आजारांची माहिती

टीबी, क्षय रोग कारणे, लक्षणे, प्रतिबंध, लसीकरण, उपचार, TB – Tuberculosis in Marathi

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

टीबी आजाराची सर्व माहिती, Tuberculosis in Marathi, TB symptoms in Marathi, Tuberculosis symptoms in Marathi, क्षय रोग मराठी माहिती, kshaya roga, क्षय रोग मराठी, क्षय रोग उपचार, TB lakshane in Marathi

क्षय रोग, राजयक्ष्मा, TB, Tuberculosis हा प्रमुख संक्रामक रोग असून जगात सार्वजनिक आरोग्याच्या ज्या समस्या आहे त्यापैकी क्षय रोग ही एक मुख्य जागतिक समस्या आहे.
जगामधे १.५ ते २ कोटी क्षय रोग, TB ह्या व्याधी चे रुग्ण असून त्यांत ७५ लाख रुग्णांची दरवर्षी वाढ होते. तसेच दरवर्षी ३ लाख रुग्ण मृत्युमुखी पडतात.

भारतामध्ये सुद्धा क्षय रोग, TB ही एक प्रमुख आरोग्य समस्या आहे. हा व्याधी सर्व वयांतील व्यक्तींंना होत असला तरी ५ वर्षाच्या आतील बालकांमधे याचे प्रमाण कमी आहे.
हा व्याधी २१ ते ४० वर्षे वयाच्या व्यक्तिमधे अधिक प्रमाणात आढळतो.

kshaya roga, TB information in Marathi language, Tuberculosis in Marathi, क्षय रोग मराठी माहिती –

Tuberculosis in Marathi, TB symptoms in Marathi, Tuberculosis symptoms in Marathi, क्षय रोग मराठी माहिती, kshaya roga, क्षय रोग मराठी, क्षय रोग उपचार, TB lakshane in Marathi

अनुक्रमणिका

क्षय रोगाची इतर नावे:-

TB in Marathi, Tuberculosis in Marathi, kshaya roga in english –

राजयक्ष्मा, क्षय रोग इंंग्रजी नाव‌‌ – TB – Tuberculosis

TB – Tuberculosis मराठी नावे – राजयक्ष्मा, क्षय रोग, क्षय, टिबी

राजयक्ष्मा, क्षय रोग संस्कृत नावे – शोष, राजयक्ष्मा, यक्ष्मा

Tuberculosis Meaning in Marathi ? Tuberculosis चा मराठी अर्थ:-

Tuberculosis ला मराठी मधे राजयक्ष्मा किंवा क्षय रोग असे म्हणतात.

The tuberculosis meaning in Marathi is Kshaya Roga or Rajayakshma.

राजयक्ष्मा, क्षय रोगाची कारणे, TB – Tuberculosis Causes in Marathi:-

  • हा चिरकालीन संक्रामक व्याधी असून स्त्रियांपेक्षा पुरुषामधे याचे प्रमाण अधिक आहे. राजयक्ष्मा, TB, क्षय रोग हा व्याधी अनुवंशिक नाही.
  • जे व्यक्ती धूळ, धूर, रेती, तन्तु याचेशी संबंधित व्यवसाय करतात त्यांना हा व्याधी होण्याची अधिक शक्यता असते.
  • अतिकुपोषित व्यक्तींंना राजयक्ष्मा, TB, क्षय रोग ह्या व्याधीचे संक्रमण त्वरित होते.
  • जे व्यक्ती गर्दिच्या ठिकाणी वास्तव्यास असतात. ज्यांच्या घरामधे वायु, प्रकाश योग्य प्रमाणात येत नाही.
  • जे अंधारात राहतात त्या ठिकाणी ह्या व्याधीचे प्रमाण अधिक असते.
  • ज्यांचे कुटुंब आकाराने मोठे आहे, दारिद्रय, अज्ञान ह्या बाबी राजयक्ष्मा, TB, क्षय रोग वृद्धिस कारणीभूत ठरतात.
  • कमी उत्पन्न असलेल्या गटामधे ह्याचे प्रमाण अधिक आहे.
  • लहान वयात लग्न आणि मुले होणे, पडदा/बुरखा पद्धती, धुमपान ( सिगारेट, बीडी, हुक्का ) ह्या समाजातील पद्धती राजयक्ष्मा, TB, क्षय रोग प्रसार करण्यास मदत करतात.
  • डांग्याखोकला, रोमातिका, स्त्रियांंमधे गर्भावस्था, प्रसव, विषमज्वर, मधुमेह हे व्याधी क्षय रोग होण्यास कारणीभूत ठरतात.
  • ह्या व्याधिला क्षय, शोष, रोगराट, राजयक्ष्मा, TB, क्षय रोग, Tuberculosis असेही इतर नावे आहेत.
  • TB causes in Marathi,

