पुरुषांचे आरोग्य

लग्न आणि ब्लडग्रुप, Same Blood Group Marriage Problems in Marathi

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

लग्न आणि ब्लडग्रुप यांचा काही सबंध असतो का? जवळच्या नात्यात लग्न करावे का? एक नाड आणि ब्लडग्रुपचा संबंध, जवळच्या नात्यातील लग्नाचे प्रकार, त्यातून कोणकोणत्या समस्या निर्माण होतात. पॉझिटिव्हआणि निगेटीव्ह ब्लडग्रुप मधे नकी काय फरक असतो, Blood Group Marriage Problems in Marathi ईत्यादि सर्व माहिती खालील लेखात दिलेली आहे.

अनुक्रमणिका

लग्न ठरताना ब्लडग्रुप बघायचा असतो का? आणि त्याचा कितपत importance असतो?

अनेकदा हा प्रश्न विचारला जातो की, लग्न ठरताना ब्लडग्रुप बघायचा असतो का? आणि त्याचा कितपत Importance असतो. Blood Group and Marriage in Marathi

होणाऱ्या नवरा बायकोचा ब्लडग्रुप एक असला काय किंवा वेगळा वेगळा असला काय, सगळं सारखंच. पण सध्या त्याचा विनाकारण बाऊ होताना दिसतो आहे. त्यातून जर मुलीचा ब्लडग्रुप निगेटिव्ह असेल तर मग विचारूच नका.

ब्लडग्रुपचा आणि लग्नानंतर मुलं होण्याचा किंवा न होण्याचा काही संबंध असतो का?

नाही.

ब्लडग्रुपचा आणि पुढे लग्नानंतर मुलं होण्याचा किंवा न होण्याचा काही एक संबंध नाही.

एक नाड आणि ब्लडग्रुपचा संबंध:-

Ek Naad and Blood Group Relation –

काही ज्योतिषीही ‘एक नाड आहे, तेव्हा आता ब्लडग्रुप बघा’, असा सल्ला देतात. या नाड या प्रकरणाचा आणि ब्लडग्रुपचा काहीही संबंध नाही. या सल्ल्यामुळे तो ज्योतिषी आपल्याला जरासा मॉडर्न आणि वैज्ञानिक वाटू शकतो.

पॉझिटिव्हआणि निगेटीव्ह ब्लडग्रुप मधील फरक :-

Difference between Positive and Negative Blood Group in Marathi –

पॉझिटिव्ह ब्लडग्रुप –

Positive Blood group Information in Marathi –

ज्या व्यक्तीच्या तांबड्या रक्त पेशींंवर आर. एच. प्रतिजन आढळून येते ती व्यक्ती आर. एच. धन (पॉझिटिव्ह ब्लडग्रुप) रक्तगटाची समजली जाते.

निगेटीव्ह ब्लडग्रुप ‌-

Negative Blood group Information in Marathi –

ज्या व्यक्तीच्या तांबड्या रक्त पेशींंवर आर. एच. प्रतिजन आढळून येत नाही ती व्यक्ती आर. एच. ऋण (निगेटीव्ह ब्लडग्रुप) रक्तगटाची समजली जाते.

निगेटीव्ह ब्लड ग्रुप म्हणजे काहीतरी वाईट असतं अस काही लोकांना वाटत. पण खरं सांगायचं तर हा निगेटीव्हपणा वाईट किंवा धोकादायक अजिबात नाही. मुळात “निगेटीव्ह” हा शब्द नकारात्मक नाहीये. काहीतरी वाईट ब्लडग्रुप आहे असा अर्थ अभिप्रेत नाही.

निगेटीव्ह ब्लडग्रुप (Rh-ve) असण्याचे तोटे:-

Negative Blood group Problems in Marathi –

१) यातली मुख्य बाब म्हणजे या Rh-ve व्यक्तींना कधी काळी रक्त भरायची गरज पडली तर निगेटीव्ह ब्लडग्रुप थोडासा दुर्मिळ असल्यामुळे रक्त सहजासहजी उपलब्ध होत नाही.

हा तोटा अर्थात स्त्री पुरुष अशा दोघांना समान लागू होतो.

२) जर आईचा निगेटीव्ह ब्लडग्रुप असेल व गर्भाचा ब्लडग्रुप पॉझिटिव्ह असेल तर आईच्या शरीरात त्या गर्भाच्या पेशींविरुद्ध रासायनिक अस्त्र (अ‍ॅन्टिबॉडिज) तयार होतात.

