घरगुती उपाय

आवळ्याचे गुण व औषधी उपयोग

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

आवळ्याचे झाड २० ते २५ फूट उंच असते. या झाडाचे फळ म्हणजेच आवळा.

आवळ्याची इतर भाषेतील नावे :-

आवळा शास्त्रीय नाव – Phyllanthus Emblica

संस्कृत नाव – आमलकी  

English name – Indian Gooseberry 

हिंदी नाम – आमला

आवळ्याचे गुण :-

आवळा सर्व रसायनात श्रेष्ठ आहे. त्रिदोषशामक आहे.

आवळ्याचे सर्व गुण हिरड्यासारखेच आहेत. पण आवळा शीत आहे तर हिरडा उष्ण आहे. 
आवळ्यात खारट सोडून बाकी सर्व रस म्हणजे गोड, आंबट, तिखट, कडू व तुरट रस असतात.

लहान मुलापासून वृद्ध माणसांपर्यंत सर्व धातूंना बलदायक आहे. आंबट पदार्थ सामान्यतः पित्तवर्धक असले तरी आवळा व डाळिंब आंबट असूनही पित्तशामक आहेत. आवळा हिरड्यापेक्षा रक्तपित्त ( रक्तस्त्रावाची प्रवृत्ती ), प्रमेह, जननेद्रियाना बलदायक व रसायन गुणांत श्रेष्ठ आहे.

आवळ्याचे डोस औषधी मात्रा :-

आवळ्यांचे चूर्ण ३ ते ६ ग्रॅम

आवळ्याचा स्वरस – १० ते २० मिलि

avala marathi, आवळा गुण, आवळ्याचे गुण व औषधी उपयोग, www.marathidoctor.com, dr.vivekanand ghodake

आवळ्याचे औषधी उपयोग :-

१ ) तहान / तोंडास कोरड पडणे ‌:-

( १ ) आवळा , कमळ , कुष्ठ , वडाचे अंकूर आणि लाया ह्याचे चूर्ण मधाबरोबर वाटून त्याची गोळी करून तोंडात धरावी. 

( २ ) आवळ्याच्या रसाबरोबर चंदन व मध द्यावा.

२ ) उलटी :-

मनुका, साखर व आवळा प्रत्येकी ४० ग्रॅम घेऊन त्याची चटणी करावी. त्यात ४० ग्रॅम मध व अडीच लिटर पाणी घालून ढवळावे व गाळून घ्यावे. हे पाणी थोडे थोडे प्यावयास द्यावे. यामुळे उलटी थांबते.

३ ) उचकी :-

आवळ्याचा रस, मध व पिंपळी घालून द्यावा.

४ ) मूत्रावरोध – लघवी तुंबणे:-

आवळा वाटून चटणीसारखी पेस्ट बनवावी, या आवळ्याच्या चटणीचा ओटीपोटावर लेप करावा. याने मूत्रावरोध दूर होतो.

५ ) लघवी करताना त्रास होणे ( मूत्रकृच्छ ) :-

१ ) आवळ्याचा रस मधाबरोबर घ्यावा. 

२ ) आवळ्याचा रस गुळाबरोबर किंवा उसाच्या रसाबरोबर घ्यावा. 

३ ) आवळ्याच्या रसातून वेलदोड्यांचे चूर्ण द्यावे. 

४ ) आवळा, द्राक्षे , विदारीकंद , जेष्ठमध व गोखरू यांचा काढा साखर घालून प्यावा . 

६ ) लघवीतून रक्त येणे :‌-

 आवळ्याचा रस मधाबरोबर द्यावा.

७ ) योनिदाह :-

आवळ्याचा रसात साखर घालून प्यावे.

८ ) केस काळेभोर करण्यासाठी :-

३ आवळे, ३ हिरहे, १ बेहडा, ५ आंब्यांचा गर (आंब्याच्या कोयीचा आतिल भाग) व २० ग्रॅम लोहभस्म वाटून मिश्रण करून रात्रभर लोखंडाच्या कढईत ठेवावे. त्याचा लेप लावल्याने केस काळेभोर होतात. 

९ ) स्थूलता :-

विडंग, सुंठ, जवखार, मण्डूर भस्म, जव व आवळाचूर्ण मधाबरोबर चाटावे. याउपायाने वजन कमी होते.

१० ‌‌‌) प्रमेह (मधुमेह) :-

हळद, आवळ्याचा रस व मध हे मिश्रण सर्व प्रकारच्या प्रमेहांत उपयोगी आहे. 

११ ) ताप :-

१ ) चतुर्थक ज्वर – चौथ्या दिवशी येणारा ताप – आवळा, नागरमोथा व गुळवेल ह्यांचा काढा द्यावा. 

२ ) सर्व तापांवर – आवळा , हिरडा , पिंपळी . चित्रक व सैंधव यांचे चूर्ण सर्व तापावर उपयोगी आहे. 

३ ) तापात घसा सुकणे व अरूचि – आवळा, द्राक्षे व साखर यांची चटणी करून तोंडात धरावी. 

१२ ) हृद्रोग :-

डाळिंबाचे दाणे १ भाग, आवळा १ भाग, व मूग ६ भाग एकत्र करून त्याचे कढण प्यावयास द्यावे. 

१३ ) पांडुरोग / अ‍ॅनेमिया :-

धात्र्यावलेह – आवळा , लोहभस्म, सुंठ ( सुंठ गुण व औषधी उपयोग ) , मिरी, पिंपळी, हळद, मध व साखर यांचा अवलेह बनवावा. हा पांडुरोग व कावीळीवर उपयोगी आहे. 
या उपायाने रक्त वाढते.

