कोरोना व्हायरस आणि आयुर्वेद, प्रतिबंधात्मक आयुर्वेदिक व घरगुती उपाय

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

खालील लेखात Covid-19 या CoronaVirus (कोरोना व्हायरस) सांसर्गिक आजारा निमित्त कोरोना व्हायरस आणि आयुर्वेद, आयुर्वेदानुसार कोरोना व्हायरस, कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक आयुर्वेदिक व घरगुती उपाय ( Prevention of Coronavirus in Marathi ) जसे नस्य, धूमपान, कवल-गंडुष, हळद, च्यवनप्राश, मध, औषधी चहा/ काढा, प्राणायाम, आहार इत्यादिंंची माहिती दिलेली आहे.

आजार आणि आयुर्वेद:-

Diseases and Ayurveda in Marathi –

कोरोना व्हायरस म्हणजेच Covid-19 या CoronaVirus सांसर्गिक विकाराचे आयुर्वेदानुसार महिती खालीलप्रमाणे

यत्र संगात ख वैगुण्यात
व्याधी स्तत्रोपजायते ||

अर्थात :
‘ख’ म्हणजे आकाश ! या आकाश तत्वा मध्ये म्हणजेच शरीरातील असणाऱ्या विविध पोकळी युक्त संस्था/ Systems मध्ये वैगुण्य निर्माण झाल्यामुळे शरीरात विकार / आजार निर्माण होतात.
हे एक आयुर्वेद सूत्र आहे.

Gharguti Upay for Coronavirus in Marathi, Prevention of Coronavirus in Marathi, कोरोना व्हायरस आणि आयुर्वेद, कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक आयुर्वेदिक व घरगुती उपाय, Coronavirus and Ayurveda in Marathi, Ayurvedic Tips to Increase Immunity in Marathi, Ayurveda for Coronavirus in Marathi

आयुर्वेदानुसार आजारांचे प्रकार:-

Types of Diseases According to Ayurveda in Marathi –

सर्व आजाराचे कारण भेदाने दोन प्रकार पडतात.
१) निज
२) आगंतुज

१ ) निज :-

Non Infectious Disease in Marathi –

निज म्हणजे शरीरांतर्गत वात, पित्त, कफ या दोषांचे असंतुलन झाल्यामुळे होणारे विकार होय.
उदा. मधुमेह, हृदय विकार इत्यादि

२) आगंतुज:-

Infectious Disease in Marathi –

आग्न्तुज म्हणजे बाहेरील कारणांनी होणारे विकार होय.
उदा. कुठल्या तरी किटक दंश अथवा सुक्ष जीव / विषाणू संसर्ग यामुळे होणारे विकार

या दोन्ही कारणांचा / विकारांचा विचार केल्यास याला आपण घेत असलेला आहार, विहार आणि अवलंब करीत असलेली जीवनपद्धती तसेच प्रतिकारशक्ती कारणीभूत असते.

कोरोना व्हायरस आणि आयुर्वेद :-

Coronavirus and Ayurveda in Marathi –

Covid-19 हा Corona Virus विषाणू पासून होणारा विकार सध्या आपण बघत आहोत.
यामध्ये शरीरातील श्वसन संस्थेवर प्रथम आक्रमण होऊन लक्षणे दिसू लागतात.

ज्या व्यक्ती च्या श्वसन संस्थे मध्ये / शरीरात वैगुण्य ( प्रतिकारशक्ती कमी असणे ) व कोरोना विषाणू च्या संपर्कात येणार्या अशा व्यक्तींना कोरोना या संसर्गजन्य विकारांना सामोरे जावे लागते.

कोरोना व्हायरस सारखे संसर्गजन्य विकार होऊ नयेत व झालेले नियंत्रणात रहावेत या साठी गरज असते ती प्रतिकारक्षम शरीराची आणि अशा शरीरातील कार्यरत असणाऱ्या रोग प्रतिकार शक्तीला जागृत आणि बलवान करण्याची. यालाच आयुर्वेदात रसायन चिकित्सा / Rejuvenation Therapy असे म्हटले आहे.

