प्लेग कारणे, लक्षणे, प्रसार, इतिहास, प्रकार, प्रतिबंध, उपचार Plague Disease in Marathi

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

प्लेग (Plague Disease in Marathi) मनुष्याला होणारा हा एक प्राणघातक संक्रामक रोग, एंटेरोबॅक्टेरिएसी कुलातील येर्सिनिया पेस्टिस या जीवाणूंमुळे होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार २००७ सालापर्यंत प्लेग हा एक साथीचा आजार मानला जात होता. Plague Disease Meaning in Marathi.

काही दिवसांंपूर्वी चीन मधे ब्युबॉनिक प्लेग (लसीका ग्रंथीचा प्लेग) Bubonic Plague in Marathi चे काही रुग्ण सापडलेले आहेत. या कारणामुळे प्लेग Plague in Marathi पुन्हा चर्चेत आला.

प्लेग चा प्रसार कसा होतो?

Plague Disease Information in Marathi, Plague in Marathi:-

येर्सिनिया पेस्टिस जीवाणूंचा प्रसार निरोगी व्यक्तीच्या शरीरात पुढील मार्गानी होऊ शकतो : प्लेगबाधित रुग्णाच्या शिंंकण्यातील कण निरोगी व्यक्तीच्या शरीरावर पडल्याने व त्याने वापरलेल्या वस्तू हाताळल्याने, ये. पेस्टिस जीवाणुबाधित दूषित अन्न किंवा पाणी यांचे सेवन केल्याने किंवा येर्सिनिया पेस्टिस जीवाणूंचा प्रसार कीटक तसेच अन्य प्राण्यांमार्फत झाल्याने.

१) निसर्गात जेथे विशेषेकरून कृंंतक गणातील प्राणी मोठ्या संख्येने राहतात अशा अधिवासात यर्सिनिया पेस्टिसजातीचे जीवाणू आढळून येतात.

२) हे जीवाणू प्लेग रोगाचे कारक असतात. प्लेग हा रोग प्रथम झेनोप्सायला केओपिस या जातीच्या पिसवांना होतो. या पिसवा उंदराच्या शरीरावर वाढत असल्याने उंदीर हा प्लेगचा पहिला बळी ठरतो.

३) महत्त्वाचे म्हणजे प्लेगचा वाहक उंदीर नसतो. मात्र प्लेगबाधित उंदरावर वाढलेली प्लेगवाहक पिसू जेव्हा मनुष्याला दंश करते तेव्हा मनुष्यामध्ये प्लेग रोगाचे संक्रामण होते.

४) प्लेगचे जीवाणू पिसूमध्ये गुणित होत जातात, ते प्लेगचे जीवाणू एकमेकांना चिकटतात आणि त्यांची गुठळी तयार होते. जीवाणूंच्या या अशा प्रकारे तयार झालेल्या गुठळीमुळे पिसूचा जठरमार्ग बंद होतो आणि तिची उपासमार होते.

५) मग ती पिसू आश्रयीला चावते आणि अन्न मिळवत राहते. मात्र तरीही तिची भूक शमत नाही. पिसू तिच्या शरीरातील दूषित रक्त मनुष्याच्या ( आश्रयीच्या ) शरीरावर जेथे दंश केलेला असतो तेथील जखमेवर ओकते. अशा प्रकारे प्लेगच्या जीवाणूंचा प्रवेश निरोगी व्यक्तीच्या शरीरात होतो आणि त्या व्यक्तीला प्लेग हा रोग होतो. त्यानंतर पिसू मरून जाते.

प्लेग चा इतिहास:-

Plague Disease History in Marathi:-

१८९४ मध्ये फ्रेंच – स्विस जीवाणुतज्ज्ञ अ‍ॅलेक्झांडर यर्सिन आणि जपानी वैज्ञानिक किटाझाटो यिबासाबुरो यांनी हा जीव स्वतंत्ररीत्या प्रथम शोधला. पाश्चर इन्स्टिट्यूटचा गौरव करण्यासाठी या जीवाणूला पाश्चुरेला पेस्टिस असे नाव दिले; परंतु येर्सिन यांनी या जीवाणूंवर संशोधन पुढे चालू ठेवल्यामुळे नंतर त्या जीवाणूंना यर्सिनिया पेस्टिसहे नाव दिले गेले.

