कोरोनाची लस गरोदर महिला आणि स्तनदा मातांसाठी कितपत सुरक्षित?

Pregnancy and Covid 19 Vaccine in Marathi, Lactation and Covid 19 Vaccine in Marathi, Covid 19 Vaccination during Lactation in Marathi, Covid 19 Vaccination during Pragnancy in Marathi, Garodarpanat Corona Las,

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला स्तनदा माता आणि गर्भवती महिलांना सल्ला देण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती मिळते जेणेकरून या महिलांना कोविड -१ ९ लसी घेण्यासंबंधी माहितीपूर्ण निर्णय घेता येऊ शकतील.

‘फॉग्सी’ (Federation of Obstetric and Gynecological Society of India) देशभरातील स्त्रीरोगतज्ज्ञांची सर्वात मोठी संघटना आहे. गर्भवती महिला आणि स्तनदा मातांच्या लसीकरणाबाबत ‘फॉग्सी’ने एक पत्रक जारी केलंय. त्या पत्रकात खालील मुद्दे आहेत –

 • गर्भवती महिला, स्तनदा मातांना लस देण्यात यावी. लशीची सुरक्षा त्यांनाही मिळाली पाहिजे
 • महिलांना त्यांचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असावं. स्त्रीरोगतज्ज्ञांना लस देण्याची परवानगी द्यावी. जेणेकरून योग्य काळजी घेता येईल
 • कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सीनचा गर्भवती महिला आणि स्तनदा मातांवर चाचणीचा डेटा उपलब्ध नाही. पण प्राण्यांवर झालेलं संशोधन आणि शास्त्रीय माहितीनुसार, लशीचा गर्भावर किंवा जन्माला येणाऱ्या बाळावर प्रतिकुल परिणाम होत नाही
 • आईच्या दुधावर असलेल्या बाळावर लशीचा प्रतिकुल परिणाम होत नाही. त्यामुळे स्तनदा मातांना लस मिळाली पाहिजे.
 • या निर्णयाचा 50 दशलक्ष लोकांवर परिणाम होणार आहे

स्त्रीरोगतज्ज्ञांची संघटना फॉग्सीचे अध्यक्ष डॉ. अल्पेश गांधी सांगतात, “कोरोनाची लाट येण्यापासून प्रतिबंध करायचा असेल. तर लसीकरण प्रभावी आणि दिर्घकाळ उपाय आहे. त्यामुळे गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना लशीची सुरक्षा मिळाली पाहिजे.”

“गर्भवती महिला, स्तनदा मातांना लस दिल्यामुळे होणारे फायदे, सौम्य धोक्यांपेक्षा अधिक जास्त मोलाचे आहेत,” असं डॉ. गांधी पुढे म्हणतात.

अनुक्रमणिका

दुसऱ्या लाटेत गर्भवती महिलांना संसर्ग जास्त?

देशभरात कोरोनासंसर्गाच्या दुसऱ्या लाटेने हाहा:कार माजवलाय. गर्भवती महिलांनाही कोरोनासंसर्गाचा मोठा फटका बसलाय.

“कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तूलनेत, दुसऱ्या लाटेत गर्भवती महिलांना गंभीर संसर्ग होण्याचं प्रमाण जास्त आहे,” असं फॉग्सीचे अध्यक्ष डॉ. गांधी सांगतात.

फोर्टिस रुग्णालयाच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सोनल कुमटा सांगतात, “तज्ज्ञांच्या मते गर्भवती महिलांना लस मिळाली पाहिजे. याचं कारण संसर्गाचा धोका खूप वाढलाय.”

स्त्रीरोगतज्ज्ञ काय म्हणतात?

गर्भवती महिलांसाठी लस सुरक्षित आहे का?

डॉ. नंदिता पालशेतकर मुंबईतील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. स्त्रीरोगतज्ज्ञांची संघटना फॉग्सीच्या माजी अध्यक्ष राहिल्या आहेत.

त्या म्हणतात, “भारतात उपलब्ध असलेल्या कोणत्याही लशीमुळे गर्भवती महिलांना धोका नाही. गर्भवती महिलांवर याची चाचणी न झाल्यामुळे, त्यांना देण्यात येऊ नये असं सांगण्यात आलं होतं. पण, आता संशोधन स्पष्ट आहे.”

भारतात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन लशी उपलब्ध आहेत.

मुंबईतील व्हॉकार्ड रुग्णालयाच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. गंधाली देवरूखकर सांगतात, “सामान्य व्यक्तीप्रमाणेच गर्भवती महिला आणि स्तनादा मातांना लस दिली जाऊ शकते. मधूमेहाचा त्रास असलेल्या गर्भवती महिलांना लस दिलीच पाहिजे. जेणेकरून गर्भावस्थेत संसर्ग झाला. तर आजार गंभीर होण्याची शक्यता कमी होईल.”