राजयक्ष्मा, क्षय रोग कारणीभूत जीवाणू Tuberculosis Causative Organism in Marathi:-

मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस ( Mycobacterium Tuberculosis ) ह्या जीवाणुमुळे राजयक्ष्मा, क्षय रोग हा व्याधी होतो.

Tuberculosis meaning in Marathi, क्षय रोग जीवाणू, क्षय रोग मराठी, TB Marathi, TB information in Marathi language, TB causes in Marathi, क्षय रोग कारणीभूत जीवाणू, Tuberculosis Causative Organism in Marathi

राजयक्ष्मा, क्षय रोगाचा प्रसार कसा होतो? Transmission of TB, Tuberculosis in Marathi:-

१ ) राजयक्ष्मा, क्षय रोग ह्या व्याधी चा प्रसार क्षय व्याधीने ग्रस्त रुग्णांद्वारे होतो.
क्षय रोगाने ग्रस्त रुग्णांच्या थुंंकीमधे ( Sputum ) असंख्य जीवाणु विद्यमान असतात.
२ ) हवेतून हा व्याधी प्रसारित होतो. क्षय व्याधीने ग्रस्त रुग्णांच्या खोकणे, शिंकणे, बोलणे ह्या क्रियांचे वेळी अनेक जीवाणु बाहेर पडतात.
३ ) बिन्दुत्क्षेप संक्रमणा ( Droplet infection ) मुळे ह्या व्याधीचा प्रसार होतो.

४ ) राजयक्ष्मा, क्षय रोग ह्या व्याधीने संक्रमित गाय-म्हैस इ जनावरांचे दूध पिल्याने हा व्याधी होतो. भारतामधे राजयक्ष्मा, क्षय रोग ह्या व्याधीचे संक्रमण ह्या मार्गाने सहसा होत नाही.
कारण येथे सूर्यप्रकाश विपूल प्रमाणात आहे त्यामुळे गाय-म्हशींना राजयक्ष्मा, क्षय रोग होत नाही. तसेच दूध हे उकळुन पिण्याची पद्धत रुढ झालेली आहे.

राजयक्ष्मा, क्षय रोगाचा संचयकाळ Incubation Period of TB, Tuberculosis in Marathi:-

राजयक्ष्मा, क्षय रोगाचा संचयकाळ हा ४ आठवडे ते १२ आठवडयाचा असतो.
क्षयरोग संसर्ग हा रुग्ण बल आणि जंतुसंसर्ग यावर अवलंबून असतो. त्यामुळे संचयकाळ काही आठवड्यापासून तर काही महिन्यांपर्यंत असतो.

राजयक्ष्मा, क्षय रोगाचे प्रकार TB, Tuberculosis Types in Marathi:-

१ ) फुफ्फुसाचा क्षयरोग Pulmonary TB, Tuberculosis

९० % रुग्णांमध्ये फुफ्फुसाचा क्षयरोग आढळून येतो.

२ ) फुफ्फुसाव्यतिरिक्त इतर अवयवांचा क्षयरोग Extrapulmonary TB, Tuberculosis १० % रुग्णांमध्ये फुफ्फुसाव्यतिरिक्त इतर अवयवांचा क्षयरोग आढळून येतो.

  • ग्रंथीचा क्षयरोग ( Tuberculosis Lymphadenitis )
  • आतडयाचा क्षय्ररोग ( Intestinal Tuberculosis )
  • मज्जासंस्थेचा क्षय्ररोग (Tuberculosis of Nervous System )
  • जनन व विसर्जन संस्थाचा क्षयरोरोग ( Genito-Urinary Tract Tuberculosis )
  • हाडाचा व सांध्याचा क्षय्ररोग ( Bones & Joints Tuberculosis )
  • Miliary Tuberculosis

राजयक्ष्मा, क्षय रोगाची लक्षणे TB, Tuberculosis Symptoms in Marathi:-

१ ) ताप – सायंकाळी येणारा मंदज्वर व रात्री येणारा घाम येणे.

