घरगुती उपाय

स्वयंपाक घरातील औषधे, Home Remedies from the Kitchen in Marathi.

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

अनुक्रमणिका

ओवा औषधी उपयोग Parsley use in Marathi:-

१ ) व्यसनमुक्ती साठी ओवा:-
जे जास्त दारू पित असतील आणि अल्कोहलयुक्त पेय ( दारू ) सोडू इच्छितात,
त्यांनी अर्धा किग्रॅ ओवा ४ लीटर पाण्यात शिजवावा आणि जवळपास २ लीटर पाणी शिल्लक राहिल्यावर गाळून ठेवावे .

हे पाणी दरारोज जेवणाच्या आधी एक एक कप प्यावे . यामुळे लीवरचे कार्य सुधारेल, भूक वाढेल, व दारू पिण्याची इच्छा कमी होईल .

२ ) २-३ ग्रॅम ओव्याला थोडेसे भाजून सकाळ – सायंकाळ कोमट पाणी किंवा दूधाबरोबर घेतल्यास सर्दी , पडसे व पोटाच्या रोगात फायदा होतो .

३ ) २-३ ग्रॅम ओव्याची पावडर करून ताकाबरोबर घेतल्यास पोटातील कृमी नष्ट होतात .

४ ) १० ग्रॅम ओव्याला १ लीटर पाण्यात शिजवून एक चतुर्थांश शिल्लक राहिल्यावर गाळून घ्यावे.

सकाळ – सायंकाळ प्रसूति झालेल्या स्त्रीला पाजल्यास प्रसूतिजन्य रोग होत नाही .
यामुळे वाढलेले शरीर आपल्या मूळ स्थितीत परत येते .

५ ) १० ग्रॅम ओव्याला बारीक वाटून त्यात अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यावा, त्यात ५ ग्रॅम तुरटी पावडर व ताक मिसळावे.

केसांमध्ये चोळल्यास केसातील कोंडा बरा होतो , त्याच बरोबर लिखा आणि उवा मरतात .

वेलदोडे / वेलची औषधी उपयोग Cardamom use in Marathi:-

१ ) तोंंड येणे / मुखपाक :-

तोंडात छाले असतील तर वेलची वाटून त्यात मध मिसळून लावल्यास छाले बरे होतात.

२ ) लघवीची जळजळ व थेंंब थेंब लघवी होणे :-

२-३ ग्रॅम वेलची वाटून त्यात खडीसाखर मिसळून खाल्याल्यास लघवीची जळजळ व थेंंब थेंब लघवी होण्याच्या समस्येत त्वरीत लाभ होतो.

३ ) उचकी

उचकी थांबत नसेल तर २ वेलची व ३ लवंगांना चहाप्रमाण ने पाण्यात उकळवून प्यावे ,
उचकी थांबेल . जर बरी झाली नाही तर हा प्रयोग दिवसातून ३-४ वेळा करू शकतात .

काळी मिरी औषधी उपयोग Black pepper use in Marathi:-


१ ) खोकला :-

अ) जास्त खोकल्यामुळे जर झोपू शकत नसाल तर १-२ काळी मिरी तोंडात ठेवून चोखाव्या, खोकल्यात आराम मिळेल आणि झोप देखील येईल .

किंवा

ब) थोडे आले व ३-४ काळी मिरी एकत्र करून काढा बनवून प्यायल्यास खोकल्यात त्वरीत लाभ होतो . चहाच्या ऐवजी याचा वापर करू शकता .

२ ) शीतपित्त :-

शीतपित्त झाल्यावर ४ ते काळी मिरी वाटून त्यात १ चमचा कोमट तूप आणि साखर मिसळून प्यायल्यास लाभ होतो .

३ ) खोकला व अशक्तपणा :-

खोकला व त्याच्या बरोबर अशक्तपणाही असेल तर २० ग्रॅम काळी मिरी, १०० ग्रॅम बदाम , १५० ग्रॅम कच्ची साखर किंवा खडीसाखर मिसळून, कुटून पावडर बनवून बाटलीत भरून ठेवावी .

५ ग्रॅम पावडर सकाळ – सायंकाळ कोमट दूध किंवा कोमट पाण्याबरोबर घेतल्यास जुना खोकला बरा होतो. यामुळे अशक्तपणातही फायदा होतो .

