औषधी वनस्पती

हळद गुण व औषधी उपयोग, कस्तुरी हळद, आंंबे हळद, Halad, Turmeric in Marathi

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

हळद हि बहुगुणी औषधी वनस्पती आहे. हळद वनस्पतीच्या कंदाच्या चूर्णाला हळद असे म्हणतात. हरीद्रा किंवा हळदिचे कंद, कंदाचे चूर्ण, स्वरस औषध म्हणून वापरले जाते. हळदीच्या वाळलेल्या कंदाला हाळकुंड असे म्हणतात.

खालिल लेखामधे हळद गुण, हळदीचे औषधी उपयोग, कस्तुरी हळद, आंंबे हळद, Halad, Turmeric in Marathi, Turmeric Information in Marathi, Turmeric Powder in Marathi, Kasturi Turmeric in Marathi, Wild Turmeric in Marathi, इत्यदि हळद या औषधी वनस्पती बद्दलची सर्व माहिती दिलेली आहे.

halad in marathi, halad, हळद, turmeric in marathi, kasturi turmeric in marathi, amba haldi for skin, wild turmeric in marathi, halad in marathi, turmeric powder in marathi,

हळद वनस्पती चे स्वरुप Turmeric in Marathi:-

Turmeric Plant Information in Marathi, Halad in Marathi –

वर्षायु क्षुप असते. हळदीचे २ ते ३ फूट उंचीचे झुडूप/क्षुप असते.
याच्या कंदाचे चूर्ण म्हणजे हळद होय. आल्यासारखी हळद कंदाने वाढते.

हळदीची वाळलेल्या कंदाला हाळकुंड असे म्हणतात.

हळदीची पाने –
३० ते ४० सें . मी . लांब – रुंद असतात व त्यांना आंब्यासारखा वास येतो.
पानाचा देठ पानाप्रमाणेच लांब रुंद असतो.

हळदीची फुल –

फुलाचा दांडा १२ ते १६ सें . मी . लांब व त्यात हळदीच्या/पिवळ्या रंगाचे ५ सें. मी. लांबीचे फूल निघते. वर्षाऋतुच्या प्रारंभी फुले येतात.

हळदीची फळे –

लांबट गोल व गाठदार असते . याच्या आतील भाग खूप पिवळा असतो .

turmeric powder benefits in marathi, turmeric benefits in marathi, benefits of turmeric in marathi, turmeric tree information in marathi, turmeric plant in marathi, हळद माहिती

इतर भाषेतील नावे:-

Turmeric in Marathi, Turmeric Marathi Meaning, Halad in English Halad in Marathi –

हळद शास्त्रीय नाव – Kurkum longa, कुरकुम लाँगा
हळद English name – Turmeric
हळद हिंदी नाम – हलदी, हल्दी

हळद संस्कृत नाव –

१) हरिद्रा – हरिं वर्णं द्राति – रंग सुधारते ती

२) कांचनी – त्वचेला सोन्याचा रंग देते ती ,
३) निशा – चांदण्या रात्रीसारखी सुंदर ,

४) वरवर्णिनी – चांगल्या रंगाची ,

५) हट्टविलासिनी – हट्ट म्हणजे बाजार व त्या बाजाराला त्याला शोभा आणिते ती

हळद गुण, Turmeric in Marathi:-

हळद गुण – रुक्ष , लघु
हळद रस – तिक्त , कटु ,

हळद वीर्य – उष्ण ,
हळद विपाक – कटु ,

हळद कडू , तिखट , रूक्ष , लघु , उष्ण , कफवातशामक , पित्तरेचक , वर्ण सुधारणारी , रक्तप्रसादक आहे.

कर्म व प्रयोग दोष – उष्णवीर्य म्हणून कफवातशामक पित्तरेचक व तिक्तरसाने पित्तशामकही आहे . साहजिकच त्रिदोषात्मक विकारावर उपयोगी पडते.

अंगावर पित्त उठणे , रक्तस्त्राव , कंड , जुनाट ताप , त्वचेचे रोग , जखम , उचकी , दमा , रक्तपित्त , प्रमेह , शुक्रदोष , व अंगावरच्या दुधातील दोष ह्यांवर उपयोगी.

