औषधी वनस्पती

गुळवेल, गुडूची, गिलोय गुण व औषधी उपयोग Gulvel, Guduchi, Giloy in Marathi

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

गुळवेल, गुडूची, गिलोय हि एक बहुवर्षिय औषधी वेल आहे. हिची पाने विड्याच्या पानाप्रमाणे ह्रदयाच्या आकाराची असतात. आयुर्वेदात गुळवेल, गुडूची, गिलोय ला ज्वर म्हणजेच तापाचे महाण औषध मानले जाते. हि अमृताप्रमाणे गुणकारी असल्याने हिला अमृता असेहि म्हणतात. Tinospora Cordifolia in Marathi

गुळवेल ( गुडुची ) गुळवेलीचा वेल कडुनिंब, आंबा इत्यादी वृक्षांंच्या आधाराने त्यांच्यावर वाढते, हि औषधी वनस्पती ज्या झाडावर वाढते त्या झाडाचे विशेष गुणधर्म धारण करते. कडुनिंबांवर वाढलेली गुळवेल, गुडूची, गिलोय श्रेष्ठ मानली जाते. Neem ki Giloy in Marathi.

गुळवेल वनस्पती ची माहिती Gulvel, Giloy Plant in Marathi:-

Giloy Information in Marathi,
ही बहुवर्षायू वेल आहे व ती आंबा, कडुनिंब आदि झाडांवर वाटोळी वरवर चढत जाते.
हिला पुष्कळशा वाताशन मुळ्यांचे लांब लांब ताण निघतात व ते जमिनीकडे लोंबत असतात.

गुळवेल वनस्पती ची साल – वरची साल करड्या रंगाची व पातळ असते. वरची साल काढल्यावर आत हिरवी साल दिसते.

गुळवेल वनस्पती ची पाने – हृदयाकृती, एकान्त , शेवटी टोकदार व स्निग्ध असतात. Giloy Leaves in Marathi.

गुळवेल वनस्पती चे पुष्प – लहान पिवळ्या रंगाचे व गुच्छांनी येतात.
स्त्रीपुष्प – एकएकटे येते.

गुळवेल वनस्पती ची फळे – वाटाण्या ( मटार ) सारखे, पिकल्यानंतर लाल होते.
गुळवेल वनस्पती ला ग्रीष्मात फुले व थंडीच्या दिवसात फळे येतात.

गुळवेल गुडूची गिलोय गुण, गुळवेल गुडूची गिलोय औषधी उपयोग, Gulvel, Guduchi, Giloy in Marathi, Gulvel plant in marathi, Gulvel, Giloy Plant in Marathi,

इतर भाषेतील नावे:-

शास्त्रीय नाव – Tinospora cordifoliaटिनोस्पोरा कॉर्डिफोलिया

मराठी नाव – गुळवेल, अमृता.

हिंदी नाम – गीलोय, गुडूची

संस्कृत नाव – अमृता, गुडूची, बल्ली, छिन्ना, मधुपर्णी, वत्सादनी, कुण्डलिनी

English name – Tinospora

उपयुक्तांग:-

गुळवेलीच्या वेलाचे ‘काण्ड’ औषध म्हणून वापरतात. त्यापासून गुळवेल चूर्ण, गुडूची सत्व, गुडूच्यादि चूर्ण, गुडूच्यादि क्वाथ, गुडूची लोह, अमृतारिष्ट, गुडुची तैल तयार केलेे जाते.

उत्पत्तीस्थान:-

गुळवेल, गुडूची, गिलोय ची भारतात सर्वत्र उत्पत्ती होते.

गुळवेल, गुडूची, गिलोय चे प्रकार/जाती:-

पद्मगुडूची किंवा कंद गुडूची –

  • गुळवेलीची पद्मगुडूची किंवा कंद गुडूची नावाची एक जात आहे.
  • या कंदगुडूचीची पाने मोठी व त्रिखंड असतात.
  • कांडावरही ठिकठिकाणी कंदासारखा ( गाठी सारखा) भाग असतो.
  • म्हणून याला ‘ कंद ‘ गुडूची म्हणतात.

गुळवेल, गुडूची, गिलोय गुण:-

Gulvel, Guduchi, Giloy Medicinal Properties in Marathi-

  • रस – कडू, तुरट, तिखट,
  • वीर्य – उष्ण
  • विपाक – मधुर .
  • गुण – उष्ण,
  • प्रभाव – विषघ्न
  • दोष – त्रिदोषशामक आहे . ( स्निग्ध व उष्ण गुणाने वातशमन, तिक्तकषायाने कफ व पित्ताचे शमन करते. ), पित्तसारक, पित्ताचे वहन नीट होऊ लागते.

