औषधी वनस्पती

हरड, हिरडा, हरीतकी गुण व औषधी उपयोग, Harad, Hirada, Haritaki, Ink Nut in Marathi

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

हिरड्याचे वृक्ष ५० ते ६० फूट उंच असतात, त्याच्या फळांचा उपयोग औषधांत केला जातो. संस्कृतमध्ये हिरड्याला हरीतकी म्हणतात, सर्व रोगांचे हरण करते ती हरीतकी.
इग्रजी मध्ये हिरड्याला Ink Nut नाव आहे तर हिरड्याचे शास्त्रीय नाव Terminalia Chebula आहे.

खालील लेखात हरड, हिरडा, हरीतकी गुण व औषधी उपयोग, हिरडा चूर्ण, डोस मात्रा, ऋतू हरीतकी, विशिष्टयोग, जाती/प्रकार, बाळ हिरडा, दोष-धातु-मलावरील कार्य, Haritaki in Marathi, Terminalia Chebula in Marathi, Inknut in Marathi, Haritaki in Marathi, Harad Powder in Marathi, Gandharva Haritaki in Marathi, Bal Hirada इ. हिरड्याची सर्व माहिती दिलेली आहे.

हरड, हिरडा, हरीतकी गुण व औषधी उपयोग, Hirada, Haritaki, Ink Nut in Marathi, Tree

अनुक्रमणिका

हरीतकी वृक्षाची माहिती / वर्णन, Haritaki, Ink Nut Tree in Marathi:-

हरीतकी, हिरड्याचा मोठा वृक्ष असतो. या झाडाची २५ ते ३० मीटर उंची असू शकते.
याचे लाकूड घट्ट व कठीण असते.

हरीतकी वृक्षाची पाने – १० ते ३० सें. मी. लांब, पानाला टोक असते. पानातील शिरा ६ ते ८ जोडीने असतात. पानाच्या खालच्या अंगावर देठानजिक २ लहान ग्रंथी असतात.

हरीतकी वृक्षाचे फूल – ही लहान, पांढरी अथवा पिवळी, उग्र वास येणारी असतात.

हरीतकी वृक्षाचे फळ – ३ ते ६ सें. मी. लांबीचे, पृष्ठभागावर पाच रेषा असणारे.
ओले असता हिरवे पण पक्व झाल्यावर पिवळट – धुसर रंगाचे होते .

हरीतकी वृक्षाचे बिया – प्रत्येक फळात एक बी असते. बी लांबोडी व कठीण असते. त्यात लांबोडा मगज निघतो.

<script type="text/javascript" language="javascript">
      var aax_size='300x600';
      var aax_pubname = 'marathidoc009-21';
      var aax_src='302';
    </script>
    <script type="text/javascript" language="javascript" src="https://c.amazon-adsystem.com/aax2/assoc.js"></script>

हिरडा, हरीतकी इतर भाषेतील नावे:-

Terminalia Chebula Common Name, Terminalia Chebula in Marathi, Ink Nut Marathi Name –

हरड, हरीतकी मराठी नाव – हिरडा, Hirada

हिरडा, हरीतकी हिंदी नाम – हरड़, हर्रे, Harad, Harre

हिरडा, हरड, हरीतकी संस्कृत नाव – हरीतकी, हैमवती, शिवा, पथ्या, अभया.

हिरडा, हरड, हरीतकी English name – InkNut, Chebulic Myrobalan

हिरडा, हरड, हरीतकी शास्त्रीय नाव – Terminalia Chebula

हरड, हिरडा, हरीतकी उत्पत्तीस्थान:-

हिरडा, हरड, हरीतकी ची भारतात सर्वत्र उत्पत्ती होते. समुद्रसपाटीपासून ते २ हजार मीटर उंचीपर्यंतच्या भूमीत ही झाडे वाढतात.

हरड, हिरडा, हरीतकी चे उपयुक्तांग – फळ

हरड, हिरडा, हरीतकी चे प्रकार/जाती:-

हरड, हरीतकी, हिरड्याच्या फळावरुन सात जाती/प्रकार पडतात. त्यापैकी विजया हा प्रकार सर्वोत्तम होय.