४ ) उचकी व डोके दुखी :-

उचकी किंवा डोके दुखीत काळी मिरीच्या ३ ते ४ दाण्यांना जाळून त्याचा धूर हुंगल्यास फायदा होतो.

जिरे औषधी उपयोग Cumin use in Marathi:-


१ ) जुलााब –

अ ) जेव्हा कधी जुलाब होतील , तेव्हा 4 – 6 ग्रॅम जिरे हलके भाजून , वाटून दही किंवा लस्सीबरोबर घेतल्यास त्वरीत लाभ होतो.

ब ) भाजलेले जिरे व तेवढीच बडीशोप भाजून , वाटून १ – १ चमचा पाण्याबरोबर दिवसातून ३ – ४ वेळा घेतल्यास मुरडा मारून होणाऱ्या जुलाबात फायदा होतो .

२ ) आतड्यांमधील कृमी / जंत

५ – ७ ग्रॅम जि-याला ४०० मिली पाण्यात शिजवून पाव भाग (१००मिली) शिल्लक राहिल्यावर दिवसातून दोन वेळा प्यायल्यास आतड्यांमधील कृमी मरतात.

३ ) मूत्र – रोग व प्रदर रोग :-

३-४ ग्रॅम जिरे पाण्यात उकळवून गाळून खडीसाखर मिसळून प्यायल्यास मूत्र – रोग व प्रदर रोग इत्यादीत फायदा होतो .

दालचीनी औषधी उपयोग Cinnamon use in Marathi:-

१ ) दालचीनी पचन शक्तीला वाढवते आणि सर्दी – पडसे , खोकल्यात फायदा करते.
२ ) दालचीनीचा फार बनवून त्यात आले , लवंग आणि वेलची मिसळून प्यायल्यास वातजन्य आणि कफजन्य रोगांचे शमन होते.
३ ) दालचीनी चूर्णात मध मिसळून घेतल्यास श्वास – खोकल्यात फायदा होतो.

जिरे, दालचीनी, धणे, वेलची, मिरी, स्वयंपाक घरातील औषधे, Home Remedies from the Kitchen in Marathi. www.marathidoctor.com, Dr.Vivekanand Ghodake

धणे औषधी उपयोग Coriander use in Marathi:-

१ ) आम्ल पित्त –
धणे वाटून, त्यात त्याच्यापेक्षा ४ पट खडीसाखर मिसळून बाटलीत भरून ठेवावे . १ – १ चमचा दोन वेळा पाण्याबरोबर घेतल्यास आम्ल पित्तामध्ये अत्यंत फायदा होतो.

यामुळे लघवी देखील मोकळी होते.

२ ) रक्तप्रदर व उष्णता –

३-४ ग्रॅम धणे ४०० मिली पाण्यात शिजवून १०० मिली शिल्लक राहील, तेव्हा गाळून थंड करावे.

त्यात थोडा मध मिसळून प्यायल्यास रक्तप्रदर किंवा शरीरात होणाऱ्या उष्णतेमध्ये फायदा होतो.

३ ) तारुण्यपिटिका व सुरकुत्या –
४-५ ग्रॅम धणे व कोथिंबीरची थोडी पाने वाटून चेहऱ्यावरत लावल्यास चेहरा सुंदर आणि तारुण्यपिटिका व सुरकुत्या विरहित होतो.

४ ) ज्यांना काम – वासना जास्त त्रस्त करत असेल , त्यांनी 2 – 3 ग्रॅम धणे पावडर काही काळापर्यंत नियमितपणे थंड पाण्याबरोबर घ्यावी .
ज्यामुळे काम वासना कमी होते.

५ ) दररोज ५ते ७ कडुनिंबाच्या पानांना चावून वरून थोडे पाणी प्यायल्यास कामवासना शांत होते. असे करण्याने तीव्र आम्लपित्त ( हायपरअ‍ॅसिडिटी ) देखील त्वरीत शांत होते.

मेथी औषधी उपयोग Fenugreek use in Marathi:-

१ ) मधुमेह –

१ चमचा मेथी दाणे रात्री १ कप पाण्यात भिजवावेेे, सकाळी ते पाणी पिऊन मेथी दाणे चावून खावे. यामुळे मधुमेह व त्यामुळे होणारी दुर्बलता, वात रोग आणि हृदय रोगांमध्येही फायदा होईल.