२ ) सतत येणारा खोकला कधी कधी बेडक्यातून रक्त पडणे. १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधीचा खोकला.

३ ) स्वरभेद, पाठ व छातीत दुखणे.

४ ) अरुचि, भूक न लागणे

५ ) कृशता- वजन कमी होणे. थकवा येणे.

६ ) श्वास घॆण्यास त्रास होणॆ.

७ ) अवदान ‌‌‌‌‌‌‌- मानेला गाठी येणे.

ही लक्षणे आढळतात.

TB symptoms in Marathi, क्षय रोग मराठी माहिती, TB lakshan Marathi

राजयक्ष्मा, क्षय रोग प्रयोगशालेय परीक्षण Investigation for TB, Tuberculosis in Marathi:-

थुंकीची किंवा बेडक्याची तपासणी, एक्सरे, रक्ताच्या चाचण्या, मॉन्टॉक्स परिक्षण Mantoux Test यांवरून क्षयरोगाचे रोगनिदान केले जाते.

अ ) मॉन्टॉक्स परिक्षण Mantoux Test in Marathi:-

१ ) मॉन्टॉक्स परिक्षण Mantoux Test मध्ये त्वचेच्या खाली ( Intradermal )
१ टयुबर कुलीन युनिट या प्रमाणात क्षयाचे प्युरीफाईड प्रोटीन डेरीव्हेटिव्ह टोचलेे जाते.
२ ) ७२ तासानंतर त्या इंजेक्शन दिलेल्या स्थानांचे परिक्षण केले जाते.
३ ) त्या स्थानी १० मि. मि. जाडीची गाठ/चट्टा निर्माण झाल्यास हे मॉन्टॉक्स परीक्षण होकारार्थी ( Positive )आले असे समजतात.

४ ) व त्या स्थानी ५ मि. मि. पेक्षा कमी जाडीची गाठ/चट्टा निर्माण झाल्यास मॉन्टॉक्स परिक्षण हे नकारार्थी समजतात.

Tuberculosis in Marathi, kshaya roga, Tuberculosis treatment in Marathi, TB treatment in Marathi, मॉन्टॉक्स टेस्ट, TB treatment Marathi, क्षय रोग उपचार, मॉन्टॉक्स परिक्षण Mantoux Test in Marathi

ब ) थुंकीची किंवा बेडक्याची तपासणी Sputum Test in Marathi:-

१ ) पौढ व्यक्तींंमध्ये –

सकाळचा बेडका/थुंकी निर्जंतुक बाटलीत घेतला जातो. तो काचपट्टीवर पसरवून त्याचे सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने निरीक्षण केले जाते. यामध्ये जर राजयक्ष्मा, क्षय रोगाचे जीवाणू सापडले तर अशा रुग्णास थुंकी दूषित रुग्ण म्हणजेच राजयक्ष्मा, क्षय रोगाचा रुग्ण समजले जाते.

२ ) लहान मुलांमध्ये –

सकाळीच उपाशीपोटी अन्ननलिकेतून नॅसोगॅस्ट्रिक टुब टाकून जठरातील द्रव, निर्जंतुक बाटलीत गोला केला जातो. तो काचपट्टीवर पसरवून त्याचे सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने निरीक्षण केले जाते. यामध्ये जर राजयक्ष्मा, क्षय रोगाचे जीवाणू सापडले तर अशा रुग्णास थुंकी दूषित रुग्ण म्हणजेच राजयक्ष्मा, क्षय रोगाचा रुग्ण समजले जाते.

क ) चेस्ट एक्स रे (छातीची क्ष किरण तपासणी) Radiological Investigation –

एक्स रे मध्ये फुफ्फुसांंच्या ऊतींंचा क्षय झालेला दिसतो व त्या ठिकाणी पोकळी निर्माण झालेली दिसते. यांवरुन राजयक्ष्मा, क्षय रोगाचे निदान एक्स रे च्या सह्यांंने केले जाते.