शरीर आणि प्रतिकारशक्ती बलवान राहण्यासाठी आयुर्वेद शास्त्रात दिनचर्या, ऋतुचर्या, ऋतूनुसार पंचकर्म, आहार संकल्पना, व्यायाम इत्यादिचे निर्देश केले आहेत.

Coronavirus in Marathi, Corona in Marathi

श्वसन संस्थेची व शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपाय:-

Ayurvedic Tips to Increase Immunity in Marathi, Ayurveda for Coronavirus in Marathi –

सद्यस्थितीत श्वसन संस्थेची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी खालील दिनचर्या अवलंबण्याची गरज आहे.

नस्य –

Nasya for Coronavirus in Marathi-

औषधी तेल/तूप/ खोबरे तेलाचे २ ते ३ थेंब नाकात सोडणे याला नस्य असे म्हणतात.

नस्य करण्याची पद्धत –
१ सुरवातीला चेहऱ्याला कोमट तेलाने मसाज करून वाफ घ्यावी.

२ ) नंतर नाकात औषधी तेलाचे थेंब सोडावे.

सध्या घरा बाहेर पडतांना किंवा घरात असतांना ही नाकाला आतून तेल / तुपाने जरूर माखून घ्यावे.

धूम / धूरी :-

Fumigation for Coronavirus in Marathi-

वातावरण शुद्ध ठेवणेसाठी कडू निंब पान, हळद, ओवा, गुग्गुळ, कापूर, वेखंड, लसूण पाकळ्या या पैकी जे उपलब्ध असेल ते द्रव्य विस्तवावर / गरम तव्यावर टाकून धुनी / धूर सर्व घरात व अंगणात फिरवावी.

कवल-गंडुष:-

Gandush, Oil pulling therapy for Coronavirus in Marathi-

मुखा मध्ये आतून औषधी तेल/तूप/काढा/पाणी काही वेळ तोंडात धरून ठेवने व नंंतर चूळ भरणे.
सध्या:- १ ग्लास कोमट पाणी + सैंधव मीठ + हळद घालून कवल किंवा गंडुष – Gargles करावे.

हळद:-

हे Immunity / प्रतिकारशक्ती वाढविणारे उत्तम द्रव्य आहे.
हळद सिद्ध दुधाचे सेवन करावे. तसेच विविध अन्नपदार्थ बनविताना हळदिचा वापर करावा.

गोल्डन मिल्क – Golden Milk in Marathi –
अर्धा चहाचा चमचा हळद (हळद) चूर्ण १०० मिली गरम दुधात – दिवसातून एकदा किंवा दोनदा सेवन करावे.

च्यवनप्राश :-

Chyawanprash in Marathi, Chyawanprash for Coronavirus in Marathi –

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आवळा युक्त (Vit.C) च्यवनप्राश चे सेवन करावे. च्यवनप्राश रोज सकाळी १ चमचा सेवन करावा.

Chyawanprash in Marathi,

मध:-

Honey for Coronavirus in Marathi –

श्वसन संस्थेची Immunity / प्रतिकारशक्ती वाढविणारे उत्तम Immunomodulator असे द्रव्य म्हणजे मध होय.
रोज १ चमचा सकाळी मधाचे सेवन करावे.

चहा / काढा :-

Herbal Tea for Coronavirus in Marathi, Gharguti Upay for Coronavirus in Marathi –

१ ) गुळवेल, हळद, सुंठ, मिरे, दालचिनी, इलायची, ज्येष्ठमध, लवंग, आवळा, तुळस, गवती चहा या पैकी जे उपलब्ध असेल ते रोज सकाळ संध्याकाळ गुळ घालून / विरहित १ कप काढा तयार करुन त्याचे सेवन करावे. सर्व प्रकारचे Green Tea उपयुक्त आहेत.

२ ) कफ वृद्धी होऊन सर्दी / घशाचे विकार होणार नाहीत यासाठी थंड, स्निग्ध, तळलेले पदार्थ इत्यादि टाळावे.

३ ) दूध घ्यायचेचं असल्यास सुंठ, हळद टाकून उकळून लहान मुलांना देणे.
४ ) सुवर्ण जल सकाळी घ्यावे.