२ ) सांधे दुखी , सर्व प्रकारचे वात रोग व सूज –
मेथी दाणे, हळद आणि मुंठ सम प्रमाणात घेऊन त्याची पावडर बनवावी. १-१ चमचा पावडर सकाळ – सायंकाळ कोमट पाणी किंवा कोमट दूधाबरोबर घ्यावी.
यामुळे सांधे दुखी, सर्व प्रकारचे वात रोग व सूजेत फायदा होतो.

जुन्या आर्थरायटिसच्या रोग्यांनी नियमितपणे दीर्घकाळपर्यंत उपरोक्त पावडर घेतल्यास आशादायक लाभ होतो.

३ ) आर्थरायटिस व मधुमेहाच्या रोग्यांनी मेथीचे दाणे मोड आणून दररोज खाल्यासही फायदा होईल.
४ ) मेथी दाणे भाजून , वाटून कॉफीप्रमाणे काढा बनवून त्यात थोडे आले मिसळून प्यायल्यास सदी, कफात फायदा होतो.

मोहरी औषधी उपयोग Mustard use in Marathi:-

१ ) मोहरी बारी वाटून सूजयुक्त जागेवर लावून पट्टी बांधल्यास सूजेत फायदा होतो.
२ ) डोके दुखीत मोहरी वाटून कपाळावर लेप केल्यास लगेच डोकेदुखी थांबते.

३ ) मोहरीच्या चूर्णात आसव ( व्हिनेगर ) मिसळून वाटावे. याला त्वचा रोग ( गजकर्ण, खाज, खरूज ) मध्ये लावल्यास लाभ मिळतो.

लवंग औषधी उपयोग Clove use in Marathi:-

१ ) तीव्र डोके दुखी -अचानक तीव्र डोके दुखी किंवा अर्धशिशीमुळे दुखत असेल तर ४-५ ग्रॅम लवंग वाटून थोडे पाणी मिसळून कपाळावर ( कानशीलांवर ) लावल्यास फायदा होतो.
२ ) लवंग धोडी भाजून चोखत राहिल्यास खोकल्यात चमत्कारीक फायदा होतो.

३ ) शरीरात कोठेही जखम सडली किंवा फोड झाला असेल तर 5 – 7 लवंग व हळद वाटून लावल्यास फायदा होतो.
४ ) दाढ किंवा दात दुखीत लवंग दुखत असलेल्या जागेवर दाबल्यास किंवा पावडर करून त्या जागेवर लावल्यास वेदना शांत होते.

हळद औषधी उपयोग Turmeric use in Marathi:-

१ ) हळद , मीठ आणि थोडे मोहरीचे तेल एकत्र करून बोटाने दररोज हिरड्यांची मालिश करणे पायरिया, तोंडाची दुर्गंध व दाताच्या रोगांमध्ये अत्यंत लाभदायक असते.

२ ) १ चमचा हळद पावडर दररोज १ ग्लास कोमट दूधात घालून प्यायल्यास शरीराच्या रोग प्रतिरोधक क्षमतेमध्ये वाढ होते. सर्दी , पडसे , इत्यादी होत नाही . शरीराचे दुखणे, जखम व वेदनेतही लाभ होतो.
३ ) अर्धा चमचा हळद थोडी भाजून घ्यावी मधात मिसळून चाटल्यास गळा बसणे किंवा खोकल्यात त्वरीत फायदा होतो.

४ ) जर कोठे कापले किंवा भाजले तर हळद पावडर लावल्यास रक्तस्त्राव बंद होतो. जळलेल्या भागावर फोड येत नाही.
५ ) शरीरात कोठेही लचक / मुरगळल्यास एक जाडी पोळी बनवून, त्यावर मोहरीचे तेल व हळद टाकून, कोमट पोळीला लचक आलेल्या जागेवर बांधल्यास सूज व मुरगळण्यात त्वरीत फायदा होतो.

६ ) चेहऱ्यावरील सुरकुत्या किंवा मुरुमांमध्ये हळद , चंदन आणि कडुनिंबाच्या पानांना वाटून लावल्यास मुरुम बरे होऊन चेहऱ्याची सुंदरता देखील वाढते.