उपयुक्तांग – कंद

विशिष्टकल्प – हरिद्रा खण्ड

मंगल द्रव्यात ‘ हरिद्रा ‘ ही शिरोभागी आहे . हरिद्रा – कुंकुम या सौभाग्य द्रव्यात हरिद्रा प्रथम आहे . कुंकू हि हळदीपासूनच बनवितात. पंढरपूरला हळदिपासून कुंकू बनवले जाते.
विवाह – संस्कारात हळद अंगास लावण्याचा प्रकार मंगल समजतात.

हळद डोस व औषधी मात्रा:-

हळदीचे चूर्ण – १ ते ३ ग्रॅम .

ओल्या हळदीचा स्वरस – १० ते २० मि. ली.

हंता व्हायरस सर्व माहिती, Hantavirus in Marathi, हंता व्हायरस मराठी

हळदीचे प्रकार Types of Turmeric in Marathi:-

रानहळद व आंबेहळद हे हळदीचेच प्रकार मानले जातात .

१) रानहळद / कस्तुरी हळद Wild Turmeric in Marathi –

Wild Turmeric Meaning in Marathi, Kasturi Turmeric in Marathi –

हि एक हळदीची जात आहे, नावाप्रमाणे हि फक्त जंगलात आढळते. सध्या फक्त भारता मधे आढळून येते, महाराष्ट्रामध्ये सह्याद्रिच्या डोगर रांगामध्ये हि आपल अस्ततित्व टिकवून आहे. रानहळद (Wild Turmeric in Marathi) लाच कस्तुरी हळद ( Kasturi Turmeric in Marathi ) या नावानेही ओळखतात.

रानहळद / कस्तुरी हळदीचे (Wild Turmeric in Marathi) कंद आकाराने मोठे, गोलाकार असतात. कंदाचा रंग वरुन पिवळा व आतून नारंगी असतो. यांना कापरा सारखा वास येतो.

रानहळद / कस्तुरी हळद औषधी उपयोग Benefits of Wild Turmeric in Marathi

१ ) रानहळदीला (wild turmeric name in marathi) आयुर्वेदामध्ये औषधी दृष्ट्या खुप महत्व आहे. कावीळ, श्वसन विकार, अतिसार व हृदयाच्या आजारांवर ही हळद अत्यंत गुणकारी आहे.

२) रानहळदीचा / कस्तुरी हळदिचा लेप गरम करून सुज आलेल्या भागावर लावल्यास लवकर सूज व ठणका यातून आराम मिळतो.

३) स्तनदा मातांनी रानहळद / कस्तुरी हळदीचा उकडून खाल्याने दुधामध्ये वाढ होण्यास मदत होते.

४) रान हळदीचा / कस्तुरी हळदीचा लेप डोक्यावर लावल्यास डोकं शांत होण्यास मदत होते.

५) कच्ची रानहळद / कस्तुरी हळद ही रक्तशुद्धीकरण करते.

२ ) आंबेहळद Amba Haldi for Skin in Marathi –

आंबेहळद ( Aamba Halad ) हा एक हळदीचा प्रकार आहे, आंबेहळद हि सामान्य हळदि पेक्षा उग्र वासाची व उग्र गुण कर्माची अ‍सते.

आंबेहळद चा फक्त बाह्य उपचारांन साठीच उपयोग केला जातो, आंबेहळदीचे ( Aamba Halad ) सेवन करु नये.

आंबे हळद औषधी उपयोग –

१) शरीराच्या एखाद्या भागावर सूज, वेदना असतील तर तेथे आंबेहळदीचा ( Aamba Halad ) लेप केल्यास त्वरीत आराम मिळतो.

२) अंगावर कोठेहि गाठ आल्यास त्यावर आंबे हळदीचा ( Aamba Halad ) लेप केल्यास आराम मिळतो.

३) अंगावर बारिक पुरळ उठल्यास त्यावर जीरे, आंबेहळद ( Aamba Halad ) गोमूत्रात कालवून त्याचा लेप केल्यास त्वरीत आराम मिळतो.