३) ही रासायनिक अस्त्र (अ‍ॅन्टिबॉडिज) त्या गर्भाच्या रेड सेल्स विरुद्ध लढा पुकारतात. त्यात गर्भाच्या रेड सेल्स मरतात, जन्मानंतर गर्भाला अ‍ॅनिमिया व कावीळ होते.

पण त्यावर हि अगदी सहज उपाय, उपचार आणि लसी आहेत. त्याला घाबरण्यासारखं आता काहीच उरलं नाही.

same blood group marriage o+ in marathi –

४) वरील तोटा क्र. २ ही टाळायचा असल्यास, फारतर मुलगा (वर) Rh+ve व मुलगी(वधु) निगेटीव्ह ब्लड ग्रुप Rh-ve ची नसावी उदा. मुलगा(वर) औ(O) Rh+ve व मुलगी(वधु) औ(O) Rh-ve

same blood group marriage a+ in marathi –

५) थोडक्यात काय, तर सध्या काही अतिशहाण्यांकडून लग्नाच्या वेळी ब्लडग्रुप पहा, वगैरे गोष्टीचा उगीचच बाऊ केला जातो, पण त्याला तितकंसं महत्व देण्याचं कारण नाही. ब्लडग्रुप तपासणी केलेली चांगलीच कारण स्वताचा ब्लडग्रुप माहित असणे महत्वाचे आहे. त्या बरोबर दोघांचीही एच. आय. व्ही. तपासणी करा.

Same Blood Group Marriage in Marathi –

पॉझिटिव्हआणि निगेटीव्ह ब्लडग्रुप फरक, लग्न आणि ब्लडग्रुप, एक नाड आणि ब्लडग्रुपचा संबंध, जवळच्या नात्यात लग्न, Same Blood Group Marriage Problems in Marathi

जवळच्या नात्यात लग्न का टाळावे?

Consanguineous Marriage in Marathi –

भारतात अनेक वर्षांपासून जवळच्या नात्यामध्ये लग्न करण्याची परंपरा आहे. धर्म आणि कायद्याचीही अशा लग्नाला मान्यता आहे.

त्यात मामाची मुलगी किंवा आत्याचा मुलगा यांच्यासोबत लग्नाचे प्रमाण खूप जास्त आहे. महाराष्ट्रात जवळपास २५ ते ३० टक्के लग्न हि जवळच्या नात्यामध्ये होतात. त्यात काही धर्मामधे व जातीमधे याचे प्रमाण खूप जास्त आहे.

मात्र, जवळच्या नात्यात लग्न केलेल्या जोडप्यांना होणा-या अपत्यात आनुवंशिक आजाराचे प्रमाण जास्त असते. इतर आरोग्यविषयक समस्या जास्त असू शकतात.

बर्यापैकी आनुवंशिक आजार गरोदर पणात केल्या जाणार्या सोनोग्राफी (गरोदर पणात सोनोग्राफी का करावी?) मध्ये समजतात. डॉक्टरांच्या सल्ल्याने सोनोग्राफी करावी.

नात्यामधील लग्नांना वैद्यकीय भाषेत ‘कॉनसॅनग्यूनस मॅरेज’ असे म्हणतात.

प्रेगन्सीत सोनोग्राफी का ? कधी ? कशासाठी करतात ? Sonography in Marathi

जवळच्या नात्यातील लग्नाचे प्रकार:-

Consanguineous Marriage Types in Marathi –

१) फर्स्ट डिग्री :- First degree Consanguineous Marriage in Marathi –

म्हणजे काका, मामा, पुतणी, मावसबहीण यांच्यातील विवाह.

२) सेकंड डिग्री:- Second degree Consanguineous Marriage in Marathi –

म्हणजे मावस किवा चुलत भाऊ बहिणीमधील विवाह.

३) थर्ड डिग्री:- Third degree Consanguineous Marriage in Marathi –

म्हणजे मामाची मुलगी व आत्याच्या मुलामधील विवाह.

याशिवाय थेट रक्ताचे नाते असलेल्यांमध्ये विवाह झाल्यास तोही कॉनसॅनग्यूनस मॅरेजमध्ये येतो.

जवळच्या नात्यात लग्न केल्यास कोणत्या समस्या उद्भवू शकतात?

Same Blood Group Marriage Problems in Marathi –

१) प्रजननशक्तीवर परिणाम होऊ शकतो.