  • अग्निवर्धक, त्रिदोषशामक, रसायन, भूक वाढविणारी, निरनिराळ्या रोगांत औषध म्हणून उपयोग.
  • पचनसंस्था – उलटी , लिव्हर व प्लीहांमधील दोष नाहीसे करणारी, मूळव्याध, कावीळ ह्या रोगांत उपयोगी.
  • हृदय – रक्त, पांडुरोग, शिरांमधील दोष नाहीसे करणारी, रक्त – प्रसादक
  • त्वचा – त्वचेचे रोग, कंड, आग होणे, केस पिकणे , चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडणे.
  • वात – वातरक्त , संधिवातात लााभदायक
  • सर्वसाधारण – ताप , मांस प्रसादन , मेदातील शैथिल्य कमी करणारी, शुक्रवर्धक, स्थूलता व प्रमेहनाशक आहे.
  • रसायन – आयुष्यवर्धक, बलदायक, व बुद्धिवर्धक आहे.
  • कडू द्रव्ये सर्वसाधारणतः जननेंद्रियांना अहितकर असतात. पण गुळवेल वृष्य आहे. म्हणजे जननेंद्रियांना बलदायक आहे.
  • शरीरातील क्लेद कमी करणारी आहे. ताप कमी करणाऱ्या द्रव्यांत श्रेष्ठ आहे .
  • आईच्या दुधातील दोष नाहीसे करते .
  • स्रोतोगामित्व – दोष – त्रिदोष . धातू – रक्त , मेद , द्रवधातु , शुक्र , वृष्य रसायनी.
  • अवयव – वृक्क , यकृत , प्लीहा या अवयवांवर विशेष कार्यकारी आहे.
  • मल – मूत्र – मल – मूत्र चे संग्रहण करते.
  • गुळवेल – गुडुची ही विशेषत : रक्तधातुगामी आहे. दाह, पाण्डु, कामला, कुष्ठ, वातरक्त या विकारांत रक्त हे दूष्य अव्यभिचारी असते. त्यामुळे या रोगात विशेष गुणकारी आहे. Giloy Ke Fayde in Marathi, Giloy Uses in Marathi

औषधी मात्रा डोस:-

काढा – ६० ते १०० मि. लि.
चूर्ण – १ ते ३ ग्रॅम

सत्व – ०.७५ ते २ ग्रॅम

गुळवेल गुडूची गिलोय, Gulvel, Guduchi, Giloy in Marathi, gulvel plant in marathi, giloy plant in marathi, tinospora cordifolia in marathi, giloy plant in marathi, marathi doctor,

गुळवेल, गुडूची, गिलोयऔषधी उपयोग:-

Giloy uses in Marathi, Benefits of Giloy in Marathi, Giloy Plant Benefits in Marathi, Gulvel Medicinal Uses in Marathi –

१ ) बाह्य उपयोग –

Gulvel, Guduchi, Giloy External use in Marathi

कुष्ठघ्न व वेदनास्थापन कर्म करते.

२ ) कावीळ – पांडुरोग ( अनीमिया ) –

Gulvel, Guduchi, Giloy for Jaundice, anaemia in Marathi

  • गुळवेलीचा काढा थंड झाल्यावर मधाबरोबर घ्यावा.
  • गुळवेल सिद्ध म्हशीचे दूध काविळीवर घ्यावे.
  • गुळवेल, मनुका व आवळा यांनी सिद्ध केलेले तूप घ्यावे.
  • त्रिफळा, गुळवेल व दारूहळद ह्यांचा काढा घ्यावा.
  • गुळवेलीच्या पानांची चटणी (कल्क) ताकाबरोबर घ्यावी.

३ ) खोकला –

Gulvel, Guduchi, Giloy for Cough in Marathi

गुळवेल व कंटकारी ( काटे रिंगणीच्या ) काढ्याने सिद्ध केलेले तूप घ्यावे.

४ ) प्रमेह –

Gulvel, Guduchi, Giloy for Diabetes, Polyurea in Marathi

गुळवेलीचा रस ( Giloy Juice in Marathi ) मधाबरोबर घ्यावा किंवा पाषाण भेदाचे चूर्ण व मधाबरोबर द्यावा .

५ ) दाह –

Gulvel, Guduchi, Giloy for Burning Sensation in Marathi

( अंगाची आग होणे ) गुळवेलीचा रस किंवा गुळवेल सत्व घ्यावे.

ताप / ज्वर –

Gulvel, Guduchi, Giloy for Fever in Marathi

६ ) वातप्रधान ज्वर –

Gulvel, Guduchi, Giloy for Viral Fever in Marathi

  • गुळवेल, उपळसरी , बला व सालवण यांचा काढा वातज ज्वरावर घ्यावा .
  • गुळवेल, सुंठ, नागरमोथा, हळद, पिंपळी, दारूहळद व धमासा यांचा काढा घ्यावा.

७ ) पित्तप्रधान ज्वर –

गुळवेल कुटून रात्री पाण्यात भिजत ठेवावी व सकाळी ते पाणी गाळून व साखर घालून घ्यावे.

