शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

रजोनिवृत्ती, Rajonivritti ला इंंग्रजी भाषेत मेनोपॉज, Menopause असे म्हणतात. खालील लेखात मेनोपॉज म्हणजे काय?, रजोनिवृत्ती चे वय, मेनोपॉज पुर्वरुप, मेनोपॉज ची लक्षणे, मेनोपॉज उपाय, मेनोपॉज बद्दलच्या गैरसमजुती, Menopause Symptoms in Marathi, Hormone replacement therapy in Marathi, Menopause Treatment in Marathi, इत्यादि रजोनिवृत्ती Rajonivritti म्हणजेच मेनोपॉज Menopause ची सर्व माहिती दिलेली आहे.

सौजन्य :- डॉ. अनुजा केळकर, Menopause video in Marathi

मेनोपॉज म्हणजे काय? What is Menopause in Marathi?

उतारवयात वयाच्या ४५ ते ५० वर्षाच्या दरम्यान स्त्रीला मासिकपाळी येणे कायमचे बंद होते, त्याला मेनोपॉज, Menopause असे म्हणतात.

रजोनिवृत्ती Rajonivrutti in Marathi :-

Menopause ला मराठीमध्ये काय म्हणतात ?
मेनोपॉज / Menopause ला मराठीमध्ये रजोनिवृत्ती किंवा उतारवयातील पाळी बंद होणे असे म्हणतात.

रजोनिवृत्ती किती वयाला येते ? Menopause age in marathi ?

सामान्यत: ४५ ते ५५ वयाला मेनोपॉज आलेला आढळतो.

परंतु काहि स्त्रीयांमध्ये लवकरात लवकर म्हणजे वयाच्या ३५ व्या वर्षी मेनोपॉज आलेला आढळतो व उशिरात उशीरा म्हणजे वयाच्या ५५ व्या वर्षी मेनोपॉज आलेला आढळतो.

Masik Pali in marathi, Menstrual Cycle in marathi

मेनोपॉज पुर्वरुप कोणती? What are the early Sign & symptoms of Menopause in Marathi?


पुर्वरुप / Early Sign & Symptoms म्हणजे मेनोपॉज Menopause होण्याआधी दिसणारी लक्षणे.
यामध्ये पाळी बंद होण्याअगोदर एक ते दोन वर्षे पाळी अनियमित येऊ लागते. अंगावर जाण्याचे प्रमाणही कमी होते.

मेनोपॉज ची लक्षणे काय काय आहेत? What are the Symptoms of Menopause in Marathi?

रजोनिवृत्ती लक्षणे menopause Symptoms Dr. vivekanand ghodake

हॉर्मोन्सची कमतरता व असमतोल यामुळे स्त्रियांमध्ये मेनोपॉज च्यावेळी खालील तक्रारी उद्भवतात.

  • मासिकपाळी अनियमीत होते, कमी रक्तस्राव होतो, कधी कधी फक्त स्पॉटिग होते.
  • वजन वाढणे.
  • चेहरा लालबुंद होऊन वाफा आल्या सारख्या वाटणे.
  • रात्रीच्या वेळी घाम येणे.
  • हातापायातून , कानातून , अंगातून गरम गरम वाफा आल्यासारखे वाटणे.
  • छातीत धडधडणे.
  • झोप न लागणे, डोकेदुखी.
  • स्तनांमध्ये बदल होणे.
  • जननेंद्रियात कोरडेपणा, यामुळे शरीरसबंध वेदनादायक होतात.
  • कामेच्छा कमी होते.
  • भीती वाटणे.
  • हाडे ठिसूळ होऊ लागतात, त्यामुळे सांधेदुखी सुरु होते.
  • लघवीला जाण्याची वारंवार इच्छा होणे, लघवीचा कंट्रोल कमी होणे.
  • तापटपणा, चिडचिडेपणा वाढणे यासारखे मानसिक बदलही दिसतात.