प्लेग कारणे, प्लेग लक्षणे, प्लेग प्रसार, प्लेग चा इतिहास, प्लेग प्रकार, प्लेग प्रतिबंध, प्लेग उपचार Plague Disease in Marathi, Pneumonic Plague in Marathi, Septicemic Plague in Marathi, Bubonic Plague in Marathi, Plague Disease, Information in Marathi, Plague in Marathi, Plague Disease History in Marathi, Symptoms of Plague Disease in Marathi, Treatment of Plague Disease in Marathi

प्लेग च्या साथीचा इतिहास:-

Plague Disease History in Marathi:-

प्लेग या रोगाच्या साथी प्राचीन काळापासून येत असल्याचा उल्लेख वैद्यकशास्त्राच्या इतिहासात आढळतो. प्लेगची पहिली ज्ञात जगव्यापी साथ इ. स. ५४१-५४२मध्ये पसरली होती. ही साथ चीनमध्ये पसरली होती आणि तिचा प्रसार आफ्रिकेपर्यंत झाला होता. साथ जेव्हा शिगेला पोहोचली, तेव्हा दररोज सुमारे १०,००० लोक मृत्युमुखी पडल्याची माहिती इतिहासात मिळते.

या रोगाची दुसरी मोठी ज्ञात साथ १३४७-१३५१ या कालावधीत आली. आशिया, यूरोप आणि आफ्रिका या तीनही खंडांत ही प्लेगची साथ पसरली होती. त्या वेळी जगाची लोकसंख्या ४५ कोटींवरून ३७ कोटींपर्यंत कमी झाल्याचे मानतात.

प्लेगची तिसरी ज्ञात साथ १८५५ मध्ये चीनच्या युनान प्रांतात पसरली. या साथीत चीनमध्ये आणि भारतात मिळून सुमारे १ कोटी २० लाख लोक मृत्युमुखी पडले होते.

१८९६ मध्ये भारतातील मुंबई इलाक्यात प्लेगची मोठी साथ पसरली होती. या साथीत सुमारे ४०,००० लोक मरण पावले. १९९४ मध्ये सुरत शहरात प्लेगची साथ उद्भवली होती. प्रशासनाने वेळीच योग्य धोरणे राबविल्यामुळे या साथीत केवळ ५४ लोक दगावले. मात्र, सुमारे ३ लाख लोक तेव्हा स्थलांतरित झाले होते.

१९९४ आणि २०१० मध्ये पेरू या देशात आणि अमेरिकेतील संयुक्त संस्थानामधील ऑरेगन राज्यामध्ये प्लेगचे रुग्ण आढळले होते.

प्लेग साथीचा भारतातील इतिहास:-

प्लेग हा प्राचीन काळापासून अस्तित्वात असणारा रोग असून प्लेग हा येर्सिनिया पेस्टिस ” नावाच्या जीवाणूमुळे होतो. या रोगाचा प्रसार कुरतडणा-या प्राण्यांना जंतूबाधित पिसवांमुळे होतो.

भारतामध्ये यापूर्वी शेवटचा प्लेग चा उद्रेक महाराष्ट्र व गुजरात राज्यांत सन १९९४ साली झालेला होता. महाराष्ट्र राज्यामध्ये प्लेग सर्वेक्षण पथकाची स्थापना सन १९५३ साली झालेली असून या पथकामार्फत प्लेगग्रस्त भागा मध्ये नियमितपणे या रोगाचे सर्वेक्षण करण्यात येते. १९८७ सालापर्यंंत एकही प्लेग रुग्ण आढळून आला नसल्या कारणाने हे पथक दिनांक ०१ डिसेंबर १९८७ पासून बंद करण्यारत आलेले होते.

तथापि ऑगस्ट व सप्टेंबर १९९४ साली प्लेग सदृश्यग रोगाचा उद्रेक बीड जिल्ह्यातील मामला या गावामध्ये झाल्याने या पथकाची पुनःस्थापना ३ ऑक्टोबर १९९४ साली सहसंचालक, आरोग्य सेवा ( हिवताप व हत्तीरोग ) पुणे यांच्या सध्याही करण्यात आली असून हे पथक सदयस्थिती मध्ये कार्यरत आहे.