ड ) रक्ताच्या तपासण्या – Blood Investigations for TB, Tuberculosis in Marathi:-

E.S.R. इएसआर- (एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट) –

  • यामध्ये रक्ताचा नमुना न गोठू देणाऱ्या द्रवा मध्ये संकलित केला जातो.
  • हा रक्ताचा नमुना विशिष्ठ इएसआर नलिकेमध्ये भरला जातो.
  • इएसआर नलिकेवरील आकड्यांनुसार नोंद घेतली जाते.
  • इएसआर चा स्तर जर सामान्य पातळीपेक्षा वाढला तर हि तपासणी पॉसिटिव्ह मानली जाते, व रुग़्ण राजयक्ष्मा किंवा क्षय रोगग्रस्त माणला जातो.
  • ही तपासणी विश्वासार्ह नाही, कारण इतर काही रोगांमध्येह E.S.R. इएसआर- तपासणी पॉसिटिव्ह येऊ शकते.

राजयक्ष्मा, क्षय रोग प्रतिबंधन Prevention of TB, Tuberculosis in Marathi:-

अ ) सर्वसामान्य प्रतिबंधात्मक काळजी –

TB, Tuberculosis General Preventive Measure in Marathi –

१ ) आरोग्य अबाधित राखण्याकरिता प्रोत्साहित करणे.

२ ) समाजाचा आर्थिक आणि सामाजिक विकास घडवुन जनतेचे राहणीमान सुधारणे
आणि त्या द्वारे प्रत्येक व्यक्तिचे आरोग्य अबाधित राखणे.
३ ) कारण सामाजिक आणि आर्थिक विकासामुळे क्षय रोगााच्या रुग्णांंच्या संख्येमधे मोठी घट होते.
उदा . अमेरिका , ऑस्ट्रेलिया आणि युरोप येथे क्षय रोगाचे रुग्ण भारताच्या तुलणेत कमीआहेत.
४ ) त्यामुळेच अधिक उत्पन्न गटातील व्यक्तिमधे राजयक्ष्मा, क्षय रोग ह्या व्याधीचे प्रमाण कमी असते.
५ ) योग्य प्रकाश आणि हवा खेळती राहील असे घर, उत्तम आहार घेणे इ पथ्य पाळल्यास राजयक्ष्मा, क्षय रोगाचे प्रतिबंधन होते.

६ ) करमणुकीच्या साधनांची उपलब्धता, काळजीमुक्त जीवन, आणि आरोग्यदायक सवयी ह्यांचा राहणीमान सुधारण्यामधे समावेश असतो.

ब ) विशेष संरक्षण उपाय –

Special Preventive Measure for TB, Tuberculosis in Marathi –

यामधे क्षय व्याधी विरुद्ध विशेष संरक्षणात्मक उपायांचा अवलंब केला जातो.
ते उपाय पुढीलप्रमाणे आहे.

१ ) लसीकरण – BCG Vaccination in Marathi –

B.C.G. Vaccination to Prevent TB, Tuberculosis in Marathi –

ह्या व्याधी विरुद्ध ब्याधिक्षमत्व निर्माण होण्याकरिता जन्मतःच किंवा जन्मानंतर लवकरात लवकर बालकांना बी. सी. जी. ही लस ( B.C.G. Vaccination ) दिली जाते.

ही लस कोमेट व म्यूरिन नामक शास्त्रज्ञाने तयार केली. त्यामुळे ह्या लसीचे नाव ( Bacille calmette Guerin ) आहे .

बी. सी. जी. लस ( B.C.G. Vaccination ) जन्मानंतर ० ते १० दिवसांंच्या आत देतात. ही अंंत:त्वचेखाली ( Intradermal ) दिली जाते.

बी. सी. जी. लस ( B.C.G. Vaccination ) मात्रा –
०.१५ ते ०.१ मि. लि. या मात्रेमधे ही लस दिली जाते. ही लस फ्रीज मधे २ ते ४ सेंटीग्रेड तापमानावर साठवली जाते.

हि लस दिल्यानंतर लस दिलेल्या ठिकाणी कायम स्वरुपी राहणारी खून निर्माण होते.