१ ) विजया – विध्य पर्वतरांगेेत उत्पत्ती होते. या हिरड्याचे फळ लंबगोल आकाराचे असते.
२ ) रोहिणी – भारतात सर्वत्र उत्पत्ती होते. या हिरड्याचे फळ गोल आकाराचे असते.
३ ) पूतना – सिंधुदेशात उत्पत्ती होते. या हिरड्याचे फळ बारीक व त्यामध्ये गर/मगज कमी असतो.
४ ) अमृता – चम्पारण्य प्रदेशात उत्पत्ती होते. या हिरड्याचे फळ मांसल असते.
५ ) अभया – चंपादेश प्रदेशात उत्पत्ती होते. या हिरड्याच्या फळांंवर पाच रेषा असतात. हा प्रकार नेत्ररोग चिकित्सेत वापरला जातो.
६ ) जीवन्ती – सौराष्ट्र प्रदेशात उत्पत्ती होते. या हिरड्याचे फळे पिवळी असतात.
७ ) चेतकी – हिमालय प्रदेशात उत्पत्ती होते. या हिरड्याच्या फळांंवर तीन रेषा असतात.

हरड, हिरडा, हरीतकी चे व्यवहारातील प्रकार/जाती:-

१ ) बाळ हिरडा –

बाळ हिरडा म्हणजे फळात अठळी जमण्यापूर्वीच झाडावरुन आपोआप गळून पडलेले बारीक फळ किंवा खुडून ते वाळवितात. मूळव्याधींवर बाळहिरडा उपयोगी पडतो.

२ ) चांभारी ( रंगारी ) हिरडा –
चांभारी हिरडा हे हिरड्याचे थोडेसे अपरिपक्व फळ असते.

३ ) सुरवारी हिरडा –

सुरवारी हिरडा म्हणजे पूर्ण परिपक्व फळ होय.

हरड, हिरडा, हरीतकी, गुण व औषधी उपयोग, हिरडा चूर्ण, डोस मात्रा, ऋतू हरीतकी


उत्तम हिरडा कसा ओळखावा?

जे फळ नवीन, स्निग्ध, जड, वाटोळे, पाण्यात टाकले असता जे बुडते व वजनात कमीत कमी २० ग्रॅम भरते ते फळ उत्तम होय.

हिरडा, हरीतकी औषधी मात्रा:-

हिरडा चूर्ण ची मत्रा – ३ ते ६ ग्रॅम

Hirada, Haritaki, Harad Powder

शोधनासाठीची मात्रा – ३ ते ६ ग्रॅम,
रसायनासाठीची मात्रा – १ ग्रॅम.
बालहिरड्याा ची मात्रा – १ ते ३ ग्रॅम.

हिरड्याचे कोणी / कधी सेवन करु नये ?

खालील व्यक्तींनी हिरड्याचे सेवन करु नये.
१ ) भरपूर व्यायाम केल्यावर किंवा संभोग केल्यानंतर हिरड्याचे सेवन करु नये.
२ ) रूक्ष , कृश , लंघन केल्यावर हिरड्याचे सेवन करु नये.
३ ) स्वेदना व रक्तमोक्षणानंतर – उपचार म्हणून स्वेदन रक्तमोक्ष केल्यानंतर हिरड्याचे सेवन करु नये.
४ ) गर्भवती स्त्रीने हिरड्याचे सेवन करु नये.
५ ) अजीर्ण – अजीर्ण झाले असताना हिरड्याचे सेवन करु नये.
६ ) मद्यसेवन केल्यानंतर हिरड्याचे सेवन करु नये.

हरड, हिरडा, हरीतकी गुण:-

Hirada, Haritaki, Ink Nut Medicinal Properties in Marathi-

  • रस – पंचरसात्मक, हिरड्यात खारट सोडून इतर पाच रस आहेत. हिरडा हा गोड आणि आंबट रसामुळे वातशामक आहे. तुरट व गोड रसामुळे पित्तनाशक आहे . व तिखट व कडू रसांमुळे कफशामक आहे.
  • वीर्य – उष्ण – हिरडा उष्ण, लघु, रूक्ष आहे. हिरडा व आवळा यांचे सर्व गुण सारखेच आहेत. फक्त हिरडा उष्ण आहे तर आवळा शीत आहे .
  • विपाक – मधुर
  • प्रभाव – त्रिदोषहर
  • दोषांवरील कार्य – त्रिदोषहर – मधुरतिक्तकषाय म्हणून पित्तघ्न, कटुतिक्तकषाय म्हणून कफघ्न, अम्ल मधुर असल्याने वातघ्न – ( विशेषत : वातशामक )
  • धातुवरील कार्य – धातुवर्धक व वाजीकर ( दीर्घोपयोगाने )
  • मलांवरील कार्य – पुरीष व मूत्र सारक, मलशुध्दी चांगली होते.

