अल्ट्रासोनोग्राफी सध्याच्या प्रगत काळातील आधुनिक विशेष तपासणी पद्धत आहे.
याच्या सहाय्याने गरोदरपणाच्या ६ व्या आठवड्यातदेखील भृणाची माहिती मिळते.
सोनोग्राफी द्वारे गरोदरपणाच्या खात्री पासून ते बाळाच्या वाढिची, जन्मजात व्यंगाची, दोषांची, वजनवाढिची, इ. जन्मापर्यंतची सर्व माहिती मिळते.
म्हणून आजकाल गरोदरमातेची अल्ट्रासोनोग्राफी ही तपासणी सर्रास केली जाते.
अनुक्रमणिका
सोनोग्राफी करण्याचे फायदे :-
१ ) ही नॉन इनव्हेजीव ( Non-invasive ) प्रोसिजर आहे, सोनोग्राफीसाठी इसिजन घ्यावे लागत नाही किवा सुईदेखील टोचवावी लागत नाही.
२ ) या तपासणीसाठी कोणत्याही प्रकारची विशेष तयारी करावी लागत नाही .
३ ) ही कृती वेदनारहित आहे.
४ ) सुरक्षीत आहे.
५ ) या कृतीसाठी कोणत्याही प्रकारचा डाय (रंंगद्रव्य) वापरावा लागत नाही.
६ ) तुलनात्मक दृष्टीने कमी खर्चीक आहे.
७ ) रिझल्ट / रिपोर्ट त्वरीत मिळतात.
८ ) तो जवळ जवळ तंतोतंत असतो.
९ ) गर्भाच्या हालचाली, गर्भहृदयाच्या हालचालीचे निरीक्षण करता येते. तसेच नाडी आणि रक्तवाढीची देखील माहिती मिळते.
१० ) त्वरीत रिझल्ट मिळाल्याने मातेची चिंता व काळजी दूर होते. या तपासणीमुळे कोणत्याही प्रकारचे अनिष्ट परिणाम मातेवर व गर्भावर होत नाहीत हे सिद्ध झालेले आहे.
म्हणजेच अ ) मशिनरी चालू केल्यानंतर निर्माण होणाऱ्या कंपनामुळे ( Mechanical Vibration ) ब ) तपमानामुळे ( Thermal effect ) क ) किंवा त्यामधून बाहेर पडणाऱ्या किरणांमुळे कोणत्याही प्रकारचे अनिष्ट परिणाम मातेवर व गर्भावर होत नाहीत.
निदानात्मक चाचणीसाठी ही अतिशय उपयुक्त व फायदेशीर अशी पद्धत आहे.
तसेच याचा आणखी महत्वाचा फायदा म्हणजे सोनोग्राफीक प्रतिमा ( Image ) रेकॉर्ड करुन ठेवता येतात.
हे रेकॉर्डींग तीन पद्धतीत करता येते फोटोग्राफ्स काढून, एक्स-रे फिल्मद्वारे, व्हिडिओ रेकॉर्डिंग करून, त्यामुळे त्याचा तुलनात्मक अभ्यासासाठी उपयोग करता येतो .
याशिवाय, अल्ट्रासाऊंड प्लासेंटोग्राफी, फिटल एकोकार्डिओग्राफी याही तपासण्या गर्भ गर्भाशयात असताना करता येतात व काही औषधोपचार करावयाचे असल्यास तेही करता येतात.
साधारणत: प्रेगन्सी मध्ये अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी हि ४ ते ५ वेळा केली जाते.
१ ली सोनोग्राफी ८ व्याआठवड्यात करतात.
२ री सोनोग्राफी १२ व्या आठवड्यात करतात.
३ री सोनोग्राफी १८ ते १९ व्या आठवड्यात करतात. या सोनोग्राफीला अनॉमली स्कॅन असेही म्हणतात.
४ थी सोनोग्राफी हि २८ व्या आठवड्यात करतात.
५ वी सोनोग्राफी हि ३७ व्या आठवड्यात करतात.
गरोदरबाईची अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी खालील गोष्टीसाठी करतात.
१) गर्भाची स्वाभाविक वाढ , विकास , त्याचे वजन , गरोदरपणाचा काळ व त्यामानाने गर्भाची वाढ स्वाभाविक आहे किंवा नाही हे कळते .
२ ) कटिराची व गर्भमस्तकाची मापे तंतोतंत मिळाल्यामुळे सी . पी . डी . ( जन्म मार्ग अरुंद) असल्यास त्याचे निदान होते .
३ ) गरोदरपणाच्या सुरवातीच्या काळात सोनोग्राफीवरून खालील गोष्टी समजतात.
अ ) स्त्री गरोदर आहे हे समजते .
ब ) गर्भाशयात गर्भ आहे याची खात्री करता येते .
क ) गर्भ एक की अनेक हे समजते .
ड ) गर्भ जीवंत आहे हे समजते .
इ ) गर्भाचे जस्टेशनल एज ( वय) समजते .
फ ) गर्भाशयात गाठी असतील तर त्याचे निदान होते .
४ ) वेगवेगळ्या ठिकाणाची मोजमापे घेऊन गर्भाची वाढ आणि निरोगी अवस्था समजण्यासाठी .
५ ) गर्भधारणा मिंध्यातील असल्यास ड्यूडेट ( प्रसुतीची तारिख) काढण्यासाठी व किती महिन्याचा गर्भ आहे . हे ठरविण्यासाठी अल्ट्रासोनोग्राफी करतात .
६ ) कटिराची मापे काढल्यामुळे संकुचित कटिर असल्यास त्याचे निदान काता येते .