प्लेग रोगाचे प्रकार:-

Types of Plague Disease in Marathi:-

प्लेग या रोगाचे लक्षणानुसार सामान्यपणे खालील तीन प्रकार दिसून येतात.

ब्युबॉनिक प्लेग (लसीका ग्रंथीचा प्लेग) Bubonic Plague in Marathi:-

जेव्हा प्लेगबाधित पिसू शरीराला दंश करते, तेव्हा दंशाच्या जागी ती दूषित रक्त सोडते. त्यामुळे प्लेगचे जीवाणू शरीरात शिरतात. शरीरातील भक्षकपेशींनी जरी या जीवाणूंचे भक्षण केले, तरी ते प्लेगचे जीवाणू जिवंत राहतात आणि त्यांचे प्रजनन होत राहते.

शरीरात शिरल्यावर प्लेगचे जीवाणू लसीका संस्थेत प्रवेश करतात आणि अंतराली द्रवाचा व्हास घडवून आणतात. तसेच हे जीवाणू शरीरात अनेक प्रकारांचे जीवविष (टॉक्सीन) निर्माण करतात.

लसीका वाहिनीवाटे हे जीवाणू लसीका ग्रंथीपर्यंत पोहोचतात व दाह निर्माण करतात आणि त्यामुळे लसीका ग्रंथींना सूज येते. रुग्णाला थंडी वाजून ताप येतो. जांघेत किंवा काखेत सूज येऊन खूप दुखते.

या अवस्थेत उपचार न केल्यास या रोगाचे संक्रामण रक्तप्रवाहात मिसळून सेप्टिसेमिक प्लेग होतो किंवा फुप्फुसाला संक्रामण झाल्यास न्यूमोनिक प्लेग होऊ शकतो.

सेप्टिसेमिक प्लेग (पूयुक्त प्लेग) Septicemic Plague in Marathi:-

ब्युबॉनिक प्लेग या रोगाचे वेळीच निदान न झाल्यास तसेच उपचार न केल्यास रक्तवाहिन्यातून हे प्लेगचे जीवाणू शरीरभर पसरतात आणि पूयुक्त प्लेग होऊ लागतो. लसीका ग्रंथीचे स्राव रक्तवाहिन्यांतून जात असल्यामुळे प्लेगचे जीवाणू शरीराच्या सर्व भागांत पोहोचतात.

या प्रकारच्या प्लेगमध्ये तयार झालेल्या जीवविषामुळे शरीरात गाठी तयार होतात. या गाठींमुळे यकृत, प्लीहा, मूत्रपिंड यांतील ऊतींचा हास होतो आणि रक्त गोठण्याच्या क्रियेवर परिणाम होऊन त्वचेत आणि इतर इंद्रियांमध्ये रक्तस्राव होऊन शरीरावर लाल – काळे चट्टे दिसू लागतात.

प्रतिजैविकांचे (अ‍ॅन्टिबॉयोटिक्सचे) उपचार केल्यास रुग्ण वाचू शकतो. हा प्लेग जीवघेणा असून ज्या रुग्णांमध्ये ही लक्षणे दिसू लागतात असे रुग्ण फार काळ जगत नाहीत.

न्यूमोनिक प्लेग (फुप्फुसाचा प्लेग) Pneumonic Plague in Marathi:-

फुप्फुसाला संक्रामण झाल्यास हा प्लेग उद्भवतो. रुग्णाच्या संपर्कातून, विशेषेकरून शिंंकांमधून बाहेर पडणाऱ्या तुषारांतून याचा प्रसार होतो. जीवाणूचा उबवणकाल २-४ दिवस असतो. मात्र , काही वेळा हा काल फक्त काही तासांचा असू शकतो.

डोकेदुखी, ताप येणे, अशक्तपणा, थुकीतून व ओकारीतून रक्त पडणे ही याची लक्षणे आहेत.

तातडीने उपचार न झाल्यास १-६ दिवसांत रुग्ण दगावू शकतो.