हिरडा, हरीतकी चे फायदे, Benefits of Ink Nut in Marathi:-

हिरडा, हरीतकी बाह्योपयोग, Ink Nut External Use Benefits in Marathi –

हिरडा, हरीतकी लेपाने केल्यास तो शोथहर, वेदनास्थापन, व्रणशोधन व व्रणरोपण व वर्ण्य कार्य करतो. Haritaki for Dark Circles, Haritaki for Skin Disease –

हिरडा, हरीतकी आभ्यंतर उपयोग, Systemic use of Ink Nut Benefits in Marathi –

नाडीसंस्थान – बल्य , मेध्य व इंद्रियांना बल देणारी . .

पाचनसंस्थान – दीपनीय, पाचनीय, यकृत् उत्तेजक,अनुलोमन, मृदुरेच, कृमिघ्न, बध्दकोष्ठघ्नी, विबंधनाशक हा विशेष गुण.

रक्तवहसंस्थान – हृद्य , शोणितास्थापन व शोथहर, रसशुध्दिकारक

श्वसनसंस्थान – कफघ्न, कफाचा रोध नाहीसा करणारी, कण्ठस्रोतरोधनाशक

प्रजननसंस्थान – वृष्य, गर्भाशयशोथघ्न, प्रजास्थापन

मूत्रवहसंस्थान – मूत्रल

त्वचा – कुष्ठघ्न . कषाय रसाने त्वचाशुध्दी करणारे, कुष्ठात बाह्योपयोगी .

तापक्रम – ज्वरघ्नी, ज्वरात रसायनी

सात्मीकरण – रसायनी

त्वचे वरील कार्य – – त्वचेचे रोग, जखम भरून काढणे, वर्ण सुधारणे.

पचनसंस्थे वरील कार्य – तोंडाला लाळ सुटणे, तोंडाला चव नसणे, पचनशक्ती बाढविणारा, उदर ( पोटात पाणी होणे ), जंत, जुनाट अतिसार, पोटदुखी, प्लीहा वाढणे, मूळव्याध इ रोगांत विशेष फायदा होतो.

श्वसनसंस्थे वरील कार्य – खोकला, दमा, आवाज बसणे इ रोगांत विशेष फायदा होतो.

मूत्रसंस्था – प्रमेह जननेंद्रिये – जननेंद्रियांना बलदायक, नपुंसकत्वावर उपयोगी.

मज्जासंस्था – बुध्दीवर्धक, डोळ्यांना हितकारक, डोकेदुखी, भ्रम

सर्वशरीर – रसायन, बलदायक, सूज, विषमज्वर, स्थूलता इ. रोगांत विशेष फायदा होतो.

हरड, हिरडा, हरीतकी औषधी उपयोग Medicinal Use of Ink Nut in Marathi:-

भूक वाढविण्यासाठी –

वैश्वानर चूर्ण – (अष्टांग हृदय नुसार)

  • सैंधव – १ तोळा ,
  • ओवा २ तोळे ,
  • पिंपळी ४ तोळे ,
  • सूंठ ५ तोळे व
  • हिरडा १० तोळे

एकत्र करून ते चूर्ण भूक वाढविण्यासाठी द्यावे.

मुखदुर्गधी – तोंंडाला वास येणे –

हिरडा, वाळा व कुष्ठ गोमूत्रांत खलून त्याची गोळी बनवावी व तोंडात धरावी.

उलटी –

हिरड्याचे चूर्ण मधाबरोबर चाटावे.

अतिसार – जुलाब होणे –

विशेषतः आमातिसार व कफातिसारावर उपयोगी.
१ ) हिरडा, पाठा, वेखंड, कुष्ठ, चित्रक व कुटकी यांचे चूर्ण गरम पाण्याबरोबर घ्यावे.
२ ) हिरडा, अतिविषा, सैंधव, सौवर्चल, वेखंड व हिंग यांचे चूर्ण गरम पाण्याबरोबर प्यावे.
३ ) हिरडा व पांढरे जिरे मंदाग्नीवर भाजून घ्यावे व त्याचे चूर्ण करावे. ते तांदूळाच्या धुवणाबरोबर प्यावे.
४ ) हिरडा, सुंठ, नागरमोथा व अतिविषा यांचा काढा आमनाशक आहे. ग्रहणी व जुनाट अतिसारांत उपयोगी.