२ ) त्वरित निदान – Early Diagnosis of TB, Tuberculosis in Marathi –

ह्या व्याधीचे रुग्ण हुडकून त्यांचे त्वरित निदान व त्यांना योग्य चिकित्सा देणे गरजेचे आहे.

रुग्णाच्या आयुर्मान वाढवण्यात व लवकर लक्षणमुक्त होण्यात त्वरित निदान हि बाब महत्वाची मानली जाते.

३ ) पृथ्यकरण Isolation of TB, Tuberculosis Patient in Marathi –

ज्या व्यक्तींना फुफ्फुसाचा क्षय रोग झालेला आहे. तसेच ज्यांना सतत बेडकायुक्त खोकला हे लक्षण आहे व त्यांच्या बेडक्यामधे राजयक्ष्म्याचे जीवाणु विद्यमान आहेत अशा रुग्णांंना पृथ्यकरणाची गरज असते.
क्षय ग्रस्त रुग्णाने आपले नाक आणि तोंडावर खोकताना नेहमी रुमाल ठेवावा.

४ ) विसंक्रमण – TB, Tuberculosis Disinfection in Marathi –

  • ष्टीवन किंवा बेडका व नाका द्वारे येणारे स्त्राव गोळा करण्याकरिता स्वस्त रुमाल वा कागदी किंवा टिनाच्या डब्यांचा उपयोग करावा.
  • नंतर ते योग्य प्रकारे नष्ट करावे. ह्याकरिता टिनाचे डव्यात ष्टीवन/थुंकी गोळा करुन त्यांत पाणी टाकून ते उकळावे.
  • त्यामुळे ह्या व्याधिचे जीवाणु नष्ट होतात नंतर ते भांडे उकळून विसंक्रमित करावे.
  • रुग्णांचे आंथरुण व पांघरुण सूर्यप्रकाशात ठेवावे. रुग्णांच्या थुंंकीवर माशा बसणार नाहीत ह्याकडे लक्ष द्यावे.

५ ) आरोग्य शिक्षण Health Education in Marathi –

  • राजयक्ष्मा, क्षय रोग ह्या रुग्णांच्या प्रत्यक्ष संपर्कात निरोग़ी व्यक्ती येणार नाही ह्याची नातेवाईक, मित्रांनी व स्वत: रुग्णाने काळजी घ्यावी.
  • राजयक्ष्मा, क्षय रोग हा व्याधी होण्याची कारणे, प्रसार, लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपायांविषयी जनतेचे उद्बोधन करावे.
  • क्षयरोगाविषयी चे गैरसमज दूर करावे. स्वच्छता, चांगले राहणीमान याबाबत शिक्षण द्यावे.
  • दूध उकळुन पिण्याबाबत सूचना द्यावी.
  • राजयक्ष्मा, क्षय रोग ह्या रुग्णाला पौष्टिक आहार, संपूर्ण आराम, शुद्ध हवेमधे राहण्यास सांगावे.

राजयक्ष्मा, क्षय रोग उपचार Treatment of TB, Tuberculosis in Marathi:-

TB upay Marathi, Tuberculosis treatment in Marathi, क्षय रोग उपचार

ह्या व्याधीकरिता सुरवातीला कमी अवधीची/कालावधीची उपचार पद्धती ( Short Course Chemo Therapy ) देण्यात येते. त्यामधे

  1. रिफॉम्पीसीन ( Rifampicin ),
  2. आयसोनाझीड ( INH ),
  3. स्ट्रेप्टोमायसीन ( Streptomycin ),
  4. पायरॅझिनामाईड ( Pyrazinamide )

ह्या जीवाणुनाशक ( Bactericidal ) औषधांचा वापर केला जातो. त्यानंतर

  1. इथॉमन्युटाल ( Ethambutol ), आणि
  2. थायसिटाझोन ( Thiacetazone – TCZ )

ह्या बॅक्टेरियोस्टॅटिक ( Bacteriostatic ) औषधांचा उपयोग केला जातो.

त्यामुळे पूर्वी १८ महिणेपर्यंत घ्यावयाची उपचाराची पद्धत ही आता फक्त ६ ते ९ महिण्यापर्यंत कमी अवधीची झाली आहे.

