ज्येष्ठमध मुलेठी हि बहुगुणी औषधी वनस्पती आहे. ज्येष्ठमध मुलेठी चे मूळ, मूळाचे चूर्ण व घनसत्त्व औषध म्हणून वापरले जाते. खालील लेखात आपण ज्येष्ठमध, मुलेठी चे गुण, ज्येष्ठमध खाण्याचे फायदे, ज्येष्ठमध चूर्ण, ज्येष्ठमध औषधी उपयोग, ज्येष्ठमध म्हणजे काय ? इतर भाषेतील नावे इ. ज्येष्ठमध मुलेठी औषधी वनस्पती बद्दलची सर्व माहिती पाहणार आहोत.
ज्येष्ठमध वनस्पतीचे स्वरुप Jeshthamadh, Mulethi Plant in Marathi :-
ज्येष्ठमध, यष्टीमधु, मुलेठी ही दक्षिण युरोपात व आशियात खंडात ( भारताात पंजाब, सिंध ) आढळणारी बहुवर्षायु क्षुप वर्गीय औषधी वनस्पती आहे.
ज्येष्ठमधाचे झाड ६ फुट उंचीचे असते. त्याचे मूळ म्हणजे औषधात वापरले जाणारे ज्येष्ठमध होय.
मूळ – लंबगोलाकार , पिवळसर लाल, मूळ व खोडापासून अनेक फांद्या निघतात.
पाने – संयुक्त पत्रक – पक्षाकार ४ ते ७ जोड्यांत असतात.
फुले – फिक्कट गुलाबी रंगाची असतात. फुले वसंत ऋतूत येतात.
शेंगा – ३ सें. मी. लांब व चपट्या असतात. त्यात २ ते ५ चौकोनी बिया असतात. बिया वर्षा ऋतूत येतात.
ज्येष्ठमध, मुलेठी ची इतर भाषेतील नावे:-
मुलेठी मराठी नाव – ज्येष्ठमध, यष्टिमधू
ज्येष्ठमध, मुलेठी संस्कृत नाव – मधुक, यष्टिमधुक
ज्येष्ठमध हिंंदी नाव – मुलेठी
ज्येष्ठमध English Name – Liquorice / Licorice, लिकोराइस
ज्येष्ठमध,मुलेठी शास्त्रीय नाव – Glycyrrhiza glabra, ग्लायसीर्हिझा ग्लाब्रा
ज्येष्ठमध, मुलेठी प्रकार Jeshthamadh, Mulethi Types in Marathi:-
ज्येष्ठमध जलज व स्थलज अशी दोन प्रकारची असते.
१ ) जलजाला ज्येष्ठमध:-
हिला मधुपर्णी असेही म्हणतात. ही दुर्मिळ असते.
२ ) स्थलज ज्येष्ठीमध
उत्पत्ती स्थानाप्रमाणे तीन प्रकारची असते.
१ ) मिसरी
२ ) अरबी
३ ) तुर्की
यांची गोडी उत्तरोत्तर कमी असते .
ज्येष्ठमध, मुलेठी गुण Mulethi Medicinal Properties in Marathi:-
- मधुर, शीत, पित्तशामक, विषनाशक, गुरू वृष्य व जननेद्रियांना बलदायक आहे.
- जेष्टमधाचा उपयोग वामक म्हणजेच उलटी करविण्यासाठी, घाम काढण्यासाठी व लघवीचा रंग पूर्ववत् आणण्यासाठी केला जातो.
- याशिवाय अंग दुखत असल्यास, अंगाला खाज येत असल्यास तसेच जखम भरून येण्यासाठी केला जातो.
- पचनेंद्रिये, स्वर, वर्ण व जननेंद्रिये यांना बलदायक व बुद्धिवर्धक आहे.
- वर्ण्य गुणात्मक म्हणजेच त्वचेचे अरोग्य व रंग सुधारणारी आहे.
ज्येष्ठमध, मुलेठी रासायनिक संघटन :-
Jeshthamadh, Mulethi Chemical composition in Marathi
ज्येष्ठमध, मुलेठी च्या मुळांमध्ये ‘ग्लिसराइजिन‘ नावाचे तत्त्व असते व ते पिवळ्या चूर्ण स्वरुपात मिळते.
हिचे घनसत्त्व ज्येष्ठमधाचा शिरा या नावाने बाजारात मिळते.