५ ) हरीतकी, पिंपळमूळ, पाठा, कुटकी, इंद्रजव, चित्रक, सुंठ यांचा काढा किंवा चूर्ण गरम पाण्याबरोबर घ्यावे.

पोटदुखी –

थ्यादी योग हिरडा, मण्डूरभस्म व सुंठ ह्यांचे समभाग चूर्ण मधाबरोबर द्यावे.
त्यामुळे त्रिदोषात्मक परिणामशूल नाहीसा होतो.

शुलचिकित्सा पोटफूगी – पोटफुगणे –

१ ) हिरडा, जवखार, पीलु व निशोत्तर यांचे चूर्ण तुपाबरोबर घ्यावे.

उदावर्त चिकित्सा –

२ ) हिरडा, वावडिंग, चित्रक, ओवा व सुंठ यांचा काढा दिल्याने पोट फुगणे, मूळव्याध, मलावरोध व पोटदुखी नाहीशी होते.

अर्श –

३ ) हिरडा, पिंपळी व सौवर्चल ह्यांचे चूर्ण व दह्यावरची निवळ गरम पाण्याबरोबर घेतली असता सर्व प्रकारचे अजीर्ण, पोटफुगी आणि पोटदुखी नाहीशी होते.

उदर रोग – पोटात पाणी होणे –

१ ) हरीतक्यादी काढा – हिरडा, सुंठ, देवदारू, पूनर्नवा, गूळवेल यांचा काढा करून गुग्गुळ व गोमूत्रा बरोबर घ्यावा.

२ ) अभयारिष्ट २ – २ चमचे दोनदा मूळव्याध व उदररोगांवर उपयोगी.

अर्शरोग मूळव्याध

रात्रभर गोमूत्रांत भिजत घातलेले हिरडे सकाळी गुळाबरोबर द्यावे.

डोस मात्रा – हिरडा चूर्ण ३ ते ६ ग्रॅम

सर्दी ( सायनस ) –

अगस्तीप्राश – १ – १ चमचा दोनदा द्यावा.
सायनस – चित्रक हरितकी १ – १ चमचा दोनदा द्यावी.

स्वर बसणे –

सुंठ, मिरे, पिपळी, इंद्रजव, त्रिफळा व अडुळसा यांचा काढा द्यावा.

दमा –

१ ) अगस्तीप्राश

२ ) हिरडा, मनुका, काकडशिंगी व धमासा यांचे चूर्ण तूप व मधाबरोबर चाटवावे ते दम्यावर उपयोगी आहे.
३ ) हरीतकी, आवळा, भद्रमुस्ता, देवदारु, नागरमोथा व सुंठ यांचे चूर्ण मधासह चाटवावे त्यामुळे कफप्रधान खोकला नाहीसा होतो.

उचकी –

जुने तूप हिरड्याचा काढा, बिडलवण व हिंग या औषधाने सिध्द करावे. हे श्वास, उचकी, व हृदरोगात उपयोगी आहे.

मूत्राघात –

लघवी तुंबणे हिरडा, देवदारू, नागरमोथा, मोरवेल व जेष्ठमध यांचे चूर्ण मधांत चाटवून त्यावर मध, दूध व पाणी प्यावे.

लघवी करताना वेदना होणे –

त्रिफळा चूर्ण गरम पाण्याबरोबर घ्यावे.

हृद्रोग –

हरीतक्यादी चूर्णहिरडा, सुंठ, पुनर्नवा, वाळा, रास्ना, पिंपळी शठी पुष्करमूळ ह्याचे समभाग चूर्ण गरम पाण्याबरोबर घ्यावे.

पाण्डूरोग (अ‍ॅनिमिया) –

गुडहरितकी – हिरडा चूर्ण गुळाबरोबर खावे.

पाण्डूरोग रक्तपित्त (रक्तस्त्राव होण्याची प्रवृती) –

१ ) हिरड्याच्या चूर्णाला अडूळशाच्या ७ वेळा भावना देऊन मधाबरोबर चाटण करावे.