Turmeric Face Pack in Marathi –

५) Aamba Halad for Skin – चिमूटभर आंबेहळद ( Aamba Halad ) व दुधावरील साय एकत्र करुन चेहर्यावर लावल्यास वर्ण सुधारतो.

उत्पत्तिस्थान –

समस्त भारतवर्ष , दक्षिण महाराष्ट्रात सांगली ( हरिपूर ) येथे हळदीची फार मोठी पेठ आहे . ( येथे जमिनीखालील दगडी तळघरात हळदीचा साठा करण्यात येतो . त्यात हळद पुष्कळ दिवस टिकते . )

रासायनिक संघटन Chemical Properties of Turmeric in Marathi –
१ % उडणारे तेल , राळ , कर्कुमिन सत्त्व , पीतरञ्जक द्रव्य , हरिद्रा तेल ( Turmeric Oil – Turmerol )
ह्या तेलाला विशिष्ट गंध असतो तसाच विशिष्ट स्वादही येतो. हे तेल घट्ट पिवळे असते

स्वयंपाक घरातील औषधे, Home Remedies from kitchen in marathi

हळद चे औषधी उपयोग Turmeric Uses in Marathi:-

बाहय औषधी उपयोग –

Turmeric External Uses in Marathi, Turmeric for Skin in Marathi –

१ ) जखम झाल्यास हळदीचे चूर्ण जखमेवर लावावे .
जखम धुण्यास ही वापरतात. कावीळ, मलावरोध व जलोदरात उपयोगी.
Turmeric for Wound in Marathi

२ ) तोंडाचे रोग व घसा सुजल्यास , हळद गरम पाण्यात घालून गुळण्या कराव्या.

Turmeric for Tonsilitis in Marathi

३ ) हळदीचा लेप शोथहर , वेदना कमी करणारा , वर्ण्य , कष्ठघ्न , व्रणशोधक , व्रणरोपक , लेखन आहे. Turmeric for Pain in Marathi

४) हळदीच्या धुमपानाने उचकी थांबते. Turmeric for Hiccups in Marathi

५) हळदीच्या धुमपानाने श्वासवेग कमी होतो.

६) हळदिचा लेप विषघ्न आहे.

७) हळदीच्या धूपाने विंचवाच्या दंशाची वेदना कमी होते. हळदीचा धूप हा फार तीक्ष्ण असतो. Turmeric for Scorpian Bite in Marathi.

आभ्यंतर औषधी उपयोग –

खोकला –

झोपण्यापूर्वी हळद भाजून खावी. Turmeric for Cough in Marathi

पडसे खोकला स्वरभेद –

गरम दुधात हळदीचे चूर्ण घालून घ्यावे. Turmeric for Cold in Marathi

कफरोग –

गोमूत्रात हळद घालून प्यावे. Turmeric for Asthama in Marathi

स्तनरोग –

हळद व लोध्र पाण्यात वाटून लेप लावावा. Turmeric for Mastitis in Marathi

मूळव्याध –

हळद भाजून तिची पूड कोरफडीच्या गिरात मिसळून घ्यावी व हि पेस्ट मूळव्याधावर लावावी. Turmeric for Piles in Marathi

मूळव्याध उपाय, घरगुती उपचार, पथ्य, लक्षणे, प्रकार, कारणे, औषध, Piles in Marathi

मूत्रकृच्छ्र व मूतखडा –

हळद आणि गूळ पेजेत किंवा कांजीत घ्यावे. Turmeric for Kidney Stone in Marathi

पिष्टमेह –

हळद व दारूहळद यांच काढा प्यावा.

ताप –

हळद , हिरडा व जवखार यांचे चूर्ण गरम पाण्याबरोबर घ्यावे.

तापक्रम – ज्वरात पित्तसारक व आमपाचक व रसादि धातुगामित्वामुळे हळद उपयोगी पडते.

