आजारांची माहिती

टायफॉईड कारणे, लक्षणे, प्रतिबंध, उपचार, आहार, विषमज्वर, Typhoid in Marathi

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

टायफॉईड हा व्याधी फक्त मनुष्यामधे आढळतो. यालाच विषमज्वर, टायफॉईड तसेच आधुनिक भाषेत Typhoid, Enteric Fever असे म्हणतात. हा व्याधी जगामधे सर्वत्र आढळत असला तरी उष्ण व मंदोष्ण कटिबंधात्मक प्रदेशात अधिक प्रमाणामधे आढळतो.

जिथे पर्यावरण प्रदूषण असते तसेच जल आणि मूलभूत स्वच्छतेच्या सुविधा ह्या कमी दर्जाच्या असतात त्याठिकाणी विषमज्वर, टायफॉईड याचे प्रमाण जास्त असते. हा विकसित देशात सुद्धा आढळतो. हा प्राधान्याने वर्षा ऋतु मधे होतो.

विषमज्वर, टायफॉईड हा व्याधी कुठल्याही वयामधे होतो परंतु याचे ५ ते १९ वयाच्या दरम्यान सर्वाधिक प्रमाण असते.
स्त्रियापेक्षा पुरुषामधे अधिक आढळतो.

खालील लेखात टायफॉईड ची कारणे, लक्षणे, प्रतिबंध, उपचार, लस, प्रयोगशालेय तपासण्या, टायफॉईड रुग्णांंसाठीआहार, विषमज्वर, Typhoid in Marathi इ टायफॉईड ची सर्व माहिती दिलेली आहे.

Typhoid in Marathi, Typhoid fever in Marathi, टायफॉईड, टायफॉईड मराठी

Typhoid in Marathi, Symptoms of Typhoid in Marathi, Typhoid Fever in Marathi, Typhoid Lakshan in Marathi, टायफॉईड विडाल टेस्ट, Widal test for Typhoid in Marathi, टायफॉईड कारणे, टायफॉईड लक्षणे,

अनुक्रमणिका

टायफॉईड ची इतर भाषेतील नावे:-

टायफॉईड मराठी नाव – विषमज्वर, आंत्रिक ज्वर, मुदतीचा ताप

टायफॉईड विषमज्वर इंंग्रजी नाव – Typhoid or Enteric Fever

Typhoid in Marathi, Typhoid fever Marathi Meaning, Typhoid Marathi Meaning, Typhoid Word in Marathi, Translation of Typhoid in Marathi

टायफॉईड ची कारणे Typhoid Causes in Marathi:-

Typhoid Reasons in Marathi, Typhoid Causes in Marathi

टायफॉईड ला कारणीभूत जीवाणू Causative Organism of Typhoid in Marathi:-

विषमज्वर, टायफॉईड हा व्याधी सालमोनेला टायफी ( Salmonella typhi ) नामक जीवाणुमुळे होतो.

विषमज्वर, टायफॉईड संचयकाळ Incubation Period of Typhoid in Marathi –

टायफॉईडचा संचयकाळ हा १० ते १४ दिवसाचा असतो.
परंतु सर्वात कमी ३ दिवस तसेच सर्वात अधिक ३ आठवड्यापर्यंत सुद्धा असु शकतो.

Typhoid Causes in Marathi

टायफॉईड प्रसार Spread of Typhoid in Marathi:-

संक्रमणाचा प्राथमिक स्त्रोत रुग्ण व वाहक व्यक्तिचे मल मूत्र असून प्रदूषित जल, अन्न आणि माशा याद्वारे सुद्धा या व्याधीचा प्रसार होतो.

टायफॉईड ची लक्षणे Symptoms of Typhoid in Marathi:-

Typhoid Symptoms in Marathi, Typhoid Lakshan in Marathi –

टायफॉईड ह्या व्याधीत खालील लक्षणे दिसतात.