डॉटस् मराठी माहिती DOT’s – Directly Observed Treatment, Short Course Chemotherapy in Marathi –

सद्या भारतामधे राजयक्ष्मा, क्षय रोग उपचारासाठी डॉटस् ( DOT ‘ s – Directly observed Treatment , short course chemotherapy ) ही पद्धत उपयोगात आणली जाते.
ही पद्धत थुकिंंच्या/बेडक्याच्या परिक्षणावर ( Sputum test ) आधारित असून यात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली औषधोपचार केले जातात.

डॉटस् उपचार पद्धतीत पूढील औषधी द्रव्यांचा समावेश होतो.

१ ) Inj. Streptomycin
२ ) Tab . Isoniazid
३ ) Tab . Pyrazinamide
४ ) Tab . Ethambutol
५ ) Rifampicin

राजयक्ष्मा, क्षय रोग ह्या व्याधी चे नियंत्रण करण्याकरीता राष्ट्रीय स्तरावर ” राष्ट्रीय क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम ” इ . स . १९६२ मधे सुरु करण्यात आला.

डॉटस् ( DOT’s) कार्यक्रमाचा उद्देश –

डॉटस् ( DOT’s) ह्या कार्यक्रमाचा उद्देश समाजामधे आढळणारी राजयक्ष्मा, क्षय रोग रुग्णांची संख्या त्वरेने कमी करुन ती आरोग्य समस्या म्हणुन राहणार नाही ह्याकरिता प्रयत्न करणे हा आहे.

डॉट्स उपचार, DOT’s in Marathi –

क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम Tuberculosis Control Program in Marathi-

त्यानंतर इ. स. १९९२ मधे सुधारित क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सुरु करण्यात आला.
ह्या अंतर्गत कमी अवधीची उपचार पद्धती व सद्या डॉटस् ही चिकित्सा पद्धती सुरु आहे.

एच. आय. व्ही. आणि क्षयरोग –

जगामधे एच. आय. व्ही. संक्रमित रुग्णांमधे एच. आय. व्ही. सोबतच क्षयरोगाचे प्रमाण वाढलेले आहे.
एच . आय . व्ही . संक्रमणामुळे शरीराची नैसर्गिक रित्या संक्रमणा विरुद्ध कार्य करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे ती व्यक्ती त्वरित क्षयाने संक्रमित होऊन मृत्यूचे प्रमाण वाढते .

सारांश summery:-

राजयक्ष्मा, क्षय रोग ह्या रुग्णामधे त्वरित निदान करुन वेळेवर ( DOT ‘ S ) उपचार केल्यास ती व्यक्ती क्षय व्याधि मुक्त होऊ शकते. तसेच निरोगी व्यक्तीने राजयक्ष्मा, क्षय रोग व्याधी होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घ्यावी.

Copyright Material Don't Copy © 2020-2023
Share
Published by

Recent Posts

जागतिक आरोग्य दिन २०२४ – माझे आरोग्य, माझे हक्क

जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास जागतिक आरोग्य दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो.… Read More

01/04/2024

राष्ट्रीय जंतनाशक दिन २०२४ प्रश्न उत्तरे Deworming day FAQ in Marathi

सन २०२३ - २०२४ राष्ट्रीय जंतनाशक दिन १३ फेब्रुवारी २०२४ व २० फेब्रुवारी २०२४ (मॉप… Read More

11/01/2024

गरोदरपणातील मधुमेह GDM in Marathi

गरोदरपणातील मधुमेह (GDM) म्हणजे काय? Gestational diabetes in Marathi :- गर्भधारणेदरम्यान जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण… Read More

07/01/2024

पोटातील जंत सर्व माहिती Roundworm Tapeworm Worm Meaning in Marathi

जंत ( Worm in Marathi ) होणे ही आपल्या देशातली महत्त्वाची समस्या आहे. ग्रामीण भागात… Read More

05/01/2024

उष्माघात कारणे लक्षणे प्रतिबंध उपचार Heat Stroke Meaning in Marathi

उष्माघात कारणे, उष्माघात लक्षणे, उष्माघात प्रतिबंध, उष्माघात उपचार, उष्माघात घरगुती उपाय, मराठी माहिती, Heat Stroke… Read More

19/03/2023