लस घेतल्यानंतर दोन-तीन दिवस ताप येणं, अंगदुखी, पाय दुखणं हे साईडइफेक्ट जाणवू शकतात. त्याच्यासाठी भरपूर पाणी प्यावं. काही दिवस आराम करावा. हे केलं तर गर्भवती महिलांना काहीच त्रास होणार नाही, असं तज्ज्ञ म्हणतात.

स्तनदा मातांना लस फायदेशीर आहे?

महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयात आतापर्यंत 5000 पेक्षा जास्त कोव्हिडग्रस्त महिलांची प्रसूती करण्यात आली आहे.

नायर रुग्णालयाच्या बालरोग विभागाच्या डॉ. सुषमा मलिक सांगतात, “लशीचा स्तनपान करणाऱ्या महिलांवर किंवा बाळावर काहीच परिणाम होणार नाही. त्यांना याचा धोका नाही. पण यावर अजूनही फारसा अभ्यास करण्यात आलेला नाही.”

“स्तनपान करणाऱ्या महिलांना लस मिळाली तर, अन्टीबॉडीज बाळालाही मिळण्याची शक्यता आहे,” असं डॉ. कुमटा म्हणतात.

गर्भवती महिलांना कोणती लस धोक्याची?

स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणतात, “गर्भवती महिलांना जिवंत पण, कमकुवत कोरोना व्हायरसपासून (Live Attenuated) बनवण्यात आलेली लस धोकादायक आहे. ही लस दिल्यास आईपासून गर्भाला संसर्ग होण्याचा धोका आहे.”

“भारतात आणि जगभरात जिवंत, पण कमकुवत व्हायरसपासून बनवण्यात आलेली लस नाही. त्यामुळे गर्भाला धोका पोहोचण्याची शक्यता नाही,” असं स्त्रीरोगतज्ज्ञांनी या पत्रकात म्हटलंय.

डॉ. नंदिता पालशेतकर म्हणतात, “निष्क्रिय व्हायरसपासून बनवण्यात आलेली लस गर्भवती महिलांना देण्यात काहीच हरकत नाही. त्यामुळे लस देण्यात आली पाहिजे.”

“अमेरिकेत M-RNA लस 35 हजार गर्भवती महिलांना देण्यात आली आहे. या लशीचा तिहेरी फायदा आहे. गर्भवती महिला, गर्भ आणि जन्माला येणाऱ्या बाळाला फायदा होतो. शरीरात चांगल्या अंटीबॉडी तयार होतात,” असं डॉ. नंदिता म्हणतात.

आंतरराष्ट्रीय संघटनांच्या मार्गदर्शक सूचना

आंतरराष्ट्रीय स्तरावर वैद्यकीय तज्ज्ञांच्या संघटनांनी गर्भवती आणि स्तनदा मातांना लस देण्याबाबत सकारात्मक पवित्रा घेतल्याचं तज्ज्ञ सांगतात.

कोरोनाविरोधी लस निर्माण करणाऱ्या फायझरने फेब्रुवारी महिन्यात गर्भवती महिलांवर लशीची चाचणी सुरू केली आहे. गर्भवती महिलांना याचा काय फायदा होते, हे तपासण्यासाठी ही ट्रायल सुरू करण्यात आली आहे.

तर, युकेतील लसीकरणाचे मार्गदर्शक सांगतात, फायझर आणि मॉडेर्नाच्या लशीची 90 हजार महिलांवर चाचणी करण्यात आली. यात लशीचे कोणतेही प्रतिकुल परिणाम समोर आले नाहीत. त्यामुळे, गर्भवती महिलांना लस देण्यात यावी.

गर्भवती महिलांकरीता कोविड -१ ९ लसीची शिफारस का करण्यात आली आहे ?

गर्भावस्थेमुळे कोविड -१ ९ संसर्ग होण्याचा धोका वाढत नाही . बहुतांश गर्भवती महिलांमध्ये लक्षणे दिसून येत नाहीत किंवा सौम्य स्वरुपाची लक्षणे दिसून येतात , परंतु त्यांची प्रकृती वेगाने खालावू शकते आणि त्याचा विपरित परिणाम गर्भावर देखील होऊ शकतो .

कोविड -१ ९ संसर्ग होऊ नये याकरीता गर्भवती महिलांनी सर्व प्रकारची खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे . यामध्ये कोविड -१ ९ लसीकरणाचा देखील समावेश आहे . त्यामुळे गर्भवती महिलांनी कोविड -१ ९ लस घ्यावी अशी शिफारस करण्यात आली आहे .