Harad Powder in Marathi-

श्लिपद ( हत्तीरोग ) –

हिरड्याचे चूर्ण एरंडेल तेलात तळून गोमूत्राबरोबर ७ दिवस द्यावे. Hirada Powder in Marathi

त्वचा रोग –

१ ) हिरडा, वावडिंग, बावची व गुळ ह्यांच्या गोळ्या कुष्ठ नाशक आहेत.
स्थूलता

२ ) हिरडा, त्रिफळा व गुळवेल ह्यांचे चूर्ण मधाबरोबर चाटवावे.

ज्वर, ताप –

१ ) विषमज्वर –
हिरडा, पिंपळी, पिंपळमळ, सुंठ, देवदार, आवळा, कुटकी व चित्रक यांचा काढा थंड झाल्यावर मध व खडीसाखर घालून घ्यावा. चौथ्या दिवशी येणान्या मलेरियामध्ये उपयोगी.

२ ) जुनाट ताप –
हिरडा, आरग्वध ( बाहवा ), कुटकी, निशोत्तर व आवळा यांचा काढा पाचक, सारक व जुनाट तापावर उपयोगी.

तापामध्ये निरामावस्थेत म्हणजे ताप नाहीसा झाल्यावर ताप परत येऊ नये म्हणून हिरडा चूर्ण मनुकांच्या पाण्याबरोबर द्यावे.

आमवात –

१ ) पथ्यादि चूर्ण –
हिरडा, सुंठ व ओवा सम प्रमाणात घेऊन त्यांचे चूर्ण करावे व ते गरम पाणी किंवा काजीबरोबर घ्यावे.
२ ) पिंपळी, हिरडा व लोहभस्म यांचे चूर्ण गुळाबरोबर घ्यावे त्यामुळे आमवात, जडपणा, स्थूलता बरी होतात.
३ ) हिरडा चूर्ण – एरंडेल तेलाबरोबर द्यावे.
त्याने आमवात अर्दित ( चेहरा वाकडा होणे ) व गृध्रसी ( सायाटिका ) हे रोग बरे होतात.

वातरोग, वात व्याधी –

१ ) हिरडा, गुळवेल, एरंडमूळ, सुंठ, देवदारु, रास्ना व हिरडा यांचा काढा सकाळी प्यायल्याने सर्व प्रकारचे वातरोग नाहीसे होतात.
२ ) पिंपळी, पिंपळीमूळ, त्रिफळा व अडूळसा यांचा काढा एरंडेल तेलाबरोबर घेतल्याने सर्व वातरोग नाहीसे होतात.
३ ) षड्धरण चूर्ण – चित्रक चूर्ण, इंद्रजव, पाठा, कुटकी, अतिविषा व हिरडा ही ६ औषधे समभाग करुन त्याचे चूर्ण द्यावे वात व्याधीत उपयोगी पडते.

रसायन ( टॉनिक ) –

हरीतकी, सुंठ, सैंधव, पिंपळी, गूळ व मध एकत्र खलून त्याची गोळी बनवावी व रोज सेवन केल्यास माणूस निरोगी होतो. बाळहिरडा रसायनकार्यात अनुपयुक्त होय ; कारण त्याचा रसपरिपोष झालेला नसतो.

त्रिफळा रसायन –

जेवणापूर्वी २ बेहडे, जेवण झाल्यावर १ हिरडा व जेवणानंतर ४ आवळे मध व तुपाबरोबर खाल्ल्यामुळे माणस निरोगी व तरूण रहातो व दीर्घकाळ जगतो.

अगस्तिप्राश –
दुष्ट प्रतिश्याय ( सायनस ) दमा, उचकी व हृद्रोगात उपयोगी. हे रसायनही आहे.

हरीतकी पंचरसात्मक :-

हिरड्याच्या फळात ५ रस विभागले आहेत.
१ ) मधूर – मज्जा
२ ) अम्ल – स्नायु – मांसल भाग ; ( लवण नाही )
३ ) तिक्त – देठ
४ ) कटु – साल
५ ) कषाय – अस्थि अशी ही हरीतकी पंचरसा आहे.