वेदनास्थापक –

उष्ण गुणधर्मामुळे हळद ही वेदनास्थापक होते. मार लागल्यानंतर होणाऱ्या वेदना हळद + गूळ खाण्यास दिल्यास कमी होतात. Turmeric for Pain in Marathi

पाचनसंस्थान –

१ ) हळद ही कडु , रुचिवर्धक , अनुलोमक , पित्तविरेचक व कृमिघ्न आहे.
या कर्मामुळे ती अरुची, विबंध, कावीळ, जलोदर, कृमि यामध्ये वापरतात.

२) हळदीचा रंग पिवळा आहे . काविळीतही पिवळेपणा येतो. त्यामुळे हळद अधिक खाल्ल्याने कावीळ होते किंवा काविळीत हळद ही अपथ्य आहे हा केवळ भ्रमच आहे. गैरसमज आहे.

रक्तवहसंस्थान –

हळद ही उत्तमपैकी रक्तप्रसादनाचे काम करते. रक्तवर्धक, रक्तस्तंभक या दृष्टीनेही हळद ही अत्यंत उपयुक्त आहे. निरनिराळे रक्तविकार, पांडुरोग व रक्तस्रावात उपयोगी पडते.

श्वसनसंस्थान –

तिक्त व तीक्ष्णत्वामुळे हळद कफघ्न आहे. हळदीने कफ होण्याचे प्रमाण कमी होते. दूध पिल्यामुळे वाढणार कफ व त्यामुळे होणारे कास, श्वास, प्रतिश्याय यासारखे विकार हळदीने कमी होतात. Turmeric for Respiratory Diseases in Marathi

हळदीच्या विडीने कास, कफ कमी होतो.

मूत्रवहसंस्थान –

हळदीत सूत्रसंग्रहणीय गुण श्रेष्ठतेने आहे. पण ती आम, कफ, मेद यांचे पाचन करुन हे कार्य करते.

‘ मेहेषु धात्रीनिशे ‘ हे वाग्भटोक्त सूत्र ( वा . उ . ४० – ४८ )
Turmeric for Diabetes in Marathi

प्रमेहात हळदीचा काढा किंवा चूर्ण वापरावे. हळदीने मारण केलेले वंगभस्मही प्रमेहात उत्तम उपयोगी पडते . ( धात्रीनिशा – मेहघ्न . )

प्रजननसंस्थान –

हळद गर्भाशयशोधन, स्तन्यशोधन व शुक्रशोधन आहे.
प्रसवानंतर हरिद्राखण्डपाक वापरतात. Turmeric for Reproductive System in Marathi

त्याला कारण हळदीने होणारे गर्भाशय व स्तन्यशोधन हे तिचे गुण हे होय. शक्रमेहातही हळद उपयोगी पडते.

त्वचा –

कुष्ठघ्न अशी हरिद्रा अनेक त्वचा रोगावर वापरली जाते.
त्वचेला वर्ण चांगला करण्याच्या तिच्या धर्मामुळेच ती अनेक त्वचारोगात वापरली जाते.

( पी हळद आणि हो गोरी, ही म्हण जरी अति घाई असणाऱ्यांचा उपहास करण्यासाठी असली तरी हळदीचे वर्ण्य कर्मच त्यातून व्यक्त होते आहे. ) Turmeric for Skin in Marathi

कण्डू , शीतपित्त या विकारांत रक्तातील गोठण्याचा धर्म कमी करणे हा त्यामागे उद्देश असतो.

सात्मीकरण –

तिक्तरसामुळे हरिद्रेने धातुशैथिल्य नाहीसे होते. सर्वसामान्य अशक्तपणा कमी करण्यास हरिद्रा उपयोगी पडते. हरिद्रेत विषघ्न धर्म चांगला आहे.

टिप :- वरील उपाय हे फक्त महिती साठी आहेत, ते उपचार्थ सल्ला नाही. उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या व तज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांद्वारेच उपचार करुन घ्या.

स्रोतोगामित्व –

दोष –

कफघ्न व पित्तघ्न.

धातु –

रसरक्त – ( वर्ण्य ) , मेद ( मेह ) , रक्तमेद ( पांडुरोग ) , रक्त ( कुष्ठ ) मल – कृमिघ्न .