२) गर्भपाताचे प्रमाण वाढते.

३) स्टील बर्थ म्हणजेच गर्भातील बाळाचे मृत्यूचे प्रमाण वाढू शकते.

नात्यामधील लग्न झाल्यास बाळांमध्ये काय समस्या येऊ शकते?

Same Blood Group Marriage Problems in Marathi –

१) जवळच्या नात्यात लग्न झालेल्या पालकांच्या मुलांमध्ये आनुवंशिक आजाराचे प्रमाण २५ टक्क्यांपर्यंत वाढलेले असू शकते.

२) त्यातच अ‍ॅटोझोनल रेसेसिव्ह आजारांचे प्रमाण जास्त असते.

३) नात्यातील लग्नातून झालेल्या मुलांचा बुद्ध्यांक इतर मुलांपेक्षा कमी असल्याचे संशोधनात आढळून आले आहे.

अश्वगंधा गुण, फायदे व औषधी उपयोग, Ashwagandha in Marathi

नात्यातील लग्नातून झालेल्या बाळांमध्ये आनुवंशिक आजारांचे प्रमाण जास्त का आढळून येते?

याचा वैज्ञानिक आधार समजून घेणे गरजेचे आहे. जवळच्या नात्यातील वर-वधूमध्ये जवळपास २५ ते ५० टक्के जेनेटिक मटेरियल म्हणजे जनुकीय रचना (साहित्य) सारखे असते.
Consanguineous Marriage Problems in Marathi –

कोणतेही आजार पुढच्या पिढीमध्ये प्रकट होण्यासाठी त्या आजाराचे दोन सदोष जनुक एकत्र येणे गरजेचे आहे. हे सदोष जनुक एकत्र येऊन अपत्यामध्ये आजार किंवा व्यंग प्रकट होतात.

जवळच्या नात्यातील लग्नातून झालेल्या बाळांमध्ये दोन सदोष जनुक एकत्र येण्याची शक्यता जास्त असते. पण दोन वेगळ्या जनुकीय संबंध नसलेल्या कुटुंबातील व्यक्तीमध्ये असे होण्याची शक्यता नगण्य असते.

blood group compatibility for marriage –

सारांश:-

  • लग्न आणि ब्लडग्रुप यांचा काही सबंध नसतो.
  • ब्लडग्रुपचा आणि पुढे लग्नानंतर मुलं होण्याचा किंवा न होण्याचा काही एक संबंध नसतो.
  • जवळच्या नात्यात लग्न टाळाच.


Copyright Material Don't Copy © 2020-2021

View Comments

Recent Posts

SRDP उपचार: संपूर्ण माहिती, फायदे आणि प्रक्रिया

प्रस्तावना SRDP (Scientific Reversal Detoxification Process) उपचार ही एक आधुनिक आयुर्वेदिक पद्धती आहे जी पारंपरिक… Read More

05/03/2025

सोरायसिस कारणे, लक्षणे, घरगुती उपाय आणि आधुनिक उपचार

प्रस्तावना सोरायसिस हे एक दीर्घकालीन त्वचेचे आजार आहे जे त्वचेच्या पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवते. ही… Read More

27/02/2025

PCOD उपचार: कारणे, लक्षणे, उपाय आणि जीवनशैलीतील बदल

प्रस्तावना पॉलीसिस्टिक ओव्हरी डिसऑर्डर (PCOD) किंवा पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) ही एक सामान्य हॉर्मोनल समस्या… Read More

25/02/2025

केस गळती थांबवण्याचे उपाय, कारणे, लक्षणे, प्रतिबंध आणि नवीन उपचार

प्रस्तावना केस गळती ही एक सामान्य समस्या बनली आहे जी पुरुष आणि महिलांना सारख्या प्रभावित… Read More

22/02/2025

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग: कारणे, लक्षणे, उपाय, प्रतिबंध, लस आणि नवीन उपचार

प्रस्तावना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) हा महिलांमध्ये आढळणारा एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे,… Read More

21/02/2025

आम्लपित्त – ऍसिडिटी उपचार, कारणे, लक्षणे, घरगुती उपाय आणि प्रतिबंध

ऍसिडिटी, ज्याला मराठीत "अम्लपित्त" किंवा "छातीत जळजळ" असेही संबोधले जाते, ही आजकालच्या जीवनशैलीमुळे सामान्य झालेली… Read More

20/02/2025