८ ) विषमज्वर ( मलेरिया ) –

Gulvel, Guduchi, Giloy for Malaria in Marathi

गुळवेल, त्रिफळा , घमासा व कडू पडवळ यांचा काढा करून त्याच्या पावभर तूप घालून पाणी उकळेपर्यंत आटवावे . हे तूप विषमज्वर व कावीळीवर उपयोगी आहे . . .

९ ) जीर्णज्वर – ( बरेच आठवडे चाललेला ताप ) –

Gulvel, Guduchi, Giloy for PUO, Chronic Fever in Marathi

  • गुळवेल रस, पिंपळी व मधाबरोबर घ्यावा.
  • अमृताष्टकगुळवेल, कडूनिंब, कुटकी, नागरमोथा, सुंठ, कडूपडवळ, रक्तचंदन व इंद्रजव ह्यांचा काढा करून त्यात पिंपळी चूर्ण घालावे त्यामुळे पित्त व कफप्रधान ताप बरा होतो.

१० ) वातरक्त – संधिवात – आमवात –

Gulvel, Guduchi, Giloy for Gout, Rheumatoid Arthritis in Marathi

गुळवेलीचा रस , सुंठीचा काढा , मनुकांचा काढा किंवा जेष्ठीमधाच्या काढ्याबरोबर घ्यावा.

११ ) सात्मीकरण –

Gulvel, Guduchi, Giloy Tuberculosis and General Wellbeing in Marathi


गुळवेल दौर्बल्य, क्षय यांवर उपयोगी तसेच उत्तमपैकी सर्वधातूंवर रसायनी म्हणून कार्य करते.

गुळवेल, गुडूची, गिलोय चे काही महत्वाचे औषधी कल्प / प्रयोग:-

  1. गुडूच्यादि चूर्ण, Giloy Powder in Marathi
  2. गुडूच्यादि क्वाथ, Gulvel Kadha
  3. गुडूची लोह, Guduchi loha in marathi
  4. अमृतारिष्ट, Amritarishta in Marathi
  5. गुडुची तैल, Giloy Oil in Marathi
  6. गुडूची सत्व, Giloy Satva in Marathi
  7. गुडूची कल्क, Giloy Chatani in Marathi
  8. गुडूची स्वरस Giloy Juice in Marathi
  9. गुडूची घन वटि Giloy Ghan vati in Marathi

सारांश:-

  • गुळवेल नेहमी ताजी ओलीच वापरावी.
  • गुडूची हे एक श्रेष्ठ रसायनद्रव्य आहे. त्यामुळे तिचा वापर आयुर्वेदाने भरपूर प्रमाणात केला आहे.
  • गुळवेल, गुडूची, गिलोय जमविण्याचा काळ ‘मे’ महिना, मे मध्ये काढलेल्या गुळवेलीतून खूप सत्व मिळते.
Copyright Material Don't Copy © 2020

View Comments

  • Very useful information on Guduchi also please confirm how guduchi is effective in curing Coronavirus infection and other viral infections. I am not medical graduate but I am studying Original Ayurveda since five years in depth please reply and also call name is Shrirang Sudrik Pune Maharashtra and mobile number is 9011350747

  • i daily drink gulvel water {means peice of gulvel kept in water full night}in the morning before brush.is it right.?please guide me.because of plenty stock in my village of gulvel.

    • Pl'z consult BAMS ayurvedic Doctor as doses and need of any herbal medicine depends on individual Dose sthiti and Prakruti. Its not same for everyone. Thank You for Comment

Share
Published by

Recent Posts

जागतिक आरोग्य दिन २०२४ – माझे आरोग्य, माझे हक्क

जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास जागतिक आरोग्य दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो.… Read More

01/04/2024

राष्ट्रीय जंतनाशक दिन २०२४ प्रश्न उत्तरे Deworming day FAQ in Marathi

सन २०२३ - २०२४ राष्ट्रीय जंतनाशक दिन १३ फेब्रुवारी २०२४ व २० फेब्रुवारी २०२४ (मॉप… Read More

11/01/2024

गरोदरपणातील मधुमेह GDM in Marathi

गरोदरपणातील मधुमेह (GDM) म्हणजे काय? Gestational diabetes in Marathi :- गर्भधारणेदरम्यान जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण… Read More

07/01/2024

पोटातील जंत सर्व माहिती Roundworm Tapeworm Worm Meaning in Marathi

जंत ( Worm in Marathi ) होणे ही आपल्या देशातली महत्त्वाची समस्या आहे. ग्रामीण भागात… Read More

05/01/2024

उष्माघात कारणे लक्षणे प्रतिबंध उपचार Heat Stroke Meaning in Marathi

उष्माघात कारणे, उष्माघात लक्षणे, उष्माघात प्रतिबंध, उष्माघात उपचार, उष्माघात घरगुती उपाय, मराठी माहिती, Heat Stroke… Read More

19/03/2023