 • ज्वर – ३ ते ४ आठवडे सतत ज्वर येतो.
 • अस्वस्थ वाटते, अशक्तपणा येतो.
 • डोकेदुखी होते, बारीक थंडी वाजून ताप येतो.
 • सांधेदुखी
 • मळमळणे व उलट्या होणे.
 • मलावरोध, पोटात मुरडा येणे,
 • कळ लागून रक्तमिश्रित जुलाब होतात.
 • हृदगती कमी ( bradycardia ) असते.
 • सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे दुसऱ्या आठवडयामधे छातीवर व पोटावर लालसर मोती सदृश पुरळ ( Rose spots ) उत्पन्न होतात.
 • ५० टक्क्के रुग्णांंमधे यकृतवृद्धी व प्लीहावृद्धी आढळते.
 • मानेच्या ठिकाणी गाठी निर्माण होतात.

Typhoid Fever Symptoms in Marathi, symptoms of Typhoid in Marathi

Typhoid in Marathi, Symptoms of Typhoid in Marathi, Typhoid Lakshan in Marathi, Typhoid diet in Marathi, Typhoid Fever information in Marathi, टायफॉईड लक्षणे, विषमज्वर,

टायफॉईड चे निदान Diagnosis of Typhoid in Marathi:-

रुग्णपरिक्षणा द्वारे Physical Examinations –

तज्ञ डॉक्टर रुग्णाची शारिरीक तपासणी करूण टायफॉईड चे निदान करु शकतात. यासाठी खालील मुद्यांद्वारे निदान होऊ शकते.

१ ) ३ – २१ दिवसांमधील बाहेरच्या शहरात प्रवासाचा इतिहास किंवा बाहेरचे खाणे पिणे याचा इतिहास.

२ ) छातीवर व पोटावर लालसर मोती सदृश पुरळ ( Rose spots ) हे टायफॉईड चे महत्वाचे निदानात्मक लक्षण आहे.

३ ) टायफॉईड मधिल तापाचे स्वरुप व रुग्णांंमधे यकृतवृद्धी व प्लीहावृद्धी आढळणे.

टायफॉईड साठी प्रयोगशालेय तपासण्या Investigations for Typhoid in Marathi:-

१ ) टायफॉईड विडाल टेस्ट Widal test for Typhoid in Marathi:-

Widal test in Marathi –
Widal test विडाल टेस्ट ही फक्त टायफॉईड साठी केली जाणारी विशिष्ठ रक्ताची तपासणी आहे.

या तपासणीचा फायदा त्वरित निदान हा होय. काही मिनिटांमधे विडाल किट च्या सहाय्याने टायफॉईड चे निदान होऊ शकते.

या तपासणीची महत्वाची मर्यादा किंवा तोटा म्हणजे हि तपासणी संशयीत रुग्ण जर ७ दिवस किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीच्या तापाने आजारी असेल तरच हि तपासणी केली जाऊ शकते.

२ ) रक्त कल्चर Blood Culture –

रक्त कल्चर Blood Culture रक्ताची तपासणी आहे. या मधे टायफॉईड संशयीत रुग्णाचा रक्त नमुना प्रयोगशाळेत विशिष्ठ तापमान व वातावरणात वाधविला जातो. या रक्त नमुन्यात जर टायफॉईड चे जंतु आढळून आले तर त्या रुग्णास टायफॉईड ची लागण झाली असल्याची खात्री होते.

हि तपासणी विडाल टेस्ट च्या मानाने खर्चिक आहे तसेच या तपासणीस ५ ते ७ दिवस लागतात.

३ ) स्टुल कल्चर Stool Culture –

वरील रक्त कल्चर Blood Culture सारखीच हि स्टुल कल्चर Stool Culture तपासणी आहे. या मधे टायफॉईड संशयीत रुग्णाचा स्टुल Stool म्हणजेच शौचाचा नमुना प्रयोगशाळेत विशिष्ठ तापमान व वातावरणात वाढविला जातो. या स्टुल Stool नमुन्यात जर टायफॉईड चे जंतु आढळून आले तर त्या रुग्णास टायफॉईड ची लागण झाली असल्याची खात्री होते.

४ ) अस्थिमज्जा कल्चर Bone Marrow Culture –

वरील रक्त कल्चर Blood Culture सारखीच तपासणी आहे. हिचा वापर खुप कमी प्रमाणात केला जातो.

