यासाठी अंगणवाडी सेविका जबाबदार राहतील. ( प्रपत्र -१ )
- अंगणवाडी सेविका किशोरवयीन मुलींनी अंगणवाडी केंद्रातून घेतलेल्या लोह व फॉलिक अॅसीड गोळयांची प्रपत्र – ७ अ मध्ये दर्शविल्याप्रमाणे माहिती एकत्र करतील आणि ती माहिती त्यांच्या मुख्य सेविकांना पाठवतील.
- मासिक अहवालाची १ प्रत आरोग्य सेवक / सेविकेला पाठवतील.
- अंगणवाडी सेविका पुरवठा – अनुपालन नोंदवही अद्ययावत ठेवतील.
- वैयक्तिक पाठपुरावा कार्ड योग्य प्रकारे भरले किंवा नाही हे तपासण्याची जबाबदारी नोडल शिक्षक आणि वर्ग शिक्षक यांची राहील.
- वर्ग शिक्षक , प्रपत्र -२ नुसार संनियंत्रण नोंदवही शाळेत ठेवतील.
- प्रत्येक आठवडयात वर्ग शिक्षकाव्दारे नोंदवहीतील माहिती अद्ययावत करण्यात येईल.
- महिन्याच्या शेवटी वर्ग शिक्षकाने प्रत्येक महिन्यात ४/५ लोह व फॉलिक अॅसीड गोळया सेवन केलेल्या मुला – मुलींची माहिती एकत्र करावी ( महिन्यात ५ आठवडे असल्यास ५ गोळया ).
- अशाच प्रकारची माहिती जंतनाशक गोळया देण्याच्या महिन्यात एकत्रितकरण्यात यावी.
- ज्या मुला – मुलींनी एका महिन्यात ४ लोह व फॉलिक अॅसीड गोळया सेवन केल्या नसतील तर प्रपत्रातील शेरा रकान्यात कारणासह नमूद करण्यात यावे आणि शाळेच्या एकत्रित अहवालात त्याची नोंद घ्यावी.
- नोडल शिक्षकाने मासिक वर्ग अहवाल प्रपत्रावरुन शालेय अहवाल ( प्रपत्र ३ ) मध्ये माहिती एकत्र करुन शाळेच्या प्राचार्याकडे सादर करतील.
- शाळेचे प्राचार्य मासिक शालेय अहवाल प्रपत्रातील माहितीची तपासणी करुन बरोबर असल्याची खात्री करतील व स्वाक्षरी करुन दर महिन्यात तालुका शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठवतील . शाळेचे प्राचार्य मासिक अहवालाची प्रत आरोग्य सेवक / सेविकेकडे पाठवतील.
- लोहयुक्त गोळीच्या सेवनामुळे लाभार्थ्याना पोटदुखी, मळमळ, व क्वचित उलटी, होऊ शकते अशा प्रकारचा त्रास झाल्यावर सर्व शाळा व अंगणवाडीमध्ये दुरध्वनी फलक दर्शनी भागावर लावावा जेणेकरुन शिक्षक आरोग्य विभागाला त्वरीत संपर्क करु शकतील.
आरोग्य सेवकाने (MPW) करावयाच्या कामे:-
- आरोग्य सेवकाने दरमहा कार्यक्षेत्रातील दोन शाळेस भेटी दयावयाच्या आहेत. महिन्यातील कोणत्याही दोन सोमवारी शाळेतील मधल्या सुटटीत भेट दयावी, भेटीचा उद्येश कार्यक्रम अंमलबजावणीसाठी पडताळणी करणेचा आहे.
- जंतनाशक गोळया वाटपाच्या दिवशी कार्यक्षेत्रातील एका शाळेला मधल्या सुट्टीत भेट दयावयाची आहे.
- आयएफए / अल्बेंडाझॉल गोळयाचा साठा एक महिना पुरेल इतक आहे का ही माहिती शाळेच्या नावनोंदणीवरुन ( ६-१२ ) संख्या बघुन करावी.
- शाळेत विदयार्थी आयएफएच्या गोळया कॅपीयनच्या दिवशी खातो का अथवा काही विद्यार्थी गोळया लपवतात अथवा फेकुन देतात.
- शिक्षकानी विद्यार्थी निहाय रेकॉर्ड व अहवाल बरोबर ठेवले आहे का?
- विद्यार्थी / शिक्षक गोळयांच्या दुष्परीणामांची किंवा गोळया घेत असताना इतर समस्यांची तक्रार करत आहे का?
- विद्यार्थी व पालक यांचा गोळया घेण्यास तक्रार – औषधसाठा उशीरा पोहोचणे, औषधसाठा संपणे, औषधे योग्य प्रकारे साठवण न करणे, औषधसाठा मुदतबाहय होणे.
- अंगणवाडी केंद्राना भेट देऊन किशोरवयीन मुलीनी गोळया खाल्याची खात्री करणे वैयक्तिक पाठपुरावा कार्ड भरले किंवा नाही याची पडताळणी करणे.
- बहुउद्देशिय आरोग्य सेवक यांनी गरजेनुसार वेळोवेळी रक्तक्षय व आरोग्य शिक्षण या बददल व शाळा , अंगणवाडी तसेच कार्यक्षेत्रात व इतर ठिकाणी आरोग्य शिक्षण दयावे.
या योजनेचा अहवाल कोणी कोणी व कोणाकडे सादर करावा?
- सदर योजनेअंतर्गत शाळेचा अहवाल प्रपत्र -३ मध्ये तयार करुन नोडल शिक्षकांनी मुख्याध्यापक यांचेकडे दयावा.
- मुख्याध्यापकानी सदर अहवाल गटशिक्षणाधिकारी यांना दरमहा सादर करावा.
- गटशिणाधिकारी यांनी सर्व अहवाल संकलित करुन जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सादर करावा.
- आरोग्य सेवक ( पु / स्त्री ) शाळेच्या भेटीचा अहवाल फॉर्म क्र. ६ मध्ये प्रा. आ. केंद्राना सादर करावा.
- प्रा. आ. केंद्राच्या वैदयकिय अधिकारी यांनी सर्व अहवाल संकलित करुन जिल्हा आरोग्य अधिकारी यांना फॉर्म क्र. ८ मध्ये सादर करावा.
- अंगणवाडी सेविकेनी ७ अ मध्ये अहवाल तयार करुन मुख्य सेविकेकडे सादर करावा.
- मुख्य सेविका यांनी प्राप्त झालेले अहवाल ७ ब मध्ये संकलित करुन प्रकल्प अधिकारी यांना सादर करतील.
- गट शिक्षणाधिकारी व प्रकल्प अधिकारी यांचेकडून प्राप्त झालेले अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी संकलित करुन फॉर्म क्र .५ मध्ये अहवाल राज्य स्तरावर सादर करतील.