१४ ) कावीळ :-

१ ) आवळ्याचा रस मनुकांबरोबर घ्यावा.

२ ) गुळवेल, आवळा व मनुका यांनी सिद्ध केलेले तूप द्यावे. 

१५ ) दाह:-

आवळा, द्राक्षे, नारळ व साखर यांचे सरबत प्यावे. संर्वांगदाह मध्ये याचा चांगला उपयोग होतो.

१६ ) तारूण्यपीटिका /पिम्पल :-

आवळकाठी, लोध्र किंवा वड, पिंपळ यांच्या सालींच्या काढ्याने चेहरा वारंवार धुवावा. 

१७ ) मूर्छा :-

उकडलेले आवळे, मनुका व सुंठ एकत्र वाटून मधाबरोबर चाटण करावे. या उपायाने त्वरीत शुध्द येते.

१८ ) मद्य जास्त प्यायल्यामुळे होणारे उपद्रव :-

१ ) आवळा, फाळसा व खजूरह्याचे हिम करून त्यामध्ये खडीसाखर घालून प्यावे. 

२ ) आवळा किंवा हिरड्याचा काढ्याने सिद्ध तूप प्यावे. 
या उपायांनी मद्ययाचा असर लवकर कमी होतो.

१९ ) अंधत्व :-

त्रिफळा, शतावरी, कडू पडवळ, मूग, आवळा व जव ह्यांचे कढण जुन्या तुपाबरोबर घ्यावे. 

२० ) डोळ्यांची आग होणे, डोळे दुखणे :-

शतावरी , नागरमोथा, आवळा, कमळ बकरीच्या दूधात घालून तूप सिद्ध करावे. व १ – १ चमचा २ वेळा घ्यावे. 

२१ ) झोप येत नसल्यास :-

आवळकाठी सुंठ व खडीसाखर यांनी सिद्ध केलेली कण्हेरी द्यावी. 

स्वयंपाक घरातील औषधे

रसायन भाग १  :-

१ ) आवळकाठीचे चूर्ण व तिळाचे चूर्ण समभाग घेऊन तूप व मधाबरोबर द्यावे. 

२ ) आवळकाठीचे चूर्ण + अश्वगंधा चूर्ण तूप व मधाबरोबर द्यावे.

३ ) आवळाचूर्ण २० ग्रॅम + गोखरू २० ग्रॅम + गुळवेल सत्व १० ग्रॅम तूप साखरेबरोबर घ्यावे. 

रसायन भाग २ :-

१ ) आवळ्याचा रस , मध , खडीसाखर व तूप ही द्रव्ये एकत्र करून खावी म्हणजे म्हातारपण लवकर येत नाही. 

२ ) आवळा चूर्ण, असनाचा नार, तेल, तूप, मध व लोहभस्म एकत्र करून नित्य सेवन केल्यास चिरकाल तारूण्य टिकते.

३ ) आवळा काळ्या तिळाबरोबर वाटून खाल्ल्यास चिरकाल तरूण राहाता येते.

४ ) १ हिरडा, २ बेहडे व ४ आवळे मध व तुपाबरोबर खावे, म्हणजे म्हातारपण लवकर येत नाही. 

५ ) जेष्टमघ, वंशलोचन, पिंपळी, मध, तूप व खडीसाखर ह्यांच्याबरोबर त्रिफळा घ्यावे. हे रसायन आहे. 

६ ) लोहभस्म, सुवर्णभस्म, वेखंड, मध, तूप, वावडिंग, पिंपळी, त्रिफळा व सैंधव एकत्र करून १ वर्ष सेवन केले असता बलदायक, बद्धी, स्मृती व आयुष्य वाढविणारे होते. 

७ ) आवळ्याच्या चूर्णाला आवळ्याच्या रसाची भावना घ्यावी व ते चूर्ण तूप, मध व साखर यांजबरोबर चाटावे. 

8 ) आवळ्याचे चूर्ण व सुवर्णाचा वर्ख एकत्र खलून मधाबरोबर घाटबावा रोग्याची गंभीर परिस्थिती असून अरिष्ट चिन्हे असली तरी जगतो. 

संदर्भ :-

चरक चिकित्सा १९/७

चरक चिकित्सा १/९

सु.सं. १५/५८

शारंधर संं.

निघंटु रत्नाकर भाग २




View Comments

Recent Posts

चिकनगुनिया उपचार, लक्षणे, घरगुती उपाय आणि सल्ला

चिकनगुनिया हा एक विषाणूजन्य आजार आहे जो डासांच्या चावण्यामुळे पसरतो. हा आजार प्रामुख्याने एडिस इजिप्ती… Read More

08/01/2025

डेंग्यूच्या उपचाराबद्दल संपूर्ण माहिती Dengue in Marathi

डेंग्यू हा डासांमुळे पसरणारा एक गंभीर आजार आहे जो डेंग्यू विषाणूमुळे होतो. हा आजार प्रामुख्याने… Read More

01/01/2025

जागतिक आरोग्य दिन २०२४ – माझे आरोग्य, माझे हक्क

जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास जागतिक आरोग्य दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो.… Read More

01/04/2024

राष्ट्रीय जंतनाशक दिन २०२४ प्रश्न उत्तरे Deworming day FAQ in Marathi

सन २०२३ - २०२४ राष्ट्रीय जंतनाशक दिन १३ फेब्रुवारी २०२४ व २० फेब्रुवारी २०२४ (मॉप… Read More

11/01/2024

गरोदरपणातील मधुमेह GDM in Marathi

गरोदरपणातील मधुमेह (GDM) म्हणजे काय? Gestational diabetes in Marathi :- गर्भधारणेदरम्यान जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण… Read More

07/01/2024