हिंग औषधी उपयोग Asafoetida use in Marathi:-

१ ) हिंग पाण्यात वाटून बेंबीच्या जवळपास लेप केल्यास पोट फुगी आणि दुखण्यात फायदा होतो.
२ ) हिंग दूधात वाटून वक्ष – भागावर लेप करण्याने सर्दी – पडशात फायदा होतो.

कोरफड औषधी उपयोग Aloe use in Marathi:-

१ ) कोरफडीच्या गराला काढून , तुकडे बनवून भाजीप्रमाणे शिजवून खाल्यास संधिवात , वायु रोग, पोट व यकृताच्या रोगांचे शमन होते.
२ ) कापलेल्या किंवा जळालेल्या जागेवर त्याच वेळेस कोरफड जेल किंवा रस लावल्यास फोड येत नाही, रक्त थांबते आणि जखम लवकर बरी होते.

३ ) ४-६ चमचे कोरफडचा रस दररोज प्यायल्यास पोटाचे सर्व रोग व शरीरांतर्गत अशक्तपणामध्ये फायदा होतो.
४ ) कोरफड जेल चेहऱ्यावर लावल्याने कांती वाढते आणि सुरकुत्या , मुरुम , पुटकुळ्यांमध्ये फायदा होतो.
५ ) हाता – पायांच्या रूक्षतेमध्ये कोरफड जेल लावल्यास त्वरीत लाभ होतो.

६ ) कोरफडीच्या ताज्या पानांचे साल काढून आतील गराचा भाग किंवा रस काढून २० ते ४० मिली प्रमाणात प्यावा. हा सर्व वात रोग, सांधे दुखी, पोटाचे रोग, आम्लपित्त, मधुमेह, इत्यादीत लाभदायक आहे.

आले औषधी उपयोग Ginger use in Marathi:-

१ ) जेवणाच्या सुरुवातीला ३-४ घासांबरोबर थोडे आले खाल्याने भूक वाढते.
जेवणानंतर थोडे आले खाल्याने जेवणाचे पचन होते .
२ ) २ चमचे आल्याच्या रसात थोडा मध मिसळून घेतल्यास सर्दी , पडसे व खोकल्यात लाभ होतो.

३ ) जर थंडीमुळे दातांमध्ये दुखत असेल तर आल्याच्या एका तुकड्याला दातामध्ये दाबून ठेवल्यास त्वरीत लाभ मिळतो. आले भाजून त्याला चोखल्यास खोकल्यात लाभ होतो .
४ ) २-३ ग्रॅम सुंठ पावडरमध्ये अर् किंवा १ ग्रॅम दालचीनी मिसळून दूध किंवा पाण्याबरोबर घेतल्यास हृदयशूल ( एन्जायना ) मध्ये लाभ होतो.
५ ) हे हृदयाला शक्ती प्रदान करून पचन क्रियेलाही ठीक ठेवते आल्याच्या रसात लिंबाचा रस मिसळून पाजल्यास मंदाग्नी दूर होऊन भूक वाढत.

६ ) २ ग्लास पाण्यात ५ ग्रॅम आल्याला कुटून आणि त्याला थोडे उकळवून थोडा लिंबाचा रस व मध टाकून सकाळी उपाशी पोटी हे कोमट पाणी प्यायल्यास स्थूलता कमी होते.

लिंबू औषधी उपयोग Lemon use in Marathi:-

१ ) लिंबाच्या रसात मध मिसळून चेहऱ्यावर लावल्यास ब्लीचिंग केल्यामुळे होत असलेल्या चेहऱ्यावरील मुरुम – पुटकुळ्यांमध्ये फायदा होईल.
२ ) ज्या स्त्रियांना अति रक्तस्त्राव किंवा रक्त मूळव्याधाची समस्या असेल तर,

त्यांनी १ लिंबू १ कप पिण्यालायक कोमट दूधात पिळून, दूध फाटण्यापूर्वी प्यावे.
( हा प्रयोग सकाळी उपाशी पोटी करावा ) यामुळे रक्तस्त्रावात त्वरीत फायदा होईल . हा चमत्कारिक प्रयोग आहे. हा प्रयोग ३ – ४ दिवस करावा.

जर पूर्ण लाभ मिळाला नाही तर डॉक्टरांना अवश्य दाखवावे.