Giloy in Marathi, Gulvel, Guduchi

प्राणायाम:-

Pranayama for Coronavirus in Marathi, Yoga for Coronavirus in Marathi –

  • नाडी शोधन / अनुलोम – विलोम
  • कपालभाती
  • भ्रामरी
  • उज्जयी प्राणायाम
  • भस्रिका
  • सुदर्शनक्रिया

इत्यादि प्राणायाम नियमित करा.

आहार:-

Diet for CoronaVirus in Marathi –

१ ) पचण्यास हलके, ताजे – गरम अन्न , मूग , हुलगे या सारखी कड धान्यांची कढणे यांचे सेवन करा.

२ ) वरण-भात, सर्व प्रकारच्या फळ भाज्या, कोशिंबीरी यांचे सेवन करा.

३ ) थोडी (१/४) भूक शिल्लक राहील असेच जेवणाचे प्रमाण असावे.

पाणी:-

Hot Water For Coronavirus in Marathi –

सकाळी १ कप गरम पाणी चहाप्रमाणे फुंकून – फुंकून प्यावे.
दिवसभर गरम पाणी प्यावे.

सदवृत्त / सदाचार पालन:-

आचार्य चरक यांनी जनपद उद्धवंन्स करणाऱ्या अशा जनपदोद्ध्वन्स व्याधीं /महामारी युक्त साथीचे रोगा चे वर्णन चरक संहितेत केले आहे. सध्याचा Covid-19 हा ही असाच.

या व्याधींच्या काळात सदाचार पालन, दान, देव आराधना (नामस्मरण, ध्यान),अहिंसा, षडरीपु त्याग करून विवेक बुद्धीचा अवलंब, अशा प्रकारचे आचरण करण्यास सांगितले आहे.

यामुळे आत्मरक्षा होऊन मनोबल ही उंचावते . माणसिक स्वास्थ टिकून राहिल.

Coronavirus Latest News in Marathi, Coronavirus in Marathi

सारांश:-

सद्यस्थितीत प्रशासनाने या संदर्भात सांगितलेल्या सर्व उपाय योजनांचे १००% पालन करावे.

आपले सर्वांगीण स्वास्थ्य आणि प्रभावी प्रतिकारशक्ती योग्य आणि संतुलीत राहण्यासाठी आयुर्वेद शास्त्राने सांगितलेल्या वरील सर्व नियमांचे, अमृत वचनांचे, स्वहित,राष्ट्र हित आणि विश्वहित जपण्यासाठी जरूर पालन करावे. आयुर्वेद हे हजारो वर्षां पासून संशोधनाने सिद्ध झालेले शास्त्र आहे.

Copyright Material Don't Copy © 2020

View Comments

  • Very good information & Useful
    या आजारा बद्दल लोकांच्या मनातील भिती कमी होणे

    • आपल्या कमेंंट बद्दल धन्यवाद.

Share
Published by

Recent Posts

जागतिक आरोग्य दिन २०२४ – माझे आरोग्य, माझे हक्क

जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास जागतिक आरोग्य दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो.… Read More

01/04/2024

राष्ट्रीय जंतनाशक दिन २०२४ प्रश्न उत्तरे Deworming day FAQ in Marathi

सन २०२३ - २०२४ राष्ट्रीय जंतनाशक दिन १३ फेब्रुवारी २०२४ व २० फेब्रुवारी २०२४ (मॉप… Read More

11/01/2024

गरोदरपणातील मधुमेह GDM in Marathi

गरोदरपणातील मधुमेह (GDM) म्हणजे काय? Gestational diabetes in Marathi :- गर्भधारणेदरम्यान जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण… Read More

07/01/2024

पोटातील जंत सर्व माहिती Roundworm Tapeworm Worm Meaning in Marathi

जंत ( Worm in Marathi ) होणे ही आपल्या देशातली महत्त्वाची समस्या आहे. ग्रामीण भागात… Read More

05/01/2024

उष्माघात कारणे लक्षणे प्रतिबंध उपचार Heat Stroke Meaning in Marathi

उष्माघात कारणे, उष्माघात लक्षणे, उष्माघात प्रतिबंध, उष्माघात उपचार, उष्माघात घरगुती उपाय, मराठी माहिती, Heat Stroke… Read More

19/03/2023