अवयव –

गर्भाशय – मूत्रवहस्रोतस.

विशेष –

विषघ्नी

हरिद्रा हरिद्रा काञ्चनी पीता निशाख्या वरवर्णिनी । कृमिघ्ना हलदी योषित्प्रिया हटविलासिनी ॥ हरिद्रा कटुका तिक्ता रुक्षोष्णा कफपित्तनुत् । वा त्वग्दोषमेहास्रशोषपाण्डुव्रणापहा । भा . प्र .
हरिद्रा तु रसे तिक्ता रुक्षोष्णा विषकुष्ठनुत् । मेहकण्डूव्रणान् हन्ति देहवर्णविधायिनी । । विशोधनी कृमिहरा पीनसारुचिनाशिनी । ध . नि .

Pharmacology:-

PHARMACOLOGICAL ACTIVITIES Antibacterial cholagogue, insecticidal, antifungal, anti-inflammatory, antiprotozoal, CNS depressant, antifertility, antiarthritic, hypocholesterolemic, antihepatotoxic, antihistaminic.

TOXICOLOGY –

Toxicity of rhizome in rats, guinea pigs and monkeys were reported. Ether extract of rhizome was highly cytotoxic, toxicity higher than those from known curcuminoids. The LD50 value of aqueous suspension of volatile oil was found to be 3.25 ml/kg; while LD50 of volatile oil emulsified in twin 80 was found 0.533 ml/ kg. Cytotoxic effects of curcuminoids have been observed in cell culture. Turmeric or its alcoholic extract administered in 2.5 gm per. kg. and 300 mg. per kg. respectively on different species of animals proved non-toxic.

THERAPEUTIC EVALUATION A Clinical trial with Haridra was conducted in 144 patients of respective diseases. Significant improvement in signs and symptoms and relief in airway resistance was observed in 11 cases of bronchitis, 1 case of bronchiectasis, 5 cases of bronchial asthma and 6 cases of tropical eosinophilia.

Ref. – Database on medicinal plants used in Ayurved Vol. 1 – Page 152

सारांश :-

हळद हि श्रेष्ठ वर्ण्य आहे, हरिद्रेने/ हळदीने धातुशैथिल्य नाहीसे होते. सर्वसामान्य अशक्तपणा कमी करण्यास हरिद्रा उपयोगी पडते. हळद विषघ्न, जंतूघ्न कर्म करते.

संदर्भ:-

वाग्भट. उ. ४० – ४८

द्रव्यगुनविज्ञान

धन्वंतरी निघंटु

Copyright Material Don't Copy © 2020-2022

Recent Posts

जागतिक आरोग्य दिन २०२४ – माझे आरोग्य, माझे हक्क

जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास जागतिक आरोग्य दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो.… Read More

01/04/2024

राष्ट्रीय जंतनाशक दिन २०२४ प्रश्न उत्तरे Deworming day FAQ in Marathi

सन २०२३ - २०२४ राष्ट्रीय जंतनाशक दिन १३ फेब्रुवारी २०२४ व २० फेब्रुवारी २०२४ (मॉप… Read More

11/01/2024

गरोदरपणातील मधुमेह GDM in Marathi

गरोदरपणातील मधुमेह (GDM) म्हणजे काय? Gestational diabetes in Marathi :- गर्भधारणेदरम्यान जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण… Read More

07/01/2024

पोटातील जंत सर्व माहिती Roundworm Tapeworm Worm Meaning in Marathi

जंत ( Worm in Marathi ) होणे ही आपल्या देशातली महत्त्वाची समस्या आहे. ग्रामीण भागात… Read More

05/01/2024

उष्माघात कारणे लक्षणे प्रतिबंध उपचार Heat Stroke Meaning in Marathi

उष्माघात कारणे, उष्माघात लक्षणे, उष्माघात प्रतिबंध, उष्माघात उपचार, उष्माघात घरगुती उपाय, मराठी माहिती, Heat Stroke… Read More

19/03/2023