३ ) १० मिली लिंबाच्या रसात २० मिली कांद्याचा रस व आवडीनुसार मध मिसळून प्यायल्यास लीवरचे रोग, मंदाग्नी व अजीर्णात फायदा होतो.

४ ) लिंबाच्या रसात थोडे आले व थोडे मीठ मिसळून जेवणाबरोबर घेतल्यास भूक वाढते. यामुळे पचन क्रिया देखील सुधारते.
५ ) गाडीत प्रवास करताना ज्यांना उलटी होते किंवा मळमळते. त्यांनी थोडे मीठ लावून लिंबू चोखल्यास लाभ होतो.

मध औषधी उपयोग Honey use in Marathi:-

१ ) अर्धा चमचा दालचीनी पावडर आणि एक चमचा मधाच्या नियमित वापराने रोग प्रतिरोधक क्षमतेची वाढ होते आणि हे सायनस व तीव्र सर्दीत लाभदायक आहे.

२ ) डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी २ चमचे मध गाजराच्या रसात मिसळून नियमित घ्यावा.
३ ) सर्दी – पडसे , खोकल्यात २ चमचे मध आणि त्याच्या सम प्रमाणात आल्याचा रस मिसळून वारंवार चाटावे.
४ ) काळी मिरी पावडर, मल आणि आल्याचा रस सम प्रमाणात दररोज दिवसातन तीन वेळा घेतल्यास श्वास (दमा) व खोकल्यात आराम मिळतो.

५ ) रक्तदाबाच्या नियंत्रणासाठी १ चमचा लसूण रसात, २ चमचे मध मिसळून नियमित घ्यावा. .

६ ) १ ग्लास कोमट पाण्यात २ चमचे मध आणि १ चमचा लिंबाचा रस मिसळून रोज सकाळ – सायंकाळ उपाशी पोटी घेतल्यास स्थूलता कमी होते.
७ ) रोज एक चमचा मध घेतल्याने मनुष्य दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगू शकतो.

कांदा औषधी उपयोग Onion use in Marathi:-

१ ) कान दुखी किंवा पडशात कच्च्या कांद्याला कोमट करून त्याचा रस काढून ४-४ थेंब कान व नाकात टाकल्यास त्वरीत लाभ होतो.

२ ) जेथे जास्त उष्णता किंवा उष्माघाताचा प्रकोप होत असेल , जर उन्हात जायचे किंवा फिरायचे असेल तर एक कांदा खिशात ठेवल्यास किंवा गळ्यात बांधल्यास उष्माघाताची भीती राहत नाही.

३ )एका पुरचुंडीत ८-१० कांदे बांधून घराच्या बाहेर टांगल्यास हवेतून पसरणारे अनेक प्रकारचे जीवाणुजन्य रोग व व्हायरसपासून लहान मुलांना वाचवण्यात मदत मिळते.

४ ) छोटी देवी किंवा मोठी देवी रोग झाला तर १-१ चमचा कांद्याच्या रसात २-३ काळी मिरी वाटून काही दिवसांपर्यंत दिवसातून २-३ वेळा पाजल्यास देवी रोग बरा होतो, नंतर त्याचे व्रणही राहत नाही.

५ ) कच्च्या कांद्याला कोमट करून फोड इत्यादीवर बांधल्यास त्वरीत वेदनेचे शमन होते आणि फोड पिकतो व त्याचा पू देखील सहज बाहेर पडतो.

६ ) पोटात दुखत असल्यास पाण्यात कांद्याचा रस, लिंबाचा रस व मीठ मिसळून पाजल्यास, त्वरीत आराम मिळेल.

स्वयंपाक घरातील औषधे, Home Remedies from the Kitchen in Marathi.ओवा, वेलदोडे/ वेलची, काळी मिरी, जिरे, दालचीनी, धणे, मेथी, मोहरी, लवंग, हळद, हिंग, कोरफड, आले, लिंबू, मध, कांदा, लसूण, पंचरस, गुळवेल, तुळस, यांचा औषधी उपयोग,

लसूण औषधी उपयोग Garlic use in Marathi:-

१ ) लसूणच्या एका पाकळीचे तुकडे करून रात्री पाण्यात भिजवावे. पहाटे उपाशी पोटी घेतल्यास कोलेस्टरॉल , हृदय रोग व संधिवातामध्ये फायदा होतो.