ऋतू हरीतकी Ritu Haritaki in Marathi:-

सात्मीकरण –
रसायनी ( मलशोधन रसायनी ) पण हे रसायन कार्य करण्यासाठी हरीतकीला निरनिराळ्या ऋतुत एक सहकारी द्रव्य अनुपान लागते. Ritu Haritaki

ऋतूप्रमाणे अनुपान –

ऋतू अनुपान

१ ) वर्षा सैंधव
२ ) शरद साखर
३ ) हेमंत सुंठ
४ ) शिशिर पिंपळी
५ ) वसंत मध
६ ) ग्रीष्म गूळ

हिरडा, हरीतकी विशिष्टयोग:-

  • अभयादिमोदक
  • अभयारिष्ट
  • पथ्यादिवटी
  • पथ्यादिकाढा
  • व्याघरीहरीतकी लेह
  • अगस्तिहरीतकीलेह
  • गंधर्वहरीतकीचूर्ण Gandharva Haritaki in Marathi
  • हरिद्रा खण्ड

Hirada, Haritaki, Ink Nut Pharmacology in Marathi:-

Extensively studied plant.

  • Its extract has a proven hepatoprotective property.
  • It has about 30 different chemical components and Tannic acid.
  • It is clinically proven hepatoprotective and
  • it is now being studied for its immuno modulatery property.

औषध निर्माणशास्त्र हरड, हिरडा, हरीतकी या वनस्पतींचा विस्तृत अभ्यास केला आहे.
त्याच्या अर्कात हिपॅटोप्रोटोटिव्ह गुणधर्म आहेत.
यात सुमारे ३० वेगवेगळे रासायनिक घटक आणि टॅनिक अ‍ॅसिड आहे.
हे वैद्यकीयदृष्ट्या हेपेटोप्रोटोटिव्ह सिद्ध झाले आहे आणि आता याचा इम्युनो मॉड्यूलटरी प्रॉपर्टीसाठी अभ्यास केला जात आहे.

सारांश:-

आयुर्वेदीय ग्रंथांतून त्रिफला स्वरुपात हिरडा पदोपदी वापरलेला आढळून येतो आणि ते सकारण आहे. एवढे बहुकल्प, बहुगुणसंपन्न व योग्य औषध अन्य नाही. म्हणून हिरड्याचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे.

हिरडा हे द्रव्य औषधी द्रव्य खरे पण त्याचा नित्योपयोग करावयास सांगितला आहे.
शरीरातील सर्व प्राकृतिक प्रक्रियांचे नियमन करणे हा हरीतकीचा विशेष गुण आहे.

हिरडा, हरीतकी ही एकंदर औषधींत श्रेष्ठ गुणांचा आहे, तथापि त्याचे रुक्षणकार्य विचारात घेता अतिखिन्न, अतिक्षीण, रुक्ष, अतिकृश, लंघित, असविसूति केलेला, पित्ताधिक्य असताना, गर्भार स्त्री यांना हिरडा वापरु नये.

Aushadhi Vanaspati Information in Marathi –

Copyright Material Don't Copy © 2020-2022

Recent Posts

SRDP उपचार: संपूर्ण माहिती, फायदे आणि प्रक्रिया

प्रस्तावना SRDP (Scientific Reversal Detoxification Process) उपचार ही एक आधुनिक आयुर्वेदिक पद्धती आहे जी पारंपरिक… Read More

05/03/2025

सोरायसिस कारणे, लक्षणे, घरगुती उपाय आणि आधुनिक उपचार

प्रस्तावना सोरायसिस हे एक दीर्घकालीन त्वचेचे आजार आहे जे त्वचेच्या पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवते. ही… Read More

27/02/2025

PCOD उपचार: कारणे, लक्षणे, उपाय आणि जीवनशैलीतील बदल

प्रस्तावना पॉलीसिस्टिक ओव्हरी डिसऑर्डर (PCOD) किंवा पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) ही एक सामान्य हॉर्मोनल समस्या… Read More

25/02/2025

केस गळती थांबवण्याचे उपाय, कारणे, लक्षणे, प्रतिबंध आणि नवीन उपचार

प्रस्तावना केस गळती ही एक सामान्य समस्या बनली आहे जी पुरुष आणि महिलांना सारख्या प्रभावित… Read More

22/02/2025

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग: कारणे, लक्षणे, उपाय, प्रतिबंध, लस आणि नवीन उपचार

प्रस्तावना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) हा महिलांमध्ये आढळणारा एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे,… Read More

21/02/2025

आम्लपित्त – ऍसिडिटी उपचार, कारणे, लक्षणे, घरगुती उपाय आणि प्रतिबंध

ऍसिडिटी, ज्याला मराठीत "अम्लपित्त" किंवा "छातीत जळजळ" असेही संबोधले जाते, ही आजकालच्या जीवनशैलीमुळे सामान्य झालेली… Read More

20/02/2025