याच्या काळ्या कांड्या ( बॅटरीच्या सेलमधील कार्बन रॉडसारख्या दिसणाऱ्या ) मिळतात.
ज्येष्ठमध, मुलेठी औषधी मात्रा डोस:-
जेष्टमध / मुलेठी चूर्ण – ३ ते ५ ग्रॅम (कधी कधी १० ग्रॅम पर्यंंत मात्रा वापरतात.)
ज्येष्ठमध, मुलेठी औषधी उपयोग :-
Jeshthamadh Mulethi Benefits, Uses in Marathi
पचनसंस्थेवर ज्येष्ठमधाचे कार्य –
१ ) वमन – उलटी करविण्यासाठी –
मदनफळ , पिंपळी , इंद्रजव व जेष्टमध यांचा कोमट काढा घ्यावा .
२ ) तोंड येणे –
ज्येष्ठमध , नीलकमल , लोघ व गाईचे दूध यांनी सिद्ध केलेले तिळाचे तेल तोंडाला लावावे व नाकांत घालावे .
३ ) अॅसिडिटी व अल्सर –
आवळा , लोह व ज्येष्ठमधाचे चूर्ण तूप व मधाबरोबर चाटवावे.
४ ) अतिसार ( जुलाब ) –
ज्येष्ठमध, कायफळ , डाळिंबाची साल , लोध्र , खडीसाखर व नीलकमल यांचा काढा बकरीच्या दुधाबरोबर घ्यावा.
५ ) प्रवाहिका ( आव ) –
लाह्या , ज्येष्ठमध, साखर , मध व तांदुळाचे धुवण एकत्र करूनद्यावे.
६ ) गुदपाक –
गुदद्वाराच्या बाजूची जागा लाल होणे, शंखभस्म, ज्येष्ठमध व रसांजन यांचे सूक्ष्म चूर्ण लावावे
७ ) उचकी –
ज्येष्ठमधाचे चूर्ण मधातून चाटवावे .
८ ) उलटीत रक्त येत असल्यास –
ज्येष्ठमध व पांढरा चंदन दुधातून द्यावा .
९ ) स्वरभंग –
ज्येष्ठमधाचे चूर्ण तूप साखरेबरोबर खावे .
श्वसनसंस्था ज्येष्ठमधाचे कार्य –
Jeshthamadh Mulethi Benefits for Respiratory System in Marathi –
१० ) खोकला, दमा व उचकी-
ज्येष्ठमध, पिंपळीमूळ, गूळ, तूप व मध यांचे चाटण करावे.
११ )पित्तप्रधान खोकला –
ज्येष्ठमध, पिंपळीमूळ, दुर्वा व मनुका यांचे चूर्ण तूप व मधाबरोबर द्यावे.
१२ ) क्षयामध्ये रक्ताची उलटी झाल्यास –
ज्येष्ठमध व चंदन एकत्र करून दुधाबरोबर घ्यावे.
१३ ) क्षयातील खोकला –
पिंपळी, ज्येष्ठमध, वंशलोचन, मनुका, रिंगणी व डोरली, मध व तूप एकत्र करून त्यांचा अवलेह घ्यावा.
रक्त व पित्तजन्य आजार ज्येष्ठमधाचे कार्य –
१४ ) रक्तपित्त –
रक्तस्त्राव होण्याची प्रवृत्ती
( १ ) ज्येष्ठमध, मनुका, गंभारी व खडीसाखर यांचा काढा थंड झाल्यावर घ्यावा .
( २ ) गुळवेल, जेष्ठमध, खजूर व गजपिंपळी ह्यांचा काढा मध घालून घ्यावा .
१५ ) ताप –
मोहाचे फूल, नागरमोथा, मनुका, गंभारीची साल, फाळसाची साल, त्रायमाण, वाळा, त्रिफळा व कुटकी ही समान प्रमाणांत घेऊन कुटून गरम पाण्यात रात्रभर ठेऊन सकाळी प्यावी.
१६ ) अंगावर उठणारे पित्त –
ज्येष्ठमध दुधाबरोबर घ्यावे.
१७ ) टक्कल पडणे – Mulethi Benefits for Hair
ज्येष्ठमध, गुंजा, मनुका, तिळाचे तेल व बकरीचे दूध एकत्र करून त्याचा टक्कलावर लेप करावा.