७ ) एल . एम . पी . ( L M P ) चे निश्चितीकरण करता येते व गरोदरपणाचा काळ, अचूक काढता येतो .
८ ) ६ व्या आठवड्यात गर्भहृदयाची हालचाल दिसते तर ७ व्या आठवड्यानंतर गर्भाच्या हालचाली दिसतात .
याशिवाय आसन गर्भपात, मिस्डगर्भपात, अपूर्ण गर्भपात, द्राक्षागर्भ, अस्थानी गर्भधारणा ( Ectopic Pregnancy )
अशा प्रकारच्या अस्वाभाविक स्थिती ओळखता येतात. सोनोग्राफीवरून गर्भातील अनेक प्रकारचे दोष व जन्मजात वैगुण्ये समजतात .
हातापायांची लांबी : विशेषकलमाडीच्या हाडाच्या लांबीवलजस्टेशनला एजठावतात हातापायांची लांबी पाहात असताना तेथील वैगुण्य समजते. उदा. थोटा पाय इ.
अ ) एनेंनसेफॅली ( Anencephaly )
ब ) स्पायनाबाफिडा ( Spina-bifida )
क ) हायड्रोसेफॅली ( Hydrocephalus )
ट ) मायक्रोसेफॅली ( Microcephalus )
अ ) युसोफेजियल अॅट्रेसिया ( Esophageal Atresia )
ब ) ट्रकिओयुसाफेिजियल फिसच्युला ( Tracheoesophageal Fistula )
क ) ऑफिलोसिल ( Omphalocele )
ड ) एझोमफॅॅलस ( Exomphalos )
यासारखे दोष सोनाग्राफीमुळे लगेच समजून येतात .
अ ) एकच किडणी असणे
ब ) पॉलिसिस्टीक किडनी
क ) हेड्रोनेफॉटिक किडनी
अ ) जन्मजात हृदयदोष उदा . व्ही , एस , डी . फेलॉटस् टेट्रॉलॉजी ए . एस . डी .
ब ) क्लेफ्ट लिप ( तुटका ओठ )
क ) क्लेफ्ट पॅलेट ( फाटका टाळा )
अ ) प्लासेंटाची स्थिती व स्थान समजते . सेंट्रल प्लासेंटा आहे की मार्जीनल प्लासेंटा आहे हे समजते .
ब ) प्लासेंटल अॅबपशन प्लासेंटाच्या मागील बाजूस असलेला क्लॉट सोनोग्राफिमधून दिसतो .
क ) सोनोग्राफीमुळे द्राक्षागर्भ / हायडेंटिडीफॉर्ममोलचे निदान होते .
ड ) सोनोग्राफिमुळे गर्भाशयातील गर्भाचे निरिक्षण करता येते .
इ ) गर्भाच्या हालचाली दिसतात .
फ ) चोखण्याच्या ( Sucking ) , गिळण्याच्या ( Swallowing ) आणि श्वसनाच्या ( Breathing ) हालचालीचे निरीक्षण करता येते .
ग ) गरोदरपणाच्या ठराविक निश्चित अवस्थेमध्ये बाळाचे पोट, मूत्राशय भरलेले, रिकामे झालेले व बाळाने डोळे फिरवलेल्या व हालचाली पाहता येतात .
ह ) गर्भोदकाचे प्रमाण समजते .
१ ) पहिल्या तीन महिन्यामध्ये भृणाच्या डोक्याच्या उंचवट्यापासून सेक्रमपर्यंतची लांबी पाहून जस्टेशनल एज ठरवितात.
२ ) दुसऱ्या तिमाहि महिन्यामध्ये गर्भमस्तकाच्या / फिटल स्कलच्या दोन परायटल एमीनन्समधील अंतरावरुन जस्टेशनल एज ठरवितात.
३ ) तिसऱ्या तिमाहि महिन्यामध्ये गर्भाच्या डोक्याचा घेर मोजतात.
याचा उपयोग IUGR. ओळखण्यासाठी फार चांगला होतो.
१ ) या तपासणीसाठी खास तयारी करावी लागत नाही.
२ ) बाईला संपूर्ण प्रोसिजर समजावून सांगावी . त्यामुळे तिची भीती कमी होते व तिचे सहकार्य मिळते.
३ ) तपासणी चालू करण्यापूर्वी व चालू असताना पोटाला औषधी जेली लावावी लागते. याची पूर्णत : कल्पना द्यावी.
४ ) भरपूर पाणी पिण्यास देऊन तपासणीपूर्वी मूत्राशय पूर्ण भरेल याची काळजी घ्यावी.
जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास जागतिक आरोग्य दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो.… Read More
bhagar-khatana-kay-kalaji-ghyavi-bhagar-vhishbadha-bhagar-acidity Read More
सन २०२३ - २०२४ राष्ट्रीय जंतनाशक दिन १३ फेब्रुवारी २०२४ व २० फेब्रुवारी २०२४ (मॉप… Read More
गरोदरपणातील मधुमेह (GDM) म्हणजे काय? Gestational diabetes in Marathi :- गर्भधारणेदरम्यान जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण… Read More
जंत ( Worm in Marathi ) होणे ही आपल्या देशातली महत्त्वाची समस्या आहे. ग्रामीण भागात… Read More
उष्माघात कारणे, उष्माघात लक्षणे, उष्माघात प्रतिबंध, उष्माघात उपचार, उष्माघात घरगुती उपाय, मराठी माहिती, Heat Stroke… Read More
View Comments
छान माहिती आहे
आपल्या कमेंंट बद्दल धन्यवाद.