टायफॉईड कसा टाळावा? Prevention of Typhoid in Marathi:-

Typhoid in Marathi, Symptoms of Typhoid in Marathi –

१ ) त्वरित निदान Early Diagnosis –

व्याधिग्रस्त रुग्णाना शोधुन त्यांचे त्वरित निदान, उपचार व पृथ्थकरण करणे.

यामुळे त्या रुग्णापासून दुसर्या रुग्णांना होणारा टायफॉईड चा प्रसार रोखता येईल.

२ ) विज्ञप्ति Notification –

टायफॉईड हा साथीचा आजार असल्या कारणाने याचा रुग्ण आढळल्यास आरोग्य विभागाला त्वरित सूचना द्यावी.

३ ) पृथ्थकरण Isolation –

रुग्णाचे तीन वेगवेगळ्या दिवशी घेतलेले मलमूत्राचे अहवाल हे निगेटिव्ह येईस्तोवर त्याला रुग्णालयामधे वेगळे ठेवावे. यामुळे त्या रुग्णापासून दुसर्या रुग्णांना होणारा टायफॉईड चा प्रसार रोखता येईल.

४ ) विसंक्रमण Disinfection –

१ ) एका बंद डब्यात केसाल घ्यावे त्यमधे रुग्णाचे मलमूत्र २ तास पर्यंत हे ठेऊन नंतर त्यांची विल्हेवाट लावावी.
२ ) रुग्णाने वापरलेले वस्त्र, चादरी यांचे विसंक्रमण करणे आवश्यक असते.

३ ) वैद्य आणि परिचारक यांनी आपल्या हाताची स्वच्छता राखावी.

५ ) इतर महत्वाच्या बाबी –

 • मुलभूत स्वच्छतेच्या सोयी उपलब्ध असाव्यात.
 • व्यक्तिगत व परिसर स्वच्छतेकडे लक्ष द्यावे.
 • शुद्ध जलाचा पुरवठा व्हावा.

टायफॉईड चे लसीकरण Typhoid Vaccination in Marathi:-

टायफॉईड लस, Typhoid Vaccine in Marathi –

१ ) टायफॉईड ह्या व्याधीचे प्रतिबंधन करण्याकरिता टी ए वी ( TAV ) हि लस देण्यात येते.

२ ) टायफॉईड लसीच्या दोन मात्रा ०.५ मिली या मात्रेत इंंजेक्शन च्या द्वारे देतात.

३ ) टायफॉईड ही लस Subcutaneously किंवा Intramuscularly दिली जाते.

४ ) टायफॉईड ची लस दिल्यानंतर १० ते २१ दिवसांमधे ह्या व्याधिविरुद्ध व्याधिक्षमत्व निर्माण होऊन ते ३ वर्षेपर्यंत ते टिकुन राहते.

५ ) ३ वर्षानंतर ह्या व्याधिची बुस्टर मात्रा घ्यावी. ह्या लसीमुळे १०० प्रतिशत संरक्षण मिळत नसले तरी व्याधी झाल्यास तो गंभीर अवस्था धारण करीत नाही.

टायफॉईड उपचार Typhoid Treatment in Marathi:-

१ ) टायफॉईड रुग्णाचे उपचार Typhoid Patient Treatment in Marathi –

टायफॉईड रुग्णाचे उपचारासाठी सद्या २ प्रतिजैविकेे एकत्रित वापले जातात.

१ ) Cephalosporin Group मधिल एक प्रतिजैविक व Fluoroquinolones Group मधील एक प्रतिजैविक एकाच वेळी दिली जातात.

२ ) Cephalosporin Group मधिल एक प्रतिजैविक व Macrolides Group मधील एक प्रतिजैविक एकाच वेळी दिली जातात.

दोन प्रतिजैविकांच्या एकत्रित वापरण्याचा उद्देश/फायदा अ‍ॅन्टिबायोटिक्स रेसिस्टन्स टाळणे हा आहे.