कोणत्या व्यक्तींना कोविड -१ ९ संसर्ग होण्याचा धोका अधिक प्रमाणात आहे ?

आरोग्य कर्मचारी किंवा फ्रंटलाईन कर्मचारी असलेली व्यक्ती कोविड -१ ९ संसर्ग अधिक किंवा वाढत्या प्रमाणात असलेला समुदाय

 • सतत घराबाहेर असलेल्या व्यक्तींच्या वारंवार संपर्कात येणाऱ्या व्यक्ती
 • घनदाट वस्तीमुळे योग्य शारीरिक अंतर राखण्याचे सदैव पालन करता न येणाऱ्या व्यक्ती . कोविड -१ ९ मुळे गर्भवती महिलांच्या आरोग्यावर कशा प्रकारे परिणाम होतो ?
 • जरी कोविड -१ ९ संसर्ग झालेल्या बहुतांश ( ९ ० टक्क्यांहून अधिक ) महिलांना रुग्णालयात दाखल होण्याची कोणतीही आवश्यकता भासत नसली तरी काही महिलांची प्रकृती वेगाने खालावत जाण्याची शक्यता असते .
 • लक्षणे दिसून येणाऱ्या गर्भवती महिलांमध्ये आजाराची तीव्रता वाढण्याचा आणि मृत्यु होण्याचा धोका अधिक प्रमाणात असतो असे दिसून आले आहे . जर आजाराची तीव्रता वाढली तर इतर बाधितांप्रमाणे गर्भवती महिलांना देखील रुग्णालयात दाखल केले पाहिजे .
 • उच्च रक्तदाब , स्थूलता , ३५ वपिक्षा अधिक वय यासारख्या वैद्यकीय अवस्था असलेल्या गर्भवती महिलांमध्ये कोविड -१ ९ आजाराची तीव्रता वाढण्याचा धोका अधिक प्रमाणात असतो .

कोविड -१ ९ संसर्गाचा परिणाम गर्भवती महिलांच्या बालकांवर कशा प्रकारे होतो ?

 1. कोविड -१ ९ संसर्ग झालेल्या मातांच्या बहुतांश ( ९५ टक्क्यांहून अधिक ) नवजात शिशुंची प्रकृती जन्माच्या वेळी अतिशय चांगल्या अवस्थेत असते.
 2. परंतु काही वेळा गर्भावस्थेदरम्यान झालेल्या कोविड -१ ९ संसर्गामुळे अकाली प्रसूत होणे , शिशुचे वजन २.५ किलोग्रॅमपेक्षा कमी असणे आणि क्वचित प्रसंगी शिशु जन्मापूर्वी मृत असणे या संभाव्यता वाढू शकतात .

कोविड -१ ९ मुळे गर्भवती महिलांच्या आरोग्यावर कशा प्रकारे परिणाम होतो ?

 • जरी कोविड -१ ९ संसर्ग झालेल्या बहुतांश ( ९० टक्क्यांहून अधिक ) महिलांना रुग्णालयात दाखल होण्याची कोणतीही आवश्यकता भासत नसली तरी काही महिलांची प्रकृती वेगाने खालावत जाण्याची शक्यता असते .
 • लक्षणे दिसून येणाऱ्या गर्भवती महिलांमध्ये आजाराची तीव्रता वाढण्याचा आणि मृत्यु होण्याचा धोका अधिक प्रमाणात असतो असे दिसून आले आहे . जर आजाराची तीव्रता वाढली तर इतर बाधितांप्रमाणे गर्भवती महिलांना देखील रुग्णालयात दाखल केले पाहिजे .
 • उच्च रक्तदाब , स्थूलता , ३५ वर्षापेक्षा अधिक वय यासारख्या वैद्यकीय अवस्था असलेल्या गर्भवती महिलांमध्ये कोविड -१ ९ आजाराची तीव्रता वाढण्याचा धोका अधिक प्रमाणात असतो .

जर गर्भवती महिलेला आधीच कोविड -१ ९ संसर्ग झाला असेल तर तिने लसीकरण कधी करावे ?

जर एखाद्या गर्भवती महिलेला गर्भावस्थेदरम्यान कोविडचा संसर्ग झाला तर तिने प्रसूतीनंतर लवकरात लवकर लस घेतली पाहिजे. कोविडचा संसर्ग झाल्यानंतर ३ महिन्यांनी कोविड -१ ९ लसीकरण करावे.

कोविड -१ ९ लसीचे दुष्परिणाम आहेत का , जे गर्भवती महिला किंवा तिच्या गर्भाकरीता हानिकारक असू शकतात ?