१८ ) बेंबीवर जखम होणे – किंवा – बेंबीतून स्त्राव होणे –
हळद, लोध, प्रियंगु, ज्येष्ठमध, रसांजन, यांनी सिद्ध केलेले तेल बेंबीत टाकावे किंवा त्याच द्रव्यांचे सूक्ष्म चूर्ण जखमेवर चोळावे.
वातजन्य आजार ज्येष्ठमधाचे कार्य :-
१९ ) वातरक्त –
( १ ) ज्येष्ठमध, मनुका व गाईच्या दुधाने सिद्ध केलेले तिळाचे तेल.
( २ ) ज्येष्ठमध व गंभारीच्या रसाने सिद्ध केलेले तिळाचे तेल.
२० ) वारंवार आकडी येणे –
कोहळ्याच्या रसांत ज्येष्ठमध उगाळून द्यावे, जेष्टमध व चंदन एकत्र करूनद्धाबरोबर प्यावे .
स्त्रीयांच्या आजारावर ज्येष्ठमधाचे कार्य –
Jeshthamadh Mulethi Benefits for Women’s Disease in Marathi
२१ ) योनीगत रक्तस्राव -
स्त्रियांमध्ये अंगावरून ( योनीद्वारे ) खूप रक्त जात असल्यास
५-१० ग्रॅम ज्येष्ठमध चूर्ण खडीसाखर घालून तांदुळाच्या धुवणाबरोबर घ्यावे.
२२ ) अंगावरून पांढरे जात असल्यास –
उडीदाचे पीठ, ज्येष्ठमध, विदारीकंद यांचे चूर्ण दूध, साखर व मधाबरोबर घ्यावे.
प्रजननसंस्थेवर ज्येष्ठमधाचे कार्य :-
Jeshthamadh Mulethi Benefits for Reproductive System in Marathi
२३ ) शुक्रवर्धक व स्तंभक –
शुक्रवर्धक व स्तंभक म्हणून शुक्रमेहात उपयोगी.
विशेषत : ज्येष्ठमधाचे चूर्ण तूपमधात घेऊन व दूध प्यायले असता वाजीकरण कार्य होते.
२४ ) जननेंद्रियांना बलदायक –
ज्येष्ठमध चूर्ण, तूप किंवा मधात एकत्र करून दुधाबरोबर प्यावे.
२५ ) बुद्धिवर्धक –
Jeshthamadh Mulethi Benefits for Mental Health in Marathi
ज्येष्ठमध चूर्ण दुधाबरोबर घ्यावे.
डोळ्यांच्या आजारावर ज्येष्ठमधाचे कार्य :-
Jeshthamadh Mulethi Benefits for skin in Marathi
२६ ) डोळ्यांना टॉनिक –
सप्तामृत लोह – ज्येष्ठमध, त्रिफळाचूर्ण, लोहभस्म, मध व तूप गाईच्या दुधाबरोबर घ्यावे.
२७ ) डोळे धुण्यासाठी –
ज्येष्ठमध, दारूहळद, लाक्षा, कमळ, नीलकमल यांचे पाणी व अंगावरचे दूध, त्यामुळे डोळ्यातील जखम भरून येते. तसेच डोळ्यांचे आरोग्य सुधारते.
त्वचा – Mulethi Benefits for skin in Marathi:-
२८ ) वर्ण्य – त्वचेचा रंग सुधारण्यासाठी –
ग्रीष्म व शरदऋतूत मुखलेपासाठी (चेहर्यावर लेप) यष्टिमधूचा / ज्येष्ठमधाचे उपयोग इतर द्रव्यांबरोबर केला जातो.
याने त्वचा तजेलदार व रक्तकमलासारखी गुलाबी सुंदर होते.
चंदनबलाक्षादि तेलाने त्यातील यष्टिमधूच्या अस्तित्वामुळे ते तेल वर्ण्य होते.
२९ ) जखम ( त्वचा ) –
ज्येष्ठमधच्या काढ्याने सिद्ध केलेल्या दुधाने जखम वारंवार धुवावी व नंतर जेष्टमध सिद्ध तूप लावावे.
३० ) मूत्रकृच्छ्र –
लघवी करताना त्रास होणे याला मूत्रकृच्छ्र असे म्हणतात. मूत्रकृच्छ्र आजारात ज्येष्ठमधाचे बारीक चूर्ण दुधात कालवून द्यावे.