प्लेग रोगावर लस आणि प्रतिजैविके:‌‌-

Plague Disease Vaccination in Marathi, Antibiotics for Plague Disease in Marathi:-

१८९७ मध्ये मुंबईत वॉल्डेमार हाफकिन या रशियन वैद्याने ब्युबॉनिक प्लेग या रोगावरील लस प्रथम शोधून काढली. प्लेग या रोगावर प्रतिजैविकांचे उपचार अधिक प्रभावी ठरतात. स्ट्रेप्टोमायसिन, क्लोरॅमफिनिकॉल, टेट्रासायक्लिन, डॉक्सिसायक्लिन, जेंटामायसिन इत्यादी प्रतिजैविके या रोगावर वापरली जातात.

प्लेग प्रतिबंधक उपाय:-

Prevention of Plague Disease in Marathi:-

प्लेग या रोगाचे निर्मूलन करण्यासाठी काही उपाय आवश्यक आणि उपयुक्त असतात. उदा. उंदीर व घूस या प्राण्यांची बिळे होऊ न देणे किंवा त्यांना खाद्य न देणे, मृत प्राण्यांवर किंवा उंदरांवर कीटकनाशकांचा वापर करून पिसवा न होऊ देणे.

विशेषत : परिसर स्वच्छ ठेवल्यास प्लेग आणि इतर संक्रामक रोगांचे प्रमाण आपोआपच आटोक्यात येते. १९९४ साली भारतात उद्भवलेल्या प्लेगच्या साथीनंतर आजपर्यंत पुन्हा प्लेगची साथ आलेली नाही.

रोगाचा प्रकार – जीवाणूजन्य आजार

Plague Disease History in Marathi:-

hiv symptoms in marathi

प्लेग रोग पसरविणारे घटक:-

Spread of Plague Disease in Marathi:-

” येर्सिनिया पेस्टिस ” या जीवाणुमुळे हा रोग होतो. हे जीवाणू बाधित व्यक्तिच्या रक्त, प्लीहा, यकृत व इतर अंतर्गत अवयवामध्ये आढळून येतात. प्लेग जीवाणू हा त्यास अनुकूल वातावरणामध्ये कुरतडणा-या प्राण्यांच्या बिळातील मातीमध्ये वाढू शकतो.

जंतुसंसर्गाचे मूळ मानवामध्ये प्लेग रोगाचा प्रसार व उद्रेक मुख्यतः उंंदीर व त्यावरील पिसवा व्दारे होतो. उंदरामुळे प्रगतशील देशांतील विशेषतः ग्रामीण भागामध्ये या रोगाचा उद्रेक झालेले आढळतात.

सर्व वयोगटातील स्त्री पुरुषांना हा रोग होऊ शकतो,

व्यवसाय –

मानवाच्या दैनंदिन कार्यामध्ये उदाः- शिकार , पशुपालन शेतीची मशागत व बांधकाम अशा व्यवसाया दरम्यान या पिसवांच्या सानिध्यात आल्याने या रोगाचा प्रसार होतो.

पर्यावरणातील घटक हवामान –

उत्तर भारतामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने सप्टेंबर महिन्यात सुरु होऊन मे महिन्यापर्यंत आढळतो. वातावरणातील तापमानामध्ये वाढ झाल्याने उन्हाळयामध्ये या रोगाचा प्रसार थांबतो.

पर्जन्यामानः-

अति पर्जन्यपमानामुळे कुरतडणा-या प्राण्याची आश्रयस्थाने ( बिळे ) नष्ट होतात, त्यामुळे पठारी प्रदेशात या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत नाही.

प्रसाराचे माध्यम:-

मानवी कच्च्या मातीच्या घरामध्ये या रोगाच्या प्रसारक पिसवा व उंदराना पोषक वातावरण मिळाल्याने या रोगाचा प्रसार जास्त.

वय व लिंगः-

सर्व वयात आढळून येतो.

रोग प्रसार –

बाधित पिसवांच्या मार्फत या रोगाचा प्रसार प्राण्यांमध्ये व प्राण्यांपासून मानवास होतो. शरीरावर झालेल्या जखमांमधून या रोगजंतूचा प्रत्यक्ष संसर्ग होतो. या रोगाचा प्रसार बाधित व्यक्तिंच्या, प्राण्यांच्या खोकल्यातून, शिकण्यातून बाहेर पडणा-या थेंबावाटे देखील होतो.