२ ) ५० ग्रॅम लसूण कुटून १०० ग्रॅम मोहरीचे तेल, तिळाचे तेल किंवा ऑलिव्हच्या तेलात शिजवून, गाळून ठेवावे. याच्या वापराने सूज व दुखण्यात फायदा होतो.

हा एक चांगला उपचार आहे.

३ ) कानात दुखल्यावर या तेलाचे ३-३ थेंब कानात टाकू शकता.

४ ) सर्दिमुळे नाक बंद झाल्यास लसणाचा वास घ्यावा.

पंचरस औषधी उपयोग Panchras use in Marathi:-

गुळवेल रस १० ते २० मिली, कोरफड स्वरस १० ते २० मिली, गव्हांंकुराचा रस १० ते २० मिली, तुळस ७ पाने आणि कडुनिंबाची ७ पाने सकाळ – सायंकाळ उपाशी पोटी घेतल्यास कॅन्सरपासून ते सर्व असाध्य रोगांमध्ये अत्यंत लाभ होतो.

हे पंचरस शरीराची शुद्धि व रोग प्रतिरोधक क्षमतेच्या वाढिसाठी अत्यंत लाभदायक आहे.

गुळवेल औषधी उपयोग Heart-leaved moonseed use in Marathi:-

१ ) सर्दी, पडसे, ताप, इत्यादीत एक बोट जाड व ४ ते ६ इंच लांब गुळवेल घेऊन ४०० मिली पाण्यात उकळवावी. १०० मिली शिल्लक राहिल्यावर ते पाणी प्यावे.

हे रोग प्रतिरोधक क्षमतेला ( इम्यून सिस्टमला ) बळकट करून त्रिदोषांचे शमन करते व सर्व रोग, वारंवार होणारी सर्दी – पडसे, ताप, इत्यादीला बरे करते.

तुळस औषधी उपयोग Basil use in Marathi:-

सकाळी उपाशी पोटी तुळशीची ५ ते १० ताजी पाने पाण्याबरोबर घ्यावी. यात भरपूर प्रमाणात अँटी – ऑक्सीडेंट असतात.

हे रोग प्रतिरोधक क्षमतेला वाढवून सर्दी, पडसे, तापापासून ते कॅन्सरपर्यंत सर्वात लाभदायक आहे.

काही अन्य औषधी उपयोग Other use in Marathi:-

१ ) २-३ ग्रॅम दालचीनी व त्यात २-३ लवंग टाकून पाण्याला चहाप्रमाणे उकळवून प्यायल्यास हृदयशूलात लाभ होतो.

हृदयाची वाढलेली धडधड सामान्य होते. तसेच यामुळे जीवाणु संसर्गातही फायदा होतो.

२ ) वेलची, दालचीनी आणि सुंठ यांची १ ग्रॅम पावडर नियमितपणे दूधात टाकून किंवा पाण्याबरोबर घेतल्यास हृदयाला शक्ती मिळते.

रोगप्रतिरोधक क्षमता वाढते.

३ ) कारले, काकडी आणि टोमॅटोचा ताजा एक कप रस सकाळी उपाशी पोटी प्यावे. त्यामुळे मधुमेहात फायदा होतो आणि पचन क्रिया ठीक राहते.
४ ) दुधी भोपळ्याचा ताजा रस दररोज सकाळी प्यायल्यास हृदयासाठी व सामान्य आरोग्यासाठी ( जनरल हेल्थ ) अत्यंत चांगला असतो. यात सफरचंदाचा रसही मिसळून पिक शकता.

५ ) सर्दी असेल तर थोडा आल्याचा रस किंवा सुंठ मिसळून प्यावे. हा कोलेस्टरॉलला कमी करतो.
६ ) ज्यांना तीव्र ताप असेल त्यांना औषधांबरोबर सामान्य उपचाराच्या रूपात दुधी भोपळ्याला गोल कापून पायाच्या तळव्यांमध्ये ठेवायला पाहिजे. यामुळे रोग्याला शांती मिळते, ताप लवकर उतरतो.