२ ) टायफॉईड वाहक रुग्णाचे उपचार Typhoid Carrier Treatment in Marathi –

टायफॉईड वाहक रुग्ण शोधून काढणे ही कठीण बाब आहे. टायफॉईड वाहक रुग्णाच्या उपचारासाठी एक किवा दोन प्रतिजैविक ४ ते ६ आठवडे द्यावी लागतात. अँपिसिलीन आणि अ‍ॅमॉक्सिसिलीन, अँपिसिलीन आणि प्रोबेनेसिड यांचे मिश्रण टायफॉईड वाहक रुग्णाच्या उपचारासाठी दिले जाते. 

३ ) पित्ताशयामध्ये टायफॉईड संसर्ग झालेल्या वाहक रुग्णाचा उपचार –

पित्ताशयामध्ये टायफॉईड संसर्ग झालेल्या वाहक रुग्णाच्या उपचारासाठी रिफांपिन आणि ट्रायमिथेप्रिम सल्फामेथोक्सॅझोल हि औषधे वापरली जातात.

काही रुग्णांमधे औषधांचा फायदा होत नाही तेव्हा डोक्टर ऑपरेशन द्वारे पित्ताशय काढूण टाकण्याचा सल्ला देतात.

टायफॉईड रुग्णांसाठी आहार Typhoid Diet in Marathi:-

टायफॉइड च्या रुग्णांने आहारात खालील पथ्थ पाळवीत.

Typhoid Diet in Marathi, Typhoid Diet chart in Marathi

 • आहारातील साखरेचे प्रमाण कमी करावे.
 • फळांऐवजी फळांचा ज्युसचे सेवन करावे.
 • ज्युस मधे डाळिंबाचा, सफरचंदाचा ज्युस प्यावा.
 • घन आहार न खाता त्याऐवजी द्रवआहार घ्यावा.
 • भाताची पेज,भाज्यांची सुप प्यावे.
 • ताजा व कमी मसालेयुक्त आहाराचे सेवन करावे.
 • भात, बटाटा, पांढरा ब्रेड इ कमी फाबर युक्त आहार
 • नारळाचे पाणी, डाळींचे सुप
 • अंडी, मासे
 • भरपूर पाणी पिणे.
 • उंंच्च उष्मांक असणारा आहार घ्यावा.
 • दिवसभर थोडे थो परंतु वारंवार जेवन करत राहा.

Typhoid Diet in Marathi, Typhoid Diet chart in Marathi

सारांश:-

प्रत्येक निरोगी व्यक्तीने टायफॉईड ची लस घ्यावी, व दर ३ वर्षांनी लसीचा बुस्टर डोस न चुकता घ्यावा.

कोणताही ताप हा विषमज्वर / टायफॉईड असू शकतो त्यामुळे ताप आल्यास त्वरीत डॉक्टरांकडून उपचार करुन घ्यावेत.

Typhoid Lakshan in Marathi

Copyright Material Don't Copy © 2020-2021

View Comments

Recent Posts

जागतिक आरोग्य दिन २०२४ – माझे आरोग्य, माझे हक्क

जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास जागतिक आरोग्य दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो.… Read More

01/04/2024

राष्ट्रीय जंतनाशक दिन २०२४ प्रश्न उत्तरे Deworming day FAQ in Marathi

सन २०२३ - २०२४ राष्ट्रीय जंतनाशक दिन १३ फेब्रुवारी २०२४ व २० फेब्रुवारी २०२४ (मॉप… Read More

11/01/2024

गरोदरपणातील मधुमेह GDM in Marathi

गरोदरपणातील मधुमेह (GDM) म्हणजे काय? Gestational diabetes in Marathi :- गर्भधारणेदरम्यान जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण… Read More

07/01/2024

पोटातील जंत सर्व माहिती Roundworm Tapeworm Worm Meaning in Marathi

जंत ( Worm in Marathi ) होणे ही आपल्या देशातली महत्त्वाची समस्या आहे. ग्रामीण भागात… Read More

05/01/2024

उष्माघात कारणे लक्षणे प्रतिबंध उपचार Heat Stroke Meaning in Marathi

उष्माघात कारणे, उष्माघात लक्षणे, उष्माघात प्रतिबंध, उष्माघात उपचार, उष्माघात घरगुती उपाय, मराठी माहिती, Heat Stroke… Read More

19/03/2023