प्लेग चा अधिशयन काळ:-

Incubation Period of Plague Disease in Marathi:-

या रोगाचा संसर्ग झाल्यास रण २ ते ६ दिवसांमध्ये लसीकाग्रंथिच्या प्रादुर्भावाने ( ब्युबॉनिक प्लेग ) आजारी पडतो. ब्युबॉनीक प्लेगवर उपचार न झाल्यास प्लेगचे जीवाणू रक्तामध्ये जातात व त्यांची वाढ होते.

रक्तामध्ये हे जंतू झपाटयाने वाढून संपूर्ण शरीरामध्ये पसरतात व रुग्ण अत्यवस्थ होतो. यामुळे धोका संभवतो. या जंतूचा प्रसार पुढे फुप्फुसामध्ये होऊज फुप्फुसाच्या प्लेगचा धोका संभवतो.

संसर्ग झालेल्या व्यक्तिस तीव्र ताप, थंडी, खोकला व श्वास घेण्यास त्रास होतो व अशा रुग्णात रक्तमिश्रित थुंकी पडते, संसर्गबाधित व्यक्तींना वेळीच उपचार झाल्यास अशा रुग्णांचा मृत्यू संभवतो.

प्राथमिक श्वसनाच्या प्लेगचा अधिशयन कालावधी १ ते ३ दिवस असून यामध्ये तीव्र श्वसनदाह, तीव्र ताप, खोकला. रक्तमिश्रित थुंंकी व थंडी अशी लक्षणे आढळतात.

फुप्फुसाच्या प्लेग रुग्णांमध्ये मृत्यू दर जवळपास ५० टक्के आहे.

प्लेग रोगांची सर्वसाधारण चिन्हें व लक्षणे:-

Symptoms of Plague Disease in Marathi:-

 • ( लसीकाग्रंथीचा ) ब्युबॉनिक प्लेग लसीका ग्रंथीस सूज येणे, ताप, थंडी व यकवा येणे.
 • ( रक्ताचा ) रक्तसंसर्ग स्वरुपाचा प्लेग – ताप, थंडी, यकवा येणे, पोटदुखी, त्वचेमध्ये व इतर अवयवांमध्ये रक्तस्त्राव व झटके येणे.
 • फुप्फुसाचा ( न्युमानिक ) प्लेग – ताप , थंडी , खोकला व श्वासोच्छवासास आस होणे , तीव्र झटका व उपचार न झाल्यास मृत्यू.

प्लेग रोगावर औषधोपचार:-

Treatment of Plague Disease in Marathi:-

प्लेग रोग संशयित किंवा प्लेग बाधित व्यक्ती अथवा प्राण्यांच्या संपर्कामध्ये आल्यास अथवा पिसवांचा चावा झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रतिजैविकांचा ( antibiotics ) उपचार घेणे इष्ट ठरते.

प्लेग प्रतिबंधात्मक उपाययोजना:-

How to Prevent Plague Disease in Marathi?

 • नियमित प्लेग सर्वेक्षणामध्ये उंदीर व त्यावरील पिसवा पकडणे.
 • पिसवांची घनता काढणे.
 • उंंदीर व पिसवा यांचे विच्छेदन प्रयोगशालेय अन्वेषण
 • ग्रामीण भागात कुत्र्यांचे रक्तजलनमूने गोळा करणे.
 • ज्या ठिकाणी पिसवांची घनता वाढलेली आढळून येते अशा ठिकाणी मॅलेथीऑन ५ टक्के या किटकनाशकाची धूरफवारणी उंंदराच्या बिळामध्ये करण्यात यावे.
 • आरोग्य शिक्षण – घरात / घराच्या आजूबाजूस उंदीर अयवा इतर प्राण्यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दक्षता घेणे.
 • आपल्या परिसरात मृत उंदीर आढळल्यास आरोग्य विभागास माहिती देणे.
 • पाळीव कुत्र्यांची स्वच्छता व निगा राखा.

देवी रोगाची माहिती

Copyright Material Don't Copy © 2020