तसेच याचबरोबर वयोमानानुसार शरीरातील इतर संस्थांमध्येही बदल होतात.
जसे हृदय व रक्ताभिसरणसंस्था , पचनसंस्था , मज्जासंस्था , इ या इतर संस्थांंमधील बदलांंमूळेे खालील लक्षणे दिसतात

  • रक्तदाब वाढणे ( Hypertension )
  • मधुमेह ( Diabetes Mellitus )
  • डोकेदुखी , पायदुखी , कंबरदुखी
  • कमी दिसणे.
  • कानामध्ये आवाज येणे, कमी ऐकू येणे.

याही तक्रारींची भर पडते. त्यामुळे स्त्रियांची मानसिक स्थिती बिघडण्यात आणखीनच भर पडते.

मेनोपॉज उपाय / Menopause Treatment in Marathi:-

मेनोपॉज ही स्त्रीयांच्या जीवनातील एक नैसर्गिक अवस्था आहे. हा आजार किंवा विकार नाही. म्हणून, त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय उपचारांची आवश्यकता नसते.

परंतु, जेव्हा मेनोपॉज मुळे निर्माण होणा-या लक्षणांचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक प्रभाव अति प्रमाणात असतात व त्यामुळे आयुष्यात लक्षणीय व्यत्यय येतो. तेव्हा वैद्यकीय चिकित्सा घेणे गरजेचे असते.

Hormone replacement therapy :-

तुमचे डॉक्टर आवश्यकते नुसार Hormone replacement therapy चा उपाय करतील. या उपचरामुळे मेनोपॉज मुळे निर्माण झालेली लक्षणे कमी होतात.

हाडांचे नुकसान आणि ऑस्टिओपोरोसिस थांबवण्यासाठी देखिल याचा फायदा होतो.

१ ) सगळ्यात महत्वाचे म्हणजे मेनोपॉज / Menopause चा हा काळ फक्त वर्षा – दोन वर्षांचा असतो. त्यामुळे याची भीती वाटून घेऊ नये.
२ ) ज्या स्त्रिया झालेल्या बदलांचा स्वीकार करून त्यांच्याशी समरस होतात त्या स्त्रियांना मेनोपॉजचा त्रास कमी होतो.
३ ) या वयात त्यांना समजून घेणे , समजावून सांगणे , त्यांच्याशी सहृदयतेने वागणे आणि त्यांचे म्हणणे शांततेने ऐकून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.
४ ) वाचनामध्ये, टी. व्ही. पाहाण्यात, विणकामात किंवा इतर कोणत्याही आवडत्या छंदात मन रमवावे.
५ ) सकाळ – संध्याकाळ मोकळ्या हवेत फिरावयास जावे, म्हणजे मन शांत राहील.
६ ) याबरोबरच सकस व चौरस आहार घेणे अतिआवश्यक आहे.

७ ) आपल्या घरांमध्ये नवऱ्याशी , मुला – मुलींशी , सुनांशी हसून – खेळून , बोलून – चालून आनंदाने रहावे. म्हणजे पाळीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष होऊन त्रास कमी होईल.

व्यायाम :-

पोस्टमेनोपॉझल लक्षणे कमी होण्यासाठी सुर्य नमस्कार, व्यायामाचा चांगला फायदा होतो.
त्याचप्रमाणे योगामुळे पोस्टमनोपॉझल लक्षणांचा त्रास कमी होण्यास मदत होते.

Surya Namaskar in Marathi

मेनोपॉज बद्दलच्या गैरसमजुती / Misconcept About Menopause :-

आपल्या देशातील ६५ % लोक खेड्यामध्ये राहणारे आहेत. तेथील स्त्रियांची विचार करण्याची प्रवृत्तीही वेगळी असते. त्यांना वाटते की, आपली पाळी बंद झाली म्हणजे, आपले स्त्रीत्वच आटोक्यात आले आहे .
आपला नवरा आपल्याशी शरीरसंबंध ठेवणार नाही व तो बाहेरख्याली बनेल. या सर्व गैरसमजुती असतात व गैरसमजुतीमुळेच त्यांच्या मनामध्ये या वयात विचारांचे वादळ उठते व त्या अतिशय अस्वस्थ बनतात.

तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगतील की, पाळी बंद झाली म्हणजे आपले स्त्रीत्व जात नाही, त्यामुळे नवरा बायकोच्या संबंधात बाधा येत नाही. तुमचे वय जसे वाढते तसेच तुमच्या नवऱ्याचेही वय वाढत आहे व त्यांच्याही शरीरात असेच बदल घडत आहेत. त्यामुळे बाहेरख्यालीपणाचाही प्रश्न उद्भवणार नाही.

याचबरोबर प्रत्येक स्त्रीची पाळी ही ठराविक वयानंतर बंद होणारच आहे. काहींची लवकर तर काहींची थोडीशी उशीरा. हा काळ फक्त वर्षा – दोन वर्षांचा असतो.

आवश्यकतेनुसार स्त्रीरोगतज्ञांचा सल्ला घ्यावा.

रजोनिवृत्ती संदर्भातील प्रश्नोत्तरे / FAQ about Menopause in Marathi :-

१ ) प्रश्न:- रजोनिवृत्ती किती वयाला येते ? Menopause age in marathi

उत्तर:- सामान्यत: ४५ ते ५५ वयाला मेनोपॉज आलेला आढळतो. परंतु काहि स्त्रीयांमध्ये लवकरात लवकर म्हणजे वयाच्या ३५ व्या वर्षी मेनोपॉज आलेला आढळतो व उशिरात उशीरा म्हणजे वयाच्या ५५ व्या वर्षी मेनोपॉज आलेला आढळतो.

२ ) प्रश्न:- रजोनिवृत्ती चा कालावधी किती असतो? What is the Period/Duration of Menopause in Marathi?

उत्तर:- रजोनिवृत्ती चा कालावधी एक – दोन वर्षांचा असतो.

३ ) प्रश्न:- रजोनिवृत्ती च्या कालावधीत गर्भधारणा राहू शकते का?

उत्तर:- पाळी येणे पूर्ण बंद झाली नसेल तर क्वचितप्रसंगी यावेळेला देखील ( या वयालादेखील ) गर्भधारणा राहू शकते.

४ ) प्रश्न:- खात्रीपूर्वक रजोनिवृत्ती झाली असे कसे समजावे?

उत्तर:- रजोनिवृत्तीच्या वयात १ वर्षापर्यंत जर पाळी आली नाही तर खात्रीपूर्वक रजोनिवृत्ती झाली असे समजावे.

Symptoms of Pregnancy in Marathi
Copyright Material Don't Copy © 2020

View Comments

  • Doctor, very informative post of menopause.I clear all my doubt.
    Thanks....

    • Thanks for your valuable comment. please share on WhatsApp. Thanks...

Recent Posts

राष्ट्रीय जंतनाशक दिन २०२४ प्रश्न उत्तरे Deworming day FAQ in Marathi

सन २०२३ - २०२४ राष्ट्रीय जंतनाशक दिन १३ फेब्रुवारी २०२४ व २० फेब्रुवारी २०२४ (मॉप… Read More

11/01/2024

पोटातील जंत सर्व माहिती Roundworm Tapeworm Worm Meaning in Marathi

जंत ( Worm in Marathi ) होणे ही आपल्या देशातली महत्त्वाची समस्या आहे. ग्रामीण भागात… Read More

05/01/2024

उष्माघात कारणे लक्षणे प्रतिबंध उपचार Heat Stroke Meaning in Marathi

उष्माघात कारणे, उष्माघात लक्षणे, उष्माघात प्रतिबंध, उष्माघात उपचार, उष्माघात घरगुती उपाय, मराठी माहिती, Heat Stroke… Read More

19/03/2023

पांढरे डाग, कोड त्वचारोग लक्षणे, कारणे, निदान, उपचार, घरगुती उपाय, Vitiligo in Marathi

कोड रोग म्हणजे काय ? कोड रोग म्हणजेच vitiligo मध्ये त्वचेचा रंग जातो, ज्यामुळे, त्वचेवर… Read More

19/02/2023

आरोग्यवर्धिनी उपकेंद्र बोरीपार्धी अंतर्गत जागतिक योग दिन साजरा डॉ गणेश केशव भगत

आरोग्यवर्धिनी उपकेंद्र बोरीपार्धी अंतर्गत नाथनगर विद्यालय बोरीपार्धी येथे 21 जून 2022 रोजी जागतिक योग दिन… Read More

22/06/2022