७ ) ज्यांना रक्ताल्पता, दुर्बलता असेल, त्यांनी डाळिंब, सफरचंदाच्या रसाबरोबर पालकाचा रस मिसळून प्यायल्यास लवकर फायदा मिळेल.
८ ) ज्यांचे पोट योग्य प्रकारे साफ होत नसेल त्यांनी पपई जास्त खायला पाहिजे
त्यामुळे पोट साफ होईल व लीवरचे आरोग्य चांंगले राहील.

९ ) ५-७ बदाम, ५-१० ग्रॅम अक्रोड आणि ४-५ काळी मिरीला रात्री पाण्यात भिजवून सकाळी वाटून किंवा चांगल्या प्रकारे चावून खाल्यास स्मरण शक्ती व शारीरिक शक्ती वाढते.

१० ) १०-१० ग्रॅम मनुका किंवा बेदाणे व ४-५ अंजीर आणि ८-१० बदाम रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खावे. हे बलकारक व पोटाच्या रोगांमध्ये लाभदायक आहे.

११ ) मुनका व अंजीर दूधात शिजवून खाल्यास पचन क्रियेत सुधारणा आणि बलाची वाढ होऊन दुर्बलता दूर होते.
१२ ) थंडीच्या प्रदेशात / दिवसांत खारीक किंवा खजूर दूधात शिजवून खाणे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे.

By

डॉ.विवेकानंद वि. घोडके

Dr.Vivekanand V. Ghodake

View Comments

Share
Published by
Tags: Aloe in MarathiAloe use in MarathiAsafoetida in MarathiAsafoetida use in MarathiBasil in MarathiBasil use in MarathiBlack pepper in MarathiBlack pepper use in MarathiCardamom in MarathiCardamom use in MarathiCinnamon in MarathiCinnamon use in MarathiClove in MarathiClove use in MarathiCoriander in MarathiCoriander use in MarathiCumin in MarathiCumin use in MarathiDr.Vivekanand V. GhodakeFenugreek in MarathiFenugreek use in MarathiGarlic in MarathiGarlic use in MarathiGinger in MarathiGinger use in MarathiHeart-leaved moonseed in MarathiHeart-leaved moonseed use in MarathiHome Remedies from the Kitchen in MarathiHoney in MarathiHoney use in MarathiLemon in MarathiLemon use in MarathiMustard in MarathiMustard use in MarathiOnion in MarathiOnion use in MarathiPanchras in MarathiPanchras use in MarathiParsley in MarathiParsley use in MarathiTurmeric in MarathiTurmeric use in Marathiआलेओवाऔषधी मसालेकांदाकाळी मिरीकोरफडगुळवेलजिरेडॉ.विवेकानंद वि. घोडकेतुळसतोंंड येणे / मुखपाकदालचीनीधणेपंचरसमधमसाले उपयोगमसाल्याचे औषधी उपचारमेथीमोहरीयांचा औषधी उपयोगलवंगलसूणलिंबूवेलदोडे/ वेलचीव्यसनमुक्ती साठी ओवास्वयंपाक घरातील औषधेहळदहिंग

Recent Posts

जागतिक आरोग्य दिन २०२४ – माझे आरोग्य, माझे हक्क

जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास जागतिक आरोग्य दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो.… Read More

01/04/2024

राष्ट्रीय जंतनाशक दिन २०२४ प्रश्न उत्तरे Deworming day FAQ in Marathi

सन २०२३ - २०२४ राष्ट्रीय जंतनाशक दिन १३ फेब्रुवारी २०२४ व २० फेब्रुवारी २०२४ (मॉप… Read More

11/01/2024

गरोदरपणातील मधुमेह GDM in Marathi

गरोदरपणातील मधुमेह (GDM) म्हणजे काय? Gestational diabetes in Marathi :- गर्भधारणेदरम्यान जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण… Read More

07/01/2024

पोटातील जंत सर्व माहिती Roundworm Tapeworm Worm Meaning in Marathi

जंत ( Worm in Marathi ) होणे ही आपल्या देशातली महत्त्वाची समस्या आहे. ग्रामीण भागात… Read More

05/01/2024

उष्माघात कारणे लक्षणे प्रतिबंध उपचार Heat Stroke Meaning in Marathi

उष्माघात कारणे, उष्माघात लक्षणे, उष्माघात प्रतिबंध, उष्माघात उपचार, उष्माघात घरगुती उपाय, मराठी माहिती, Heat Stroke… Read More

19/03/2023