Water Purifier in Marathi, Water Filter in Marathi, RO in Marathi, UV Water Purifier in Marathi, Water Purifier Buying Guide in Marathi, UF water purifier in marathi, वॉटर प्युरीफायर सर्व महिती, TDS in Marathi, UF Water Purifier in Marathi, Water filter in marathi
वॉटर प्युरीफायर खरेदी करण्याआधी या गोष्टी माहीत करून घ्या. पिण्याचं पाणी स्वच्छ नसेल तर कित्येक आजार होऊ शकतात. आजकाल अशी परिस्थिती झालेली आहे की नळाला येणारं पाणी हे पिण्या लायक नसतं, तर वॉटर फिल्टर आणि प्युरीफायरचा वापर सुद्धा शरीराच्या कालांतराने इम्युनिटी वर परिणाम करतो.
पण तरीही शुद्ध पाणी ही आपली गरज असते. आणि त्याचमुळे वॉटर फिल्टर चं मार्केट दिवसेंदिवस वाढत चाललंय.
अशात जर तुम्ही वॉटर फिल्टर घेण्याच्या विचारात असाल, तर आधी हे जाणून घेणं गरजेचं आहे की, तुमच्या साठी कोणतं प्युरीफायर योग्य असेल.
RO, UV, UF यातलं कोणतं प्युरीफायर तुमच्या घरातल्या पाण्यासाठी योग्य असेल हे माहीत करून घेऊन मगच योग्य तो फिल्टर निवडावा.
अनुक्रमणिका
‘ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड’ BIS च्या नियमांनुसार पिण्याच्या आणि पॅकेज्ड वॉटरच्या शुद्धतेच्या मापनासाठी काही मानक तयार केले गेलेले आहेत. पिण्याच्या पाण्यातील शुद्धतेच्या मापनासाठी TDS म्हणजेच ‘टोटल डिसॉल्व्हड सॉलिड्स’ यात पीएच आणि हार्डन्स चे प्रमाण मोजले जाते.
BIS मानकानुसार मानवी शरीर जास्तीत जास्त ५०० PPM ‘पार्टस पर मिलियन’ इतकं TDS सहन करू शकतं. यापेक्षा जास्त TDS असलेलं पाणी हे शरीरासाठी घातक ठरतं.
TDS मोजण्याचे यंत्र (इंस्ट्रुमेन्ट) जवळ असणे कधीही चांगले. अगदी रुपये २५० ते ३०० पर्यंतच्या किरकोळ किमतीत तुम्ही ते विकत घेऊ शकता.
बरेचदा तुम्ही फिल्टर ची सर्व्हिसिंग किंवा रिपेअरिंग करता तेव्हा टेक्निशियन त्याच्या कडच्या TDS मीटरने ने पाणी तपासून दाखवतो. TDS बद्दल माहिती असणं आणि तो स्वतः नेहमी तपासता येणं हि सवय आपण करून घेतली पाहिजे. ज्यामुळे योग्य तो निर्णय तुम्ही घेऊ शकाल.
पण हल्ली काही फिल्टर्स मधून प्रमाणापेक्षा जास्त कमी TDS असलेले पाणी मिळते. जे आरोग्यासाठी हानिकारक असते.
WHO च्या निर्धारित मानका नुसार १०० ते १५० इतके TDS पिण्याच्या पाण्याचे असले पाहिजे.
RO या प्युरीफिकेशन टेक्निक मध्ये पाण्यावर दाब देऊन पाणी साफ केलं जातं. यात पाण्यातले अशुद्ध घटक कमी केले जातात. ज्या ठिकाणी TDS चं प्रमाण जास्त असेल म्हणजे बोअर वेलचे पाणी असल्यास RO प्युरीफायर वापरणं योग्य ठरेल.
UV म्हणजे अल्ट्रा व्होयलेट तंत्रज्ञानाने पाण्यात असलेले बॅक्टेरिया आणि व्हायरस कमी केले जातात. यात पाण्यातील क्लोरीन आणि आर्सेनिक काढले जात नाहीत.
याचा वापर अशाच ठिकाणी केला गेला पाहिजे, जिथे खारट पाणी नसून फक्त बॅक्टेरिया मारण्यासाठी फिल्टर ची गरज पडत असेल.
प्रदूषण कमी असलेल्या ठिकाणी, ज्या ठिकाणी बोअरवेल चे पाणी पिण्यासाठी वापरले जात नाही अशा ठिकाणी UV प्युरीफायर वापरला गेला पाहिजे.
१) यात वेगवेगळ्या लेअर्स चा वापर करून पाणी साफ केले जाते.
२) बॅक्टेरिया आणि व्हायरस कमी केले जातात.
१) बॅक्टेरिया आणि व्हायरस ला पुर्णतः न संपवता फक्त मारले जाते.
२) विजेची गरज पडते
यात वेगवेगळ्या थरांच्या मेम्बरेन मधून पाण्यातील अशुद्ध घाटक साफ केले जातात. हा इलेक्ट्रिसिटी वर न चालत मेकॅनिकल फिल्टरचा प्रकार आहे.
१) वीज वापरली जात नाही
२) नॉर्मल टॅप वॉटर प्रेशर वर काम होऊ शकते
३) बॅक्टेरिया ना मारून पाण्या बाहेर फेकले जाते.
१) हार्ड वॉटर साठी याचा वापर करता येत नाही
२) आर्सेनिक आणि क्लोरीन जास्त असल्यास याचा वापर करणे उपयोगाचे नाही.
वॉटर प्युरिफायर निवडताना आपल्या भागातला वॉटर सप्लाय कसा आहे हे माहीत करून घ्यावे.
मेट्रो सिटी मध्ये राहत असल्यास तिथले पोल्युशन जास्त असते, याचा परिणाम सप्लाय केल्या जाणाऱ्या पाण्यावर सुद्धा होतो. अशा वेळी RO, UV, UF तिन्ही तंत्रज्ञान असलेले फिल्टर घ्यावे.
फिल्टर्स मध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानामुळे मिनरल्स ची मात्रा कमी केली जात असल्याने बाजारात TDS कंट्रोलर टेक्निक असलेले फिल्टर सुध्दा उपलब्ध असतात. ते घेण्याचा पर्याय सुद्धा तुम्ही निवडू शकता.
प्रस्तावना SRDP (Scientific Reversal Detoxification Process) उपचार ही एक आधुनिक आयुर्वेदिक पद्धती आहे जी पारंपरिक… Read More
प्रस्तावना सोरायसिस हे एक दीर्घकालीन त्वचेचे आजार आहे जे त्वचेच्या पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवते. ही… Read More
प्रस्तावना पॉलीसिस्टिक ओव्हरी डिसऑर्डर (PCOD) किंवा पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) ही एक सामान्य हॉर्मोनल समस्या… Read More
प्रस्तावना केस गळती ही एक सामान्य समस्या बनली आहे जी पुरुष आणि महिलांना सारख्या प्रभावित… Read More
प्रस्तावना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) हा महिलांमध्ये आढळणारा एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे,… Read More
ऍसिडिटी, ज्याला मराठीत "अम्लपित्त" किंवा "छातीत जळजळ" असेही संबोधले जाते, ही आजकालच्या जीवनशैलीमुळे सामान्य झालेली… Read More