 • उपलब्ध असलेल्या कोविड -१ ९ लसी अतिशय सुरक्षित आहेत आणि लसीकरणामुळे कोविड -२५ संसर्ग होण्यापासून / आजारी पडण्यापासून इतर व्यक्तींप्रमाणे गर्भवती महिलांचे देखील संरक्षण होते .
 • इतर कोणत्याही औषधाप्रमाणे लसीचे देखील दुष्परिणाम असू शकतात , जे सहसा सौम्य स्वरुपाचे असतात . लस टोचून घेतल्यावर गर्भवती महिलांमध्ये श्ते ३ दिवस सौम्य ताप येणे , इंजेक्शन टोचलेल्या जागी वेदना होणे किंवा थोडेसे अस्वस्थ वाटणे यासारखे किरकोळ दुष्परिणाम दिसून येऊ शकतात .
 • दीर्घकालीन दुष्परिणाम तसेच गर्भ आणि शिशुसाठी लस सुरक्षित आहे की नाही हे अजूनही सिद्ध झालेले नाही .
 • अतिशय क्वचित प्रसंगी ( १ ते ५ लाखांमध्ये एखादे प्रकरण ) कोविड -१ ९ लसीकरणानंतर पहिल्या २० दिवसांत गर्भवती महिलांमध्ये खालील लक्षणांपैकी काही लक्षणे दिसून येऊ शकतात . अशा प्रसंगी त्वरीत वैद्यकीय सल्ला घेण्याची आवश्यकता असू शकते.

कोविड -१ ९ लसीकरण केल्यानंतर २० दिवसाच्या दरम्यान आढळणाऱ्या लक्षनावर तत्काळ लक्ष देण्याची आवश्यकता आहे ?

कोविड -१९ लसीकरणानंतर पहिल्या २० दिवसांत गर्भवती महिलांमध्ये खालील लक्षणांपैकी काही लक्षणे दिसून येऊ शकतात . अशा प्रसंगी त्वरीत वैद्यकीय सल्ला घेण्याची आवश्यकता असू शकते

 • धाप लागणे ( श्वासोच्छ्वास करताना अडचण होणे )
 • छातीत दुखणे
 • उलटी होणे किंवा उलटी न होता
 • सतत पोटात दुखणे
 • हातपाय दुखणे / हातपाय दाबल्यावर दुखणे किंवा
 • हातापायाला सूज येणे
 • इंजेक्शन दिलेल्या जागेपासून दूरवरच्या त्वचेवर रक्ताचे लहान मोठे निशाण दिसणे.
 • आकडी येणे ( आकडी येण्याचा कोणताही पूर्वइतिहास नसताना )
 • तीव्र किंवा नेहमी डोकेदुखी ( अर्धशिशी किंवा जुनाट डोकेदुखीचा पूर्वइतिहास नसताना )
 • कोणतेही स्पष्ट कारण नसताना सतत उलटी होणे
 • धूसर दिसणे / डोळ्यांमध्ये वेदना होणे.
 • शरीराच्या कोणत्याही अंगाला कमजोरी वाटणे.

गर्भवती महिलेचे लसीकरण झाल्यानंतर कोणत्या प्रकारची खबरदारी घेणे आवश्यक आहे ?

 • कोविड -१ ९ संसर्ग पसरू नये याकरीता स्वतचे तसेच आजूबाजूच्या व्यक्तींचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला आणि तिच्या कुटुंबियांना कोविड विषयक सुयोग्य सवयींचे पालन चालू ठेवणे अत्यावश्यक आहे.
 • एकावर एक दोन मास्क लावा.
 • योग्य शारीरिक अंतर राखा आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
 • हात वारंवार धुवा.

कोविड -१ ९ लसीकरणासाठी गर्भवती महिलेने स्वतःची नोंदणी कशी करावी ?

 1. सर्व गर्भवती महिलांनी स्वतची नोंदणी को-विन ( Co-win ) पोर्टलवर करणे किंवा कोविड -१ ९ लसीकरण केंद्रावर ऑनसाईट नोंदणी करणे आवश्यक आहे .
 2. गर्भवती महिलांकरीता नोंदणीची प्रक्रिया सर्वसामान्य जनतेप्रमाणे तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने वेळोवेळी जाहीर केलेल्या अद्ययावत मार्गदर्शक सूचनांना अनुसरूनच आहे .

Pregnancy and Covid 19 Vaccine in Marathi, Lactation and Covid 19 Vaccine in Marathi, Covid 19 Vaccination during Lactation in Marathi, Covid 19 Vaccination during Pragnancy in Marathi, Garodarpanat Corona Las,

Copyright Material Don't Copy © 2021